सांबर रेसिपी मराठी Sambar Recipe in Marathi

Idli Sambar Recipe in Marathi सांबर रेसिपी मराठी सांबर हा एक दक्षिण भारतीय आमटी किंवा सूप सारखा प्रकार आहे जो तुरीच्या किंवा मुगाच्या डाळी पासून बनवला जातो. या सांबर मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातल्या जावू शकतात जसे की टोमॅटो (tomato), बटाटा (potato) वांगी (bringle) आणि शेवग्याच्या शेंगा (drum stick). हा लोकप्रिय दक्षिण भारतीय प्रकार इडली, डोसा, मेदु वाडा, उतप्पा या सर्व नाश्त्याच्या पदार्थांसोबत खाल्ला जातो. सांबर हि अशी रेसिपी आहे जी भारतामध्ये सर्व ठिकाणी आवडीने खाल्ली जाते. देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी सांबर बनवण्याच्या पध्दती ह्या वेगवेगळ्या आहेत.

जसे कि तामिळनाडू मध्ये सांबर बनवण्याची पध्दत हि वेगळी आहे, महाराष्ट्रामध्ये सांबर बनवण्याची पध्दत वेगळी आहे आणि महाराष्ट्रामध्ये याला आमटी म्हणतात तसेच कर्नाटकामध्ये वेगळ्या पध्दतीने समाबर बनवले जाते.

sambar recipe in marathi
sambar recipe in marathi

सांबर रेसिपी मराठी – Sambar Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० मिनिटे
पाककलादक्षिण भारतीय

सांबर या आमटीचे नाव सांबर किंवा सांभार कसे पडले

सांबर किंवा सांभार हा पदार्थ दक्षि भारतीय असून या पदार्थाबद्दल असे म्हंटले जाते कि शहाजी महाराजांना स्वयंपाकाची आवड होती आणि ते एके दिवशी आमटी तयार करण्याचा प्रयत्न करत होते आणि ती आमटी कोकम वापरून करत होते आणि कोकम हा त्यामधील एक मुख्य घटक होता.

पण त्यावेळी कोकम उपलब्ध नव्हते म्हणून त्यांनी त्या आमटीमध्ये चिंचेचे कोकम वापर केला आणि त्यांनी तुरडाळ, चिंच आणि भाज्या वापरून आमटी बनवली. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज तंजावर येथे शहाजी महाराजांना भेट देण्यासाठी गेले त्यावेळी त्यांनी त्या आमटीची चव चाखली आणि त्यांना ती आमटी खूप आवडली आणि त्यांच्या संभाजी या नावावरून सांभार किंवा सांबर हे नाव पडले. 

सांबर बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

सांबर हे तुरडाळ, सांबर पावडर आणि चिंच या महत्वाच्या साहित्यापासून बनवले जाते.

 • तुरडाळ : तुरडाळ हे एक महत्वाचा घटक आहे कारण डाळीशिवाय सांबर बनूच शकत नाही. सांबर करतेवेळी तुरडाळ ही पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेवून ती चांगली मऊ शिजवून घ्यावी. डाळ मऊ शिजवल्यामुळे आपले सांबर चांगले होण्यास मदत होते.
 • सांबर पावडर : सांबर पावडर आपण जर सांबर मध्ये वापरले तर सांबर खूप चविष्ट लागते. सांबर पावडर आपण बाजारातून विकत अणु शकतो किंवा घरामध्ये देखील बनवू शकतो.
 • चिंच : चिंच हे देखील सांबर मधील एक महत्वाचे साहित्य आहे ज्यामुळे सांबराला आंबट पणा येतो त्यामुळे सांबर चांगले लागते.

सांबर रेसिपी कशी बनवायची – how to make sambar recipe in marathi

sambar kasa banvaycha सांबर हा पदार्थ दक्षिण भारतीय प्रकार असून हा पदार्थ भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिध्द आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी थोड्याश्या फरकाने बनवला जातो. सामान्यपणे बनवला जाणारा सांबर हा पदार्थ तुरडाळ, चीच कोकम आणि सांबर पावडर पासून बनवला जातो. आता आपण सांबर हा पदार्थ कसा बनवायचा आणि त्यासाठी कोणकोणत्याची आवश्यकता असते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० मिनिटे
पाककलादक्षिण भारतीय

सांबर बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make sambar 

सांबर हा पदार्थ अगदी सोप्या पध्दतीने बनवला जातो आणि हा पदार्थ बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही जे सहजा सहजी बाजारामध्ये मिळू शकत नाही. सांबर बनवण्यासाठी आपल्याला डाळ, चीच, सांबर पावडर, लाल मिरची पावडर आणि मीठ हे महत्वाचे साहित्य लागते. खाली आपण सांबर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

 • १ वाटी तुरडाळ.
 • २ चमचे सांबर मसाला पावडर.
 • १ मोठा टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
 • २ मोठे कांदे ( बारीक चिरलेले ).
 • २ शेवग्याच्या शेंगा ( तुकडे ).
 • १ चमचा आलं लसून पेस्ट.
 • २ चमचे चिंच कोळ.
 • १/४ चमचा हिंग.
 • १/२ चमचा हळद.
 • २ चमचे लाल मिरची पावडर.
 • १ चमचा मोहरी.
 • १/२ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर.
 • मीठ ( चवीनुसार ).
 • २ मोठे चमचे तेल.

सांबर बनवण्यासाठी केली जाणारी कृती – instructions to make sambar recipe 

सांबर बनवण्याची केली जाणारी कृती खूप सोपी असते. आत्ता आपण सांबर बनवण्यासाठी केली जाणारी कृती पाहूयात.

 • सांबर बनवताना सर्वप्रथम तुरडाळ घ्या आणि ती स्वच्छ निवडून घेवून ती चांगल्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या.
 • मग स्वच्छ धुतलेली डाळ कुकरमध्ये घाला आणि त्यामध्ये २ ते अडीच वाटी घालून त्याचे झाकण घालून तो कुकर गॅसवर मध्यम आचेवर ठेवून त्याला चार ते पाच शिट्या द्या त्यामुळे डाळ चांगली आणि मऊ शिजण्यासा मदत होईल.
 • चार ते पाच शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा आणि थोडा वेळ ( १० ते १५ मिनिटे ) कुकर झाकण न उघडता तसेच ठेवा त्यामुळे डाळ चांगली शिजेल.
 • आता एक कढई घ्या आणि ती मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवा आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम होईपर्यंत वाट पहा एकदा तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी टाका आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच हिंग, आलं लसून आणि कांदा घाला आणि ते चांगले भाजून घ्या.
 • त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि ते चांगले भाजून त्याच्यावर झाकण घालून ते २ ते ३ मिनिटे शिजवून घ्या आणि मग त्यावरील झाकण कडून त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घाला आणि ते चांगले भाजून घ्या.
 • मग त्यामध्ये चिंचेचा कोळ, लाल तिखट, हळद, सांबर पावडर आणि मीठ ( चवीनुसार ) आणि ते चांगले मिक्स करा आणि थोडा वेळ ते चांगले मिक्स करत रहा.
 • मग त्यामध्ये शिजवलेली डाळ घाला आणि ते सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि जर डाळ घातल्यानंतर ते खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडेसे पाणी घाला आणि ते एक ७ ते ८ मिनिटे मध्यम आचेवर चांगले शिजवा.
 • मग त्या सांबर वर कोथिंबीर टाका आणि तुमचे सांबर इडली, डोसा किंवा मेदु वडा सोबत खाण्यासाठी तयार झाले.

सांबर काश्यासोबत खाल्ले जाते – serving suggestions

 • सांबर हे आपण इडली, डोसा, मेदू वडा, उतप्पा, वडा संभार किंवा साध्या पांढऱ्या भातासोबत देखील खूप चांगले लागते.

आम्ही दिलेल्या sambar recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर योगासन चित्र सहित माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sambar masala recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of sambar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये idli sambar marathi recipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “सांबर रेसिपी मराठी Sambar Recipe in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!