विटी दांडू खेळाची माहिती Vitti Dandu Information in Marathi

Vitti Dandu Information in Marathi विटी दांडू हा एक लाल मातीतील खेळ आहे या खेळला लाल मातीतील खेळ म्हणण्याचे कारण हा खेळ शहरांपेक्षा जास्त खेडे गावात खेळला जातो. विटी दांडू हा खेळ एक पारंपारिक खेळ असून हा खेळ पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खेळला जायचा. विटी दांडू हा एक मजेशीर आणि मनोरंजक खेळ आहे आणि हा खेळ खेळण्यासाठी एक लाकडाचा दांडू आणि एक लहान लाकडाचीच विटी वापरली जाते. हा खेळ शक्यतो खेडे गावामध्ये लहान मुले खेळतात आणि या खेळासाठी खेळाडूंची मर्यादा नसते. हा खेळ वैयक्तिक किवा सांघिक पणे देखील खेळला जावू शकतो.

हा खेळ भारतामध्ये सर्व भागामध्ये खेळला जातो पण हा खेळ महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये खूप आवडीने खेळला जातो. उत्तर भारतामध्ये या खेळाला गुल्ली डंडा किवा गिल्ली डंडा या नावाने ओळखले जाते. गिल्ली किवा गुल्ली म्हणजे छोट्याश्या आकाराची एक लाकडी भाग ज्याला महाराष्ट्रामध्ये विटी म्हणतात आणि डंडा म्हणजे दांडू म्हणतात.

vitti dandu information in marathi
vitti dandu information in marathi

विटी दांडू खेळाची माहिती – Vitti Dandu Information in Marathi

खेळाचे नावविटी दांडू
खेळाचा प्रकारमैदानी खेळ
खेळ खेळण्यासाठी लागणारे आवश्यक सामानलाकडी विटी आणि दांडू
खेळण्याच्या पध्दतीवैयक्तिक किवा सांघिक
खेळाडूंची संख्याया खेळामध्ये खेळाडूंच्या संख्येवर कोणतेही बंधन नसते.

विटी दांडू खेळाचा इतिहास – history of vitti dandu game 

विटी दांडू हा खेळ भारतामध्ये हा खेळ प्राचीन काळापासून म्हणजेच बहुतेक हा खेळ भारतामध्ये २५०० वर्षापासून खेळला जात होता. विटी दांडू हा खेळ क्रिकेट, सॉफ्टबॉल, बेसबॉल या खेळांचे मुल आहे असे मानले जाते. विटी दांडू हा खेळ महाभारत होण्याच्या आधीपासून खेळला जात होता असे म्हंटले जाते आणि या खेळाचे वर्णन कवींनी आणि संतांनी (ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यादवकाळ) आपल्या कवितेमध्ये किवा अभंगांमध्ये केले आहे. त्याचबरोबर हा खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील आवडीने खेळला जात होता म्हणून या खेळल मराठी मातीतील आणि पारंपारिक खेळ म्हणून ओळखले जाते.

विटी दांडू खेळाचे मैदान – ground 

विटी दांडू हा खेळ खेळण्यासाठी कोणतेही विशिष्ठ स्वरूपाचे, आकाराचे किवा कोणत्याही  बनवलेल्या मैदानाची गरज नसते. हा खेळ कोठेही रिकाम्या जागी खेळला जावू शकतो. आपण जेथे खेळणार अहोर तेथे एक विटी ठेवण्यासाठी खड्डा पाडला जातो आणि खेळाची सुरुवात केली जाते.

विटी दांडू हा खेळ खेळण्यासाठी लागणारे सामान – equipments 

विटी दांडू हा खेळ खेळण्यासाठी विशेष असा पोशाख, मैदान किवा संरक्षणासाठीची सामग्री लागत नाही कारण हा खेळ मनोरंजनासाठी खेडोपाडी खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी एक विटी ज्याला गुल्ली म्हणतात आणि एक दांडू लागतो. विटी ५ ते १३ सेंटी मीटर लांबीची आणि २ ते ३ मीटर व्यासाची असते. दांडू मुठीत धरायला येईल इतका लांब असतो दांडूची लांबी साधारण पणे ४२ ते ४५ सेंटी मीटर लांब असतो आणि ३ ते ४ सेंटी मीटर व्यासाचा असतो. विटी लाकडाची लहान आकाराची असते आणि त्याला २ बाजूला नमुळते टोक असते आणि दांडूला एका बाजूला नमुळते टोक असते.

विटी दांडू खेळातील खेळाडू – players 

विटी दांडू हा खेळ वैयक्तिक किवा सांघिक स्वरुपात खेळला जातो आणि या खेळामध्ये खेळाडूंची मर्यादा नसते म्हणजेच हा विटी दांडू हा खेळ कितीही खेळाडू खेळू शकतात आठ, नऊ, दहा किवा त्यापेक्षाही जास्त खेळाडू हा खेळ खेळू शकतात. या खेळामध्ये खेळाडूंच्या संख्येसाठी कोणतेही बंधन नसते.

विटी दांडू हा खेळ कसा खेळला जातो – how to play vitti dandu game 

विटी दांडू हा खेळ पूर्वीच्या काळापासून खेळला जाणारा एक खेळ असून हा खेळ वैयक्तिक रित्या किवा गटामध्ये खेळला जातो. या खेळामध्ये खेळाडूंच्या संखेवर कोणतीही मर्यादा नसते आणि हा खेळ शक्यतो खेडे गावामध्ये लहान मुले त्यांच्या मनोरंजनासाठी खेळत होते. चला तर मग बघूया हा खेळ कसा खेळायचा असतो.

हा खेळ खेळण्यासाठी एक लाकडाची विटी आणि दांडू आवश्यक असतो. रिकाम्या जागेमध्ये एक छोटासा खड्डा पडला जातो त्याला गाली म्हणतात. विटी दांडू या खेळाची सुरुवात टॉस करून केली जाते आणि हा टॉस ला विटी दांडूच्या भाषेमध्ये ओलीसुखी या नावाने ओळखले जाते. ओलीसुखी म्हणजे एका सपाट छोट्या दगडाला किवा खापरीला एक बाजूला थुकी लावली जाते आणि एक भाग तसाच कोरडा ठेवून टॉस केला जातो. हा टॉस जो जिंकेल त्याच्यावर राज्य असते आणि तोच खेळाची सुरुवात करतो.

हा खेळ सुरु करताना ज्याच्यावर राज्य आले आहे तो खेळाडू गालीवर विटी अडवी ठेवून दांडूचे नमुळते टोक विटीला टेकवून गुल्ली म्हणून विटीला दांडूच्या सहाय्याने उडवले जाते आणि समोर दुसरे खेळाडू मैदानामध्ये विटीला पकडण्यासाठी उभे असतात जर त्या खेळाडूंनी विटी जमिनीवर पडायच्या अगोदर हातामध्ये पकडली किवा झेलली तर राज्य आलेला खेळाडू बाद होतो आणि जर ते विटी पकडण्यास असमर्थ ठरले तर राज्य असलेला खेळाडू दांडू गलीजवळ अडवा ठेवतो आणि दुसरे खेळाडू विटी त्या दांडूवर मारतात जर विटी दांडूला लागली तर खेळाडू बाद होतो आणि जर नाही लागली तर राज्य करणाऱ्या खेळाडूला पुढील खेळ खेळण्यासाठी परवानगी असते.

विटीला दांडूने मारून विटी हवेमध्ये उडवून गुण मिळवण्यासाठी तिला हवेमध्येच खेळवत राहणे गरजेचे असते. जितका वेळ तुम्ही ती विटी हवेमध्ये खेळवू शकता तितका वेळ ती हवेमध्ये खेळवायची आणि शेवटी आपण बॅटने जसे बॉल लांब मारतो तसे विटीला मारायचे. विटी जितक्या लांब  अंतरावर जावून पडेल तेथून गली पर्यंत दांडी च्या सहाय्याने मोजणी केली जाते आणि त्यावरून गुण दिले जातात. शेवटी ज्या व्यक्तीचे किवा संघाचे गुण जास्त असतात तो व्यक्ती किवा संघ विजयी होतो.

विटी दांडू खेळाचे नियम – rules of vitti dandu 

  • या खेळाची सुरुवात करताना एक टॉस पडला जातो ज्याला ओलीसुखी म्हणतात.
  • जो टॉस जिंकेल त्याच्यावर राज्य येते.
  • जर मैदानामध्ये उभे असणाऱ्या खेळाडूंनी जर दांडूने मारलेली विटी पकडली तर तो खेळाडू बाद होऊ शकतो.
  • विटीने दांडूला मारल्यनंतर विटी दांडूला स्पर्श झाली तरीही खेळाडू बाद होऊ शकतो.
  • खेळाडूने जितका वेळ विटी हवेमध्ये ठेवली त्यावरुन देखील खेळाडूला गुण मिळतात तसेच विटीच्या आणि गलीपर्यंतच्या अंतरावरही गुण मिळतात.
  • विटीचे गलीपर्यंतचे अंतर दांडूने मोजले जाते.

आम्ही दिलेल्या vitti dandu information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर विटी दांडू या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about vitti dandu game in marathi  या article मध्ये update करू, मित्रांनो हि vitti dandu game information in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!