नळदुर्ग किल्ला माहिती Naldurg Fort Information in Marathi

Naldurg Fort Information in Marathi नळदुर्ग हा एक प्राचीन किल्ला असून हा किल्ला भूईकोट प्रकारातील आहे. हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वसलेला आहे नळदुर्ग हा किल्ला उस्मानाबाद पासून ४५ ते ४६ किलो मीटर अंतरावर आहे आणि या किल्ल्याचा संपूर्ण व्यास अडीच किलो मीटरच्या क्षेत्रामध्ये आहे आणि हा किल्ला आज देखील सुस्थितीमध्ये आपल्यला पाहायला मिळतो. नळदुर्ग या किल्ल्याच्या जवळ बोरी नदी वाहते आणि त्या काळी हे वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा उपयोग किल्ल्यच्या संरक्षणासाठी वापरले जाते.

naldurg fort information in marathi
naldurg fort information in marathi

नळदुर्ग किल्ला माहिती मराठी – Naldurg Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावनळदुर्ग
प्रकारभूईकोट
ठिकाणहा किल्ला महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नळदुर्ग गावाजवळ वसलेला आहे
बांधणीसाठी लागलेला काळ१५ वर्ष
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणेपाणी महाल, तोफा, गणपती महाल, लक्ष्मी महाल अंबरखाना, जामा मशीद, हमामखाना, निजाम कोर्ट, राणीमहाल, रंगमहाल, बारुदखाना आणि कृत्रिम धबधबा

या किल्ल्याच्या मध्य युगीन स्थापत्यशैलीवर भारतीय आणि इस्लामिक अश्या दोन प्रकारच्या रचनांचा प्रभाव आहे आणि १४ व्या शतकामध्ये ज्यावेळी हा किल्ला बहामनिंच्या ताब्यात गेला त्यावेळी त्यांनी किल्ल्याला संरक्षणात्मक भक्कम अशी तटबंदी बांधली. नळदुर्ग या किल्ल्यामधील मुख्य आकर्षणे महणजे पाणी महाल, तोफा, गणपती महाल, लक्ष्मी महाल अंबरखाना, जामा मशीद, हमामखाना, निजाम कोर्ट, राणीमहाल, रंगमहाल, बारुदखाना आणि कृत्रिम धबधबा यासारखी ठिकाणे पाहायला मिळतात.

नळदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वसलेला आहे आणि हा एक भूईकोट प्रकारातील प्राचीन किल्ला आहे. हा किल्ला उस्मानाबाद आणि सोलापूर या २ शहरांपासून ४५ किलो मीटर आणि हा तुळजापूर शहरापासून ३२ किलो मीटर अंतरावर आहे. नळदुर्ग हा किल्ला कोणी बांधला आहे याचे इतिहासामध्ये ठोस असे पुरावे नाहीत.

पण काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला चालुक्य राजकर्त्यांच्या काळात म्हणजेच राजा नळ याने बांधला असावा आणि या किल्ल्याचे नाव त्याच्या नावावरूनच पडले असावे असे इतिहासामध्ये म्हंटले जाते. हा किल्ला अडीच किलो मीटर क्षेत्रामध्ये वसलेला आहे आणि या किल्ल्याला संरक्षणात्मक भक्कम अशी तटबंदी देखील आहे त्याचबरोबर या किल्ल्यावर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच युध्दाच्या वेळी शत्रूवर आक्रमण करण्यासाठी नळदुर्ग किल्ल्यावर बुरुज आहे आणि या बुरुजांची संख्या ११४ इतकी आहे आणि हे बुरुज किल्ल्याला समांतर आहेत. नळदुर्ग हा किल्ला बांधण्यासाठी एकूण १५ वर्ष लागली होती.

नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास – Naldurg Fort History in Marathi 

नळदुर्ग या किल्ल्यातील वास्तुशिल्प हे बहुतेक मध्ययुगीन काळातील असावे आणि किल्ल्याचे वास्तू हे त्या आधीचे असावे असे काही इतिहासकारांच्या मते सांगितले जाते. नळदुर्ग हा किल्ला कोणी बांधला आहे याचे इतिहासामध्ये ठोस असे पुरावे नाहीत पण काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला चालुक्य राजकर्त्यांच्या काळात म्हणजेच राजा नळ याने बांधला असावा.

त्यानंतर हा किल्ला १४ व्या शतकामध्ये बहामनिंच्या ताब्यात गेला आणि बहामनिंच्या काळातच या किल्ल्याचे दगडी बांधकाम तसे या किल्ल्याला संरक्षक अशी तटबंदी बांधली असावी. त्यानंतर इ. स. १४८० मध्ये बहामनी साम्राज्याच्या विभाजनानंतर हा किल्ला विजापूरच्या आदिल शहाच्या वर्चस्वा खाली गेला आणि विजापूरच्या आदिल शहा ने देखील किल्ला विकसित केला.

आदिल शाही काळामध्येच या किल्ल्यावर ११४ बुरुज असणारी भक्कम तटबंदी बांधली होती. आज आपण जो किल्ला पाहतो त्याचे श्रेय दुसरा इब्राहीम आदिल शहा याला दिले जाते आणि याने किल्ल्यावर (इ. स. १५५६ ते इ. स. १६२७) पर्यंत राज्य केले. आदिल शाही नंतर नळदुर्ग या किल्ल्यावर औरंगजेब याने ताबा घेतला आणि त्याने हा किल्ला हैद्राबादच्या निजामांच्या कडे दिला.

किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे 

  • बोर नदीवरील धरण :

नळदुर्ग हा किल्ला बोर नदी काठी वसलेला आहे आणि तेथे आदिल शाहीच्या काळामध्ये एक प्रचंड मोठे धारण बांधले आहे. हे धारण ९० फुट उंच, २७५ मीटर लांब आणि ३१ मीटर रूड आहे.

  • तहळणी बुरुज :

तहळणी बुरुजाला उपळीबुरुज देखील म्हणतात आणि हा बुरुज त्या काळी शत्रूच्या हालचालींवर पहारा ठेवण्यासाठी बांधला होता. हा बुरुज किल्ल्याच्या तटबंदीच्या बरोबर मध्य भागी बांधलेला आहे.

  • प्रवेशदार :

नळदुर्ग या किल्ल्याच्या मुख्य प्रवेश दाराला दोन दरवाजे आहेत आणि त्यांना २ वेगवेगळी नावे आहेत. एक दरवाज्याचे नाव हाथी दरवाजा आणि दुसऱ्या दरवाज्याचे नाव हुरमुख दरवाजा असे आहे.

  • तोफा :

नळदुर्ग ह्या किल्ल्याच्या आवारामध्ये आपल्यला दोन तोफा पाहायला मिळतात त्या म्हणजे मगर तोफ आणि हाथी तोफ.

  • बारदरी :

या किल्ल्यावर आपल्यला १५ फुट उंचीची एक इमारत पाहायला मिळते. ज्यावेळी या किल्ल्यावर इंग्रजांचे राज्य होते त्यावेळी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासक कर्नल मेडोज टेलर हे होते आणि ते ५ वर्ष याच इमारतीमध्ये राहिले होते.

  • दरबार महाल :

दरबार महाल म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या ठिकाणी राजदरबार भरायचा ते ठिकाण. आपल्यला या किल्ल्यावर दरबार महाल पाहायला मिळतो.

  • पाणी महाल :

पाणी महाल हि किल्ल्याची एक आकर्षक वास्तू आहे आणि हा पाणी महाल आदिल शाही काळामध्ये म्हणजे इ. स. १६१३ मध्ये बांधला आहे आणि किल्ल्याच्या विरुध्द बाजूला हा बोरी नदीवर बांधला आहे. हा महाल नदीवर ९० फुट उंच बांधला आहे. या पाणी महालाची विशेषता म्हणजे या इमारतीमधील तापमान हे कायम थंड असते.

  • रनमंडळ :

रनमंडळ हा एक किल्ला आहे जो नळदुर्ग किल्ल्याच्या नदीच्या पलीकडे आहे आणि पाणी महाल हे या दोन किल्ल्यांना जोडते.

  • किल्ल्यामधील इतर महत्वाच्या वास्तू :

या किल्ल्यावर आपल्याला अंबरखाना, जामा मशीद, हमामखाना, निजाम कोर्ट, राणीमहाल, रंगमहाल, बारुदखाना, गणपती महाल, लक्ष्मी महाल आणि कृत्रिम धबधबा पाहायला मिळतो.

नळदुर्ग किल्ला फोटो:

naldurg fort information in marathi
naldurg fort information in marathi

नळदुर्ग या किल्ल्यावर कसे जायचे ?

नळदुर्ग हा किल्ला उस्मानाबाद पासून ५० किलो मीटर अंतरावर आहे, तुळजापूर पासून ३५ किलो मीटर अंतरावर आहे, सोलापूरहून ५० किलो मीटर अंतरावर, पुणे शहरापासून २६० किलो मीटर आणि मुंबई शहरापासून ४११ किलो मीटर आहे. आर तुम्हाला रेल्वेने यायचे असल्यास उस्मानाबाद किवा तुळजापूर मध्ये आपल्यला कोणतीही रेल्वे मिळू शकणार नाही त्यामुळे उस्मानाबादचे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक सोलापूर आहे,

जे उस्मानाबाद पासून ५८ किलो मीटर आहे आणि तेथून आपल्यला बस किवा टॅक्सी पकडून किल्ल्यापर्यंत जाता येते. आपण पुणे किवा मुंबई मधून उस्मानाबादला किवा तुळजापूरला बसने देखील जावू शकतो आणि तेथून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी स्थानिक बस किवा टॅक्सी पकडू शकतो.

टीप

  • नळदुर्ग हा किल्ला सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत पर्यटकांच्यासाठी खुला असतो.
  • हा किल्ला पाहण्यासाठी पावसाळा हा उत्तम काळ आहे.
  • नळदुर्ग हा किल्ला पाहण्यासाठी कोणताही शुल्क घेतला जात नाही.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, नळदुर्ग किल्ला naldurg fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. naldurg fort wiki in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about naldurg fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही नळदुर्ग किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या naldurg killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

5 thoughts on “नळदुर्ग किल्ला माहिती Naldurg Fort Information in Marathi”

  1. नळर्दुग किल्ला पहाण्यासाठी पैसे घेतले जातात.
    किल्ला हा पूर्ण पाने पाहू देत नाहीत फाशी दरवाज्याच्या पलीकडे जाऊ देत नाही
    तेथे वशीला चालतो.

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!