Kaju Curry Recipe in Marathi काजू करी रेसिपी काजू करी हि एक पंजाबी डिश आहे जी भाजीच्या प्रकारामध्ये मोडते आणि ज्यांना काही मसालेदार आणि ग्रेवीचे पदार्थ खावेसे वाटत असतील तर आपण काजू करी हि मसालेदार पंजाबी डिश बनवू शकतो. काजू करी हि टोमॅटो आणि कांदा यांची पेस्ट घालून त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि इतर मसाले घालून ग्रेवी बनवली जाते आणि मग त्यामध्ये तळलेले काजू घालून हि भाजी शिजवली जाते आणि सर्व्ह केली जाते. काजू करी हि डिश पंजाबमध्ये लोकप्रिय आहेच पण भारतामधील काही ठिकाणी देखील या डिशला लोकप्रियता मिळालेली आहे.
आणि काजू करी हि एक अशी डिश आहे जी हॉटेल मध्ये सतत ऑर्डर केलेल्या लिस्ट मधील एक प्रसिध्द डिश आहे आणि हि रेसिपी लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडू शकणारी डिश आहे. ज्यांना काजू करी आवडते त्यांनी वारंवार हॉटेल मध्ये जाण्याची काहीच गरज नाही
कारण आपण हॉटेल सारखी काजू करी रेसिपी घरी देखील बनवू शकतो कारण काजू करी रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि ती खूप कमी वेळेमध्ये बनते. चला तर आज आपण या लेखामध्ये काजू करी रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
काजू करी रेसिपी – Kaju Curry Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | २५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ४५ मिनिटे |
पाककला | पंजाबी ( भारतीय ) |
- काजू : काजू करी बनवण्यासाठी काजू हे आवश्यक घटक आहे. या रेसिपी मध्ये काजू हा दोन प्रकारे वापरला जातो एक ग्रेविमध्ये पेस्ट करून वापरला जातो आणि ग्रेवी तयार झाल्यानंतर त्यामध्ये भाजून टाकला जातो.
- कांदा आणि टोमॅटो : काजू करी म्हणजे एक प्रकारची ग्रेवी असते आणि त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची मिक्सरवर बारीक पेस्ट करून ग्रेवी बनवली जाते आणि या कांदा आणि टोमॅटो मुळे करीला एक वेगळीच चव येते त्यामुळे कांदा आणि टोमॅटो हे काजू करी बनवण्यासाठी लागणारे मुख्य घटक आहेत.
काजू करी हि रेसिपी जरी एक पंजाबी दिश असली तरी हि भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थोड्या फरकाने बनवली जाते आणि हि रेसिपी हॉटेल मध्ये जास्त प्रमाणात ऑर्डर केल्या जाणाऱ्या डिश पैकी एक आहे. काजू करी हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनते. चला तर मग आता आपण काजू करी रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.
तयारीसाठी लागणारा वेळ | २५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ४५ मिनिटे |
पाककला | पंजाबी ( भारतीय ) |
काजू करी बनवण्यासाठी वेगवेगळे मसाले, टोमॅटो, कांदे, काजू यासारखे साहित्य लागते आणि यामधील काही साहित्य घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य घरामध्ये उपलब्ध नसते. म्हणून जे साहित्य घरामध्ये उपलब्ध नसते ते आपण बाजारातून विकत आणून काजू करी बनवण्यासाठीची सर्व पूर्व तयारी करू शकतो. चला तर मग आता आपण काजू करी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ३ मोठे कांदे ( उभे चिरलेले ).
- ३ लाल टोमॅटो ( उभे चिरलेले ).
- २ चमचे काजूचे तुकडे ( ग्रेवी पेस्ट मध्ये वापरण्यासाठी ).
- १ वाटी काजू.
- १ बदाम फुल, २ ते ३ तमाल पत्री पाने, २ ते ३ लवंग, १ वेलदोडा, १ दालचिन तुकडा.
- २ चमचे आले लसून पेस्ट.
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १ चमचा गरम मसाला पावडर.
- १ चमचा धने जिरे पावडर.
- ३ मोठे चमचे तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- काजू करी रेसिपी बनवताना सर्वप्रथम कांदा आणि टोमॅटो चिरून घ्या आणि ते बाजूला ठेवा आणि त्यानंतर गॅसवर मध्यम आचेवर एक कढई ठेवा आणि त्यामध्ये तेल घालून काजू तळून घ्या आणि ते चांगले कुरकुरीत आणि थोडे तांबूस रंगाचे झाले कि ते तेलामधून काढून बाजूला ठेवा.
- आता या कढई काजू तळण्यासाठी घेतलेले तेल काढा आणि परत कढई मध्यम आचेवर गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये ३ ते ४ चमचे तेल घाला. तेल गरम झाले कि त्यामध्ये १ बदाम फुल, २ ते ३ तमाल पत्री पाने, २ ते ३ लवंग, १ वेलदोडा, १ दालचिन तुकडा घाला आणि ते थोडा वेळ भाजा हे मसाले थोडा वेळ भाजल्यानंतर त्याचा खमंग वास सुटेल आता त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घाला आणि ते ९ ते १० मिनिटे कांद्याला लासर रंग येई पर्यंत भाजा.
- मग त्यामध्ये काजू घाला आणि ते परत ५ ते ६ मिनिटे भाजा आणि गॅस बंद करा आणि ते मिश्रण थोडे गार होऊ द्या.
- आता हे कांदा आणि टोमॅटोचे भाजलेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढा आणि ते त्याची मिक्सरवर एकदम बारीक पेस्ट करून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर एक ग्रेवी पॅन ठेवा आणि त्यामध्ये २ ते ३ मोठे चमचे तेल घाला आणि ते गरम होऊ द्या.
- तेल गरम झाले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट घाला आणि ती काही सेकंद भाजा आणि मग त्यामध्ये लगेच आपण तयार केलेला मसाला घाला आणि तो २ ते ३ मिनिटे भाजा आणि मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि धने जिरे पावडर घाला आणि ते सर्व मिश्रण चांगले एकजीव करा आणि मग त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून ते ग्रेवी थोडी पातळ करा.
- मग त्यामध्ये तळून ठेवलेले काजू आणि चवीनुसार मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करी त्या ग्रेविला चांगली वाफ येवू द्या. चांगली वाफ आली कि गॅस बंद करा
- मग त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि रोटी सोबत सर्व्ह करा.
काजू करी कश्यासोबत सर्व्ह करतात – serving suggestion
मसालेदार आणि स्वादिष्ट काजू करी रेस्टॉरंट किंवा हॉटेल मध्ये रोटी सोबत सर्व्ह करतात परंतु आपण घरामध्ये बनवलेली काजू करी रोटी, चपाती, नाना, पुलकी किंवा पांढऱ्या भातासोबत देखील सर्व्ह करू शकतो.
टिप्स ( Tips )
- काजू करी मसाला बनवताना आले लसून आणि हळद, लाल तिखट आणि गरम मसाला आपण मिक्सरमध्ये कांदा आणि टोमॅटो सोबत फिरवून घेवू शकतो आणि मग त्या मसाल्याला तेलाची फोडणी देवून त्यामध्ये पाणी, तळलेले काजू आणि मीठ घालू शकतो.
- काजू करीमध्ये करी दाट होण्यासाठी दही देखील वापरले तरी चालते.
आम्ही दिलेल्या kaju curry recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर काजू करी रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kaju curry recipe restaurant style in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kaju curry recipe in marathi madhura माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kaju curry recipe in marathi video Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट