Panhala Fort Information in Marathi पन्हाळा गडाची माहिती पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर पासून २० किलो मीटर अंतरावर असणारा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे आणि या किल्ल्याची उंची ४०४० फुट इतकी आहे. या किल्ल्याच्या सभोवताली ७ फुट उंचीच्या भिंती आहेत त्या पूर्वीच्या काळी शत्रूपासून किल्ल्यावरील लोकांचे रक्षण करण्यासाठी बांधल्या होत्या. पावन खिंडीची लढाई आणि पन्हाळा गड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक महत्वाचे घटना आहे. सदरच्या लेखात आपण पन्हाळा गडाची सखोल माहिती घेणार आहोत.
पन्हाळा किल्ला माहिती – Panhala Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | पन्हाळ गड |
किल्ल्याची पूर्वीची नावे | पन्नग्नालय, पहल्ला, पर्णालदुर्ग |
किल्ल्याचा प्रकार | गिरिदुर्ग |
किल्ल्याची स्थापना | ११७८ ते १२०९ मध्ये |
कोणी बांधला | राजा भोज नृसिंह ( शिलाहार वंश ) |
किल्ल्याची उंची | ४०४० फुट |
डोंगर रांगा | सह्याद्री डोंगर रांगा |
गडावरील ठिकाणे | संभाजी मंदिर, राज दिंडी, सज्जाकोट इमारत, अंबरखाना, तीन दरवाजे, सोमेश्वर मंदिर |
पन्हाळगड हा एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा किल्ला आहे कारण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावर होते त्यावेळी २ मार्च १६६० मध्ये सिध्दी जोहरने पन्हाळा गडाला ४ महिने वेढा घातला होता आणि तो काही केल्यास हा वेढा मागे घेण्यास तयार न्हवता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी एका रात्री खूप मुसळधार पावूस पडत असताना त्या वेढ्यातून सुटून ते विशाळगडावर गेले त्यावेळी सिध्दी जोहर शिवाजी महराजांचा पाठलाग करत होता पण बाजीप्रभू देशपांडे यांनी सिध्दी जोहरला पावनखिंडी जवळ अडवले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पण पोहचले पण तेथे बाजीप्रभू देशपांडे सिध्दी जोहरशी झुंज देत होते आणि झुंज देता देता ते तेथे मरण पावले म्हणून या पावनखिंडीला घोडखिंड म्हणून देखील ओळखले जाते.
- नक्की वाचा: राजगड किल्याची माहिती
त्याचबरोबर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करण्यासाठी शिवा काशीदने शिवाजी महाराजांचे सोंग घेतले होते त्यामुळे सिध्दी जोहर फसला गेला आणि त्याच वेळामध्ये शिवाजी महारांना सुटून जाण्यासाठी वेळ मिळाला पण शिवा काशिदला आपले प्राण गमवावे लागले.
पन्हाळ गडाचा इतिहास – panhala fort history in marathi
या किल्ल्याचा इतिहास हा खूप जुना आहे म्हणजेच १२०० वर्षापूर्वीचा आहे आणि ११७८ ते १२०९ मध्ये राजा भोज नृसिंह यांनी या किल्ल्याची बांधणी केली तसेच या किल्ल्याचे पहिले नाव पन्नग्नालय असे होते. १६५९ मध्ये विजापूरच्या अफझुल खानच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरहून पन्हाळा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
१६५६ ते १६७२ या कालावधी मध्ये किल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी विजापूरचा दुसऱ्या आदिल शहाने सिध्दी जोहर सोबत आपले सैन्य पाठवले. सिध्दी जोहरने १ मार्च १६६० मध्ये पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला हा वेढा त्याने सलग ४ महिने घातला होता. सिध्दी जोहर काही केल्या मागे हटण्यास तयार न्हवता म्हणून शिवाजी महाराजांनी असे ठरवले कि या गडावरून विशाळगडावर जाने सुरक्षेचे ठरेल आणि त्यांनी काही सैनिक जमवले त्यांमध्ये बाजी प्रभू देशपांडे आणि शिवा काशीद देखील होते.
छत्रपती शिवाजी महाराज एका रात्री मुसळधार पाऊस पडत असताना ते पन्हाळगडावरून सुटले. त्यावेळी शिवा काशीद हे थोडेफार शिवाजी महाराजांसारखे दिसत असल्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांचे सोंग घेतले आणि सिध्दी जोहराला त्यामध्ये गुंतवून ठेवले आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना पालीन जाण्यासाठी वेळ मिळाला.
- नक्की वाचा: शिवनेरी किल्याची माहिती
पण सिध्दी जोहराला हे शिवाजी महाराज नाहीत तर त्याचे सोंग घेतलेला शिवा काशीद आहे हे समजताच त्यांनी शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्याचे ठरवले पण तिकडे शिवा काशीदला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती. सिध्दी जोहर शिवाजी महाराजांचा पाठलाग करत असताना त्याला पावनखिंडी जवळ “लाख मेले तरी चालतील पण लोकांचा पोशिंदा जगला पाहिजे” असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे यांनी त्याला तेथे रोखले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षितपणे विशाळगडावर पोहचले तो दिवस होता १३ जुलै १६६० हा होता.
इकडे पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे सिध्दी जोहरशी लढत असताना तेथेच धारातीर्थ झाले आणि हा किल्ला विजापूरच्या अदिल शहाच्या ताब्यात गेला. पण ६ मार्च १६७३ मध्ये शिवरायांचा शिलेदार कोंडाजी फर्जंद यांनी फक्त ६० मावळ्यांच्या सोबतीने पन्हाळा किल्ला परत छत्रपती शिवाजी महाराजांना मिळवून दिला आणि हा किल्ला पुन्हा स्वराज्यामध्ये आणला गेला. ताराराणींच्या अधिपत्याखाली १७८२ ते १८२७ मध्ये हा किल्ला मराठी राज्याची राजधानी होता.
पन्हाळा गडाची माहिती – information about panhala fort in marathi
११७८ ते १२०९ मध्ये राजा भोज नृसिंह यांनी या किल्ल्याची बांधणी केली तसेच हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची जवळ जवळ ४०४० फुट इतकी आहे. या किल्ल्याच्या भोवतीने संरक्षक भिंती बांधल्या आहेत आणि त्या भिंतींची उंची ७ फुट इतकी आहे. पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर पासून २० किलो मीटर अंतरावर असून हा किल्ला समुद्रसपाटी पासून ९७७.२ मीटर उंचीवर आहे तसेच या किल्ल्याला अनेक भुयारी मार्ग आहेत ज्याला आपण गुप्त मार्ग म्हणतो आणि किल्ल्याची बांधणी विजापुरी पद्धतीची आहे. पन्हाळा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक नाट्यपूर्ण घटनांचा साक्षीदार असणारा किल्ला म्हणून ओळखले जाते.
या किल्ल्याला पूर्वी पन्नग्नालय म्हंटले जायचे. हा किल्ला १७८२ ते १८२७ पर्यंत ब्रिटीशांच्या काळात आणि ताराराणींच्या काळामध्ये मराठा राज्याची राजधानी होती. पन्हाळा या किल्ल्याच्या आतमध्ये संभाजी मंदिर, राज दिंडी, सज्जाकोट इमारत, अंबरखाना, तीन दरवाजे, सोमेश्वर मंदिर हे बघण्यासारखी ठिकाणे आहेत. पन्हाळा या किल्ल्यावर राजा भोज ( शिलाहार वंश ), यादव आणि बहामनी, छत्रपती शिवाजी महाराज, देवगिरीचे यादव तसेच विजापूर सैन्याचा अधीर शाह वंश या सारख्या अनेक वंशांनी या किल्ल्यावर राज्य केले. या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये २०००० मावळे आणि १५००० घोडे तैनात असत होते. सह्याद्रीच्या डोंगर रांगावर असणारा हा पन्हाळा गड दख्खन पठारावरील सर्वात मोठा गड आहे.
पन्हाळ्या वरील इमारती आणि ठिकाणे – Panhala fort information in Marathi
पन्हाळा हा एकमेव किल्ला आहे जो सुवैवास्थित आहे या गडावर आपल्याला सज्जाकोठी, अंबर खाना, संभाजी मंदिर, तीन दरवाजा, सोमेश्वर मंदिर, सोमाळे तलाव, गांधार बावडी ज्याला अंदर बाव असे देखील म्हंटले जाते, पराशर गुहा, राजदिंडी, धर्मकोठी, रेडे महाल, महाराणी ताराबाई यांचा वाडा यासारक्या इमारती आणि थिअक्ने पाहायला मिळतात.
सज्जाकोठी :
सज्जकोठी इमारत हि इब्राहम आदिल शाह याने १५०० ए. डी. मध्ये हि इमारत बांधली होती. सज्जाकोट इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे पुत्र संभाजी राजे यांना तेथील कारभार पाहण्यासठी ठेवले होते त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे सर्व गुप्त व्यवहार देखील या इमारतीमध्ये चालत होते. हि इमारत देखील विजापुरी शैलीमध्ये बांधली आहे. त्याचबरोबर असे देखील म्हंटले जाते कि जेव्हा संभाजी राज्यांनी औरंगजेबाला धमकी दिली त्यावेळी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना याच इमारतीमध्ये कैद केले होते.
गांधारबावडी :
पन्हाळा गडावर गांधारबावडी हि एक तीन मजली विहिर पाहायला मिळते. या विहिरीची विशेषता म्हणजे यामधील पण कधीच कमी पडत नाही. हि विहीर तीन दरवाजांच्या वरच्या बाजूला आहे. यामध्ये खोल भागात पाणी आणि मधल्या मजल्यातून तटाबाहेर जाण्यासाठी एक खिडकी आहे ज्याला चोर दरवाजा म्हणतात. याला अंदरबाव या नावाने देखील ओळखले जाते.
अंबरखाना :
अंबरखाना हा किल्ल्यावर मध्यभागी आहे आणि अंबर खान हि एक गडावरील मोठी इमारत आहे जेथे पूर्वी धान्य साठवून ठेवले जायचे. या इमारतीमध्ये ५०००० पाऊंड धान्य साठवले जायचे. यामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे होती त्याबरोबर येथे सरकारी कचेऱ्या आणि दारूगोळे ठेवण्यासाठी देखील कोठारे होती.
पराशर गुहा :
पन्हाळा गडावर आपल्या ज्या गुहा पाहायला मिळतात तेथे महर्षी पाराशर हे निवास करत होते आणि म्हणूनच या गुहांना पराशर असे म्हंटले जाते.
संभाजी मंदिर :
संभाजी मंदिर हा एक छोटा दरवाजा आहे जो आपल्याला पन्हाळा गडावर पाहायला मिळतो.
सोमेश्वर मंदिर :
सोमाळे तलावाच्या शेजारी सोमेश्वराचे मंदिर आहे. या मंदिरातील देवाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी चाफ्याची फुले वाहिली होती.
तीन दरवाजा :
तीन दरवाजा हा गडावरील पश्चिम दिशेकडील महत्वाचा दरवाजा असून या वरील केलेले नक्षीकाम पर्यटकांच्या दृष्टीने प्रेक्षणीय आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार कोंडाजी फर्जंद यांनी ६ मार्च १६७३ मध्ये फक्त ६० मावळे घेवून किल्ला जिंकला होता त्यावेळी त्यांनी या किल्ल्यामध्ये याच दरवाजातून प्रवेश केला होता.
राज दिंडी :
राजादिंडी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सिध्दी जोहरने ज्यावेळी गडाला वेढा घातलेला त्यावेळी ज्या वाटेने गडाबाहेर गेले त्या वाटेला राजादिंडी म्हणतात. हि विशाळगडावर जाणारी एकमेव वाट होती.
सोमाळे तलाव :
गडावर एक मोठे तलाव आहे त्याला सोमाळे तलाव म्हणतात आणि हे एक पर्यटकांच्या दृष्टीने एक किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळ आहे.
धर्मकोठी :
धर्मकोठी हे गडावरील असे ठिकाण होते जेथे सरकारातील धान्य आणून धान्य गरजूंना दान केले जायचे. धर्मकोठी हि इमारत पन्हाळा किल्ल्यावर संभाजी मंदिरापुढे लागते.
रेडे महाल :
या इमारतीमध्ये पूर्वीच्या काळी जनावरे बांधली जायची म्हणून या इमारतीला रेडे महाल असे नाव पडले.
कलावंती महाल :
कलावंती महाल या इमारतीला नायकिणी सज्ज या नावाने देखील ओळखले जाते. हा महाल बहामनीच्या काब्जानंतर स्त्रियांसाठी निवास स्थान म्हणून वापरला गेला होता.
पुसाटी बुरुज :
पुसाटी बुरुजला पिछाडी बुरुज या नावाने देखील ओळखले जाते. पूर्वीच्या काळी बुरुजांचा वापर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी होत होता त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर बुरुज असायचेच. पुसाटी बुरुज हा पन्हाळ गडाच्या पश्चिमेच्या बाजूला आहे.
बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा :
वीररत्न बाजी प्रभू देशपांडे यांचा पुतळा आपल्याला बस मधून उतल्यानंतर थोडे पुढे आल्यावर एका चौकामध्ये पाहायला मिळतो.
राजवाडा :
पन्हाळागडावर गेल्यानंतर आपल्याला एक वाडा बघायला मिळेल हा वाडा महाराणी ताराबाईंचा असून या वाड्यातील देवघर खूप सुंदर आणि आकर्षक आहे. हा वाडा महाराणी ताराबाई १७०८ मध्ये किल्ल्यावर बांधला आहे.
नागझरी :
नागझरी हा बारामहिने पाण्याच्या सोयीसाठी दगडामध्ये तयार केलेला एक कुंड आहे.
दुतोंडी बुरुज :
पन्हाळ गडावरील या बुरुजाला दोन बाजूंनी पायऱ्या आहेत त्यामुळे या बुरुजाला दुतोंडी बुरुज म्हणतात. हा बुरुज गडावरील न्यायालयाजवळ आहे आणि ह्या बुरुजाच्या काही अंतर पुढे दौलत बुरुज आहे.
पन्हाळा किल्ल्याबद्दलची काही अनोखी तथ्ये
- पन्हाळा हा किल्ला भारतामध्ये असणाऱ्या किल्ल्यांपैकी सर्वात जुना किल्ला आहे.
- पन्हाळा या शब्दाचा अर्थ सापांची घरे असा होतो.
- पूर्वी या किल्ल्याला पहल्ला किवा पन्नग्नालय या नावाने ओळखले जायचे.
- पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर या शहरापासून २० किलो मीटर अंतरावर असून हा पन्हाळा या गावाजवळ आहे आणि हा सह्याद्रीच्या डोंगर रांगा मध्ये आहे जो रननीतिक दृष्ट्या वसलेला आहे.
- पन्हाळा हा किल्ला सर्व प्रथम शिलाहार चा प्रसिध्द राजा राजा भोज नृसिंह याने सर्वप्रथम बांधला त्यानंतर विजापूरचा प्रथम आदिल शहा याने हा किला पुन्हा वसवला.
- पन्हाळगडाला पर्णालदुर्ग या नावाने देखील ओळखले जायचे.
- या किल्ल्यावरील जास्तीत जास्त बांधकाम हे विजापुरी शैलीतील आहे.
- हा किल्ला दख्खन पठारावरील सर्वात मोठा किल्ला असून आणि ह्या किल्ल्याचे क्षेत्रफळ १४ किलो मीटर आहे.
- या गडावर एक मुख्य आणि महत्वाचा चार दरवाजा होता जो १८४४ मध्ये इंग्रजांनी पाडला त्याचे काही अवशेष अजूनही आहेत.
- गडावर आपल्याला शिवा काशीद यांचा पुतळा देखील पाहायला मिळतो.
- ज्यावेळी या किल्ल्यावर कोणताही शत्रू हल्ला करत असेल त्यावेळी तो तेथे असणाऱ्या विहिरी मधील पाण्यामध्ये विष कालवत होता म्हणून हे टाळण्यासाठी आदिल शहाणे ह्यावर एक अंधार बावडी बांधली आणि त्यामध्ये सैन्य देखील तैनात केले.
- औरंगजेबाने हा किल्ला १७०१ मध्ये आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावर मोगलांनी बरेच वर्ष राज्य केले.
- गडावर एक प्राचीन काळातील महालक्ष्मीचे मंदिर आहे आणि या मंदिराबद्दल असे म्हंटले जाते कि हे राजा भोज नृसिंह यांचे कुलदैवत होते.
- २ जानेवारी १९५४ मध्ये ह्या किल्ल्याला महाराष्ट्र जिल्ह्यातील संरक्षित किल्ला म्हणून घोषित केले आहे.
पन्हाळा किल्ला फोटो:
पन्हाळा गड कोठे आहे ? आणि गडावर कसे जायचे ?
पन्हाळागड हा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये आहे हा किल्ला कोल्हापूर पासून २० किलो मीटर अंतरावर आहे. कोल्हापूर हे पन्हाळगडापासून जवळ असल्यामुळे आपण पन्हाळा गडावर जाण्यासाठी आपण कोल्हापुरातून पन्हाळा बसने जावू शकतो किवा टॅक्सीने जावू शकतो किवा आपल्या कारणे किवा बाईकने सुध्दा जाऊ शकतो.
- नक्की वाचा: लाल किल्याची माहिती
जेवणाची सोय :
पन्हाळा या गडाजवळील झुणका भाकरी लोकप्रिय आहे.
पन्हाळा गडाला भेट केव्हा द्यावी
उत्तम वेळ : जुन ते फेब्रुवारी
वेळ : २४ तास उघडे असते.
पाहण्यासाठी घेतले जाणारे शुल्क :
हा गड पाहण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, पन्हाळा किल्ला panhala fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. information on panhala fort in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about panhala fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही पन्हाळा किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या panhala killa माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट