मानव सेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध Manav Seva Hich Ishwar Seva Essay in Marathi

Manav Seva Hich Ishwar Seva Essay in Marathi – Jan Seva Hich Ishwar Seva Essay in Marathi मानव सेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये मानव सेवा हीच ईश्वर सेवा / जन सेवा हीच ईश्वर सेवा या विषयावर निबंध लिहिणार आहोत. मानव सेवा हिचा ईश्वर सेवा म्हणणे कि सोपे आहे पण हे प्रत्यक्षात आणणे खूप महत्वाचे आहे कारण आपण जन्माला आलो आहोत तर दुसऱ्यांच्यासाठी म्हणजेच गरीब लोकांच्यासाठी, असहाय्य लोकांच्यासाठी, अपंग लोकांच्यासाठी किंवा कोणत्यातरी संकटात सापडले आहेत त्यांची मदत करणे किंवा त्यांना कोणत्याही मार्गाने बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे.

आपण जर आपल्या आयुष्यामध्ये अश्या लोकांची मदत केली तर आपले आयुष्य काहीतरी सार्थ ठरेल आणि ते ईश्वराला देखील मान्य होईल. सेवा हा शब्द किती सुंदर आहे आणि या शब्दामध्ये किती पावित्र्य देखील आणि पावित्र्य आपण जपले पाहिजे तसेच आपण लोकांची सेवा केली पाहिजे आणि त्यांना संकटातून किंवा ते ज्या समस्येचा सामना करत आहेत त्या समस्येचा सामना करण्यास आणि त्यामधून बाहेर पडण्यास त्यांना मदत केली पाहिजे.

manav seva hich ishwar seva essay in marathi
manav seva hich ishwar seva essay in marathi

मानव सेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध – Manav Seva Hich Ishwar Seva Essay in Marathi

जनसेवा हीच ईश्वर सेवा निबंध मराठी – Jan Seva Hich Ishwar Seva Essay in Marathi

आपला भारत देश हा संस्कृती प्रधान आणि समृध्द आणि खूप जुनी परंपरा असणारा देश आहे आणि आपल्या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या धर्माचे जातीचे लोक हे एकात्मतेने राहतात तसेच एकमेकांना तसेच संकटामध्ये अडकलेल्या लोकांना मदत करण्याची आपली भारतीय संस्कृती आहेच. पण अनेक लोकांना आपल्या देशामध्ये लोकांची सेवा करू मोठी कामगिरी बजावली आहे म्हणजेच त्यांनी अनेक लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तसेच अनेक असहाय्य लोकांना सहारा दिला.

जगामध्ये असे अनेक लोक असतात ज्यामधील काही लोक हे अनाथ मुलांचा तसेच विधवा महिलांचा किंवा मुलांनी सोडलेल्या अनाथ आई वडिलांचा सहारा बनतात किंवा त्यांच्यासाठी अन्न वस्त्र आणि निवारा पुरवठा करतात तसेच त्यांना एक चांगले जीवन जगता यावे म्हणून प्रयत्न करतात आणि या प्रकारची मानव सेवा करून ईश्वर सेवेचे पुण्य आपल्या पदरामधे घेतात.

तसेच काही समाज सेवक असतात ते आजारी लोकांची मदत करतात तसेच त्यांना हवी असणाऱ्या औषधे किंवा त्यांना जे उपचार घ्यावे लागतात त्यासाठी मदत करतात किंवा मग ते त्या आजारी लोकांना त्या समस्येतून किंवा आजारातून लोकांना बाहेर येण्यासाठी मदत करत असतात.

तसेच काही लोक महिलांच्या वर होणाऱ्या अत्त्याचारावर तसेच महिलांना स्वातंत्र्य मिळावे तसेच स्वतंत्रपणे शिकता यावे यासाठी मदत करतात किंवा महिलांच्या बाजूने लढतात. त्याचबरोबर काही लोक असे देखील असतात जे नैसर्गिक आपत्तीमुळे संकटामध्ये सापडलेल्या लोकांना मदत करतात तसेच त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा या सर्व गोष्टींची उपलब्धता करून देतात आणि त्यांना त्यांच्या त्या दुखः मधून बाहेर येण्य्साठी मदत करतात आणि अश्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करून आपली मोलाची कामगिरी बजावतात.

अनेक लोकांना असे वाटते कि आपला जन्म हा ईश्वराची सेवा करण्यासाठी झाला आहे आणि आपण देवाची सेवा केली पाहिजे म्हणजे आपली ईश्वर सेवा चांगली होईल आणि ते आपला वेळ हा मंदिरांमध्ये घालवतात तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पूजा पाठ करतात आणि आपले आयुष्य अश्या प्रकारे ईश्वर सेवा आहे पण देवाने सांगितले आहे कि माझे पूजा पाठ करा पण गरजू लोकांना, गरीब लोकांना, संकटामध्ये अडकलेल्या लोकांना आणि असहाय्य लोकांना मदत करा आणि त्यांची सेवा करा आणि त्यांना मदत करा आणि त्यांना संकटातून बाहेर काढून मानव सेवा करून माझी सेवा केल्याचे श्रेय घ्या.

आपल्या देशामध्ये असे अनेक लोक होवून गेले ज्यांनी लोकांची सेवा करून ईश्वर सेवा करण्याचे भाग्य आपल्या पदरी घेतले. सिंधूताई सपकाळ ह्या कोणाला माहित नाहीत तर ह्या सर्वांना माहित आहेत कारण त्यांनी अनेक अनाथांची मदत करून त्यांच्या सामाजिक कामगिरी मध्ये भर पडली आहे. त्यांनी समाजातील अनेक लहान मुलांना आसरा दिला तसेच त्यांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला तसेच आपले आयुष्य त्यांची सेवा करण्यासाठी घालवले आणि म्हणूनच आज त्यांना संपूर्ण देशामध्ये अनाथांची आई म्हणून ओळखले जाते.

त्यांनी हजारहून अधिक मुले दत्तक घेवून त्यांचे पालन पोषण केले तसेच त्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. यामधील काही मुले उच्च शिक्षित आहेत तसेच त्यामधील काही मुलांनी आपले स्वताचे अनाथ आश्रम देखील सुरु केले आहेत. अश्या प्रकारे त्यांनी असहाय्य अनाथांची मदत केली. त्याचबरोबर बाबा आमटे हे नाव कोणाला माहित नाही हे नाव देखील सर्वांना माहित आहे,

कारण त्यांनी देखील समाजातील पिडीत लोकांची मदत केली आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला आहे. बाबा आमटे हे डॉक्टर होते त्यांनी अनेक लोकांचे आजार बरे करण्याचे प्रयत्न केले तसेच त्यांनी जंगलामध्ये राहणाऱ्या अधिवासी लोकांच्या रोगावर उपचार करून त्यांना बरे करण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी कुष्ठरोगाने ग्रस्त लोकांविरुद्ध भेदभावाच्या विरोधातील लढाईत भारताला मदत केली होती तसेच भारतातील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते आणि भारत छोडो आंदोलनात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती आणि त्यांनी जंगलामध्ये राहणाऱ्या अधिवासी लोकांच्या आरोग्याविषयी काम केले होते. अश्या प्रकारे देशामध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांनी असहाय्य लोकांची मदत करून मानव जन्माचे सार्थ केले होते कारण मानव जन्म हा देवाने आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांच्यासाठी काही करण्यासाठी दिला आहे आणि मला देखील वाटते कि मानव सेवा किंवा जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे.

आम्ही दिलेल्या manav seva hich ishwar seva essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मानव सेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या jan seva hich ishwar seva essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि jan seva hich ishwar seva essay in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!