लाला लजपतराय यांची माहिती Lala Lajpat Rai Information in Marathi

Lala Lajpat Rai Information in Marathi लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1836 मध्ये दुढिके-जागरा  तालुका-पंजाब मध्ये झाला. लाला लजपतराय हे पंजाबी, भारतीय राजकारणी आणि लेखक होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले आहे. लाला लजपतराय हे जहाल मतवादी नेते होते. पंजाब केसरी असे त्यांना म्हणतात. पंजाब नॅशनल बँकेची स्थापना लाला लजपतराय यांनी केली. लाल-बाल-पाल असे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपीनचंद्र पाल यांना म्हटले जाते.

lala lajpat rai information in marathi
lala lajpat rai information in marathi

लाला लजपतराय यांची माहिती – Lala Lajpat Rai Information in Marathi

नाव (Name)लाला लजपतराय
जन्म (Birthday)28 जानेवारी 1836
जन्मस्थान (Birthplace)दुढिके-जागरा तालुका-पंजाब
वडील (Father Name)राधाकृष्ण अग्रवाल 
आई (Mother Name)गुलाबदेवी अग्रवाल
पत्नी (Wife Name)राधादेवी
मुले (Children Name)प्यारेलाल अग्रवाल, पार्वती अग्रवाल, अमृत ​​राय अग्रवाल
मृत्यू (Death)17 नोव्हेंबर 1928
लोकांनी दिलेली पदवीपंजाब केसरी

वैयक्तिक आयुष्य

मुन्शी  राधाकृष्ण अग्रवाल हे लाला लजपतराय  यांचे वडील सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते. गुलाबदेवी अग्रवाल हे त्यांच्या आईचे नाव होते. लाला लजपतराय यांचा विवाह राधादेवीशी 1849 मध्ये झाला. लाला लजपतराय यांच्या वडिलांची बदली 1870 च्या दशकाच्या उत्तरार्धात रेवरी येथे झाली होती. लाला लजपतराय यांचे सुरुवातीचे शिक्षण तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत झाले. सुरुवातीच्या आयुष्यात लाला लजपतराय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील असलेला विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला होता.

शिक्षण

लाला लजपतराय यांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात 1880 मध्ये प्रवेश घेतला होता. याठिकाणी ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक पंडित गुरुदत्त आणि लाला हंसराज यांच्या संपर्कात आले होते. स्वामी दयानंद सरस्वतीच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव लाहोर मध्ये शिकत असताना लाला लजपतराय यांच्यावर झाला. त्यानंतर लाला लजपतराय हे आर्यसमाजाचे सदस्य झाले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक झाले.

राजकीय आयुष्य

हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे लाला लजपतराय हे हिंदू महासभेत सहभागी झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. कारण महासभा ही  धर्मनिरपेक्ष नव्हती. त्यामुळे नौजवान भारत सभेच्या टीकेला लाला लजपत राय यांना सामोरे जावे लागेल होते. कारण ही धर्मनिरपेक्ष महासभा नव्हती. भारतीय स्वातंत्र्यासाठी च्या यशस्वी आंदोलनासाठी भारतीय उपखंडातील हिंदू जीवन पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे लाला लजपत राय यांनी शांततेच्या मार्गाने चळवळी केल्या. रोहतक येथे त्यांच्या वडिलांची बदली 1884 मध्ये झाली आणि लाला लजपतराय सुद्धा लाहोर येथील अभ्यास संपवून त्यांच्याबरोबर आले.

वडिलांच्या बदली बरोबर 1886 मध्ये ते हीसारला आले. तेथे लाला लजपत राय यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला होता. लाला लजपतराय बाबू चूडामणीसह हिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले होते. लाला लजपतराय यांची लहानपणापासूनच देशसेवा करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची लाला लजपतराय यांनी शपथ घेतली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार जिल्हा शाखा त्याच वर्षी त्यांनी स्थापना केली होती. लाला लजपत राय यांनी आर्य समाजाची स्थापना बाबू चुडामणी, चंदुलाल तयाल, हरिलाल तयाल, बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजीलाल हुडा, डॉ. धनीराम, आर्यसमाजी पंडित मुररीलाल, शेठ छाजुराम जाट आणि देवराज संधिर यांच्याबरोबर केली.

1888 आणि 1889 मध्ये काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लाला लजपत लजपतराय यांची निवड झाली होती. उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी लाला लजपतराय 1892 मध्ये लाहोर येथे गेले होते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी पत्रकारिता सुद्धा करत होते. लाला लजपत राय यांनी द ट्रिब्यून सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले होते. महात्मा हंसराज यांना दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना करण्यास लाला लजपतराय यांनी 1886 मध्ये मदत केली होती.

1947 साली झालेल्या भारताच्या फाळणीनंतर लाहोर मधील या विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यासाठी लाला लजपतराय यांनी 1914 मध्ये वकीलीला रामराम ठोकला होता. ते ब्रिटनला 1914 मध्ये गेले आणि त्यानंतर अमेरिकेला 1917 मध्ये गेले. न्यूयॉर्कमध्ये भारतीय होमरुल लीगची स्थापना लाला लजपतराय यांनी ऑक्टोंबर 1917 मध्ये केली होती.  त्यानंतर ते अमेरिकेत 1927 ते 1930 पर्यंत होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाब मधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर मे 1907 मध्ये कोणताही खटला न चालवता मंडालेच्या तुरुंगात लाला लजपतराय यांची रवानगी करण्यात आली होती. पण लाला लजपतराय यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मिंटो यांनी ठरवल्याने नोव्हेंबर मध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

कोलकत्ता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात 1920 मध्ये लाला लजपतराय हे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.लाहोरमध्ये लोक सेवक मंडळ या ना-नफा तत्त्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना 1921 मध्ये केली होती. फाळणीनंतर दिल्ली येते या संस्थेचे कार्यालय हलविण्यात आले होते. या संस्थेच्या अनेक शाखा भारतभर आहेत.

भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना 1928 मध्ये केली होती. भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला होता, कारण एकही भारतीयाचा समावेश या आयोगाच्या सदस्यामध्ये नव्हता. भारतभर या आयोगावर निदर्शने झाली. जेव्हा या आयोगाने लाहोरला 30 ऑक्टोबर 1928 रोजी भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध लाला लजपतराय यांनी मूक निदर्शनाचे नेतृत्व केले होते. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी निदर्शनावर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले होते. लाला लाजपतराय यांनी जखमी होऊन सुद्धा जमावासमोर भाषण केले होते.

मृत्यू

निदर्शनाच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपतराय पूर्णपणे बरे झाले नव्हते. 17 नोव्हेंबर 1928 रोजी हृदय विकाराच्या आजाराने निधन झाले. लाला लजपतराय यांचा स्कॉटच्या लाठीमारामुळे मृत्यू ओढवला, असे म्हणणे डॉक्टरांचे होते. पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपस्थित करण्यात आला तेव्हा, यात आपली काहीही भूमिका नाही, असे ब्रिटिश सरकारने जाहीर केले होते. भगतसिंग यांनी या घटनेचा सूड घेण्याचे ठरविले होते. पण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंग यांना  सहाय्यक पोलीस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला होता.

लाहोरमधील जिल्हा पोलीस मुख्यालयातून बाहेर पडताना त्या सहाय्यक पोलीस अधिक्षकवर 17 डिसेंबर 1928 रोजी राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या होत्या. भगतसिंग आणि राजगुरू यांचा पाठलाग करताना चननसिंग नावाचा हेड कोन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला होता. ब्रिटिश सरकार विरुद्ध शक्तिशाली भाषण करून लाला लजपत राय यांनी त्यांना हादरवून टाकले होते. यांच्या देशाप्रती असलेल्या देशभक्ती आणि देशाबद्दल निष्ठा यातून दिसून आली. लाला लजपत राय यांनी गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

लाल-बाल-पाल या भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील तीन प्रमुख नायकांपैकी एक होते. या त्रिकोणातील प्रसिद्ध लाला लजपत राय केवळ एक निस्सीम देशभक्त, शूर स्वातंत्र्य सैनिक आणि एक चांगले नेता होते. तसेच एक उत्तम लेखक, वकिल, आर्य समाजी आणि एक समाज सुधारक होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील महानायक लाला लजपत राय यांचे व्यक्तिमत्व प्रामुख्याने एक राष्ट्रवादीने नेत्याच्या रूपात आहे. लाला लजपतराय यांना “पंजाब केसरी” आणि “पंजाबचा सिंह” असे म्हटले जाते. गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता लाला लजपत राय यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जोरदार संघर्ष केला होता.

लाला लजपतराय यांनी लिहिलेली पुस्तके :-

1) द कलेक्टड वर्क्स ऑफ लाला लजपतराय

2) यंग इंडिया

3) महान अशोक

4) लाला लजपतराय रायटिंग अँड स्पीचेस

5) म्याझिनी, ग्यारीबालडी, शिवाजी महाराज यांची उर्दू भाषेत लिहिलेली संक्षिप्त चरित्र

6) श्रीकृष्ण आणि त्यांची शिकवण

आम्ही दिलेल्या lala lajpat rai information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लाला लजपतराय यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lala lajpat rai biography in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about lala lajpat rai in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!