Importance of Newspaper Essay in Marathi वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये वर्तमान पत्र किंवा वृत्त पत्राचे चे महत्व या विषयावर निबंध लिहिणार आहोत. वर्तमान पत्र किंवा वृत्त पत्र हे एक सध्याच्या काळातील अशी गोष्ट आहे, ज्यामुळे आपल्याला जगामध्ये, देशामध्ये आणि आपल्या भागामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टी अगदी सविस्तर पणे समजतात आणि त्या चांगल्या असोत किंवा मग वाईट.वर्तमान पत्र किंवा वृत्त पत्रा मुळे आपल्याला अनेक चांगल्या किंवा वाईट बातम्या कळतात तेच वर्तमान पत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांच्यावर मजकूर असतात.
वर्तमान पत्रामध्ये राजकीय बातम्या, वेगवेगळ्या प्रकारचे शोध, राष्ट्राचे परस्पर संबध, दंगली, अपघात, वैज्ञानिक अविष्कार या प्रकारच्या बातम्या किंवा मुद्दे येतात आणि ह्या बातम्या सामाजिक प्रश्न, आरोग्य, घटना, खेळ, अंतराष्ट्रीय बातम्या, शिक्षन, संशोधन आणि विज्ञान, तंत्रज्ञान याविषया वर असतात. अनेक लोकांना सकाळी सकाळी वर्तमान वाचण्याची आणि आपल्या जगामध्ये, देशामध्ये किंवा आपल्या भागामध्ये काय घडत आहे. याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते आणि म्हणून अनेक लोकांची सकाळी लवकर आवरून पेपर वाचणे हि एक रोजची सवय झाली आहे.
कारण त्यांना पेपर वाचल्याशिवाय गमत नाही आणि जर एक दिवस काही कारणास्तव पेपर आला नाही तर ते बाहेरून जाऊन घेवून येतात आणि वाचतात कारण वर्तमान पत्रामुळे किंवा वृत्त पत्रामुळे अनेक प्रकारची सध्या घडत असणाऱ्या विषयांच्याबद्दल माहिती मिळते. वर्तमान पत्र किंवा वृत्त पत्राला अनेक लोकांच्या मते खूप महत्व आहे आणि वर्तमान पत्र वाचणे हि लोकांची रोजची दिनचर्या झालेली आहे आणि हे अनेक लोकांच्या मते खूप महत्वाचे देखील आहे.
वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध – Importance of Newspaper Essay in Marathi
वर्तमानपत्राविषयी निबंध – Essay On Newspaper In Marathi
वर्तमान पत्र हि प्रत्येक भागावर अवलंबून छापलेली असतात आणि काही वर्तमान पत्रामध्ये देशातील महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या असतात म्हणजेच देशातील राजकीय घडामोडी, सामाजिक घडामोडी, तसेच आंतरदेशीय संबध, देशाच्या सीमाभागावर झालेल्या युद्धाच्या चकमकी, आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेले खेळ यासारख्या अनेक बातम्या वर्तमान पत्रामध्ये येतात तसेच काही वर्तमान पत्र हि लोकल असतात म्हणजेच यामध्ये जास्तीत जास्त बातम्या ह्या लोकल घटनांच्यार असतात म्हणजेच लोकल भागामध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी, दंगली, अपघात, शिक्षण विषयक बातम्या असतात आणि त्यामध्ये थोड्याच प्रमाणात देशातील बातम्या देखील असतात.
आपण टीव्ही मध्ये बातम्या जरी पहिल्या तर आपल्याला इतकी सविस्तर बातमी मिळत नाही जितकी आपल्याला वर्तमानपत्र वाचल्यानंतर मिळते कारण वर्तमान पत्रामध्ये कोणत्याही बातमीचा जो मजकूर येतो तो खूप सविस्तरपणे आलेला असतो. आपल्या भारतामध्ये पूर्वीच्या काळी म्हणजेचज्यावेळी इंग्रजांचे राज्य आपल्या भारतावर नव्हते त्यावेळी आपल्या देशामध्ये वर्तमान पत्र नव्हते कारण ते इंग्रजांची सत्ता ज्यावेळी भारतावर होतो त्या काळामध्ये भारतामध्ये पहिले वर्तमान पत्र आले होते आणि तो काळ म्हणजे इ.स १७८० आणि या वर्तमान पत्राचे नाव बंगाल दि बंगाल गॅजेट असे होते आणि या वर्तमान पत्राचे संपादक जेम्स हिक्की हे होते.
अश्या प्रकारे भारतामध्ये वर्तमान पत्र वापरण्यास सुरुवात झाली आणि सध्या अनेक माहिती आणि बातम्या जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक वर्तमान पत्र घेतात आणि रोज वाचतात आणि रोजच्या चाललेल्या घडामोडी माहिती करून घेतात. पूर्वी म्हणजेच इ.स १७८० या काळापासून वर्तमान पत्रामध्ये फक्त बातम्या सविस्तरपणे येत होत्या इतर कोणतीही माहिती वर्तमान पत्रामध्ये येत नव्हती परंतु सध्याचे वर्तमान पत्र पहिले तर आजच्या काळातील वर्तमान पत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्या विषयी आलेली माहिती आपल्याला पाहायला मिळते.
म्हणजेच वर्तमान पत्रामध्ये राजकीय विषयांच्यावर, देशातील वेगवेगळ्या घटनांच्यावर, सामाजिक घडामोडी, खेळातील घडामोडी आणि माहिती, चित्रपटातील घडामोडी आणि माहिती, विज्ञान आणि संशोधन विषयी माहिती आणि घडामोडी, खाद्यपदार्थांच्या विषयी माहिती, पर्यटन स्थळे या विषयी माहिती, मनोरंजक गोष्टी यासारखे अनेक विषय आजकाल आपल्याला पेपरमध्ये पाहायला मिळते.
वर्तमान पत्र हे वेगवेगळ्या भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळते जसे कि इंग्लिश, मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती अश्या वेगवेगळ्या भाष्यामध्ये असते आणि वर्तमान पत्र हे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये म्हणजेच राज्याच्या अधिकृत भाषेमध्ये येत असते म्हणजे कर्नाटक मध्ये कन्नड, महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी, गुजरात मध्ये गुजराती भाषेमध्ये अश्या प्रकारे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये वर्तमानपत्र प्रकाशित होतात.
त्याचबरोबर राज्यामध्ये इतर भाषेमध्ये देखील वर्तमान पत्र असतात कारण अनेक राज्यामध्ये इतर भाषा बोलणारे लोक राहतात जसे किं महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी, गुजराती भाषा बोलणारे लोक राहतात. वर्तमान पत्र हे अनेक लोकांच्या वाचनाचा एक आवडीचा विषय आहे कारण वर्तमान पत्र किंवा वृत्त पत्र हे असे आहे ज्यामुळे आपल्या वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधील माहिती मिळते तसेच आपल्याला जसे इतर गोष्टी वाचण्यासाठी कंटाळवाण्या वाटतात तसे वर्तमान पत्र वाटत नाही कारण वर्तमानपत्रा मध्ये वेगवेगळे विषय असतात.
वर्तमान पत्राचे फायदे पहायाले गेले तर वर्तमान पत्रामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कानाकोपऱ्यातील बातम्या समजतात तसेच वर्तमान पत्रामुळेच जगातील किंवा देशातील बातम्या कानाकोपऱ्यामध्ये पोहचतात. तसेच वर्तमान पत्रामध्ये ज्या बातम्या असतात त्या सविस्तर पाने असतात त्यामुळे आपल्या त्या चांगल्या प्रकारे समजतात. तसेच वर्तमान पत्रामुळे वाचनाची आवड देखील झोपासली जाते.
त्याचबरोबर वर्तमान पत्रामुळे आपले रोजचे वाचन होते अश्या प्रकारे वर्तमान पत्राचे वेगवेगळ्या प्रकारे फायदे होतात परंतु काही वेळेला वर्तमान पत्रामध्ये खोट्या बातम्या देखील छापुन येतात त्यामुळे लोकांची दिशाभूल देखील होऊ शकते.
अश्या प्रकारे वर्तमान पत्राचे कार्य असते तसेच काही लोकांच्यासाठी वर्तमान पत्र हे खूप महत्वाचे असते कारण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते.
आम्ही दिलेल्या importance of newspaper essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on newspaper in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on importance of newspaper in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये importance of newspaper essay in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट