झांसी किल्ला माहिती Jhansi Fort Information in Marathi

Jhansi Fort Information in Marathi झाशीचा किल्ला माहिती भारताच्या इतिहासातील सर्वात प्राचीन आणि भारताचा अभिमान असणारा राणी लक्ष्मीबाई यांचा किल्ला म्हणजे झांसी किल्ला होय. या किल्ल्याची बांधकाम शैली बुंदेला आणि मराठा मिश्रित आहे. झांसी हा किल्ला उत्तर प्रदेशातील बांगीरा नावाच्या टेकडीवर वसलेला आहे. हा किल्ला १७ व्या शतकात राजा बिरसिंग देव यांनी उत्तर प्रदेशात बांगीरा टेकडीवर बनवला होता. हा किल्ला झांसीच्या राणीच्या पराक्रमामुळे प्रसिध्द आहे आणि या किल्ल्याच्या इतिहासामुळे येथे खूप पर्यटक आकर्षित होतात.

या किल्ल्यात आपल्यला आसपासच्या प्रदेशातील इतिहास दर्शवणाऱ्या अनेक कलाकृती पाहायला मिळतात तसेच या किल्ल्यामध्ये गणपतीचे आणि महादेवाचे मंदिर देखील बांधलेले आहे त्याचबरोबर किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला राणी झांसी बाग, गुलाम गौस खान,  मोतीबाई आणि खुदा बक्ष यांची मजार या सर्व गोष्टी किल्ल्यामध्ये पाहायला मिळतात.

jhansi fort information in marathi
jhansi fort information in marathi

झांसी किल्ला मराठी माहिती – Jhansi Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावझांसी किल्ला
ठिकाणउत्तर प्रदेशातील झांसी गावाजवळ बांगीरा नावाच्या एका टेकडीवर वसलेला आहे.
स्थापना१७ व्या शतकामध्ये
संस्थापकराजा बिरसिंग देव
क्षेत्रफळ१५ एकर
आकारकिल्ल्याची लांबी ३१२ मीटर आणि रुंदी २२५ मीटर इतकी आहे.
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणेगणपतीचे मंदिर, महादेवाचे मंदिर, राणी झांसी बाग, गुलाम गौस खान,  मोतीबाई आणि खुदा बक्ष यांची मजार

झांसी हा किल्ला उत्तर प्रदेशातील झांसी गावाजवळ बांगीरा नावाच्या एका टेकडीवर वसलेला आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ १५ एकर इतके आहे. या किल्ल्याची बांधकाम शैली बुंदेला आणि मराठा मिश्रित आहे आणि हि उत्तर भारतीय शैलीतील ह्या किल्ल्याची लांबी ३१२ मीटर इतकी आहे आणि रुंदी २२५ मीटर आहे. या किल्ल्याची एक विशेष गोष्ट म्हणजे या किल्ल्यामध्ये येण्यासाठी एकूण १० दरवाजे आहेत. या किल्ल्यावर एक राणी महाल देखील आहे जो १९ व्या शतकामध्ये बांधला आहे.

किल्ल्यावरील दरवाज्यांची नावे : दतिया दरवाजा, ओरछा दरवाजा, सागर दरवाजा, बडा गाव दरवाजा, उन्नाव दरवाजा, खंडेराव दरवाजा, लक्ष्मी दरवाजा आणि चांद दरवाजा.

झांसी किल्ल्याचा इतिहास – Jhansi Fort History in Marathi

झांसी हा किल्ला १७ व्या शतकामध्ये राजा बिरसिंग देव यांनी बांधला. झांसी हा किल्ला बुंदेलाच्या किल्ल्यांपैकी एक आहे. इ. स. १७२८ मध्ये मोहम्मद खान बंगाशने छत्रसालवार हल्ला केला पण छत्रसाल यांनी बाजीराव पेशवा यांची मदत करून मोहम्मद खान बंगाशचा पराभव केला आणि किल्ल्यावरचे वर्चस्व कायम ठेवले. त्यानंतर १७६६ ते १७६९ या काळामध्ये विश्वास राव लक्ष्मण यांनी झांसीचे सुभेदार म्हणून कामगिरी पार पाडली.

त्यांनी झांसी राज्याचा महसूल वाढविला तसेच महालक्ष्मी आणि रघुनाथ हि मंदिरे देखील बांधली. विश्वास राव लक्ष्मण यांच्या मृत्यू नंतर या किल्ल्याची सत्ता त्यांचे नातू रामचंद्र राव यांच्या हाती आला. इ. स. १८३५  रामचंद्र राव यांचा मृत्यू झाला आणि या किल्ल्याचा ताबा रघुनाथ राव यांच्याकडे गेला आणि त्यांच्या मृत्यू नंतर ब्रिटीश सरकारने सरकारने गंगाधर राव यांना झांसीचा राजा म्हणून स्वीकारले आणि गंगाधर राव यांनी मनिकर्निका म्हणजेच लक्ष्मीबाई यांच्याशी लग्न झाले.

लग्नानंतर लक्ष्मीबाईं एक मुल झाले पण ते जन्मानंतर काही महिन्यात मरण पावले आणि या कारणामुळे गंगाधर रावांची तब्येत बिघडत गेली आणि त्यांनी त्यांनी त्यांच्या चुलत भावाचा मुलगा आनंद राव याला दत्तक घेतले आणि त्याला झांसीचा वारस म्हणून स्वीकारले आणि त्याचे नाव दामोदर राव असे ठेवले. त्यावेळी गंगाधर रावांनी हि गोष्ट ब्रिटीश सरकारला सांगितली.

नोव्हेंबर १८५३  मध्ये महाराजांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने “थॉप्सीन ऑफ लॅप्स” या कायद्याचा वापर करून दामोदर राव यांचा सिंहासनावरील दावा नाकारला आणि त्यांनी लक्ष्मीबाई यांना ६०००० रुपये पेन्शन देण्याचे ठरवले आणि त्यांना महल सोडून जाण्यास सांगितलेत्यावेळी त्यांना महल सोडवा लागला.

इ. स. १८५८ मध्ये कॅप्टन ह्युरोज याने किल्ल्याला वेढा घातला आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी परत आपल्या ताब्यात घेतला आणि १८६१ मध्ये ग्वालियर राजा जीयाजी राव याचे कडे सोपवला पण १८६८ मध्ये त्यांनी किल्ला परत आपल्या ताब्यात घेतला.

झांसीची राणी लक्ष्मीबाई 

शिवरामभाऊ गंगाधर राव यांच्या वडिलांच्या नंतर गंगाधर राव हे झांसीचे राजा झाले. मानिकार्निका म्हणजेच लक्ष्मीबाई यांचा विवाह झांसीचे राजा गंगाधर राव यांच्याशी झाला. त्यांचे विवाहनंतर राणीने एका मुलाला जन्म दिला पण त्याचा मृत्यू झाला त्यानंतर गंगाधर रावांची देखील तब्येत खालावली आणि काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला.

गंगाधरराव यांच्या मृत्यू नंतर इ. स. १८५३ मध्ये राणी लक्ष्मीबाई राणी झाली पण काही कारणास्तव एका वर्षामध्ये राणी लक्ष्मीबाईंना इ. स. १८५४ मध्ये आपला महल सोधावा लागला. त्यानंतर लक्ष्मीबाईंनी काही बंडखोर सैनिक स्वतासोबत घेवून “मेरी झांसी नही दुंगी” इंग्रजांसोबत युध्द केले आणि त्यांचा पराभव केला आणि इ. स. १८५७ मध्ये झांसी परत आपल्या ताब्यात घेतली.

झांसी किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे 

या किल्ल्यात आपल्यला आसपासच्या प्रदेशातील इतिहास दर्शवणाऱ्या अनेक कलाकृती पाहायला मिळतात त्याचबरोबर या किल्ल्यावर आपल्याला गणपतीचे मंदिर, महादेवाचे मंदिर, राणी झांसी बाग, गुलाम गौस खान,  मोतीबाई आणि खुदा बक्ष यांची मजार हि ठिकाणे पाहायला मिळतात.

झांसी किल्ल्याजवळील इतर ठिकाणे

  • जहांगीर महल
  • बेटवा नदी
  • राणी महल
  • राजकीय संग्रहालय झांसी
  • पंचरत्नम पार्क
  • महालक्ष्मी मंदिर
  • राय प्रवीण महल

झांसी किल्ला फोटो:

jhansi fort information in marathi
jhansi fort information in marathi

झांसी किल्ल्यावर कसे जायचे ? 

झांसी हा किल्ला शहराच्या मध्य भागी असल्यामुळे तेथे जाण्यासाठी सुलभ वाहतूक व्यवस्था आहे. झांसी रेल्वे स्थानक किल्ल्यापासून सुमारे ३ किलो मीटर अंतरावर आहे त्यामुळे आपण कोणत्याही मुख्य शहरातून झांसी येथे येवू शकतो आणि तेथून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी स्थानिक बस, टॅक्सी किवा रिक्षा पकडून आपण किल्ल्यापर्यंत जावू शकतो.

त्याच बरोबर या किल्ल्याजवळील विमानतळ हे ग्वालेर शहरामध्ये आहे जे किल्ल्यापासुन १०३ किलो मीटर अंतरावर आहे. तेथून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बस, टॅक्सी किवा पकडून आपण जावू शकतो

वेळ : झांसी हा किल्ला आठवड्याचे सातही दिवस पर्यटकांसाठी खुला असतो. हा किल्ला सकाळी ६ वाजता उघडतो आणि सायंकाळी ६ वाजता बंद होतो. सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेमध्ये झांसी हा किल्ला आपण केव्हा हि पाहू शकतो.

प्रवेश शुल्क : या किल्ल्यावर भारतीय पर्यटकांच्यासाठी वेगळा प्रवेश शुल्क आणि विदेशी पर्यटकांच्यासाठी वेगळा प्रवेश शुल्क आकाराला जातो.

झांसी हा किल्ला पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांच्या कडून २५ रुपये प्रत्येकी प्रवेश शुल्क आकाराला जातो आणि विदेशी पर्यटकांच्या कडून हा किल्ला पाहण्यासाठी ३०० प्रत्येकी असा प्रवेश शुल्क आकाराला जातो.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, झांसी किल्ला jhansi fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. jhansi fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about jhansi fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही झांसी किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या jhansi killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!