कास पठार विषयी माहिती Kas Pathar Information in Marathi

Kas Pathar Information in Marathi – Kas Pathar Satara Information in Marathi कास पठार विषयी माहिती कास पठार भूगोल मित्रहो, हिरवी साडी नेसलेले पठार व पर्वत, निळ्याशार शाईने अथांग भरलेले समुद्र व महासागर, मंजुळ गाणी गात खळखळत वाहणाऱ्या नद्या व नाले, अशा अनेक दागिन्यांनी नटलेला निसर्ग खरंच किती सुंदर आणि आकर्षक आहे! सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला अशा बलाढ्य, विलक्षणीय आणि भव्य निसर्गाचा अनमोल ठेवा जपण्याची संधी मिळते, हे तर नवलचं! अगदी अशाच पद्धतीचा असलेला कास पठार देखील सह्याद्री सब-क्लस्टरचा सगळ्यात महत्वाचा जागतिक नैसर्गिक वारसा आहे.

आजकाल कास पठाराला भेट देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून आणि दुरवरून भरपूर पर्यटक येत असतात. त्यामुळे, पर्यटकांमुळे होणाऱ्या पठाराच्या संभाव्य नुकसानीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या पठारावर येणाऱ्यांची संख्या आता दिवसाच्या वेळेला जवळजवळ ३००० इतकी  मर्यादित ठेवण्यात आलेली आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये एरिओकॅलॉन एसपीपी, उट्रिक्युलरिया एसपीपी, पोगोस्टेमॉन डेकेनेनेसिस, सेनेसिओ ग्रॅहॅमी, इम्पेटीन्स लॉईआय आणि दिपकाडी मॉन्टॅनम अशा काही सामान्य फुलांच्या रोपांची कास पठारावर लागवड केली जाते. मित्रहो, कास पठार हे एक बलाढ्य पठार असून ते सातारा जिल्ह्यापासून केवळ २५ किमी एवढ्या अंतरावर स्थित आहे.

खरंतर, कास येथे जाण्यासाठी फक्त दोन मार्ग आहेत आणि ते म्हणजे; साताऱ्यातून निघणारा एक थेट मार्ग आणि तपोलाहून जाणारा ‘महाबळेश्वर व पाचगणी‘ यांना कास पाथरला जोडणारा लिंक रोडचा मार्ग. याखेरीज, कोयना अभयारण्याच्या उत्तर भागापासून कास पठार हे केवळ २० किमी एवढ्या अंतरावर वसलेले आहे.

kas pathar information in marathi
kas pathar information in marathi

कास पठार विषयी माहिती – Kas Pathar Information in Marathi

मित्रहो, कास पठाराचा महत्वाचा आणि मुख्य भाग म्हणजे ‘राखीव वन’ होय. कास तलाव हा गुरुवारच्या दिवशी सातारा शहराच्या पश्चिम भागासाठी पाणीपुरवठा करण्याचा एकमेव असा बारमाही स्रोत उपलब्ध आहे.

कास पठारावर येणाऱ्या वनस्पती या सामान्यतः गवतासारख्या दिसणाऱ्या वनौषधी म्हणून मानल्या जातात. शिवाय, कास पठाराच्या परिघावर अनेक छोटी झुडपे आणि उंच झाडे आहेत. शिवाय, लहान-लहान झुडुपे व मोठी, उंच, डौलदार झाडे या पठाराच्या परिघात आढळली जातात. कास पठार मोठ्या प्रमाणात बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे.

त्यामुळे, बेसॉल्ट या खडकापासून बनल्यामुळे कास पठारास थेट वातावरणाला सामोरे जावे लागते. याशिवाय, कासचे पठार बेसॉल्ट खडकाच्या जमिनीमुळे तयार झालेल्या मातीच्या अगदी पातळ आवरणाने झाकले गेले आहे आणि या भुमिपेक्षा जास्त इंच नसलेला थर कास पठारावर साचलेला आपल्याला दिसून येतो.

इतकेच नाही तर कास पठारावरील माती सरळ काळ्या किंवा अन्य कोणत्याही एकाच अशा विशिष्ट रंगाची ही नाही. या पठारावरील वेगवेगळ्या ठिकाणांच्या पृष्ठभागावरील मातीच्या असमानतेमुळे पाणी साचले आहे.

खरंतर, कासच्या या पठारावर पावसाळा हंगाम सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची आणि नानाविध जातीची रानफुले बहरतात. याचबरोबर, अनेक दुर्मीळ प्रजाती याठिकाणी सापडल्या गेल्याने कास पठाराचा इसवी सनाच्या २०१२ या साली ‘युनेस्को जागतिक वारसा स्थळां’च्या संरक्षित यादीत समावेश करण्यात आला आहे. कास पठार हे महाराष्ट्रातील सर्वांना आकर्षित करणारे एक प्रसिध्द आणि नावारूपाला आलेले  पर्यटन स्थळ आहे.

कास पठारावरील जैवविविधता

कास पठार या ठिकाणाला ‘जैवविविधतेचा हॉटस्पॉट’ असे मानले जाते. कास पठाराचे विष्येशत्व म्हणजे साधारणतः ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांच्या कालावधीत फुलणाऱ्या निरनिराळ्या रंगांच्या आणि नानाविध प्रकारच्या रानफुलांसाठी तसेच, या फुलांवर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांसाठी हे पठार विशेष प्रसिद्ध आहे.

याशिवाय, जर आपण कास पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची पहायला गेलो तर ती जवळपास १००० ते १२५० मीटर यादरम्यान होईल आणि या पठाराचे क्षेत्रफळ अंदाजे १० चौ. किमी इतके होईल. त्याचबरोबर, या पठाराच्या भुमीवर २८० फुलांच्या प्रजाती आणि या फुलांच्या व्यतिरिक्त वेली, वनस्पती, झुडपे व त्यांच्या इतर प्रजाती एकत्रित मिळून ८५० प्रजाती आढळतात.

याशिवाय, या पठारावर आययूसीएनच्या संघटनेने असे घोषित केले आहे की, (International Union for Conservation of Nature and Natural Resources) प्रदेशनिष्ठ लाल लिस्टमधील अनेक प्रजाती नष्टप्राय होण्याचा धोका संभवत आहे. या घोषित प्रादेशिक प्रजातींच्या यादीमध्ये कास पठारावर वास्तव्यास असलेल्या एकूण २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात.

कास पठारावरील अजुन एक खास वैशिष्ट्य म्हणजे या पठारावर जवळपास ५९ जातींचे सरिसृप म्हणजे सरपटणारे प्राणी आढळतात.

कास पठारावरील पर्यटनस्थळे

कास पठार फुले

मित्रहो, ‘भांबवली पुष्प पठार’ हे संपुर्ण जगातील सर्वांत मोठे पुष्प पठार म्हणून ओळखले जाते आणि विशेष म्हणजे हे पठार कास पठारापासून केवळ ३ किमीवर इतक्या अंतरावर असून ते एकूण तीन तालुक्यांमध्ये येते व ते तीन तालुके पुढीलप्रमाणे; सातारा, जावळी आणि पाटण इत्यादी.

पण मित्रांनो, निरनिराळ्या व रंगी-बेरंगी रंगांच्या फुलांनी बहरून आलेले हे पुष्प पठार मात्र पर्यटकांच्या नजरेपासून दूर राहिले आहे त्यामुळे, सध्या ते दुर्लक्षित आहे. परंतू, सातारा जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. म्हणूनच तर कास-भांबवली-तापोळा- महाबळेश्वर– पाटण हा निसर्गाच्या अनोख्या सौंदर्याने नटलेला परिसर सदाहरित जंगलाने व्यापलेला आपल्याला पहावयास मिळतो.

शिवाय, याच पश्चिम घाटाच्या डोंगराळ प्रदेशामध्ये कोयनेचा शिवसागर जलाशय, भांबवली, वज्रा धबधबा, युनेस्को पुरस्कृत ठरलेले कास पुष्प पठार, तसेच शिवरायांच्या आठवणींमध्ये विसाव्यास असलेले प्रतापगडसारखे बलाढ्य व मजबूत गड/किल्ले आहेत.

भारतातील तसेच, अन्य प्रदेशातील पर्यटकांना कास पठारावरील सदाहरित जंगलामध्ये नैसर्गिक जैवविविधतेचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. कासचे पुष्प पठार, चाळकेवाडी येथील पवनचक्कीचे पठार, पाचगणी येथील ‘Table land’ या पठारांना दुसऱ्या शब्दात सडा या अर्थाने सगळीकडे ओळखले जाते.

पावसाळा हंगाम सुरू झाल्यावर या सडयावर मोठ्या प्रमाणात गवत उगवते आणि त्यावर विविध प्रकारची, नानारंगी फुले डोलू लागतात. शिवाय, याठिकाणी जाण्यासाठी कोणताही विशेष असा मार्ग नाही, त्यामुळे अर्थातच गाड्यांच्या वर्दर्ळी नाहीत, पर्यटक नाहीत आणि यामुळे कोणतेही प्रदूषण देखील नाही.

याठिकाणी आजूबाजूच्या खेड्यांतील पाळीव जनावरे मनसोक्तपणे गवत खाण्यासाठी येत असतात. शिवाय, या सड्यावर कोणत्याही प्रकारचे  कुंपण नसल्यामुळे वन्यजीव तसेच, तेथील विहंग अगदी मनसोक्तपणे विहार करताना आपल्याला दिसू शकतात.

निसर्गाने मानवाला प्रदान केलेल्या आणि अनोख्या सौंदर्याने नटलेल्या या रमणीय पर्यटन स्थळांवर मनुष्याचा अडथळा अथवा कोणतीही गर्दी  नाही, त्यामुळे याठिकाणाचे निसर्गाचे जीवनचक्र सुरळीतपणे चालू आहे. शिवाय, येथील हिरव्यागार रानाला व फुलांना शेणखत आणि पशुपक्ष्यांचे तसेच मृत प्राण्यांचे मूत्रखत मिळते.

त्यामुळे, कास पठारावरील रान आणि निरनिराळ्या जातीची सुंदर फुले जोमाने वाढतात. खरंतर, निसर्गाचा हा अनोखा व रंगीबेरंगी महाउत्सव जून किंवा जुलै या महिन्यांमध्ये सुरू होतो आणि तो अखेर सप्टेंबर महिन्यापर्यंत आपल्याला पहायला मिळतो. याशिवाय, सप्टेंबर महिन्यामध्ये भांबवलीचे संपूर्ण पठार नानाविध अशा अनेक रंगांनी बहरलेले पहावयास मिळते.

असे संपूर्ण दृष्य पाहिले की असे वाटते जणू काही निसर्ग देवतेचे मंदिर रंगीबेरंगी रंगांची उधळण करत आहे. शिवाय, येथील भांबवलीचे पुष्प पठार उन्हाळ्याच्या ऋतुमध्ये करकरीत कोरडे असते.

परंतू, गडद रंगाच्या काळ्याकुट्ट जांभ्या दगडाच्या पठारावर पावसाळा ऋतूत बहरणारा विविधरंगी फुलांचा बहर हे येथील विशेष आश्चर्य आहे. त्याचबरोबर, या दगडावरील विविधरंगी आणि सुवासिक फुले हा निसर्गाचा एक प्रकारचा चमत्कारचं आहे. असे आपल्याला म्हणावे लागेल.

मित्रहो, विशेष म्हणजे फक्त दसऱ्याच्या सणादिवशी या पठारावर केवळ फुलेच नाहीत तर, विविधरंगी खेकडे सुद्धा फिरताना दिसतात. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे कास पठारावर पूर्वीच्या काळातील विजनवासातील पांडवांच्या पायाचे ठसे आजही येथे पहावयास मिळतात असे सांगितले जाते.

कास पठारावर भेट द्यायची वेळ – Kas Pathar Best Time to Visit

कास पठारावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधी मध्ये भेट दिलेली उत्तम राहील.

घ्यावयाची काळजी 

कास पठारावर निसर्गाच्या अनेक लीलांसोबतच आपल्याला वन्यप्राण्यांचे देखील दर्शन घ्यावयास मिळते. जसे की भेकरे, ससे यांसारखे चपळ प्राणी दूरवरून आपल्याला पळताना दिसतात. या प्राण्यांशिवाय बिबट्यासारखे आणि अस्वलासारखे हिंस्त्र प्राणी देखील कास पठारावर वास करतात. त्यामुळे, पर्यटकांनी कास पठारावर पर्यटनासाठी जाताना या गोष्टींची काळजीपूर्वक नोंद घेणे खूप गरजेचे आहे.

कास पठारावर पावसामुळे खूप ठिकाणी निसरडे तयार झालेले आहेत, त्यामुळे अशा काही ठिकाणांहून पाय घसरण्याची शक्यता देखील असते. मित्रहो, कास पठारावर खासकरून पहाटेच्या वेळी आणि इतर वेळीदेखील दाट धुक्याची मऊशार व थंड चादर पांघरलेली असते.

या दाट धुक्यामुळे आपण कास पठाराच्या कड्यापर्यंत कधी पोहचलो! याची काहीवेळा आपल्याला जाणीवही होत नाही. त्यामुळे, पर्यटकांनी या गोष्टीबद्दल विशेष आणि जाणीवपूर्वक सावधानता बाळगणे आवश्यक आहे. परंतु, काहीही असले तरी कास पठार हे ठिकाण म्हणजे पृथ्वीवरील जणू एक नंदनवनच आहे!

                     तेजल तानाजी पाटील

                        बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या kas pathar information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कास पठार विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kas pathar satara information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Kas Pathar Best Time to Visit माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kas pathar flowers information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!