भारतीय वायुसेना माहिती Indian Air Force Information in Marathi

Indian Air Force Information in Marathi भारतीय वायुसेना माहिती मराठी इसवी सन १९१८ ते १९३८ या एकवीस वर्षांच्या दोन जागतिक युद्धांच्या कालावधीत एकामागोमाग एक अशा जवळजवळ सर्व लहान-मोठ्या राष्ट्रांनी आपल्या देशांची हवाई दले स्थापन करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे, याच काळात ब्रिटिशांनी देखील जगासोबत आपल्या भारत देशात ‘रॉयल एअर फोर्स’ म्हणजे ‘शाही हवाई दल’ ची स्थापना केली. इसवी सन १९१८ मध्ये ब्रिटिशांनी या हवाई दलामध्ये दोन स्क्वॉड्रन्स, ८० अधिकारी आणि ६०० सैनिक आपल्या भारत देशात ठेवले.

इसवी सन १९२० पर्यंत स्क्वॉड्रन्सची संख्या साधारणतः आठपर्यंत गेली आणि इसवी सन १९२३ ते १९२४ मध्ये ही संख्या आठवरून सहापर्यंत खाली आली. या सहापैकी चार भूसेनेला सहाय्य करणारी आणि दोन बाँबर स्क्वॉड्रन्स होती.

यानंतर, सर ॲण्ड्र्यू स्कीन कमिटीच्या एका शिफारशीनुसार इसवी सन १९२८ मध्ये क्रॅनवेलच्या वैमानिक शाळेमध्ये सहा भारतीय सैनिकांनी म्हणजे हिंदी सैनिकांनी दरवर्षी प्रशिक्षण घ्यायचे असे ठरवण्यात आले आणि त्यानुसार भारतात हिंदी हवाई दलाची स्थापना करण्यात आली.

indian air force information in marathi
indian air force information in marathi

भारतीय वायुसेना माहिती मराठी – Indian Air Force Information in Marathi

vayu sena information in marathi भारतीय वैमानिकांची पहिली प्रशिक्षित तुकडी ही इसवी सन १९३३ मध्ये बाहेर पडली. या तुकडीला आपल्या भारतीय लष्कराची एक महत्त्वाची शाखा मानले जाऊ लागले. पहिल्या जागतिक महायुद्धापासून युद्धशास्त्राचे एक नवे अंग स्थापन झाले ज्याला ‘हवाई युद्ध’ असे नाव देण्यात आले.

पुढील काळात या हवाई युद्धाचा वापर जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन,रशिया व अमेरिका यांसारख्या देशांनी एकापाठोपाठ युद्धामध्ये करण्यास प्रारंभ केला. इसवी सन १९४१ मध्ये ‘शाही हवाई दला’ मधील थोड्या तुकड्या भारतात ठेवण्याचे ठरले होते. याप्रमाणे हिंदुस्थानात फेब्रुवारी १९४२ पर्यंत हिंदी हवाई दलाची तीन स्क्वॉड्रन्स निर्माण करण्यात आली.

इसवी सन १९४२ पर्यंत भारतीय हवाई दलाची मुख्य शिक्षण संस्था लाहोरजवळ स्थित होती. जरी आपल्या देशात याअगोदर आपल्या हिंदी हवाई दलाची दहा स्क्वॉड्रन्स स्थापन करण्याचे ठरले होते आणि यासोबतच आपल्या देशाचे जपानबरोबरचे युद्ध जोमाने सुरू झाले होते, तरीदेखील इसवी सन १९४३ ते १९४४ या एका वर्षाच्या कालावधीत जवळपास नऊ स्क्वॉड्रन्स उभारली गेली.

असे असले तरी सुद्धा त्यांचे कर्तव्यक्षेत्र मात्र भूसेनेच्या सहकारापुरतेच मर्यादित राहिले नसून टेहळणी, बाँबिंग, रसद पुरवठा, शत्रूच्या विमानांचा पाठलाग करणे अशा अनेक कार्यांसाठी देखील केले जात होते. खरंतर, या कार्यासाठी आपल्या हिंदी वैमानिकांचे पदार्पण झाले होते.

याशिवाय, समुद्र किनारा/तट संरक्षणाच्या तुकड्या हिंदुस्थानी हवाई दलाच्या स्वयंसेवक राखीव दलाच्या कर्मचाऱ्यांमधून इसवी सन १९३९ मध्ये तयार करण्यात आल्या होत्या आणि त्यांचे प्रशिक्षण रिसालपूर याठिकाणी झाले होते. याशिवाय, ऑक्टोबर १९४१ पर्यंत भारतामध्ये एकूण पाच फ्लाइट्स या अनुक्रमे मद्रास, मुंबई, कराची, कलकत्ता व कोचीन याठिकाणी उभ्या करण्यात आल्या.

दिनांक १६ मार्च १९३९ मध्ये पहिले भारतीय हिंदी अधिकारी सुब्रोतो मुखर्जी हे स्क्वॉड्रन कमांडर बनले आणि मुखर्जी हेच पुढील काळात  भारतीय हवाई दलाचे देखील पहिले हिंदी प्रमुख बनले.

सुरुवातीच्या काळामध्ये ‘वाफिटी’ नावाचे एक जुनाट विमान हिंदी वैमानिकांना सापडले होते. हे जुनाट विमान सापडल्यानंतर आपल्या हिंदी वैमानिकांना इसवी सन १९४१ च्या शेवटी ‘ऑडॅक्स’ नावाचे दुसरे विमान मिळाले. यानंतर, सप्टेंबर १९४२ मध्ये ‘हरिकेन’ नावाच्या एका प्रसिद्ध लढाऊ विमानावर विशेष असे प्रशिक्षण घेण्यासाठी आपले हिंदी वैमानिक रिलासपुर याठिकाणी गेले होते.

या प्रशिक्षणाच्या दोन वर्षांआधी सप्टेंबर १९४० मध्ये जवळपास आपल्या २४ हिंदी वैमानिकांची एक तुकडी इंग्लंड देशात लष्कराच्या सहाय्यासाठी पाठवण्यात आली. इंग्लंड देशामध्ये त्यांना लढाऊ क्रमांक ७ विमानोड्डाणाचे उच्च प्रशिक्षण मिळाल्यानंतर युद्धामध्ये सहभाग घेता आला.

शिवाय, या तीव्र हवाई युद्धामध्ये आपल्या हिंदी वैमानिकांनी स्वतःचे नाव गाजविले होते. पण त्याचबरोबर, जुलै १९४२ पर्यंत आठ वैमानिकांनी हवाई युद्धकार्यात आपली प्राणाहुती देखील दिली.

या हवाई युद्धानंतर आणखी काही तुकड्या प्रशिक्षणासाठी इंग्लंड तसेच, कॅनडा या देशांमध्ये रवानगी झाल्या. यानंतरच्या काही वर्षांत यांत्रिकी शिक्षण घेण्याकरिता सुद्धा आपले हिंदी अधिकारी इंग्लंडमध्ये पाठवण्यास सुरुवात झाली होती. इसवी सन १९४५ पर्यंत जवळपास ३७ भारतीय हिंदी अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण घेतले होते. 

सुरुवातीची कामगिरी

मित्रहो, वरील माहितीमध्ये आपण पाहिले की आपले हिंदी वैमानिक त्यांच्या कर्तव्याबद्दल किती दक्ष होते. हिंदुस्थानातील अगोदरच्या कर्तव्यक्षेत्राप्रमाणे सुरुवातीच्या काळातील या लहानशा हिंदी हवाई दलाचे कार्य देखील वायव्य सरहद्द भागातील बंडखोर पठाणांना काबूत ठेवणे एवढेच होते.

त्यामुळे भारतीय हिंदी हवाई दलाला युद्धक्षम त्याचबरोबर, कार्यक्षम  बनविण्याचे प्रशिक्षण देखील याच ठिकाणी देण्यात आले. यानंतर, ऑगस्ट १९४० मध्ये दौर खोऱ्यात तीव्र गोळी-बाराविरुद्ध आपल्या भारतीय हिंदी वैमानिकांनी जवळपास अकरा हल्ले चढविले होते. बहुतेक यावेळी हिंदी वैमानिकांच्या वाट्याला शाही हवाई दलातील मोडगळीस आणि त्यांना नको असलेली जुनाट विमानेच आली.

याशिवाय, आपल्या वैमानिकांना  सरहद्दीवरील कर्तव्यासोबतच भूसेनेला देखील हातभार लावला लागे. मित्रहो, ज्यावेळी दुसऱ्या महायुध्दाला सुरुवात झाली होती, तेंव्हा हिंदी महासागराच्या तटाचे  संरक्षण करण्यासाठी एक दल उभारले गेले. परंतू, या दलाचे एक स्क्वॉड्रन तयार होण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा अवधी लागला.

भारतीय वायुसेनेच्या संघटना

सध्याच्या काळात आपल्या भारतीय हवाई दलाचे मुख्यालय दिल्ली याठिकाणी असून, या मुख्यालयाचे प्रमुख ‘एअर चीफ मार्शल’ हे असतात. या प्रमुखाला त्याच्या कामात मदत करण्यासाठी मदतनीस म्हणून एअर मार्शल दर्जाचे काही उच्चाधिकारी काम पाहत असतात.

शिवाय, आपल्या भारतीय हवाई दलाचे विभाजन समादेशांत (कमान्ड्ज) केलेले असून त्यांचे समादेश क्षेत्र प्रक्रियावादी गरजवंत अशा विविध  गोष्टींवर (भौगोलिक) आधारलेले असते. सर्व प्रकारचे  हवाई दल हे समादेशावर एक ‘एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ अथवा एओसीआय्सी प्रमुख असतो आणि प्रमुखाच्या हाताखाली प्रशिक्षित असा कर्मचारी वर्ग देखील असतो.

समादेश हवाई दलाचा स्वयंभू-सुविधा ठरलेला सगळ्यात मोठा विभाग असून त्याचे कार्यानुसार विंग, युनिट, स्टेशन अशा अनेक निरनिराळ्या कनिष्ठ शाखांमध्ये परत विभाजन केलेले आपल्याला दिसून येते.

शिवाय, अशा विविध शाखांवर विंग कमांडर ते एअर व्हाइस मार्शल दर्जाचे अधिकारी कार्यक्षेत्र तसेच भूमिकेबरहुकूम प्रमुख असतो. अशा प्रकारच्या उड्डाण विशिष्ट रचनाक्षेत्रात (विंग वा स्टेशन) विविध विमाने स्क्वॉड्रन्स असून ते भूमिका, भौगोलिक स्थळ तसेच अत्यावश्यक गरज अशा अनेक बाबींवर अवलंबून असते.

या उड्डाण विशिष्ट रचनाक्षेत्रांवरती विंग कमांडरपासून ते अगदी ग्रुप कॅप्टन बरोबरीचा प्रत्येकी एक अधिकारी प्रमुख असतो आणि यामध्ये  मूलभूत लढाऊ दल हे फायटर स्क्वॉड्रन देखील असते. सामान्यतः यामध्ये जवळपास सोळा विमाने व दोन भरारी पथके सहभागी असतात आणि यांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या खालच्या दर्जाचा अधिकारी (फ्लाइट कमांडर) कार्यरत असतो.

आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलुमी राजवटीतून इसवी सन १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यावर, काश्मीरमध्ये झालेल्या एका मोठ्या  युद्धामध्ये भूसेनेची वाहतूक व रसद पुरवठा करण्याचे  जबाबदारीचे कार्य आपल्या हिंदी हवाई दलाने व्यवस्थितरीत्या पार केले.

त्याचबरोबर, अनेक नैसर्गिक संकटांच्या वेळीदेखील आपल्या हवाई दलाचा विनियोग खूप वेळा झाला. पूर्व आघाडीवर असलेल्या नेफा, नागालँड व मणिपूर या प्रदेशांमध्ये आणि त्याचबरोबर लडाखमध्ये सैन्याला जी रसद पुरविली जाते, ती प्रायः हवाई दलाच्या मालवाहतूक व छत्री प्रपात (सप्लाय ड्रॉप्स) विमानांच्या मदतीने पुरविली जाते.

इसवी सन १९६२ मध्ये झालेल्या भारत आणि चीनच्या युद्धात हिंदी हवाई दलाने प्रत्यक्षपणे या  युद्धकार्यात सहभाग घेतला नव्हता. परंतू, याची  भरपाई करण्याची सुवर्णसंधी इसवी सन १९६५ च्या भारत व पाकिस्तान युद्धात तसेच इसवी सन १९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या युद्धात आणि विशेषतः इसवी सन १९९९ मध्ये झालेल्या कारगील युद्धामध्ये आपल्या भारतीय हिंदी हवाई दलाला मिळाली होती.

पाकिस्तानचे विमानतळ त्याचबरोबर, अनेक दळणवळणाची साधने यांसारख्या अन्य गोष्टींवर देखील भारतीय विमानांनी आक्रमकरीत्या चढाई केली आणि अखेर पाकिस्तानी हवाई दलावर आपले वर्चस्व प्राप्त करून विजय मिळवला. अशा रीतीने, या तीन युद्धांमध्ये विजयश्रीचा मोठा वाटा आपल्या भारतीय हवाई दलाने मिळविला.

                     तेजल तानाजी पाटील

                        बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या indian air force information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भारतीय वायुसेना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about indian air force worke in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of indian air force in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये indian air force missile information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!