कुसुमाग्रज (वि वा शिरवाडकर) माहिती Kusumagraj Information in Marathi

“सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना

तिमिरातुनी तेजाकडे, प्रभू आमुच्याने जीवना”

Kusumagraj Information in Marathi – Vishnu Vaman Shirwadkar Information in Marathi कुसुमाग्रज यांची संपूर्ण माहिती मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि आपल्या वाड्मय प्रकारातील साहित्याने मराठी मनावर ठसा उमटवणारे, आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठी साहित्यातील एक गाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज’. ज्यांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न म्हणून करतात अशा कुसुमाग्रजांना १९८७ साली भारतातील प्रसिद्ध प्रतिष्ठित अशा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा,

हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा.

कुसुमाग्रजांच्या या कवितेतून त्यांना असलेला मराठी भाषे बद्दलचा अभिमान दिसून येतो. त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

kusumagraj information in marathi
kusumagraj information in marathi

कुसुमाग्रज  (विष्णु वामन शिरवाडकर) माहिती – Kusumagraj Information in Marathi

नावविष्णू वामन शिरवाडकर
टोपणनावकुसुमाग्रज, तात्या शिरवाडकर
जन्म२७ फेब्रुवारी १९१२, नाशिक
मृत्यू१० मार्च १९९९, नाशिक
राष्ट्रीयत्वभारतीय
धर्महिंदू
शिक्षण बी. ए.
कार्यकवी, लेखक, नाटककार, कथाकार, समीक्षक
साहित्यकृती कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, नाटिका आणि एकांकिका, लेखसंग्रह, नाटके  
भाषामराठी
प्रसिद्ध साहित्य (नाटक)नटसम्राट
पुरस्कारज्ञानपीठ पुरस्कार

साहित्य अकादमी पुरस्कार

प्रारंभिक जीवन

कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ साली नाशिक येथे झाला. त्यांचे मुळनाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. परंतु लहान असतानाच त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कुसुमाग्रज यांचे वडील वामन हे पेशाने वकील होते. कामानिमित्त ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले.

त्यामुळे कुसुमाग्रजांचे बालपण हे येथेच गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे पिंपळगाव मधून पूर्ण झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल नाशिक मधून पूर्ण केले. त्यानंतर मुंबई महाविद्यालयातून बी.ए चे शिक्षण पूर्ण केले.  

कुसुमाग्रजांना सहा भावंड आणि कुसुम नावाची एक लहान बहिण होती जी सगळ्यांची लाडकी होती. कुसुम हि एकुलती एक बहिण असल्याने कुसुम चे अग्रज (थोरले भाऊ) म्हणून कुसुमाग्रज हे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून ते कुसुमाग्रज या टोपणनावाने ओळखले जाऊ लागले.

शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी त्यांची पहिली कविता लिहिली. त्यांची ती कविता ‘रत्नाकर’ नावाच्या मासिकातून प्रसिद्ध करण्यात आली. बी.ए ची पदवी मिळाल्यानंतर १९३४ ते १९३६ या सुरुवातीच्या काळात कुसुमाग्रजांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली.

१९४२ ला विशाखा हा कुसुमाग्रजांचा कवितासंग्रह मराठी भाषेचे ध्येयवादी लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांनी स्वखर्चातून प्रकाशित केला. त्यामुळे हे वर्ष त्याच्या जीवनाला एक नवे वळण देण्यासाठी कारणीभूत ठरले. वि. स. खांडेकर हे कुसुमाग्रज यांचे वर्णन करताना म्हणतात कि, “कुसुमाग्रजांच्या शब्दांमुळे सामाजिक असंतोष प्रकट होतो, परंतु त्यांच्यामुळेच जुने जग नव्या मार्गाकडे जात आहे.

हि आशावादी श्रद्धा आहे”. त्यांनतर १९४९ पर्यंत त्यांनी सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.

साहित्य आणि सामाजिक दृष्टीकोन

वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी नाशिकमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून केलेल्या अहिंसात्मक आंदोलनामध्ये सहभागी झाले. १९३० मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात’ कुसुमाग्रज सहभागी झाले होते. १९३३ ला त्यांनी त्यांचा पहिला कवितासंग्रह “जीवनलहरी” प्रकाशित केला.

१९४२ चा स्वातंत्र्य लढ्याची चळवळीच्या काळात शिरवाडकर हे प्रभात दैनिकात काम करत होते. तेव्हा त्यांनी आपल्या वृत्तपत्रातून “क्रांतीचा जयजयकार” हि देशाला स्फूर्ती देणारी कविता प्रकाशित केली होती.

“गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार

अन् व्रजांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार”

कुसुमाग्रज हे अनेक आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्यांच्या आंदोलनातील अनुभवातून त्यांना क्रांतिकारी कविता तयार झाल्या. पत्रकारितेच्या निमित्ताने कुसुमाग्रज मुंबई ला आल्यावर त्यांची भेट मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून टी मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे मुंबई मराठी साहित्य संघाचे “डॉ. अ. ना. भालेराव” यांच्याशी झाली. त्यांनी त्यांना नाटक लिहिण्यासाठी प्रवृत्त केले. आणि कुसुमाग्रज हे एक यशस्वी नाटककार झाले.

त्यांनी त्यांच्या लिखाणातून समाजातील अन्याय आणि विषमता यावर कठोर टीका केली. “साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे” या मताचा त्यांनी पुरस्कार केला.

लेखनशैली

आत्मनिष्ठ व समाज निष्ठेची जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक वि. वा. शिरवाडकर यांचे लेखनही अलौकिक आहे. त्यांचे लेखन हे मनाला भिडणारे आहे. मराठी भाषेवर चार दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी प्रभुत्व गाजविला. हे अग्रगण्य प्रतिभावंत कवी, कथाकार, नाटककार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि आस्वादक समीक्षक होते. त्यांच्या कवितांची वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे शब्द्कलेवर असलेले प्रभुत्व.

त्यांच्यातील साहित्यिक विचार आणि त्यांच्या अंगी जोपासलेली सहानुभूतीने त्यांना समाजातील सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तीमत्वातील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले.

त्यांच्या कविता तरुण पिढीला प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यांच्या अंगी जडलेल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावामुळे त्यांना प्रत्यक्ष ईश्वरा संबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व हे त्यांच्या साहित्यामध्ये प्रतिबिंबित झाले आहे.

कुसुमाग्रज हे सामाजिक क्रांती हि साहित्याची प्रेरणा मानतात. कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव, आणि आविर्भाव हि कलेची आधारभूत तत्त्वे मानतात, त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. त्यांच्या मते लेखकाचा अहंकार हा त्याच्या लेखनप्रक्रीयेला प्रेरणा देणारा ठरतो, हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. अनुभव हा लेखकाच्या सामिलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे. आणि आणि आविर्भाव हा आशयाचा आकार ठरवतो, हे म्हणजे कलाकृतीसापेक्ष आहे.

त्यांच्या मते आपल्याला जे उत्कटपणे जाणवलेले आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे हि माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आणि हा अनुभव आपल्या काव्यातून दुसऱ्यापर्यंत पोचतो तेव्हा लेखकाचा अहंकार सुखावतो. आणि हीच काव्यलेखनाची प्रक्रिया व प्रक्रिया होय.    

वि. वा. शिरवाडकर यांच्या साहित्यकृती

कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यामध्ये मोलाची भर टाकली आहे. साहित्य हि मानवी संसारातील एक समर्थ, किंबहुना सर्वात अधिक सामर्थ्यशाली अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संकृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करीत असते. साहित्य हि एकच अशी गोष्ट आहे जी पृथ्वी वरच्या नाशवंत पसाऱ्यामध्ये हीच एक शक्ती अशी आहे, कि जी अजरामर आहे. ज्याला कायम चीरांजीवानाचे वरदान लाभलेले आहे.

कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता – Kusumagraj Poems in Marathi

कुसुमाग्रज यांनी अनेक कवितासंग्रह लिहिले. त्यांच्यातील प्रामाणिक सामाजिक आस्था, त्यांच्या प्रती मराठी भाषेवर असलेले प्रेम, क्रांतिकारक मनोवृत्ती, या सर्व गोष्टींचा स्फूर्तीदायक अविष्कार त्याच्या विविध कविता मधून दिसून येतो. त्यांचे शब्दकलेवरचे प्रभुत्व हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. आजही त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत.

त्यांच्या कवितेमध्ये शब्दरचना अर्थपूर्ण आहे. त्यांच्या प्रेम या कवितेतील खालील काही ओळी बरंच काही सांगून जातात.

“प्रेम कर भिल्लासारखं

बाणावरती खोचलेलं

मातीमध्ये उगवूनसुद्धा

मेघापर्यंत पोचलेलं.”

– kavi kusumagraj information in marathi

  • विशाखा (१९४२) या त्यांच्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्काराने गोरविण्यात आले आहे.
  • मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) या काव्यसंग्रहाला उत्कृष्ट पुस्तक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.      
  • तसेच जीवन लहरी (१९३३), जाईचा कुंज (१९३६), समिधा (१९४७), किनारा (१९५२), मेघदूत अनुवाद (१९५६), वादळवेल (१९६९), छंदोमयी (१९८२), मुक्तायन (१९८४), श्रावण (१९८५), प्रवासी पक्षी (१९८९), माधवी (१९९४), करार एका ताऱ्याशी (१९९७), अक्षरबाग (१९९९) असे अनेक कवितासंग्रह त्यांनी लिहिले आहेत.
  • त्यांनी लिहिलेली सागर हि कविताहि खूप प्रसिद्ध आहे.

“आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे

निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफेद शिंपित वाटेवरी सडे

हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे”

वि वा शिरवाडकर नाटक यादी

शिरवाडकरांची अनेक नाटके गाजली आहेत.

कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या मराठी भाषेतील नाटकाला ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ आणि ‘साहित्यसंघ’ पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोसिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर १९७० ला बिर्ला मातोश्री सभागृह,  येथे केला.

या नाटकातील नटसम्राट गणपतराव उर्फ आप्पासाहेब बेलवलकर हि प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी केली. या नाटकातून कुसुमाग्रजांनी कलेसाठी स्वतःला वाहून घेतलेल्या माणसाची आणि त्याच्यासोबत संसार करताना कराव्या लागणाऱ्या तडजोडी व ताण तणावांबरोबर प्रेमाने आणि संयमाने घर सावरणाऱ्या स्त्रीचे कथानक लिहिले आहे.

त्याचबरोबर त्यांची दूरचे दिवे (१९४), दुसरा पेशवा (१९४७), वैजयंती (१९५०), कौंतेय (१९५३), राजमुकुट (१९५३), ययाती आणि देवयानी (१९६८), वीज म्हणाली धरतीला (१९७०), विदुषक (१९७३), कैकयी (१९८९), किमयागार (१९९६) इत्यादी अनेक नाटके लिहिली

नाटिका आणि एकांकिका

कुसुमाग्रजांनी अनेक नाटिका आणि एकांकिका लिहिल्या. दिवाणी दावा (१९५४), देवाचे घर (१९५५), नाटक बसते आहे आणि इतर एकांकिका (१९६०), संघर्ष- ‘सुगंध’ दिवाळी अंक (१९६८), बेट (१९७०) इत्यादी.

कादंबऱ्या

वैष्णव (१९४६), जान्हवी (१९५२), कल्पनेच्या तीरावर (१९५६)  

कथासंग्रह

कुसुमाग्रज यांनी लिहिलेले अनेक कथासंग्रह गाजलेले आहेत. त्यामध्ये अंतराळ (१९९१), अॅपॉईंटमेंट (१९६८), एकाकी तारा (१९८३), काही वृद्ध काही तरुण (१९६१), जादूची होडी (१९४६), प्रेम आणि मांजर (१९६४), फुलवाली (१९५०), सतारीचे बोल (१९५८).

लेखसंग्रह

प्रतिसाद (१९८९), मराठीचिए नगरी (१९९५), एखादे पान एखादे फुल (१९९६), बरे झाले देवा (१९९७).

वि. वा. शिरवाडकर यांना सन्मानित करण्यात आलेले पुरस्कार

  • १९९१ – साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारचा ‘पद्मभूषण पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले.
  • १९८७ – कुसुमाग्रजांना भारतातील साहित्यकृती मधील प्रतिष्ठित असा ‘ज्ञानपीठ पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. कुसुमाग्रज हे मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक होते.
  • १९६५ – कुसुमाग्रजांना भारतीय नाट्य परिषदेद्वारे ‘राम गणेश गडकरी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • १९८६ – त्यांना पुणे विद्यापीठाने ‘डि. लिट.’ हि सन्माननीय पदवी प्रदान केली.
  • १९८८ – त्यांना ‘संगीत नाट्यलेखन पुरस्कार’ देण्यात आला.
  • ‘विशाखा’ या कवितासंग्रहाला ‘ज्ञानपीठ पुरस्कार’.
  • अंतराळातील एका ताऱ्याला “कुसुमाग्रज” हे नाव दिले गेले आहे.

कुसुमाग्रज यांच्या नाटकासाठी मिळालेले पुरस्कार

  • १९६६ – ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकाला राज्य शासनाचे पुरस्कार.
  • १९६७ – ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकाला राज्य शासनाचे पुरस्कार.
  • १९७४ – कुसुमाग्रज यांच्या ‘नटसम्राट’ या नाटकाला ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ आणि ‘साहित्यसंघ’ पुरस्कार देण्यात आला.

महराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठीचे पुरस्कार

  • १९६० – ‘मराठी माती’
  • १९६२ – ‘स्वगत’, ‘हिमरेषा’
  • १९७१ – ‘नटसम्राट’

कुसुमाग्रज यांना मिळालेले सन्मान

  • १९६० – मुंबई मराठी ग्रंथसंग्रहाचे अध्यक्षपदी नियुक्ती
  • १९६४ – मडगाव मध्ये भरवलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसमेलनाचे अध्यक्षपद.
  • १९७० – कोल्हापूर येथे भरलेल्या ५१ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद
  • १९९० – मुंबई मध्ये भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्षपदी कुसुमाग्रज होते.
  • २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

कुसुमाग्रज यांच्या नावाने देण्यात येणारे पुरस्कार

  • कुसुमाग्रज स्मृती गौरव पुरस्कार – नक्षत्राचे देणे काव्यमंच संस्थेतर्फे दिला जातो.
  • कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार– या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे. हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने दिला जातो.
  • जनस्थान पुरस्कार – या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे. हा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक तर्फे देण्यात येतो.
  • कुसुमाग्रज पुरस्कार – हा पुरस्कार काव्य विभागासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दिला जातो.
  • ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ – हा पुरस्कार कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनाला नाशिक मधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने १० मार्चला एक वर्षाआड विविध क्षेत्रातील असामान्य कामगिरीसाठी दिला जातो.

आम्ही दिलेल्या kavi kusumagraj information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कुसुमाग्रज – वि वा शिरवाडकर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vishnu vaman shirwadkar information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about kusumagraj in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vi va shirwadkar information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!