Kala Masala Recipe in Marathi काळा मसाला रेसिपी मराठी काळा मसाला हा वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाले वापरून बनवलेला एक मसाला पावडर आहे. जी आपण जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी जेवणामध्ये वापरतो. काळ्या मसाल्या सोबत आपण अनेक प्रकारचे मसाला पावडर जेवणामध्ये वापरतो त्यामधील वारंवार वापरले जाणारे मसाले म्हणजे गोडा मसाला आणि गरम मसाला. काळा मसाला हा सर्वप्रथम खानदेशमध्ये बनवण्यात आला होता आणि हा मसाला त्या ठिकाणी कोणत्याही तिखट भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. काळा मसाला हा मुख्यता आमटी मध्ये किंवा सांबर मध्ये घातला जातो आणि त्याची चव वाढवली जाते.
काळा मसाला बनवताना काही खडे मसाले जसे कि दगडफूल, दालचिन, बदाम फुल, तीळ, जिरे, वेलदोडे, सुखं खोबर, तमाल पत्री, तसेच हिंग हे सर्व काही तेलामध्ये परतले जातात आणि काही तसेच कोरडे भाजून ते मिक्सरला फिरवले जातात आणि त्याची पावडर बनवून घेतली कि आपला काळा मसाला तयार झाला.
काळा मसाला हि एक भारतीय पाककृती आहे आणि हे मसाल्याचे मिश्रण भारतामध्ये बहुतेक भागामध्ये जेवणामध्ये वापरला जातो. चला तर मग एकदम सोपा आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनणारा काळा मसाला कसा बनवायचा ते पाहूयात.
काळा मसाला रेसिपी मराठी – Kala Masala Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
काळा मसाला म्हणजे काय ?
काळा मसाला बनवताना काही खडे मसाले जसे कि दगडफूल, दालचिन, बदाम फुल, तीळ, जिरे, वेलदोडे, सुखं खोबर , तमाल पत्री ,तसेच हिंग हे सर्व काही तेलामध्ये परतले जातात आणि काही तसेच कोरडे भाजून ते मिक्सरला फिरवले जातात आणि त्याची पावडर बनवून घेतली जाते
काळा मसाला रेसिपी – kala masala recipe
काळा मसाला हा एक खानदेशी मसाल्याच प्रकार आहे जसा आपण गोडा मसाला किंवा गरम मसाला वापरतो तसेच हा मसाला देखील जेवणामध्ये वापरला जातो. भारतीय स्वयंपाक घरांमध्ये वेगवेगळ्या तिखट भाज्यांच्या मध्ये काळा मसाला वापरला जातो कारण कोणत्याही भाजीमध्ये हा मसाला घातल्यामुळे भाजीची चवा वाढते. गरम मसाला हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनतो. चला तर आता आपण काळा मसाला कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
काळा मसाला साहित्य यादी – kala masala ingredients in marathi
काळा मसाला बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाले लागतात आणि हे काही खडे मसाले घरामध्ये उपलब्ध असतात तर काही खडे मसाला घरामध्ये उपलब्ध नसतात ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागतात. चला तर आता आपण काळा मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- अर्धी वाटी सुखं खोबरं
- अर्धी वाटी तीळ.
- अर्धी वाटी जिरे.
- २ वाटी धणे.
- ३ ते ४ कांड्या दालचिन.
- २ चमचे दगडफूल.
- ४ ते ५ तमाल पत्री पाने.
- २ बदाम फुल.
- १ चमचा लवंग.
- २ ते अडीच चमचे काळी मिरी.
- थोडासा खडा हिंग
आता आपण वरील खडे मसाले वापरून काळा मसाला कसा बनवायचा ते पाहूयात.
- सर्वप्रथम सर्व मसाला स्वच्छ निवडून घ्या आणि सुखं खोबरं खिसून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आता कढई गरम झाली कि त्यामध्ये सर्वप्रथम जे कोरडे मसाले भाजायचे आहे ते भाजून घ्या.
- सर्वप्रथम कढईमध्ये तीळ भाजून घ्या मग त्यामध्ये मग खिसलेले सुखं खोबरं भाजून घ्या आणि मग जिरे भाजून घ्या आणि ते एक ताटामध्ये काढा.
- आता कढईमध्ये थोडे तेल घाला आणि त्यामध्ये धणे घालून त्याचा खमंग वास येईपर्यंत चांगले भाजून घ्या आणि ते चांगले भाजले कि बाजूला काढा.
- आता कढई मध्ये आणखीन थोडे तेल घाला आणि त्यामध्ये इतर खडे मसाला वेगवेगळे परतवून घ्या जसे कि दालचिन, हिंग, लवंग, काळी मिरी, बदाम फुल आणि दगड फुल घाला आणि ते वेगवेगळ तळून घ्या.
- आता हे भाजलेले सर्व मसाले थोडे गार होऊ द्या.
- ते मिश्रण गार झाले कि त्यामध्ये पहिल्यांदा सर्व खडे मसाले घ्या आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पावडर करून घ्या आणि मग ती पावडर भांड्यातून बाहेर काढा.
- त्यानंतर त्यामध्ये धने घाला आणि ते देखील बारीक करून घ्या आणि ते देखील खड्या मसाल्यांच्यामध्ये काढा.
- आता खोबरे देखील मिक्सरवर फिरवून बारीक करून घ्या आणि तीळ-जिरे देखील बारीक करनू घ्या.
- मग हे बारीक केलेले वाटण चांगले मिक्स करून घ्या आणि आणि हे सर्व वाटण थोडे थोडे करून परत मिक्सरला फिरवून घ्या ज्यामुळे सर्व मसाले चांगले एकत्र मिक्स होतील.
- काळा मसाला तयार झाला.
- हा मसाला एक हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवा आणि तुम्हाला हवा आहे त्यावेळी तो तुम्ही वापरू शकता.
टिप्स (Tips)
- काळा मसाला हा हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यामुळे त्याचा वास निघून जात नाही.
- काळी मिरी आणि लवंग घातल्यामुळे मसाल्याला तिखटपणा येतो त्यामुळे हा मसाला आमटी किंवा सांबर मध्ये घालताना काळजीपूर्वक घाला.
आम्ही दिलेल्या kala masala recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर काळा मसाला रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chicken kala masala recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि khandeshi kala masala recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kala masala chicken recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
thanks for sharing recipe in local language, it really helpful
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ..!