लॅपटॉप ची माहिती Laptop Information in Marathi

laptop information in marathi लॅपटॉप ची माहिती, सध्याच्या काळामध्ये तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने सुधारणा होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारे तंत्रज्ञानामध्ये सुधारणा होत आहे आणि त्याचप्रमाणे तंत्रज्ञाना मुळे एक मोठी सुधारणा म्हणजे लॅपटॉप आहे. लॅपटॉप हा कोणाला माहित नाही असे नाही तर हा लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यत सर्वांना माहित आहे आणि लॅपटॉप हा देखील संगणकासारखा काम करतो परंतु आपल्याला संगणक एका ठिकाणी ठेवल्यानंतर ते कोणत्याही ठिकाणी हलवता येत नाही.

परंतु लॅपटॉपचे तसेक नाही ते वाहून नेण्यासाठी खूप सोपे आहे आणि आपण ते कोणत्याही ठिकाणी नेऊ शकतो. लॅपटॉप हा एक संगणकाचा प्रकार आहे आणि हा संगणकासारखाच काम करतो, परंतु हा संगणकाच्या तुलनेने आकाराने देखील आणि वजनाने देखील हलका असतो.

आणि त्यामुळे आपण हा लॅपटॉप कोठेही घेऊन जाऊ शकतो आणि आपल्याला आपण संगणकावर जे काम करू शकतो ते आपण लॅपटॉपवर देखील करू शकतो. लॅपटॉप ला लॅपटॉप कॉम्प्युटर किंवा नोटबुक कॉम्प्युटर या नावाने देखील ओळखले जाते.

laptop information in marathi
laptop information in marathi

लॅपटॉप ची माहिती – Laptop Information in Marathi

लॅपटॉप म्हणजे काय – laptop meaning in marathi

लॅपटॉप हा एक संगणकाचा प्रकार आहे आणि हा संगणकासारखाच काम करतो परंतु हा संगणकाच्या तुलनेने आकाराने देखील आणि वजनाने देखील हलका असतो.

लॅपटॉप चे पूर्ण स्वरूप काय आहे – LAPTOP fullform in marathi

लॅपटॉपचे पूर्ण स्वरूप लाईटवेट अॅनॅलेटिकल प्लॅटफॉर्म टोटल ऑप्टीमाईझ्ड पॉवर (light weight platform total optimised power) असे आहे.

लॅपटॉपचे वेगवेगळे भाग कोणते आहेत ?

संगणकाला जसे मॉनिटर, सीपीयू, कीबोर्ड आणि माऊस असे वेगवेगळे भाग असतात तसेच लॅपटॉप हा देखिल जरी आकाराने लहान असला तरी त्याचे काही भाग असतात ते कोणकोणते असतात ते आपण खाली पाहणार आहोत.

लॅपटॉपचे महत्वाचे भाग – important parts

स्क्रीन (screen) , टचपॅड (touch pad) , किबोर्ड (keyboard), कॅमेरा (camera), पोर्ट्स आणि पॉवर बटन (power button) हे काही महत्वाचे भाग आहेत.

लॅपटॉपचे इतर भाग

लॅपटॉपच्या इतर भागामध्ये बॅटरी (battery), स्टोरेज डिव्हाईस (storage device), मायक्रोफोन (microphone), लॉजिक बोर्ड (logic board), ऑप्टीकल ड्राईव्ह (optical drive) आणि वायरलेस कार्ड (wireless card) इत्यादी.

पाहिला लॅपटॉप कोणता होता ?

आपल्यापैकी अनेकांना असा प्रश्न पडतो कि पहिला लॅपटॉप कोणता असेल तर पहिला लॅपटॉप हा आयबीएम ५१०० हा आहे आणि तो सप्टेंबर १९७५ मध्ये आला होता आणि हा १३ किलो वजनाचा होता आणि त्यामध्ये ५ इंच सीआरटी डिस्प्ले आणि टेप ड्रायव्हर, ६४ केबी रॅम इतके होते.

आणि काहीजन असे देखील म्हणतात कि खऱ्या अर्थाने पहिला लॅपटॉप हा १९८१ मध्ये आला आणि तो म्हणजे ऑस्बोर्ण १ हा होता आणि हा अॅडम ऑस्बोर्ण यांनी विकसित केला होता आणि त्याचे वजन हे १० किलो इतके होते आणि त्याचा डिस्प्ले ५ इंचाचा होता आणि ६४ केबी रॅम होते.

त्याचबरोबर पहिला अॅपल लॅपटॉप हा सप्टेंबर १९८९+ मध्ये आला परंतु ते त्याच्या आकारामुळे आणि किंमतीमुळे इतके लोकप्रिय नव्हते परंतु ते तेथे थांबले नाहीत तर त्यांनी लॅपटॉपच्या विकासासाठी आपला दृष्टीकोन बदलला आणि ऑक्टोबर १९९१ मध्ये त्यांनी पॉवरबुक १०० ( Powerbook 100 ), पॉवरबुक १५० (Powerbook 150 ), पॉवरबुक १७० ( Powerbook 170 ) हे संगणक रिलीज केले.

लॅपटॉपचे प्रकार – types

आता आपण खाली लॅपटॉपचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत.

नोटबुक लॅपटॉप

नोटबुक लॅपटॉप हा एक यामधील सामान्य प्रकार आहे ज्यामध्ये पोर्टेबिलीटी आणि कार्यक्षमतेमध्ये संतुलन राखते आणि या प्रकारच्या लॅपटॉपची किंमत हि आपल्या बजेटमध्ये असते आणि याची कार्यक्षमता देखील चांगली आणि उच्च प्रतीची असते.

अल्ट्राबुक लॅपटॉप

अल्ट्राबुक लॅपटॉप हा प्रकार कॉम्प्यूटर चीपमेकर इंटेलने तयार केली आहे अल्ट्राबुक लॅपटॉपने आकार, वजन, बॅटरीचे आयुष्य आणि चीपसेटचा प्रकार या सारख्या विविध गोष्टींच्यासाठी विशिष्ट निकष पूर्ण केले आहेत आणि मूळ मॅकबुक एअरला अल्ट्राबुक क्लाससाठी प्रेरणा मानले जाते.

मॅकबुक

मॅकबुक हे अॅपलचे लॅपटॉप आहेत आणि अॅपलचे लॅपटॉप हे दोन फॅमिलीमध्ये येतात ते म्हणजे अल्ट्रा थिन १३ इंच मॅकबुक एअर आणि मॅकबुक प्रो १३ इंच, १४ इंच आणि १६ इंच आकारामध्ये येतात.

क्रोमबुक

क्रोमबुकचे लॅपटॉप हे क्रोम ओएस ऑपरेटिंग सिस्टम चालवतात आणि हे प्रामुख्याने वेब अॅप्स आणि डेटा लॅपटॉपवर न ठेवता क्लाऊड मध्ये जतन करून कार्य करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत.

लॅपटॉप फायदे – laptop benefits in marathi

  • लॅपटॉप हे आकाराने लहान आणि वजनाने हलके असल्यमुळे ते आपल्याला कोणत्याही ठिकाणी वाहून नेण्यासाठी सोपे असतात आणि हे गतिशील देखील असतात.
  • इंटरनेटचा वापर हा लॅपटॉपच्या मागणीतील वाढ होण्याचा दुसरा फायदा आहे कारण तो वायरलेस तंत्रज्ञान वाय फाय द्वारे इंटरनेट अॅक्सेस करण्याची क्षमता प्रधान करतो.
  • आपण लॅपटॉपवर ऑफलाईन प्रकारे देखील अनेक कामे करू शकतो.
  • लॅपटॉपला बॅटरी बॅकअप असल्यामुळे आपण त्याला एकदा चार्जीग केल्यानंतर ते पुढे ५ ते ६ तास विजेशिवाय चालू शकते.
  • लॅपटॉपला कोणत्याही प्रकारचे केबल कनेक्शन करावे लागत नाही.

आम्ही दिलेल्या laptop information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लॅपटॉप ची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या laptop meaning in marathi या laptop and tablet information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about laptop in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये laptop in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!