vitthal ramji shinde information in marathi महर्षी विठ्ठल रामजी शिंदे माहिती, आपल्या देशामध्ये अनेक असे समाजसुधारक आणि त्याचबरोबर लेखक होवून गेले आणि त्यांनी त्यांच्या कामगिरीमुळे समाजामध्ये ठसा उमटवला आणि म्हणून त्यांचे नाव आज देखील खूप लोकप्रिय आहेत आणि आज आपण या लेखामध्ये अश्याच समाजसुधारक आणि लेखाकाविषयी म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विषयी माहिती घेणार आहोत. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म हा भारतातील कर्नाटक राज्यातील जमखंडी या ठिकाणी २३ एप्रिल १८७३ मध्ये झाला.
जो एका मराठी भाषिक महाराष्ट्रीय कुटुंबामध्ये झाला. विठ्ठल रामजी शिंदे यांचे वडील म्हणजे रामजी बसवंत शिंदे हे जमखंडी या ठिकाणावरील संस्थानामध्ये काम करत होते. त्यांनी १८९८ मध्ये पुण्यामधील फर्ग्युसन महाविद्यालयातून कला शाखेतून पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर त्यांनी एलएलबी (LLB) देखील पूर्ण करून ते आपल्या पुढील करियरला दिश्य देण्यासाठी मुंबई या शहरामध्ये गेले.
मुंबई मध्ये गेल्यानंतर त्यांनी प्रार्थना सामाज्यामध्ये सामील झाले आणि मग त्यांनी शिवरामपंत, न्यायमूर्ती महादेव गोविंदा रानडे, जी. बी कोतकर या सर्वांची भेट त्या ठिकाणी झाली मग त्यांना त्यांच्या कडून प्रेरणा मिळाली आणि मग ते काही दिवसांनी प्रार्थना समाजाचे मिशनरी झाले.
मग त्यांच्या आयुष्यामध्ये असे काही वळण आले कि त्यांना इंग्लंड ला जाण्यासाठी इंग्रजी शिक्षण घेणे गरजेचे होते आणि त्यावेळी त्यांनी मँचेस्टर कॉलेज ऑक्सफोर्ड या ठिकाणी इंग्रजी शिक्षण घेतले आणि मग ते परदेशामध्ये गेले आणि त्यांना परदेशात जाण्यासाठी खर्च सयाजी गायकवाड ( बडोद्याचे महाराज ) यांनी आर्थिक मदत केली.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे माहिती – Maharshi Vitthal Ramji Shinde Information in Marathi
नाव | विठ्ठल रामजी शिंदे |
जन्म | २३ एप्रिल १८७३ |
वडिलांचे नाव | रामजी बसवंत शिंदे |
जन्मठिकाण | कर्नाटक राज्यातील जमखंडी |
ओळख | समाजसुधारक |
- ते १९०१ मध्ये इंग्लंडला गेले आणि १९०३ मध्ये ते इंग्लंड मधून परत आले आणि त्यांनी परत आल्यानंतर असा विचार केला कि आपले संपूर्ण जीवन हे आपण देशामधील सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्यासाठी वाहून नेऊ.
- त्यांनी मुंबई शहरामध्ये १९०६ मध्ये मुंबई डिप्रेस क्लासेस मिशन सुरु केले तसेच त्यांनी १९१० मध्ये मुरली बांधक सभेची स्थापना केली
- ते मुंबई ह्या शहरामध्ये गेल्यानंतर ते प्रार्थना समाजामध्ये सामील झाले आणि त्यानंतर त्यांनी १९१३ पर्यंत प्रार्थना समाजासाठी काम केले होते.
- त्यांनी अस्पृश्य लोकांच्यासाठी भरपूर कामे केली आहेत आणि त्यांनी अस्पृश्यांच्यासाठी सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी १९०७ मध्ये सोमवंशीय मित्र समाज म्हणून एका संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेचा मुख्य उद्देश हा महार आणि मांग महिलांच्या मधील देवदासी महिलांच्यामधील प्रथा नष्ट करणे हा होता.
- तसेच त्यांनी बेरार मध्ये अस्पृश्य लोकांच्यासाठी शाळा, ग्रंथालय आणि आश्रम उघडले.
- भारतातील अस्पृश्यतेच्या प्रथेवर टीका करण्याच्या अविरत प्रयत्नांच्यामुळे १९१७ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला यासाठी ठराव मंजूर करण्यात ते यशस्वी झाले.
- त्यांनी १९१८ ते १९२० या काळामध्ये झालेले अस्पृशता निर्मूलनावर भर देणारे अखिल भारतीय अधिवेशन हे मुंबई मध्ये आयोजित केले.
- त्याचबरोबर त्यांनी १९२५ आणि १९२६ या काळामध्ये नैतिकता आणि बौध्द धर्माचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी बर्मा या ठिकाणी भेट दिली आणि मग त्यांनी भारतामध्ये १९३० मध्ये परत आल्यानंतर महात्मा गांधी यांच्या सोबत सवियन कायदेभंग या चळवळी मध्ये सक्रीय सहभाग घेतला.
- पूर्वीच्या काळी अस्पृश्य लोकांना मंदिरामध्ये येऊ देत नव्हते आणि हे मोडून काढण्यासाठी आणि मंदिरामध्ये अस्पृश्यांचा प्रवेश, होळीच्या सणाच्या दरम्यान दिला जाणारा पशुबळी आणि मुरली परंपरा यासाठी त्यांनी अनेक अनुकरणीय प्रयत्न केले.
- समता सैनिक दल, मराठा संघ आणि बहुजन समाज पक्ष अश्या विविध संघटनांच्या माध्यमिक, सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांच्यावर त्यांनी काम केले.
- १९१९ मध्ये त्यांनी साऊथबरो फ्रेन्चायझी समितीसमोर अस्पृश्य जातींना विशेष प्रतिनिधित्व देण्याची मागणी करून पुरावे दिले.
- त्यांनी १९२८ मध्ये कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना केली आणि हे मंडळ पुण्यामध्ये स्थापन केले होते.
डिप्रेस्ड क्लासेस मिशन मराठी माहिती, मिशनची स्थापना आणि उद्देश
विठ्ठल रामजी शिंदे हे भारतातील दलित चळवळीच्या वतीने एक प्रमुख प्रचारक होते ज्यंनी दलितांना शिक्षण देण्यासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना केली. अस्पृश्यतेविरुध्द राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी त्यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिप्रेस्ड क्लास मिशनची पायाभरणी केली.
या मिशनची उदिष्ठ्ये म्हणजे अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न करणे तसेच अपृश्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्य लोकांच्यासाठी शाळा तसेच वसतिगृहे, ग्रंथालये आणि आश्रम देखील सुरु केले.
विठ्ठल रामजी शिंदे यांची लेखन कामगिरी
विठ्ठल रामजी शिंदे हे एक चांगले सुधारक तर होतेच परंतु त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक प्रकारचे लेखन देखील लिहिले. खाली आपण त्यांनी लिहिलेल्या लेखनाविषयी माहिती घेणार आहोत.
- विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९०८ मध्ये अस्पृश्यता निवारणाचा इतिहास हे पुस्तक लिहिले होते.
- १९७९ मध्ये त्यांनी धर्मजीवन आणि तंत्रज्ञान हे पुस्तक लिहिले.
- बहिकृत भारत हे पुस्तक १९०५ मध्ये लिहिला होता.
- त्यांनी भारतीय अस्पृश्यता प्रश्न या पुस्तकामध्ये त्यांनी भेदभावाचा आणि जाती व्यवस्था या विषयी विचार मांडले.
- माझ्या आठवणी आणि अनुभव हे आत्मचरित्र लिहिले.
- त्यांनी प्रार्थना समाजाच्या लोकांच्यासाठी उपासना साप्ताहिक लिहिले.
FAQ
Q1. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
महर्षी शिंदे यांनी ”डिप्रेस्ड क्लास मिशन” या संस्थेची स्थापना केली.
Q2. महर्षी शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
बहिष्कृत भारत (१९०८), अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास (१९२२), ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग (१९२७) हे लेख व ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ (१९३३) ही पुस्तके लिहिली.
Q3. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली?
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली.
आम्ही दिलेल्या maharshi vitthal ramji shinde information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vitthal ramji shinde information in marathi या information about maharshi vitthal ramji shinde in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि maharshi vitthal ramji shinde in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maharshi vitthal ramji shinde social work in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट