माहुर गडाची माहिती Mahur Fort History in Marathi

Mahur Fort History in Marathi माहुर किल्ला माहिती आपल्या सर्वांना माहित आहे कि माहूर हे एक पवित्र स्थान आहे कारण या गावामध्ये दत्तात्रेय प्रभूंचा जन्म झाला तसेच हे दत्तात्रेय प्रभूंचे निद्रस्थान देखील होते तसेच रेणुका देवीचे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ देखील आहे आणि अश्या या पवित्र स्थळाच्या ठिकाणी माहूर किल्ला देखील वसलेला आहे. ज्याला माहूरच रामगड किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. माहूर हा किल्ला टेकडी प्रकारातील असून हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यामधील माहूर या तालुका असणाऱ्या गावामध्ये वसलेला आहे.

Mahur Fort Information in Marathi माहूर हा किल्ला माहूर गावाजवळ वसलेला आहे आणि या गावाला माहोर या नावाने देखील ओळखले जाते माहूर हे गाव नादेंड या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या किनवट या गावापासून ४० ते ४१ किलो मीटर अंतरावर आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या छोट्याश्या टेकडीवर वसलेला एक प्राचीन किल्ला म्हणून ओळखला जातो. माहूर हा किल्ला समुद्र सपाटी पासून २६ फुट उंचीवर बांधला असून या किल्ल्याचा विस्तार ९ किलो मीटर वर पसरलेला आहे.

mahur fort history in marathi
mahur fort history in marathi

माहुर गडाची माहिती – Mahur Fort History in Marathi

किल्ल्याचे नावमाहूर किल्ला, माहूरच रामगड किल्ला, गिरिदुर्ग गोंड
प्रकारटेकडी किल्ला
समुद्र सपाटीपासूनची उंची२६ फुट
ठिकाणहा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यामधील माहूर या तालुका असणाऱ्या गावामध्ये वसलेला आहे
किल्ल्याचा विस्तार९ किलो मीटर वर पसरलेला आहे
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणेराजवाडा, चीनी महल, मशीद, जलाशय, हत्ती दरवाजा, कटोरा बावडी, शस्त्रगार आणि गौतम झरा, चोर दरवाजा

हा किल्ला जरी छोट्याश्या टेकडीवर वसलेला असला तरी त्याला गिरिदुर्ग प्रकारातील मानले जाते आणि या किल्ल्याला गिरिदुर्ग गोंड या नावाने देखील ओळखले जाते. माहूरच रामगड हा किल्ला खूप प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे असे म्हंटले जाते कारण हा किल्ला यादव काळामध्ये देखील अस्तित्वात होता म्हणजे हा किल्ला यादव काळाच्या देखील आधी बांधलेला किल्ला आहे त्यानंतर या किल्ल्यावर गोंड, ब्राह्मण, बहामनी, आदिलशाही आणि निजाम शाही यांनी देखील वर्चस्व गाजवले आहे.

या किल्ल्याच्या रचनेबद्दल बोलायचे म्हणटले तर या किल्ल्याला चारही बाजूंनी भक्कम अशी तटबंदी आहे आणि किल्ल्यावर जी पहिल्यांदा तटबंदी बांधलेली आहे ती देवगिरी काळातील रामदेवराय यांनी बांधली आहे. त्याचबरोर या किल्ल्याला एकूण २ प्रवेश दरवाजे आहेत एक प्रवेश दरवाजा किल्ल्याच्या उत्तरेकडील भागामध्ये आहे.

तर दुसरा दरवाजा किल्ल्याच्या दक्षिणेकडील भागात आहे. किल्ल्याचा जो मुख्य प्रवेश करण्याचा दरवाजा आहे त्याची उंची एकूण १३ फुट इतकी आहे तर रुंदी १० फुट आहे त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये आपल्यला राजवाडा, चीनी महल, मशीद, जलाशय, हत्ती दरवाजा, कटोरा बावडी, शस्त्रगार आणि गौतम झरा यासारखी प्राचीन बांधकामे पाहायला मिळतात.

माहूर किल्ल्याचा इतिहास 

दत्तात्रेय प्रभूंचे जन्म ठिकाण आणि निद्रास्थान तसेच रेणुका देवीचे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असणारे माहूर या पवित्र स्थानि असणारा हा माहूरच किल्ला कोणी बांधला याबद्दल इतिहासामध्ये काही ठोस पुरावा नाही पण काही ऐतिहासिक गोष्टींच्या वरून असे मानले जाते कि हा किल्ला देवगिरी काळातील रामदेवराय यादव यांनी बांधला असावा.या किल्ल्यावर यादव, गोंड, ब्राह्मण, बहामनी, आदिलशाही आणि निजाम शाही या वंशानी वर्चस्व गाजवले आहे.

काही इतिहास कारांच्या मते हा किल्ला यादवांच्या नंतर गोंड साम्राज्याकडे गेला आणि त्यांनी त्या किल्ल्यावर काही दिवस वर्चस्व गाजवले त्यानंतर १५ व्या शतकामध्ये माहूर हा किल्ला ब्राह्मण लोकांच्या ताब्यात गेला त्यांनी माहूर हा भाग बीशपच्या अधिकारातील एक प्रदेश बनवला.

१६ व्या शतकामध्ये माहूरच्या आजूबाजूच्या प्रांतावर आदिलशाही, निजामशाही आणि इमादशाही यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते आणि क्या किल्ल्यावर देखील हल्ले करून माहूर हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता पण काही दिवसातच म्हणजे १७ व्या शतकामध्ये हा किल्ला मोगलांनी ताब्यात घेतला ज्यावेळी औरंगजेबाचे वडील शहाजहान यांच्या वडिलांनी जहांगीर विरुध्द बंद केला होता त्यावेळी शहाजहानने आपली पत्नी आणि मुलांसोबत (औरंगजेब त्यावेळी फक्त ६ वर्षाचा होता) याच किल्ल्यामध्ये आश्रय घेतला होता.

१८ व्या शतकामध्ये माहूरच हा किल्ला गोंड राजा शंकर शहा याच्याकडे होता त्याने या किल्ल्यावर काही वर्ष राज्य केले पण इ. स १८८२ मध्ये झालेल्या लढाई मध्ये हा किल्ला निजामांच्या ताब्यात गेला कारण त्यावेळी निजामांना इंग्रजांनी या लढाई मध्ये मदत केली होती आणि हा किल्ला भारताला स्वातंत्र्य मिळू पर्यंत त्यांच्याच ताब्यात होता. आता हा किल्ला भारत सरकारच्या मालकीचा झालेला आहे.

माहूर या किल्ल्यावर राज्य करणारी वंश

माहूरच्या रामगड या किल्ल्यावर गोंड, ब्राह्मण, बहामनी, आदिलशाही, मोगल आणि निजाम शाही या सर्व वान्शनी राज्य केले.

माहूर किल्ल्यावर पाहण्यासारखी प्राचीन ठिकाणे 

  • बुरुज :

बुरुज या सर्व किल्ल्यांवर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि लढाईच्या वेळी लांब असणाऱ्या स्तरावर आक्रमण करण्यासाठी बांधलेले असतात आणि या किल्ल्यावर देखील आपल्याला प्राचीन भक्कम अशे बुरुज पाहायला मिळतात जर आज या किल्ल्याची पद्झाल झाली असली तरी पूर्वीच्या काळी हे बुरुज भक्कम होते. त्या काळी या किल्ल्यावरील बुरुजांना नावे दिलेली होती. त्यामधील काही बुरुजांची नावे म्हणजे महाकाली बुरुज, निशाणा बुरुज आणि धन बुरुज. या किल्ल्यावर पूर्वीच्या काळी एकूण ३७ बुरुज बांधले होते.

  • जलाशय :

माहूर या किल्ल्यावर आपल्याला २ मुख्य जलाशय देखील पाहायला मिळतात ते म्हणजे मातृतीर्थ जलाशय आणि दुसरा इजाला जलाशय आहे. पूर्वीच्या काळी या जलाशयातील पाणी बहुतेक पिण्यासाठी आणि वापरासाठी वापरले जात असावे. त्याचबरोबर या किल्ल्यावर आपल्याला गौतम झरा देखील पाहायला मिळतो.

  • चीनी महल :

माहूर या किल्ल्यावर आपल्याला चीनी महल ज्याला हवा महल देखील म्हंटले जाते. हा चीनी महल हत्ती दरवाज्याच्या पश्चिमेकडील भागामध्ये बांधलेला आहे.

  • मशीद :

माहूर या किल्ल्यामध्ये पश्चिमेकडील बुरुजांच्या जवळ प्राचीन काळी बांधलेल्या २ मशिदी देखील पाहायला मिळतात.

  • चोर दावाजा :

या किल्ल्यामध्ये आपत्कालीन काळामध्ये किल्ल्याच्या बाहेर जाण्यासाठी एक दरवाजा आहे त्याला चोर दरवाजा म्हणतात.

  • माहूर किल्ल्यावरील इतर प्राचीन ठिकाणे :

या किल्ल्यामध्ये वाडा, बारव, राणी महल, हत्ती दरवाजा, बारुदखाना, कारंजे आणि कटोर बावडी.

माहूर मधील इतर पाहण्यासारखी ठिकाणे

  • दत्तात्रेय प्रभूंचे मंदिर ( जनस्थान आणि निद्रास्थान )
  • रेणुकामातेचे दुसरे शक्तीपीठ
  • वस्तू संग्रहालय

माहुर किल्ला फोटो:

mahur fort history in marathi
mahur fort history in marathi

माहूर किल्ल्यावर कसे जायचे ? 

माहूर या किल्ल्यावर जाण्यासाठी आपण बसने, विमानाने किवा रेल्वेने देखील जावू शकतो. जर तुम्हाला माहूरला रेल्वेने जायचे असल्यास तुम्ही पुणे किवा मुंबई हून किनवट या रेल्वे स्थानकावर उतरू शकता आणि तेथून माहूरला स्थानी बस किवा टॅक्सी पकडून जावू शकता. किनवट ते माहूर या गावाचे अंतर ५० किलो मीटर आहे.

जर तुम्हाला माहूरला विमानाने जायचे असल्यास सर्वात जवळचे विमान स्थानक नांदेड येथे माहूर पासून १०० किलो मीटर अंतरावर आहे आणि नांदेड मधून आपल्याला माहूरला जाण्यासाठी बस मिळू शकते. त्याचबरोबर जर तुम्हाला बसने जायचे असल्यास पुणे किवा मुंबईहून नांदेड बस मिळू शकते आणि तेथून माहूरला जाणारी बस पकडावी लागते.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, माहुर किल्ला mahur fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. mahur fort history in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about mahur fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही माहुर किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या mahur killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “माहुर गडाची माहिती Mahur Fort History in Marathi”

  1. खूप छान आणि माहिती ची वाक्य रचना खूप सुंदर आहे .
    अजून माहिती मिळाली तर टाकत चला गडावर काही पुरातन काळातील वस्तू सापडल्या तर ते पण नमूद करा 🙏🏻

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!