लोकमान्य टिळक माहिती Lokmanya Tilak Information in Marathi

Lokmanya Tilak Information in Marathi लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 ला रत्नागिरी येथे झाला. लोकमान्य टिळक यांचे जन्मनाव केशव होते. पण पुढे बाळ हे नाव रूढ झाले. गाव चिखलगाव (ता. दापोली जि. रत्नागिरी) हे टिळक कुटुंबाचे मूळ गाव होते. लोकमान्य टिळक यांचे वडील गंगाधर आणि आई पार्वतीबाई होते. कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून गंगाधर यांना पुण्याहून गावी यावे लागले. त्यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी मराठी शाळेत केली. पारंपरिक संस्कृत अध्ययन लोकमान्य टिळक यांचे घरातच झाले. गंगाधर यांची बदली 1866 मध्ये पुण्यात झाली. त्यानंतर आपल्या आई-वडिलांसोबत लोकमान्य टिळक पुण्यात आले.

lokmanya tilak information in marathi
lokmanya tilak information in marathi / lokmanya tilak marathi mahiti

लोकमान्य टिळक माहिती – Lokmanya Tilak Information in Marathi

नाव (Name)बाळ गंगाधर टिळक
जन्म (Birthday)23 जुलै 1856
जन्मस्थान (Birthplace)रत्नागिरी शहर
वडील (Father Name)गंगाधर टिळक
आई (Mother Name)पार्वतीबाई टिळक
पत्नी (Wife Name)सत्यभामाबाई टिळक
मुले (Children Name)रामभाऊ, श्रीधर, विश्वनाथ
मृत्यू (Death)1 ऑगस्ट 1920
लोकांनी दिलेली पदवीलोकमान्य

वैयक्तिक आयुष्य

पारंपरिक संस्कृत अध्ययन लोकमान्य टिळक यांचे घरातच झाले. गंगाधर यांची बदली 1866 मध्ये पुण्यात झाली. त्यानंतर आपल्या आई-वडिलांसोबत लोकमान्य टिळक पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर काही दिवसानंतर लोकमान्य टिळक यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर गंगाधर यांची बदली ठाण्यात झाली. 1872 मध्ये गंगाधर यांचे निधन झाले. त्यांनी काही रक्कम मुलाच्या शिक्षणासाठी ठेवली होती. त्यामुळे डेक्कन कॉलेज मध्ये लोकमान्य टिळक यांनी नाव घातले. नियमित व्यायाम करून प्रकृती सदृढ आणि निकोप राखण्यावर कान्हे महाविद्यालयातील पहिल्या वर्षी भर दिला होता. बी.ए. पहिल्या वर्गात 1876 मध्ये लोकमान्य टिळक उत्तीर्ण झाले. त्यानंतर एल. एल. बी. ही पदवी लोकमान्य टिळक यांनी घेतली.

लोकमान्य टिळक कार्य

लोकमान्य टिळक आणि आगरकर यांचा डेक्कन कॉलेजमध्ये स्नेह जमला. देश कार्याला वाहून घेण्याचा संकल्प लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी केला. त्यानंतर निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरवले. तेव्हा आगरकर आणि टिळक दोघेही त्यांना मिळाले. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1 जानेवारी 1880 रोजी झाली. शिक्षकी पेशा लोकमान्य टिळक यांनी पत्करला. 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकर यांनी काढला.

राजकीय आयुष्य:-

(इंग्रजी) आणि केसरी (मराठी) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली होती. मराठ्याचे संपादक लोकमान्य टिळक होते आणि प्रारंभी आगरकर केसरीचे संपादक होते. लोकशिक्षण, राजकीय जागृती, शासकीय अन्यायाचा प्रतिकार हे वृत्तपत्रांच्या द्वारे त्यांचे ऐतिहासिक कार्य इथूनच सुरू केले. त्यांच्या गैरकारभारावर आणि इंग्रज सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज संबंधीच्या वर्तणुकीवर त्यांनी टीका केली होती.

त्याबद्दल लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना चार महिन्याची शिक्षा झाली. आणि या दोघांना डोंगरीच्या तुरुंगात ठेवले. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांची  सुटका 26 ऑक्टोंबर 1882 मध्ये झाली. 1882 मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे निधन झाले. त्यानंतर वेडर बर्न, वर्डस्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर इत्यादी प्रभृतींच्या मदतीने 1884 मध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे स्थापना केली होती आणि या संस्थेमार्फत फर्ग्युसन महाविद्यालयाची 1885 मध्ये स्थापना केली.

गणित आणि संस्कृत विषय लोकमान्य टिळक शिकवत होते. एकंदर धोरणासंबंधी  पुढे लोकमान्य टिळकांचे मतभेद झाले होते. चाळीस पाणी राजीनाम्यात लोकमान्य टिळक यांनी “निर्वाहापुरते वेतन” या तत्वाच्या ऐवजी “सांपत्तिक स्थतीनुसार वेतन” आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या उद्दिष्टाविरुद्ध सरकारच्या मदतीवर चालणाऱ्या संस्था  हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, हे असे लोकमान्य टिळक यांनी सांगितले होते. आगरकरांशी या प्रश्नावर लोकमान्य टिळक यांचा वाद झाला होता.

सामाजिक सुधारणा आगरकरांना महत्त्वाच्या वाटत होत्या. देशात सुधारण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी आगरकर सामाजिक सुधारणांना प्राधान्य देत होते. स्वतंत्रतेच्या आणि राष्ट्रीयत्वाचा अभिमान म्हणून, जो काही जोम आहे तो जोपर्यंत जागृत आहे, तोपर्यंत समाजरचना कशीही असली, तरी देखील दोष राष्ट्राच्या उन्नती आणि भरभराटीस आड येत नाही अशी लोकमान्य टिळक यांची भूमिका होती.

उत्साह, स्वाभिमान, स्वराज्यनिष्ठा हाच राष्ट्राचा आत्मा आणि जीव आहे आणि जेथे हा जिवंतपणा वसत आहे त्या ठिकाणी जसा दोरा सुई च्या मागोमाग प्रसाद सामाजिक सुधारणा ही मागोमाग येते, अशी इतिहासाची साक्ष आहे, असे आग्रहपूर्वक लोकमान्य टिळक सांगत असत. लोकमान्य टिळक यांचे असे म्हणणे नव्हते की, राष्ट्राची सामाजिक प्रगती होऊ नये पण ती स्वाभिमानाच्या आणि राजकीय प्रगतीच्या अनुषंगाने झाली पाहिजे असे लोकमान्य टिळकांचे म्हणणे होते.

पण यांच्या बरोबर आगरकरांची भूमिका विरुद्ध होती. धार्मिक बाबी, वेदोक्त प्रकरण आणि वर्ण व्यवस्था अशा प्रकारच्या संबंध येणाऱ्या गोष्टीवर लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यात वाद होत गेले. राष्ट्र इतकाच हिंदुधर्माचा ही लोकमान्य टिळक यांना अभिमान होता. लोकमान्य टिळक यांच्या व्यासंगाचा विषय धर्म होता. लोकमान्य टिळक यांनी उपनिषदे, तत्वज्ञान, वेद गीता, धर्मशास्त्रे आणि आचार्यांची भाष्ये या सगळ्यांचा अभ्यास केला होता.

कोणत्या समाज सुधारणा कराव्यात हे सांगण्याचा अधिकार हिंदू लोकांना नाही असे लोकमान्य टिळक यांचे म्हणणे होते.

लोकमान्य टिळकांचा मृत्यू

राष्ट्र कार्यात स्वतःला झोकून देणारे लोकमान्य टिळक यांच्या मागे खासगी कामे लागलेली होती. त्यातील सर्वात महत्वाचे काम ताई महाराजांचा खटला हे होते. प्रिव्ही कौन्सिलकडुन लोकमान्य टिळक यांनी या खटल्यातील मुख्य मुद्द्यावरील निकाल आपल्या बाजूने खेचून घेतला होता. लोकमान्य टिळक यांनी ज्याचे दत्तविधान केले होते, त्या जगन्नाथ महाराजांना न्यायालयाने वैध दत्तक पुत्र ठरविले.

कोल्हापूर संस्थानात पंडित महाराजांच्या जहागिरीचा काही हिस्सा होता. त्याचा जगनाथला अद्याप ताबा मिळाला नव्हता. कारण या बाबतीत कोल्हापूर संस्थानाने जगन्नाथची प्रतिस्पर्धी बाबा महाराजांचे बाजू घेतली. मुंबईच्या हायकोर्टात या प्रकरणाचा दावा चालू होता. 14 जुलै रोजी अखेरच्या टप्प्यातील त्याची सुनावणी होणार होती.

लोकमान्य टिळक यांनी या अंतिम फेरीच्या टप्प्यातील तयारी करण्यात खूप कष्ट घेतले होते. सभागृहात दाखल झालेल्या लोकमान्य टिळक यांनी दोन दिवस वकिलांशी चर्चा करून 12 जुलै रोजी जगन्नाथ महाराजांची कैफियत तयार केली होती. दावा 14 तारखेला उभा राहिला होता. कोर्टाने दाव्याचा निकाल 21 तारखेला लोकमान्य टिळक म्हणजे जगन्नाथ महाराजांच्या बाजूने लागून कोल्हापूर संस्थानातील उत्पन्नावरील अक्का वैद्य दत्तक या नात्याने मान्य करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसात लोकमान्य टिळक यांचे 1 ऑगस्ट 1920 मध्ये निधन झाले.

लोकमान्य टिळक पुस्तके:-

ग्रंथलेखन:-

मराठी स्कुट लेखन लोकमान्य टिळक यांनी केसरीतून केले होते. केसरी व्यतिरिक्त मराठा या त्यांच्या इंग्रजी वृत्तपत्रातून लोकमान्य टिळक यांनी लेखन केले. संस्कृत आणि वंडमयाचा जास्त अभ्यास लोकमान्य टिळक यांना होता. त्यांचा आवडीचा विषय भारतीय तत्त्वज्ञान हा होता. पाश्चात्य तत्वज्ञानाचा ही लोकमान्य टिळक यांनी अभ्यास केला होता. गीतारहस्यात लोकमान्य टिळक यांचे व्यापक व्यासंगाचे उत्कृष्ट प्रतिबिंब पाहायला मिळते.

राजकीय क्षेत्रात काम करत असताना तुरुंगात किंवा अन्य वेळी लोकमान्य टिळक यांना थोडी उसंत मिळत होती. त्यावेळी लोकमान्य टिळक यांनी काही ग्रंथ लिहिले होते. प्रत्येक ग्रंथात लोकमान्य टिळक यांनी त्यांचे लेखन संशोधनपर असून त्यांनी काही स्वतंत्र मते प्रतिपादन केले आहेत. ओरायन, ग्रंथ गीतारहस्य, वेदांग ज्योतिष आणि आर्टिक होम इन द वेदाज हे लोकमान्य टिळक यांचे प्रमुख ग्रंथ आहेत.

1910 – 11 च्या हिवाळ्यात मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळक यांनी श्रीमद्भगवद्गीता रहस्य किंवा कर्मयोगशास्त्र हा ग्रंथ लिहिला होता आणि 1915 मध्ये हा ग्रंथ प्रसिद्ध केला होता. श्रीमद्भागवतगीता रहस्य किंवा कर्मयोग शास्त्र हा ग्रंथ म्हणजे गीतेवरचे भाष्य असून ते कर्मयोगपर आहे. ओरायन हा एक लोकमान्य टिळक यांचा प्रबंध आहे. लंडन येथील ओरिएंटेशन परिषदेसाठी 1892 ला लोकमान्य टिळक यांनी तयार केला होता. यामध्ये वेदांचा कालनिर्णय हा विषय घेतला.

लोकमान्य टिळक यांनी लोकसंग्रहाची दृष्टि राखून स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजातील सर्व थरातील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले होते. लोकमान्य टिळक यांचे गीतारहस्य हे अक्षय विचारधन आहे आणि ते आधुनिक भारतातील श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे. महात्मा गांधी यांच्या सर्वांगीण आणि सर्वकष राजकीय-सांस्कृतिक कार्याला अनुकूल अशी पार्श्वभूमी निर्माण करण्याचे श्रेय लोकमान्य टिळक यांना देतात. म्हणून टिळकयुग हा आधुनिक भारताच्या इतिहासात एक खूप महत्वाचा टप्पा आहे.

आम्ही दिलेल्या lokmanya tilak information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लोकमान्य टिळक information about lokmanya tilak in marathi language यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lokmanya tilak marathi mahiti या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि lokmanya tilak speech in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!