Lapandav Game Information in Marathi लपंडाव किंवा लपाछपी लहानपणीची आठवण किवा कोणताही विषय निघाली कि पहिला आठवणारा आनंदायी खेळ म्हणजे लपंडाव. उन्हाळी सुट्टीमध्ये सर्व लहान मुले आणि मुली वेगवेगळे खेळ खेळायचे जसे कि गोट्या, विटी दांडू, लंगडी, कबड्डी, लग लग लगोरी, कांदा फोडी, भोवरा, आट्या पाट्या आणि लपंडाव यासारखे खेळ खेळायचे आणि गल्लीबोळात नुसता गोंगाट असायचा. पण आत्ता हे खेळ मोबाईल गेम्स किवा विडीओ गेम्स मुळे खूप कमी झाले आहेत. लपंडाव हा खेळ तर या सर्व खेळांपेक्षा खूप मजेशीर आणि आनंददायी वाटायचा. हा खेळ भारतामध्ये सर्व ठिकाणी खेळतात आणि या खेळला लपाछपी या नावाने देखील ओळखले जाते.
हा खेळ खेळताना ७ ते ८ खेळाडू किवा त्याहून अधिक खेळाडू असतात आणि एका खेळाडूवर डाव असतो तो डाव हाताने चकुन ठरवला जायचा. डाव घेणारा खेळाडू आपले डोळे बंद करतो आणि १० ते १०० ( १०, २०, ३०, ४०, ५०, ६०, ७०, ८०, ९० आणि १०० असे अंक मोजतो ) पर्यंत अंक मोजतो आणि त्या वेळेमध्ये राहिलेले खेळाडू लपण्यासाठी जागा शोधून लपतात.
लपंडाव खेळ माहिती – Lapandav Game Information in Marathi
खेळाचा जुना प्रकार
लपंडाव हा खेळ पूर्वी खेळल्या जाणाऱ्या डबा डबा टीम टीम या खेळापासून उदयास आला आहे पूर्वी हा खेळ खेडोपाडी लहान मुले खेळायची. या खेळामध्ये एका छोटा डबा वापरला जायचा ज्यामध्ये डाव घेणारा खेळाडू काही अंतरावर उरलेल्या खेळाडूंकडे पाठ करू उभा राहायचा आणि उरलेल्या खेळाडूपैकी एकाने तो डबा डाव असलेल्या खेळाडू कडे टाकून पाटकन लपून बसतो आणि सर्व खेळाडूही लपून बसतात. डाव असलेला खेळाडू तो डबा घेवून खेळाच्या वर्तुळामध्ये ठेवतो आणि त्याला जर लपून बसलेला खेळाडू दिसला तर त्या खेळाडूचे नाव घेवून नावापुढे डबा डबा टीम टीम असे म्हणून छोटा डबा जमिनीवर २ वेळा मारतो.
डाव असलेला खेळाडून डब्यापासून लांब असेल आणि लपलेल्या खेळाडूने त्या डब्याला डाव असलेल्या खेळाडूने डबा घ्यायच्या अगोदर त्या डब्याला लाथ मारतो. अश्या प्रकारे पूर्वीच्या काळी लपंडाव हा खेळ खेळला जायचा.
लपंडाव खेळाचे स्वरूप – how to play hide and seek game
या खेळाचा एक महत्वाची आणि फायद्याची गोष्ट म्हणजे हा खेळ खेळण्यासाठी कोणत्याही मैदानाची गरज नसते कारण या खेळामध्ये डाव घेणारा खेळाडू लपलेल्या खेळाडूला शोधतात (लपलेले खेळाडू कुठेही लपू शकतात जसे कि झाडाच्या पाठीमागे, दाराच्या पाठीमागे, घरामधील अडगळीच्या ठिकाणी आणि अश्या ठिकाणी जेथे डाव घेणारा खेळाडू पोहचू शकणार नाही) तसेच या खेळामध्ये खेळाडूंच्या संख्येवर देखील कोणतीही मर्यादा नसते त्याचबरोबर हा खेळ खेळण्यासाठी कोणतेही नियम नसतात.
लपंडाव खेळाची सुरुवात – start
या खेळाची सुरुवात हाताने चकुन होते यामध्ये दोन प्रकारे डाव घेणारा खेळाडू निवडला जातो.
- जितके खेळाडू या खेळामध्ये सामील आहेत तितके जन एकमेकावर हात ठेवतात आणि एक, दोन, तीन म्हणून आपले हात वरती उचलतात आणि हाताचे तळवे किवा हाताचा पाठीमागचा भाग आपल्या मनाप्रमाणे समोर करतात जर खेळामध्ये ५ खेळाडू असतील तर आणि त्यामधील २ खेळाडूंचे हाताचे तळवे समोर असतील तर ते डाव घेण्यापासून सुटतात अश्याप्रकारे शेवटी जो खेळाडू राहील त्याच्यावर डाव येतो किवा असेही केले जाते ज्यामध्ये चकण्याच्या प्रक्रियेमध्ये एका खेळाडूचा तळवा वरती असेल तर तो डाव घेण्यापासून सुटतो आणि हि प्रक्रिया शेवट खेळाडू मिळे पर्यंत केली जाते.
- ह्या प्रकारामध्ये देखील खेळाडू निवडण्यासाठी सर्व खेळाडू आपल्या हाताचा वापर करतात. खेळाडू राम राई सुट्ट्यो असे म्हणत आपला हा एक मेकाच्या हातावर टाकतात जो खेळाडू शेवटी हात टाकेल त्याला डाव घ्यावा लागतो.
लपाछपी खेळ – lapachhapi game information in marathi
डाव घेणाऱ्या खेळाडूची निवड झाल्यानंतर डाव घेणारा खेळाडू थोडे अंतर पुढे जावून उरलेल्या खेळाडून कडे पाठ करून डोळे मिटतो आणि १० ते १०० पर्यंत अंक मोजतो १०० (१०, २०, ३०, ४०, ५०, ६०, ७०, ८०, ९० आणि १०० असे अंक मोजतो) आणि शेवटी आलो रे आलो म्हणून खेळाडूंना शोधण्यास सुरुवात करतो. त्या वेळेमध्ये बाकीचे खेळाडू लपतात ( कोणी झाडामागे, घराच्या प्रवेशद्वाराच्या पाठीमागे, घरामध्ये अडगळीच्या जागेमध्ये लपतात जेणेकरून डाव घेणाऱ्या खेळाडूला सापडू नये अश्या ठिकाणी ).
डाव घेणारा खेळाडू सर्वांना शोधू लागतो जर एकाद्या खेळाडूला शोधून काढले तर तो खेळातून बाद होतो असेच तो खेळाडू इतर खेळाडूंना हि शोधतो जर एकाद्या खेळाडूने त्याला पाठीमागून धप्पा म्हणून स्पर्श करतो आणि जर असे झाले तर डाव घेतलेल्या खेळाडूला परत नव्याने डावाची सुरुवात करावी लागते. पण डाव घेतलेल्या खेळाडूने लपलेल्या सर्व खेळाडूंना शोधून काढले तर मात्र पहिला बाद झालेल्या खेळाडूला डाव घ्यावा लागतो.
लपंडाव खेळाविषयी काही मनोरंजक तथ्ये – facts about hide and seek game
- लपंडाव हा खेळ लहानमुले खेडोपाडी खेळायची.
- लपंडाव या खेळला लपाछपिचा या नावाने देखील ओळखले जाते.
- लपंडाव हा खेळ वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या पध्दतीने खेळला जातो.
- फ्रांस मध्ये या खेळला जेयू दे कॅशे या नावाने ओळखले जाते.
- दक्षिण कोरियामध्ये लपंडाव खेळला सुमबाग्गोगिल म्हणतात.
- अमेरिकेमध्ये या खेळला हाईड अँड सिक या नावाने ओळखले जाते.
- लपंडाव हा खेळ एक मनोरंजन म्हणून खेळला जातो या खेळाच्या कोणत्याही स्पर्धा नसतात.
आम्ही दिलेल्या lapandav game information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर लपंडाव किंवा लपाछपी या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about lapandav game in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि lapachhapi game information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू lapachhapi khel information in marathi नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट