Kite Bird Information in Marathi काइट या पक्ष्याला मराठीमध्ये ‘घार’ ghar pakshi असे म्हणतात. घार हा पक्षी ऑक्सिपिट्रीडी कुळातील आहे आणि या पक्ष्याच्या जगभरामध्ये २२ जाती आहेत. घार kite bird in marathi हा एक शिकारी पक्षी आहे आणि या पक्ष्याचे डोळे अतीशय तीक्ष्ण असतात त्यामुळे हे पक्षी आकाशामध्ये फिरत असताना उंचीवरूनही आपला शिकार अगदी सहजपणे ओळखू शकतात. घार हा पक्षी भारत, म्यानमार, बंगला देश, नेपाल, श्रीलंका आणि पाकीस्थान या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.
नर आणि मादी हे दिसायला एकसारखेच असतात पण मादी नरापेक्षा वजनाने आणि आकाराने मोठी असते. या पक्ष्याचा रंग तपकिरी किवा काळा असतो आणि या पक्ष्याचे पाय आखूड असतात, चोच लहान आणि आकडीसारखी असते, पंख लांब असतात आणि नख्या धारधार असतात आणि या पक्ष्याची शेपूट २ भागामध्ये विभागलेली असते.
घार पक्षाविषयी माहिती – Kite Bird Information in Marathi
नाव | घार |
इंग्रजी | काइट बर्ड (ghar bird in english) |
कुळ | ऑक्सिपिट्रीडी |
रंग | तपकिरी किवा काळा |
आकार ( लांबी ) | ५५ ते ६० सेंटी मीटर |
वजन | ७०० ग्रॅम |
आयुष्य | १६ ते २० वर्ष |
शास्त्रीय नाव | मिल्व्हस मायग्रान्स |
घार या पक्ष्याचा आहार ( food )
घार हा पक्षी एक शिकारी पक्षी आहे आणि त्यावरून आपल्याला समजते कि हा मांसाहार पक्षी आहे. घार साप, बेडूक, उंदीर, मासे आणि सरडे या प्रकारचे अन्न खातात पण घारीचे आवडता आहार म्हणजे कोंबडीचे किवा कोणत्याही पक्ष्याचे लहान पिल्लू.
घार पक्षी कुठे राहतात ( habitat )
घार हा पक्षी भारत, म्यानमार, बंगला देश, नेपाल, श्रीलंका आणि पाकीस्थान या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. घारीलाहि मानव वस्तीत राहायला आवडते. घार आपली घरटी बनवताना उंच झाडे निवडते जसे कि नारळ, पिंपळ किवा वड यासाराखी झाडे निवडते. घार आपले घरटे काटक्यांच्या मदतीने बनवते.
- नक्की वाचा: फिनिक्स पक्षाची माहिती
6 घार पक्ष्याचे प्रकार ( types of kite bird )
घार हा पक्षी जास्ती जास्त तपकिरी किवा काळ्या रंगाचा असतो आणि या पक्ष्याच्या जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या २२ जाती आहेत. यामधील काही जाती खाली दिल्या आहेत.
1.ब्लॅक काइट ( black kite bird information in marathi )
ब्लॅक काइट हा पक्षी मध्यम आकाराचा आणि गडद रंगाचा पिसारा असणारा पक्षी आहे आणि हा पक्षी ऑक्सिपिट्रीडी कुळातील असून घारीची हि प्रजात मोठ्या प्रमाणात आढळते. आत्ता या पक्ष्यांची संख्या अंदाजे १० लाख इतकी आहे. हे पक्षी समशीतोष्ण किवा उष्णकटिबंधात राहणे पसंत करतात. ब्लॅक काइट हा रेड काइट पेक्षा थोडा आकाराने लहान असतो. नर घार थोडा आकाराने लहान असला तरी नर आणि मादी दिसायला एकसारखेच असतात. या प्रकारच्या घारीचे पंख १५० सेंटी मीटर लांब असतात. हे पक्षी बहुतेकदा शहरी भागात. जलीय वस्ती जवळ, कचऱ्याचे ढीग, गवताळ जमिनीच्या ठिकाणी आढळतात.
2.रेड काइट ( redkite bird information in marathi )
रेड काइट हे पक्षी उत्तर इराण, युरोप आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. हे पक्षी ६५ ते ७० सेंटी मीटर लांब असतात आणि या प्रकारच्या घारीचे पंख १७५ ते १८० सेंटी मीटर लांब असतात. नर पक्ष्याचे वजन ८५० ते ११५० ग्रॅम असते आणि मादी पक्ष्याचे १००० ते १२५० इतके असते. हा एक मोहक पक्षी आहे ज्याचे पंख लांब तसेच लांबलचक काटेरी शेपूट आणि पांढऱ्या रंगाचे दुय्यम उड्डाण पंख असतात. नर आणि मादा पक्षी दिसायला एकसारखे असतात.
- नक्की वाचा: ससाणा पक्षाची माहिती
3.ब्लॅक विन्गड काइट ( black winged kite bird information in marathi )
ब्लॅक विन्गड काइट या पक्ष्याला ब्लॅक शोल्डर काइट या नावानेही ओळखले जाते. या प्रकारची घार दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असते. ह्या पक्ष्याचा पाठीमागचा मानेपासूनचा भाग फिकट राखाडी रंगाचा असतो आणि हा रंग त्याच्या शेपटी पर्यंत असतो जस जसा खाली येईल तास तसा तो रंग गडद राखाडी असतो तसेच या पक्ष्याचे वरचे पंख पूर्ण काळ्या रंगाचे असतात आणि आतला भाग राखाडी रंगाचा असतो. या घरीचा घसा आणि पोट पांढऱ्या रंगाचे असते. पाय पिवळ्या रंगाचे असतात आणि नखे खूप घटक असतात. डोळे लाल रंगाचे असतात आणि काळ्या रंगाच्या भुवया असतात. चोच लहान आणि काळ्या रंगाची असून टोक नमुळते असते. हे पक्षी युरोप, आशिया, आफ्रिका, स्पेन आणि पोर्तुगाल या देशामध्ये आढळतात.
4.व्हाईट टेल्ड काइट ( white tailed kite bird information in marathi )
व्हाईट टेल्ड काइट हा पक्षी अमेरिकेमध्ये आढळतो. या प्रकारच्या घारीची लांबी ३० ते ४३ सेंटी मीटर असते आणि या पक्ष्याच्या पंखांची लांबी ३५ ते ४० सेंटी मीटर लांब असतात आणि वजन २५० ते ४०० ग्रॅम असते आणि या पक्ष्याची शेपूट पांढऱ्या शुभ्र रंगाची आणि गोलाकार असते. हि घार ब्लॅक विन्गड घारीसारखाच असतो पण त्याची शेपूट पांढऱ्या रंगाची असते.
5.स्वाल्लोन टेल्ड काइट ( swallon tailed kite bird information in marathi )
स्वाल्लोन टेल्ड काइट हा पक्षी दक्षिण पूर्व अमेरिका, आर्जेन्टिना आणि पेरू या देशामध्ये आढळतो. या पक्ष्याला सीझर टेल्ड काइट असेही म्हणतात कारण ह्या घारीची शेपूट कात्री सारखी व्ही शेपमध्ये असते. या पक्ष्याची लांबी ५५ ते ६९ सेंटी मीटर असते आणि वजन ६०० ग्रॅम पर्यंत असते. या पक्ष्याचा डोक्यापासून मानेपर्यंतचा रंग पांढरा असते आणि तिथून पुढे शेपटी पर्यंत काळा रंग असतो तसेच या पक्ष्याचे आतील अर्धे पंख आणि आतील सर्व भाग पांढऱ्या रंगाचा असतो.
6.स्नैल काइट ( snail kite bird information in marathi )
स्नैल काइट या पक्ष्याची लांबी ३५ ते ५० सेंटी मीटर असते आणि या घारीच्या पंखाची लांबी ९९ ते १२० सेंटी मीटर असते आणि वजन ३०० ते ५५० ग्रॅम असते. हे पक्षी पूर्णपणे गडद राखाडी रंगाचे असतात आणि या पक्ष्यांचे डोळे लाल रंगाचे असतात, शेपटीवर १-२ पांढरे पाते असतात चोचीच्या बाजूला थोडा तपकिरी रंग असतो आणि चोच गडद राखाडी रंगाची आणि मध्यम आकाराची असते आणि चोचीचे टोक थोडे नमुळते असते तसेच या पक्ष्याचे पाय फिकट तपकिरी रंगाचे असतात.
- नक्की वाचा: चिमणी बद्दल माहिती
घार या पक्ष्याबद्दल काही तथ्ये ( facts of kite bird )
- घार हा पक्षी आहे जो ९ ते १० दिवस अन्न न खाता राहू शकतो.
- घार या पक्ष्याचा प्रजनन काळ मार्च ते मे असतो आणि घार एक एक दिवसाच्या अंतरावर अंडी देते.
- मादा घार एका वेळी २ ते ४ अंडी देवू शकते आणि हि वर्षातून एकदाच अंडी देते जर काही कारणास्तव अंडी दगावली तर परत अंडी देते.
- अंडी उबवण्याचे काम नर आणि मादा दोगेही करतात.
- घरीच तिच्या पंखावर चांगल्या प्रकारे ताबा असतो.
- भारतामध्ये घारीचे मुख्यता दोन प्रकार आढळतात साधी घार आणि ब्राह्मणी घार.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा माळढोक पक्षी maldhok bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. great indian bustard in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच maldhok bird and maldhok information in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही माळढोक या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या maldhok bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट