साल्हेर किल्ला माहिती Salher Fort Information in Marathi

Salher Fort Information in Marathi साल्हेर हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यामध्ये बागलाण जवळील सह्याद्री पर्वत रांगेमध्ये वसलेला आहे आणि हा किल्ला येथे झालेल्या मराठा आणि मुगल यांच्यामध्ये झालेल्या लढाई मुले खूप प्रसिद्ध आहे आणि साल्हेर हा किल्ला स्वराज्यामध्ये ठेवण्यासाठी प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे यांनी मोलाचे काम केले होते. साल्हेर हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची उंची १५६७ मीटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे सर्वात उंच शिखर कळसुबाईचे आहे त्याच प्रमाणे या किल्ल्याला देखील महाराष्ट्रामध्ये उंच असण्याचा मान आहे.

salher fort information in marathi
salher fort information in marathi

साल्हेर किल्ला माहिती मराठी – Salher Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावसाल्हेर किल्ला
ठिकाणहा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यामध्ये बागलाण जवळील सह्याद्री पर्वत रांगेमध्ये वसलेला आहे
पायथ्याची गावेसाल्हेर वाडी आणि वाघंबे
प्रकारगिरिदुर्ग
उंची१५६७
क्षेत्रफळ६०० हेक्टर
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणेगंगासागर तलाव, परशुराम मंदिर, हनुमान मंदिर, रेणुका मंदिर, गणेश मंदिर आणि गुहा

साल्हेर किल्ल्याचा पूर्ण घेरा हा ११ किलो मीटर इतका आहे आणि या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ६०० हेक्टर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इ. स. १६७१ मध्ये स्वराज्यामध्ये सामील केला होता आणि हा किल्ला मराठा साम्राज्यातील एक प्रसिध्द किल्ला होता. या किल्ल्याच्या पायथ्याशी साल्हेर वाडी आणि वाघंबे हि गावे आहेत.

साल्हेर या किल्ल्याबद्दलच्या काही पौराणिक कथा 

  • असे म्हणतात या किल्ल्यावर खूप प्राचीन काळामध्ये भगवान परशुराम यांनी कित्येक वर्ष येथे ध्यानसाधना केली होतो आणि त्यांची ध्यानसाधना पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बाण मारून मारून समुद्रामधील पाणी आत ढकलले होते.
  • त्याचबरोबर असे देखील म्हंटले जाते कि भगवान परशुरामांनी जग जिंकून घेतले होते आणि ते दान केले होते आणि आपल्यासाठी ध्यानसाधना करण्यासाठी बाण मारून एक प्रदेश वेगळा केला होता तो प्रदेश म्हणजे साल्हेर गड.

साल्हेर किल्ला इतिहास – Salher Fort History in Marathi

असे म्हणतात कि भगवान परशुरामांनी जग जिंकून घेतले होते आणि ते दान केले होते आणि आपल्यासाठी ध्यानसाधना करण्यासाठी बाण मारून एक प्रदेश वेगळा केला होता तो प्रदेश म्हणजे साल्हेर. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इ. स.१६७१ मध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता आणि त्यानंतर इ. स. १६७२ मध्ये औरंगजेबाने या किल्ल्यावर हल्ला केला होता.

नक्की वाचा: विशाळगड किल्ल्याची माहिती

पण प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे यांनी छोटीशी सैन्य तुकडी घेवून औरंगजेबाच्या सैनिकांचा पराभव केला होता आणि यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती अजून वाढली आणि महाराजांनी साल्हेर जिंकल्यानंतर तेथे जवळ असलेले मुल्हेर देखील आपल्या ताब्यात घेतले आणि बागलाण प्रांतावर आपले राज्य स्थापन केले. १८ व्या शतकामध्ये हा किल्ला पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर काही काळामध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या वर्चस्वा खाली गेला.

साल्हेर किल्ला आणि स्वराज्यातील प्रतापराव गुजर

ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबामध्ये पुरंदरचा तह झाला होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यामधील २३ किल्ले द्यावे लागले होते त्यामध्ये साल्हेर किल्ला देखील समाविष्ट होता आणि हा किल्ला परत स्वराज्यामध्ये आणण्यासाठी प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे हे अग्रणी होते त्यांना हा किल्ला मराठा साम्राज्य मध्ये आणायाचाच हा हट्ट होता.

ज्यावेळी औरंगजेबाने हा किल्ला पहिला होता त्यावेळी त्याला वाटले कि हा किल्ला आपल्याकडे असला पाहिजे आणि म्हणून त्याने इक्लास खान आणि बहलोल खान यांना ५०००० हून अधिक सैनिकांच्या सोबत या किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवले होते आणि त्यांनी त्यावेळी या किल्ल्याला वेढा घातला होता.

नक्की वाचा: अहमदनगर किल्ल्याची माहिती

पण स्वराज्यामधील प्रतापराव गुजन आणि मोरोपंत पिंगळे हे मोठ्या धैर्याचे आणि जिद्दीचे होते. यांनी त्यावेळी औरंगजेबाच्या वेढ्याला उत्तर देण्यासाठी स्वराज्यामध्ये २ गात पाडले. एका गटामध्ये प्रतापराव गुजन यांनी आपले नेतृत्व केले आणि दुसऱ्या गटामध्ये मोरोपंत पिंगळे यांनी नेतृत्व केले आणि संघामध्ये प्रत्येकी १०००० सैनिक होते म्हणजे मराठा साम्राज्याचे एकूण २०००० सैनिक होते. प्रतापराव यांनी १०००० सैनिकांनी फौज घेवून साल्हेरला उत्तरेकडे घातलेला वेढा तोडला आणि मुगलांच्या आणि मराठा सैनिकांच्यामध्ये एक भयानक युध्द सुरु झाले.

प्रतापराव महाकालचे रूप घेवून आणि इतर सैनिक आपल्या जीवाशी लढा देत होते पण मुगलांच्या ५०००० सैनिकांपुढे १०००० मराठा सैनिकांचा टिकाव लागत नव्हता आणि त्यामुळे मोगलांचा विजय जवळ जवळ निश्चित झाला होता पण अचानक कोकण भागातून येणारे मोरोपंत पिंगळे आणि त्यांच्या १०००० सैनिकांनी लढाई मध्ये उडी घेतली त्यामुळे मराठा सैनिकांची ताकद वाढली आणि परत दोन्ही सैन्यामध्ये जोरदार युध्द सुरु झाले.

मराठा सैनिकांनी हजारो मुगल सैनिकांची कत्तल केली तसेच मराठ्यांच्या कमकुवत तोफांनी मोगलांचे बलवान तोफखाने उडवले आणि प्रतापराव गुजर यांनी तर सगळ्या रननीतीक मर्यादा ओलांडल्या आणि त्यामुळे कोणताही मुगल सैनिक त्यांच्या समोर यायला घाबरू लागला आणि अश्याप्रकारे मराठा सैनिकांनी त्यांच्या तीन पट सैनिक तुडवले होते आणि यामध्ये इक्लास खान  गंभीर जखमी झाला होता आणि बहलोल खानाने लढाई मधून पळकाढली होती. या लढाई दरम्यान मराठा सैनिकांनी ६००० घोडे आणि १२५ हून अधिक हत्ती पकडले होते.

साल्हेर किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे 

  • तलाव :

या किल्ल्यावर आपल्याला एक तलाव पाहायला मिळतो ज्याला गंगासागर तलाव म्हणतात आणि तेथे २ पूर्वीच्या काळी बांधलेले पाण्याचे टाके देखील पाहायला मिळतात.

  • परशुराम मंदिर :

या किल्ल्यावर आपल्या भगवान परशुराम यांचे मंदिर पाहायला मिळते. या किल्ल्याच्या प्राचीन इतिहासामध्ये असे म्हंटले जाते भगवान परशुराम यांनी या साल्हेर डोंगरावर अनेक वर्ष ध्यानसाधना केली होती आणि म्हणूनच आपल्याला या किल्ल्यावर भगवान परशुराम यांचे मंदिर पाहायला मिळते. या मादिरामध्ये भगवान परशुराम यांची मूर्ती आणि पादुका आहेत.

  • इतर मंदिरे :

या किल्ल्यावर आपल्याला गणेश मंदिर, मारुतीचे मंदिर आणि रेणुका मंदिर देखील पाहायला मिळते.

  • गुहा :

या किल्ल्यावर आपल्याला प्राचीन काळातील गुहा देखील पाहायला मिळतात.

  • इतर ठिकाणे :

हा या किल्ल्यावरून आपल्याला हनुमान टेकडी, मुल्हेर गड, मोरागड सालोटा आणि हरगड या सारखा परिसर दृष्टीस पडतो.

साल्हेर किल्ला फोटो:

salher fort information in marathi
salher fort information in marathi

साल्हेरगड किल्ल्यावर कसे जायचे ? 

मुंबईहून किवा पुण्याहून या किल्ल्याला जाण्यासाठी आपल्यला पुणे नशिक हायवे मार्गे जावे लागेल. पुणे ते नाशिक २११ किलो मीटर आहे आणि मुंबई ते नाशिकचे अंतर १६६ किलो मीटर आहे. नाशिक मधून सटाना कडे जाण्यासाठी जर तुम्ही तेथील स्थानिक लोकांना विचारल्यास ते सांगतील (जर तुम्हाला सटाना ला जायला वेळ झाला तर तेथे १५ किलोमीटर अंतरावर मांगी तुंगी हे जैन तीर्थ क्षेत्र आहे तेथे आपण राहू शकतो). सटाना येथून आपण बसने किवा टॅक्सीने वाघंबे आणि साल्हेर वाडी या गावाजवळ जावू शकतो हि गावे किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत. येथून आपल्याला किल्ला पायी चढावा लागतो.

नक्की वाचा: आग्रा किल्ल्याची माहिती

टीप

  • साल्हेर किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची सोय नसल्यामुळे आपण सोबत पाणी आणि खाण्यासाठी काही स्नॅक्स घेतले तर चांगलेच होईल.
  • या किल्ल्यावर कोणतेही प्रवेश शुल्क घेतले जात नाहीत पण ट्रेकिंग पॅकेज उपलब्ध असतात कारण हा किल्ला ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, साल्हेर किल्ला salher fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. salher fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about salher fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही साल्हेर किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या salher killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!