कंधारचा किल्ला माहिती Kandhar Fort History in Marathi

Kandhar Fort History in Marathi कंधारचा भुईकोट किल्ला माहिती एक हजार वर्षापूर्वीचा कंधारचा हा भुईकोट प्रकारातील किल्ला महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यामधील कंधार या गावामध्ये वसलेला आहे. हा किल्ला राष्ट्रकुट वंशामधील राजा तिसरा कृष्ण याने १० व्या शतकामध्ये बांधला आणि त्यानंतर या किल्ल्यावर ज्यांचे वर्चस्व येईल त्यांनी हा किल्ला विकसित केला. ज्यावेळी येथे राष्ट्राकुटांची वर्चस्व होते त्यावेळी कंधार हे शहर त्यांची राजधानी होती. हा किल्ला नांदेड या मुख्य शहरापासून ५५ किलो मीटर अंतरावर आहे आणि या किल्ल्याला तेथील प्रांताचे प्रतिक मानले जाते.

kandhar fort information in marathi या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ हे २४ एकर असून या किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याभोवती एक रुंद खंदक आहे आणि भक्कम अशी तटबंदीची भिंत आहे. इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याची देखील एक पौराणिक कथा आहे जी महाभारताशी संबधित आहे. कंधार हा किल्ला राष्ट्रकुट घराण्याची राजधानी होती त्याचबरोबर हा किल्ला राष्ट्रकुट वंशाच्या काळात कृष्णदुर्ग या नावाने ओळखले जायचे कंधार हा किल्ला कंधार या गावापासून ४ किलो मीटर अंतरावर बालाघाट डोंगर रांगेमध्ये मन्याड नदीच्या खोऱ्यामध्ये हा किल्ला वसलेला आहे.

या किल्ल्याला दुहेरी तटबंदी असून याला बाहेरच्या तटाला मजबूत असा लोहबंद दरवाजा लावलेला आहे. कंधार या किल्ल्यावर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूवर आक्रमण करण्यासाठी या किल्ल्यावर एकूण ३४ बुरुजांचे बांधकाम प्राचीन काळी केले आहे.

kandhar fort history in marathi
kandhar fort history in marathi

कंधारचा किल्ला माहिती – Kandhar Fort History in Marathi

किल्ल्याचे नावकंधार किल्ला
ठिकाणहा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यामधील कंधार या गावामध्ये वसलेला आहे
प्रकारभुईकोट किल्ला
संस्थापकराष्ट्रकुट वंशामधील राजा तिसरा कृष्ण
स्थापना१० व्या शतकामध्ये
क्षेत्रफळ२४ एकर
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणीमाचाली दरवाजा, सुंदर अशी भीतीवर कोरलेली शिल्प, मंदिरे, लाल महल, शीश महल, अंबरखाना, दरबार महल, बाग आणि बागेमधील कारंजे आणि राष्ट्रकुट रॉयल पॅलेस

कंधार या किल्ल्याचा इतिहास 

कंधार या किल्ल्यावर १४ व्या ते १३ व्या शतकापर्यंत अनेक राजवटींनी राज्य केले. कंधार हा किल्ला बहुतेक १० व्या शतकामध्ये राष्ट्रकूट वंशातील राजा तिसरा कृष्ण याने बांधला असावा. कंधार हा किल्ला १० व्या शतकामध्ये राष्ट्रकुट घराण्याची राजधानी होता आणि राष्ट्रकुटांच्या काळात या किल्ल्याला कृष्णदुर्ग या नावाने ओळखले जायचे. कंधार या प्रांतावर आणि किल्ल्यावर ६ व्या ते १० शतकापर्यंत राज्य करणारे राज्यकर्ते कर्नाटका, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगना या भागातील होते.

ज्यावेळ राष्ट्रकुट राजकर्त्यांनी या किल्ल्याची बांधणी केली त्यावेळी त्यांनी तेथे लाकडी इमारत बांधली होती. राष्ट्रकुट वंशानंतर या किल्ल्यावर वारंगलचे काकटेय म्हणजेच तुघलक, देवगिरीचे यादव, दिल्ली सल्तनत, बहामनी साम्राज्य, अहमद नगराचे निजाम शहा, हैद्राबदाचे निजाम या सर्व कुळांनी या किल्ल्यावर राज्य केले.

कंधार या किल्ल्यावर तुघलक राज्कारात्यानी इ. स. १४०३ मध्ये वारंगल हा प्रांत जिंकल्यानंतर कंधार या भाग देखील त्यांच्या वर्चस्वा खाली आला आणि त्यामुळे कंधार किल्ल्याची जबादारी देखील त्यांच्याकडेच असल्यामुळे त्यांनी या किल्ल्याचा कारभार पाहण्यासाठी नुसरत सुलतान याची नेमणूक केली पण हा किल्ल्याची जबाबदारी पार पाडण्यास असक्षम ठरल्यामुळे तुघलकांनी कंधार या किल्ल्याची जबाबदारी इ. स. १३१७ ते इ. स. १३४० मध्ये मलिक सैफद्दोला याच्याकडे देण्यात आली.

त्यानंतर हा किल्ला इ. स. १५९० च्या दरम्यान इब्राहीम आदिलशहा म्हणजेच आदिलशाही कुळाकडे गेला असे तेथील बुरुजावर असणाऱ्या शिलालेखावरून इतिहासकार सांगतात. त्याचबरोबर इ. स. १६०५ मधील इब्राहीम आदिलशहा याच्या नावाचा आणखीन एक शिलालेख आपल्याला किल्ल्यामध्ये असणाऱ्या मशीदीवर पाहायला मिळतो. त्याचबरोबर कंधार या किल्ल्यावर मलिक अंबर, औरंगजेब (मुगल) यांनी देखील राज्य केलेले असावे याचे पुरावे आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळतात.

कंधार या किल्ल्यावर पाहण्यासारखी प्राचीन ठिकाणे 

  • खंदक :

कंधार या किल्ल्याजवळ गेल्यानंतर आपल्यला पहिल्यांदा जे पाहायला मिळते ते म्हणजे एक खोल खंदक जे पूर्वीच्या लोकांनी किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधले होते त्याचबरोबर या खंदकाचा उपयोग पावसाळ्यामधील पाणी साठवण्यासाठी देखील केला जात होता. कंधार किल्ल्याभोवती बांधलेला हा खंदक ५० फुट खोल असून या खंडाकाची रुंदी एकूण १४० फुट आहे.

  • जगतुंग तलाव :

कंधार या किल्ल्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक विशाल असा तलाव देखील पाहायला मिळतो ज्याला जगतुंग तलाव म्हणतात. या तलावामध्ये देखील पावसाळ्याचे पाणी साठवले जात असत आणि या पाण्याचा उपयोग रोजच्या वापरासाठी केला जात असावा. पूर्वीच्या काळी जगतुंग तलावातील पाणी खंदका मध्ये देखील सोडले जायचे.

  • प्रवेश दरवाजा :

खंदक पार केले कि उत्तर दिशेकडे तोंड करून असणारा प्रवेश दरवाजा आहे ज्याला लोहबंदी दरवाजा म्हणतात. शत्रूला या दरवाज्यावर थेट आक्रमण करता येवू नये म्हणून दरवाज्य समोर एक भिंत बांधलेली आहे. आता या दरवाज्याची थोडीशी पडझड झालेली आहे. या लोहबंदी प्रवेश दाराची उंची ११ ते १२ फुट आहे आणि रुंदी ९ ते १० फुट.

  • कंधार या किल्ल्यावर आपल्याला एकमजली अंबरखाना देखील पाहायला मिळतो.
  • बुरुज :

प्रत्येक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यावर देखील भक्कम असे बुरुज बांधलेले आहेत ज्यांचा वापर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच लांब असणाऱ्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी केला जातो. कंधार या किल्ल्यावर देखील आपल्याला अशे एकूण ३४ बुरुज पाहायला मिळतात. या किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे आणि या किल्ल्याच्या बाहेरील तट बंदीला एकूण १८ बुरुज आहेत आणि आतील तटबंदीच्या भिंतीला एकूण १६ बुरुज आहेत.

  • दरवाजे :

कंधार या किल्ल्यावर आपल्याला लोहबंदी दरवाजा (प्रवेश दरवाजा), महाकाली दरवाजा, मछली दरवाजा पाहायला मिळतात.

  • बाग :

आपल्याला या किल्ल्यावर एक बाग पाहायला मिळते आणि त्या बागेमध्ये कारंजे देखील आहेत. हि बाग औरंगजेबाच्या काळात बनवलेली आहे हे तेथील एका शिलालेख वरून स्पष्ट झाले आहे. औरंगजेबाने हि बाग तयार करण्यासाठी मिर्झा हमीद उद्दीन खान याला आदेश दिले होते.

  • कंधार या किल्ल्यावरील इतर महत्वाची ऐतिहासिक ठिकाणे :

सुंदर अशी भीतीवर कोरलेली शिल्प, मंदिरे, लाल महल, शीश महल, अंबरखाना, दरबार महल, बाग आणि बागेमधील कारंजे आणि राष्ट्रकुट रॉयल पॅलेस.

कंधारचा किल्ला फोटो:

kandhar fort history in marathi
kandhar fort history in marathi

कंधार या किल्ल्यावर कसे जायचे ? 

जर तुम्हाला हा किल्ला पाहण्यासाठी विमानाने यायचे असल्यास या किल्ल्याचे सर्वात जवळचे विमानतळ हे नांदेड येथे आहे आणि तुम्ही नांदेडला विमानाने पुणे किवा मुंबई या शहरातून येवू शकता आणि तेथून तुम्हाला कंधारला जाणारी स्थानिक बस किवा टॅक्सी पकडावी लागेल. नांदेड ते कंधार हे अंतर ४९ किलो मीटर आहे आणि कंधार मधून हा किल्ला ४ किलो मीटर अंतरावर आहे.

जर तुम्हाला हा किल्ला पाहण्यासाठी रेल्वेने जायचे असल्यास सर्वात जवळचे रेल्वे स्थानक नांदेड वाघाळा येथे आहे तेथून हा किल्ला ४५ किलो मीटर अंतरावर आहे. आपण किल्ल्यापर्यंत स्थानिक बस किवा टॅक्सीने जावू शकतो.

टीप

  • कंधार हा किल्ला सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ पर्यंत पर्यटकांच्यासाठी खुला असतो.
  • हा किल्ला पाहण्यासाठी कोणताही शुल्क घेतला जात नाही.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, कंधार किल्ला kandhar fort history in marathi हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. kandhar fort information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about kandhar fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही कंधार किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या kandhar killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “कंधारचा किल्ला माहिती Kandhar Fort History in Marathi”

  1. मराठी वाक्य रचनेत खूप चुका आहेत.अनेक वाक्य जुळत नाहीत.पण वाचक मागचा आणि पुढचा संदर्भ घेऊन माहिती समजून घेतो.कृपया,बघा काही दुरुस्त करता आले तर.

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!