माळढोक पक्षाची माहिती Maldhok bird information in Marathi

Maldhok Bird Information in Marathi माळढोक हा एक भारतीय पक्षी आहे जो कोरड्या प्रदेशांमध्ये आढळतात. maldhok pakshi माळढोक हे पक्षी दिसायल उंच, उभे शरीर आणि आकाराने मोठे, लांब पाय आणि पंख असे या पक्ष्याचे वर्णन आहे बहुतेक हा maldhok bird पक्षी शहामृग सारखा दिसतो आणि हा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे आणि आययुसीएन रेड लिस्टमध्ये आहेत. वन्यजीव रक्षकांच्या मते २०११ मध्ये या पक्ष्यांची संख्या २५० इतकी होती त्यानंतर २०१८ मध्ये या पक्ष्यांची संख्या २५० वरून १५० वर गेली म्हणजेच या पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात शिकार करण्यात आले.

माळढोक हा पक्षी कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि आंध्रप्रदेशामध्ये आढळतात. या पक्ष्याला इंग्लिश मध्ये ‘ग्रेट इंडियन बस्टार्ड’ great indian bustard in marathi असे म्हणतात. या पक्ष्याला उडणाऱ्या पक्ष्यांमधील एकमेव उडणारा वजनदार पक्षी म्हणून ओळखले जाते. राजस्थानमध्ये सरकारने ह्या पक्ष्याचा बचाव करण्यासाठी २०१३ मध्ये एक प्रकल्प सुरु केला त्याचे नाव त्यांनी ‘ग्रेट इंडियन बस्टार्ड’ असे ठेवले.

maldhok bird information in marathi
maldhok bird information in marathi/ great indian bustard in marathi

माळढोक पक्षाची माहिती | Maldhok Bird Information in Marathi

माळढोक पक्ष्याचे वर्णन 

माळढोक या पक्ष्याचे लांब पाय, लांब मान आणि उंच पक्षी आहे या पक्ष्याची उंची १.२ मीटर म्हणजेच ४ फुट आहे. प्रौढ आणि सदृढ माळढोक पक्ष्याचे वजन १० ते १५ किलो पर्यंत असते. नर आणि मादी हे त्यांच्या पंखांच्या रंगाने ओळखली जातात. नर माळढोक पक्ष्याचे पंख काळ्या रंगाचे असतात आणि मान, स्तन आणि अंडर पार्टस पांढऱ्या रंगाचे असतात याउलट मादीच्या डोक्यावरच्या भागावर एक लहान कला मुकुट असतो आणि काळ्या स्तनाची पट्टी असते.

नावमाळढोक, शर्मिला पक्षी
इंग्लिशग्रेट इंडियन बस्टार्ड
हिंदीसोन चीरैया
उंची१ ते १.२ मीटर (४ फुट)
वजन१० ते १५ किलो
शास्त्रीय नाव अर्देओटीस निग्रीसिप्स

माळढोक पक्ष्याचे 5 प्रकार ( types of bustard bird )

माळढोक पक्ष्याचे काही प्रकार खाली दिले आहेत ते म्हणजे ग्रेट इंडिअन बस्टर्ड, हौबारा बस्टर्ड, ऑस्ट्रोलियन बस्टर्ड, अरेबियन बस्टर्ड आणि कोरी बस्टर्ड.

1.ग्रेट इंडिअन बस्टर्ड (great indian bustard in marathi)

ग्रेट इंडिअन बस्टर्ड हा पक्षी भारतातील उपखंडांमध्ये आढळणारा पक्षी आहे. ग्रेट इंडिअन बस्टर्ड या पक्ष्याचे लांब पाय, लांब मान आणि उंच पक्षी आहे या पक्ष्याची उंची १.२ मीटर म्हणजेच ४ फुट आहे. प्रौढ आणि सदृढ माळढोक पक्ष्याचे वजन १० ते १५ किलो पर्यंत असते. नर आणि मादी हे त्यांच्या पंखांच्या रंगाने ओळखली जातात. हे पक्षी शहामृग पक्ष्यासारखे दिसतात आणि या पक्ष्यांची संख्या आत्ता भारतामध्ये १५० इतकी आहे.

2.हौबारा बस्टर्ड (houbara bustard)

हौबारा बस्टर्ड या पक्ष्याला आफ्रिकन हौबारा या नावानेही ओळखले जाते. हे जातीचे माळढोक पक्षी उत्तर आफ्रिका आणि दक्षिण आशिया मध्ये आढळतात. हे पक्षी आययुसीएन च्या मते संकटात आहेत म्हणजेच हे पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. हे पक्षी मध्यम आकाराचे असतात. नर पक्ष्याची उंची ७३ सेन्तीमितर असते तर मद पक्ष्याची उंची ६६ सेंटी मीटर असते आणि नर पक्ष्याचे वजन २.४ किलो असते तर मादी पक्ष्याचे वजन १.६ किलो असते.

3.ऑस्ट्रोलियन बस्टर्ड (austrolian bustard)

ऑस्ट्रोलियन बस्टर्ड हा पक्षी उत्तर ऑस्ट्रोलिया आणि दक्षिण न्यू गिनिया मध्ये जंगलामध्ये, गवताळ प्रदेशात किवा मुक्त शेतीमध्ये आढळतात. या पक्ष्याची उंची ३ फुट ३ इंच आहे आणि या पक्ष्याचे पंख त्या लांबीच्या दुप्पट आहेत. हे पक्षी फळझाडे, लहान सस्तन प्राणी, लहान पक्षी, सरपटणारे प्राणी आणि बिया या प्रकारचे अन्न खातात.

4.अरेबियन बस्टर्ड (arabian bustard)

अरेबियन बस्टर्ड हा पक्षी दक्षिण आणि पश्चिम अरेबियाच्या साहेल भागात तसेच आफ्रीके मध्ये आढळतात. यामध्ये नर पक्षी हा मादा पक्ष्यापेक्षा आकाराने मोठा असतो. नर पक्ष्याचे वजन १० किलो असते आणि मादा पक्ष्याचे वजन 7 किलो असते. या पक्ष्यांचे शरीर तपकिरी रंगाचे असते आणि मान राखाडी रंगाची असते आणि पांढऱ्या रंगाचे अंडरपार्टस असतात.

5.कोरी बस्टर्ड (kori bustard)

कोरी बस्टर्ड हा पक्षी भारत, ऑस्ट्रोलिया आणि आफ्रिका मध्ये आढळतो आणि हा आफ्रिकेमधील सर्वात मोठा उडणारा पक्षी आहे. नर कोरी बस्टर्ड हा पक्षी उडण्यास सक्षम असा सर्वात वजनदार पक्षी आहे. कोरी बस्टर्ड हा पक्षी अरेबियन बस्टर्ड सारखाच दिसतो. नर पक्ष्याचे वजन 17 ते १८ किलो असते.

माळढोक पक्ष्याचा आहार ( diet )

माळढोक या पक्ष्याला सर्वभक्षक पक्षी म्हणतात. हे पक्षी मोठे किडे, साप, सरडे, टोळ, ज्वारी, बाजरी, गवत, झुडूपाचा पाला, गहू, उंदीर, विंचू आणि बिया यासारखा आहार सेवन करतात.

माळढोक पक्षी कुठे राहतात ( habitat )

माळढोक हे पक्षी सहसा एकटे राहणे पसंत करतात पण हिवाळ्यामध्ये हे पक्षी छोट्या कळपामध्ये राहतात तसेच हे पक्षी अर्ध शुष्क आणि कोरडे गवत असलेल्या प्रदेशमध्ये हि राहतात आणि उंच गवत असलेल्या आणि शेतजमिनीजवळ हि आढळतात.

माळढोक पक्ष्याविषयी तथ्ये ( facts of great indian bustard )

 1. माळढोक हा पक्षी राजस्थानचा राष्ट्रीय पक्षी आहे.
 2. पाकीस्थान मध्ये या पक्ष्याचा वापर अन्नामध्ये केला जातो.
 3. हा पक्षी स्वभावाने खूप लाजाळू आणि भित्रा असतो तरी पण हा पक्षी सावध असतो.
 4. २०२० मध्ये हे पक्षी वाचवण्यासाठी राजस्थानच्या सरकारने काही प्रकल्प सुरु केला.
 5. माळढोक हा पक्षी गिधाडा पेक्षा मोठा असतो.
 6. माळढोक हा पक्षी महाराष्ट्रामध्ये सोलापूर, चंद्रपूर, नगर, यवतमाळ आणि मराठवाड्यात या शहरांमध्ये आढळत होते.
 7. या पक्ष्यांची टोळकी असते आणि या तोलाकीमध्ये ३ किवा ४ माळढोक पक्षी असतात.

माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होण्याची कारणे 

 • या पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या पक्ष्यांची शिकार केली ( या पक्ष्याचा लोक आपल्या आहारामध्ये समावेश करत होते ).
 • भटकी कुत्री या पक्ष्यांवर किवा त्यांच्या अंड्यांवर हल्ला करतात त्यामुळे या पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे.
 • माळढोक हे पक्षी आकाराने मोठे असतात आणि हे सामान्यता कमी उड्डाण घेतात आणि ते जर उड्डाण करत असताना विद्युत ट्रांसमिशन लाईनच्या धक्क्यामुळे ते अचानक पणे खाली पडू शकतात.
 • लोकसंख्या, शेती आणि पायाभूत सुविधा या सर्व वाढीमुळे या पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे.

माळढोक पक्षी वाचवण्यासाठी केले जाणारे उपाय 

 • अधिवासी क्षेत्रामध्ये कमी प्रमाणात कीटक नाशक वापरणे आणि शक्य तितकी सेंद्रिय शेतीचा स्वीकार केला पाहिजे.
 • विजेच्या तारांना धडकून कितीतरी माळढोक पक्षी दगावले आहेत म्हणून उंच आणि मध्यम दाबाच्या विजेच्या तारा वापरल्या पाहिजेत.
 • जेथे माळढोक अभयारण्य आहेत तिथे भटकी कुत्री असू नयेत.
 • वन्यजीवांसाठी काही जमीन सोडून देणे.

 

माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

राज्यअभयारण्य
महाराष्ट्रनन्नज ग्रासलॅन्ड ( सोलापूर )
राजस्थानवाळवंट राष्ट्रीय उद्यान जैसलमेर आणि बाल्मर
गुजरातकच्छमधील नलिया अभयारण्य
आंध्रप्रदेशरोलापडू वन्यजीव अभयारण्य
मध्य प्रदेशकारेरा वन्यजीव अभयारण्य

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा माळढोक पक्षी maldhok bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. great indian bustard in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच maldhok bird and maldhok information in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही माळढोक या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या maldhok bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!