रतनगड किल्ला माहिती Ratangad Fort History in Marathi

Ratangad Fort History in Marathi रतनगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यामधील रतनवाडी या गावाजवळ कळसुबाई डोंगर रांगेवर वसलेला आहे आणि हा किल्ला नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे. रतनगड या किल्ल्याचे सह्याद्री हि मुख्य डोंगर रांग असून या किल्ल्याचे पाठीमागे म्हणजे पश्चिमेला प्रवरा नदीचे भंडार धारण आहे. रतनगड हा किल्ल्याच्या पायथ्याशी रतनवाडी हे गाव आहे आणि हा किल्ला या गावापासून ५ ते ६ किलो मीटर अंतरावर आहे. रतनगड हा किल्ला प्राचीन आणि ऐतिहासिक महत्व असणारा किल्ला असून या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ४२५० फुट (१२९५ मीटर) इतकी आहे.

ratangad fort history in marathi
ratangad fort history in marathi

रतनगड किल्ला माहिती मराठी – Ratangad Fort History in Marathi

किल्ल्याचे नाव रतनगड किल्ला
ठिकाण हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यामधील रतनवाडी या गावाजवळ कळसुबाई डोंगर रांगेवर वसलेला आहे
डोंगर रांग मुख्य : सह्याद्री, उपरांग : कळसुबाई
पायथ्याशी असणारे गाव रतनवाडी
उंची ४२५० फुट ( १२९५ मीटर )
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे काही मंदिरांचे अवशेष, पाण्याचे टाके, बुरुज, टाक्यामध्ये असणारा नंदी आणि शिवलिंग, गणेश दरवाजा, हेमाडपंथी मंदिर, रत्ना देवीचे मंदिर

ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला जंगलातून गड चढवा लागतो त्यामुळे रतनगड हा किल्ला ट्रेकिंगसाठी देखील खूप लोकप्रिय मानला जातो. या किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ भिंतीपासून असणाऱ्या वाटेवरून थोडे पुढे गेल्यानंतर पुढे कातळ कोरीव ५५ ते ६० पायऱ्या आहेत.

त्या पायऱ्या चढून वरती आले कि आपल्यला दिसते ते गडाचे प्रवेश दार (त्र्यंबक दरवाजा) त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये आपल्यला काही मंदिराचे अवशेष, पाण्याचे टाके, बुरुज, टाक्यामध्ये असणारा नंदी आणि शिवलिंग पाहायला मिळते त्याच बरोबर गणेश दरवाजा, हेमाडपंथी मंदिर, रत्ना देवीचे मंदिर जे गुहे मध्ये आहे, कडेलोट या सारखी प्राचीन ठिकाणे आणि बांधकामे या किल्ल्यावर आपल्यला पाहायला मिळतात.

रतनगड किल्ल्याची माहिती – Ratangad Fort Information in Marathi

रतनगड हा एक प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला आणि काही इतिहासकार असे सांगतात कि हा किल्ला मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आवडता किल्ला होता. ज्यावेळी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता त्यावेळी त्यांनी येथे कळसुबाई शिखर, विल्सन धारण आणि आर्थर तलाव बांधले.

इ. स. १३६० मध्ये हा किल्ला आणि तेथील प्रांत याच्यावर महादेव कोळी लोक यांचे वर्चस्व होते पण त्यानंतर हा किल्ला इ. स १४०० मध्ये जव्हारचा राजा नेमशहा हा बहामनी वंशातील राजाने या किल्ल्यावर ताबा मिळवला आणि जवळ जवळ ८५ ते ९० वर्ष या किल्ल्यावर बहामनी वंशाने राज्य केले.

ज्यावेळी बहामनी सत्ता पूर्णपणे मोडकळीस आली त्यावेळी त्याचा फायदा घेवून इ. स १४९० मध्ये हा किल्ला मलिक अहमद याने जिंकला आणि ह्या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून पुन्हा एकदा सरदार महादेव कोळी यांना निवडले. पुढे मलिक अंबर आणि मिया मंजू यांच्यामध्ये रतनगड या प्रांताबद्दल वाद सुरु होते आणि त्यांच्यामध्ये लढाई देखील झाले त्यावेळी मलिक अंबर चा विजय झाला आणि त्याने इ. स १५९० मध्ये पुन्हा महादेव कोळी यांची निवड केले.

इ. स. १६३० मध्ये हा किल्ला बहुतेक निजाम शाही कडे गेला असावा आणि त्यावेळी या किल्ल्यावर मोगल साम्राज्याने आक्रमण केले होते पण त्यांचे हे आक्रमण शहाजी राजे, महादेव आणि इतर मराठा सरदारांनी पळवून लावले पण थोड्याच दिवसामध्ये माहुलीचा तह झाला आणि त्या तहामध्ये रतनगड देखील मोगलांना द्यावा लागला.

पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इ. स. १६६० मध्ये मोरोपंत आणि महादेव कोळी लोकांच्या मदतीने हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला. ज्यावेळी हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर्चस्वा खाली होता त्यावेळी महाराजांनी ह्या किल्ल्यावर अनेक बांधकामे केली होती. महाराजांनी ज्यावेळी सुरतेचा प्रवास केला होता त्यावेळी परतीच्या प्रवासामध्ये इ. स. १६६४ मध्ये या किल्ल्यामध्ये आश्रय केला होता.

इ. स. मध्ये हा किल्ला मुगलांनी जव्हार राजाच्या मदतीने आपल्या ताब्यात घेतला पण छत्रपती शाहू महाराजांनी हा किल्ला इ. स. १७२० मध्ये आपल्या ताब्यात घेतला आणि पुन्हा एकदा हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये सामील झाला. ज्यावेळी पेशवे मराठा साम्राज्याची धुरा सांभाळत होते त्यावेळी त्यांनी राजूर म्हणून एक प्रांत तयार केले आणि त्या प्रांताचे मुख्यालय रतनगड करून त्याची जबाबदारी महादेव कोळी जावजी हिराजी बांबळे यांच्याकडे दिली त्यावेळी त्यांनी हा रतनगड हा किल्ला मोठ्या प्रमाणात विकसित केला होता.

इ. स १८१३ रतनगड या किल्ल्याचे सुभेदार गोविंदराज खाडे यांना करण्यात आले पण इ. स १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांनी गोविंदराज खाडे यांचा पराभव करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. इ. स १८२० मध्ये राघोजी भांगरे आणि गोविंदराज खाडे यांनी इंग्रजांविरुध्द बंड पुकारले पण ते इंग्रजांनी मोडून काढले आणि त्या बंडानंतर रतनगड या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.

राज्य करणारे साम्राज्य काळ
महादेव कोळी लोक इ. स. १३६०
बहामनी वंश इ. स १४००
निजाम शाही इ. स. १६३०
मराठा साम्राज्य इ. स १६६०
मुघल साम्राज्य इ. स १६८८
मराठा साम्राज्य इ. स १७२०
इंग्रज इ. स १८१८

रतनगड किल्ल्यावर पाहण्यासारखी प्राचीन ठिकाणे आणि बांधकाम 

  • रतनगड या किल्ल्यामध्ये आपल्यला दगडामध्ये बनवलेल्या प्राचीन गुहा आहेत आणि त्यामधील एका गुहेमध्ये आपल्याला रत्ना देवीचे मंदिर आहे.
  • या किल्ल्यामध्ये आपल्यला भूमिज पद्धतीचे एक अमृतेश्वर म्हणजे महादेवाचे मंदिर पाहायला मिळते.
  • महादरवाजा: रतनगडाचा महादरवाजा म्हणजे किल्ल्यचा मुख्य दरवाजा ज्याला त्र्यंबक दरवाजा म्हणून देखील ओळखले जाते आणि दरवाज्याच्या आतमध्ये दगडा मध्येच पहारेकरांच्यासाठी तों बाजूला २ देवड्या बनवल्या आहेत. दरवाज्यावर हनुमानाचे, गणपती आणि रिध्दी सिध्दी शिल्प कोरलेली आहेत.
  • पाण्याचे टाके: या किल्ल्यावर आपल्याला प्राचीन काळातील पाण्याचे टाके पाहायला मिळते आणि एका टाक्यामध्ये नंदी आणि शिवलिंग पाहायला मिळते. पूर्वीच्याकाळी या टाक्यांच्या मधील पाणी पिण्यासाठी वापरले जात असावे.
  • या किल्ल्यावरून आपल्याला पश्चिमेस असणारे प्रवरा नदीवरील भंडारा धारण पाहायला मिळते.
  • किल्ल्यावरील इतर महत्वाची ठिकाणे: या किल्ल्यावर गणेश दरवाजा, बुरुज, कडेलोट टोक, हेमाडपंथी मंदिर, कल्याण दरवाजा आणि काही मंदिरांचे अवशेष.

रतनगड किल्ला फोटो :

ratangad fort history in marathi
ratangad fort history in marathi

रतनगड किल्ल्यावर कसे जायचे ? 

रतनवाडी हे रतनगड या किल्ल्याचे पायथ्याशी असणारे गाव आहे आणि आपण मुंबई किवा पुण्याहून रतनवाडीला सहज पाने येवू शकतो. कसारा हे रतनवाडी पासून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे आपण कसारा येथे उतरून रतनवाडीला स्थानिक बस किवा टॅक्सीने जावू शकतो.

  • पुणे या शहरापासून या किल्ल्याचे अंतर १८४ किलो मीटर इतकी आहे.
  • मुंबई या शहरापासून हा किल्ला १९५ किलो मीटर अंतरावर आहे.

किवा मुंबई – नाशिक येथून आपण इगतपुरी या रेल्वे स्थानकावर देखील येवू शकतो आणि तेथून स्थानिक बस किवा टॅक्सीने जावू शकतो. इगतपुरी आणि रतनगड यामधील अंतर ५६ किलो मीटर आहे.

टीप

  • रतनगड या किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे काही टाके आहेत पण तेथे जेवणाची किवा खाण्याची सोय नाही.
  • ह्या किल्ल्यावर कोणताही प्रवेश शुल्क घेतला जात नाही पण हा किल्ला ट्रेकिंगसाठी लोकप्रिय असल्यामुळे ट्रेकिंग पॅकेजीस उपलब्द असतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, रतनगड किल्ला ratangad fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. ratangad fort history in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about ratangad fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही रतनगड किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या ratangad fort killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

Ad Blocker Detected!

Please Disable Ad Blocker to use this site as free

Refresh

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: