lic information in marathi एल आय सी माहिती मराठी, आज आपण या लेखामध्ये एलआयसी (LIC) या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. एलआयसी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स ऑफ इंडिया हि एक विमा कंपनी आहे आणि हि कंपनी वैयक्तिक विमा गरजांच्यासाठी सरकारच्या मालकीची सर्वात मोठी जीवन विमा आणि गुंतवणूक महामंडळ आहे. एलआयसी हि कंपनी गरजूला वेगवेगळ्या प्रकारची जीवन विमा उत्पादने प्रधान करते जसे कि बचत योजना, संपत्ती योजना, मुदत योजना, उत्पन्न योजना, गट योजना. त्याच बरोबर जीवन विमा कंपनी वैयक्तिक आणि गट विम्यासाठी एकदम सोप्या आणि उपयोगी पडतील अशा विमा पॉलिसी प्रधान करतात.
एलआयसीचे जे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (life insurance corporation) असे आहे आणि या मंडळाची स्थापना १ सप्टेंबर १९५६ मध्ये झाली. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन किंवा एलआयसी हे आपल्या ग्राहकांचे व्यवहार तत्परतेने संतुलित ठेवण्यासाठी अनेक ऑनलाइन सेवा ऑफर करतात.
एल आय सी माहिती मराठी – LIC Information in Marathi
संस्थेचे नाव | लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (life insurance corporation) |
स्थापना | १ सप्टेंबर १९५६ |
मुख्यालय | मुंबई (महाराष्ट्र) |
घोषवाक्य | योगक्षेमम वह्म्यहम |
जीवन विमा पॉलिसी म्हणजे काय – lic meaning in marathi
जीवन विमा पॉलिसी हा जीवन विमा कंपनी आणि विमा धारक ग्राहक यांच्यातील एक करार आहे ज्यामध्ये विमा कंपनी विमाधारकाला मॅच्युरिटी बेनिफिट किंवा विमाधारकाच्या नॉमिनीला प्रीमियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाममात्र रकमेच्या बदल्यात मृत्यू लाभ देण्यास सहमती दर्शवते.
एलआयसी ची माहिती – lic information in marathi wikipedia
एलआयसी हि एक सरकारी विमा आणि गुंतवणूक संस्था आहे जी भारतीय जीवन विमा कायद्यांतर्गत स्थापन केलेली आहे आणि या संस्थेची स्थापना १ सप्टेंबर १९५६ मध्ये झाली आणि या संस्थेचे मुख्यालय हे मुंबई मध्ये आहे आणि हि संस्था बाजारातील इतर गुंतवणूकदारांच्यापेक्षा अधिक आर्थिक सुरक्षितता आपल्या सेवा आणि आपल्या उत्पादनाद्वारे नागरिकांना प्रदान करण्याचे उदिष्ट आहे. एलआयसी या संस्थचे घोषवाक्य योगक्षेमम वह्म्यहम असे आहे आणि याचा अर्थ असा होतो कि तुमचे कल्याण हि आमची जबाबदारी.
एलआयसी जीवन विमा याची वैशिष्ट्ये – features
- जीवन विमा हि अशी पॉलिसी आहे जी सरकार मार्फत चालवली जाते आणि यामध्ये शस्त्रक्रिया, रुग्णालयातील भरती, रुग्णालयातील खर्च आणि इतर अनेक उपचाराचे खर्च या पॉलिसीमध्ये समाविष्ट आहेत.
- जर एखाद्या व्यक्तिला दवाखाण्यामध्ये ठेवले असेल आणि त्याची तब्येत सुधारल्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपण एलआयसी कडे रक्कमेचा दावा करण्याऐवजी ती एलआयसीने दिलेल्या रोख सुविधेचा उपयोग करू शकतात.
- हि पॉलिसी अशी आहे जी एकाद्या व्यक्तीने आपल्या नावावर चालू केली तर ती त्याच्या आई, वडील, बायको आणि मुलांना देखील लागू होऊ शकते.
- यामध्ये वैद्यकीय खर्च कितीही झाला असेल तर त्याला न जुमानत वैद्यकीय खर्चाची रक्कम दिली जाते.
जीवन विमा कार्पोरेशनची उदिष्ठ्ये – objectives
- निधीच्या गुंतावानुकीमध्ये संपूर्ण समुदायाचे हित न पाहता ज्यांच्या पैश्यावर विश्वास ठेवला जातो त्यांच्या पॉलिसी धारकांच्या प्राथमिक दायीत्वावर लक्ष ठेवणे.
- त्याचबरोबर राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि आकर्षक परताव्याच्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन गुंतवणूकदारांच्या तसेच संपूर्ण समुदायाच्या सर्वोत्तम फायद्यासाठी निधी वापरला जातो.
- देशामधील सर्व विमा पात्र व्यक्तींच्यापर्यंत पोहचवण्याच्या आणि त्यांना वाजवी किमतीमध्ये मृत्यूच्या बदल्यात पुरेसे आर्थिक संरक्षण प्रधान करण्याच्या उद्देशाने जीवन विमा व्यापकपणे आणि विशेषता ग्रामीण भागांच्यामध्ये आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गामध्ये देणे.
- गुंतवणूकदार आणि समुदायाच्या हितासाठी निधी वापरणे.
- कार्पोरेशनमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना शिष्टचारासह कार्यक्षम सेवा देऊन विमाधारक लोकांचे हित जोपासण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार सामील करून घेतले जाते.
- विमाधारक लोकांचे त्यांच्या वैयक्तिक आणि सामुहिक क्षमतेत विश्वस्त म्हणून काम करणे.
- सामाजिक आणि आर्थिक वातावरणातील बदलांचा सामना करणाऱ्या रहिवाश्यांच्या विविध जीवन विमा गरजा पूर्ण करणे.
- कंपनीचे सर्व प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांना नोकरीतील उच्च पातळीचे समाधान प्रधान करणे आणि विमाधारकांना विनम्र आणि कार्यक्षम सेवा प्रधान करण्यासाठी सहायक कार्य वातावरणाच्या स्थापनेला प्रोत्साहन देणे हा त्यांचा उद्देश आहे.
एलआयसी विषयी विशेष तथ्ये – facts
- एलआयसी हि कंपनी गरजूला वेगवेगळ्या प्रकारची जीवन विमा उत्पादने प्रधान करते जसे कि बचत योजना, संपत्ती योजना, मुदत योजना, उत्पन्न योजना, गट योजना.
- लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना १ सप्टेंबर १९५६ मध्ये झाली आणि या कंपनीचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे.
- जीवन विमा कंपनी वैयक्तिक आणि गट विम्यासाठी एकदम सोप्या आणि उपयोगी पडतील अश्या विमा पॉलिसी प्रधान करतात.
- लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच जीवन विमा कंपनी हि १०० टक्के भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे.
- एलआयसीचे जे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (life insurance corporation) असे आहे.
- लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन या कंपनीचे अध्यक्ष एमआर कुमार हे आहेत.
जीवन विम्याचे वेगवेगळे प्रकार – lic policy plan details in marathi
lic policy details in marathi
जीवन विम्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते कोणकोणते आहे ते आपण आता खाली पाहूया.
- एलआयसी सरल जीवन विमा.
- एलआयसी जीवन तरुण.
- एलआयसी जीवन लक्ष्य.
- एलआयसी विमा रत्न.
- एलआयसी धनसंचय.
- एलआयसीचा जीवन १९ वर्षाचा जीवनविमा.
- एलआयसी विमा ज्योती.
- एलआयसी जीवन शिरोमणी.
- एलआयसी जीवन उमंग.
आम्ही दिलेल्या lic information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर एल आय सी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lic meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि lic policy plan details in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये lic plan information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट