सिंधुताई सपकाळ यांची माहिती Sindhutai Sapkal Information in Marathi

Sindhutai Sapkal Information in Marathi – Sindhutai Sapkal Biography सिंधूताई सपकाळ यांची माहिती अनाथांची आई आणि आपल्या भारत देशामध्ये सामाजिक सेवाकार्य करणाऱ्या म्हणून ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांच्याबद्दल आज आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. सिंधुताई सपकाळ यांना अनाथ मुलांची आई म्हणायचे कारण त्यांनी लहान अनाथ मुलांचा सांभाळ केला आणि त्यांचे आयुष्य मार्गाला लावले आहे आणि त्यांनी ज्या मुलांचे पालन पोषण केले होते त्यामधील काही मुले उच्च शिक्षित आहेत तसेच त्यांना आता २०० हून अधिक जावई आणि ३५ ते ३६ सुना आहेत.

सिंधूताई सपकाळ ह्या एक समाजसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या ज्यांनी अनाथांचा सांभाळ केला तसेच महिलांच्या अन्याय विरुध्द आवाज उठवला. सिंधूताई सपकाळ यांना माई म्हणून देखील ओळखले जात होते. चला तर आता आपण सिंधुताई सपकाळ यांच्या बद्दल माहिती घेवूयात.

sindhutai sapkal information in marathi
sindhutai sapkal information in marathi

सिंधुताई सपकाळ यांची माहिती – Sindhutai Sapkal Information in Marathi

खरे नावसिंधुताई सपकाळ (सर्वजन यांना याच नावाने ओळखतात)
बालपणीचे नावचिंधी
बालपणीचे पूर्ण नावचिंधी अभिमान साठे
जन्म१४ नोव्हेंबर १९४७
जन्म ठिकाणवर्धा जिल्ह्यातील नवरगाव
वडिलांचे नावअभिमान साठे
आईचे नावमाहित नाही
वडिलांचा व्यवसायत्यांच्या वडिलांचा गुरे वळायचा व्यवसाय होता
पतीचे नावश्रीहरी सपकाळ
मुलीचे नावममता
शिक्षणचौथी
ओळखसामाजिक कार्यकर्ती किंवा समाजसेविका
प्रसिध्दीअनाथांची आई
पुरस्कारत्यांना २७० हून अधिक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते तसेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.

जन्म आणि बालपण

सिंधीताई सपकाळ यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील वर्धा या ठिकाणी १४ नोव्हेंबर १९४७ मध्ये झाला आणि त्यांच्या नाव जन्मानंतरचे नाव चिंधी असे ठेवण्यात आले होते आणि त्याचे पूर्ण नाव चिंधी अभिमान साठे असे होते. पूर्वीच्या काळी मुलगा हा घराचा वारस असे मानले जायचे त्यामुळे जर एखादीला मुलगी झाली तर ती नकोशी वाटायची किंवा तिला रस्त्यावर सोडले जायचे.

सिंधुताई देखील त्यामधील एक होत्या. सिंधुताई ह्या त्यांच्या आई वडिलांना नकोशी वाटणारे एक अर्भक होते म्हणून त्यांनी त्यांचे नवा चिंधी असे ठेवले होते. यांचा जन्म वर्धा जिल्ह्यामधील नवरगाव या गावामध्ये झाला होता आणि हे जंगल भागामध्ये होते. त्यांच्या वडिलांचा गुरे वळायचा व्यवसाय होता आणि त्या देखील गुरे वळण्यासाठी जातो म्हणून घरामध्ये सांगून त्या शाळेमध्ये जाऊन बसत होत्या.

जरी त्या हुशार आणि बुध्दिमान असल्या तरी त्यांना त्यांच्या हलाकीच्या आणि जेमतेम असणाऱ्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. त्यांनी आपले चौथी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून कसे बसे पार केले होते.

सिंधुताई सपकाळ यांची कथा 

पूर्वीच्या काळी विवाह किंवा मुलींचा कमी वयामध्ये विवाह करत होते आणि सिंधूताई देखील त्यामधील एक होत्या त्यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी झाला होता आणि त्याचे पती त्यांच्याहून २६ वर्ष मोठे होते ज्यांचे नाव श्रीहरी सकपाळ असे होते. त्यांचे सासर देखील त्यांच्या महेरासारखे असुशिक्षित होते म्हणजे त्यांच्या सासरच्या लोकांना देखील शिक्षणाचे काही महत्व नव्हते.

यांच्या सासरी देखील गुरे वळणे हाच व्यवसाय होता आणि त्या तेथे देखील गुरे वळत होत्या त्यावेळी त्यांच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुरे वळली जायची म्हणजेचे १०० च्या संखेने आणि त्या गुरांचे शेन देखील बायकांना काढायला लागायचे.

पण रस्त्यावर काम करण्याऱ्या किंवा मुरूम फोडणाऱ्या मजुरांना मजुरी मिळायची पण १० गुरांचे शेण काढल्यानंतर देखील बायकांना मजुरी मिळत नव्हती आणि शेणाच लिलाव देखील जंगलतील अधिकारी करत होते आणि हे सर्व सिंधुताई यांच्या लक्षात आले.

त्यावेळी त्यांनी त्यांच्या विरुध्द लढा पुकारला आणि त्या जिंकल्या देखील पण काही लोकांना यामध्ये लिलाव मिळत होता तो मिळायचा बंद झाला. त्याचबरोबर दमडाजी असतकर जो गावामधील जमिदार होता त्याला सिंधूताई यांचे बुध्दीमत्ता आणि धैर्य पाहवले नाही आणि त्याने गावामध्ये त्यांना कमीपणा आणण्यासाठी एक युक्ती केली.

सिंधूताई सपकाळ यांची पूर्वी ३ बाळंतपणे झाली होती आणि ती देखील १८ व्या वर्षी त्यानंतर त्यांच्या चौथ्या बाळंतपणाच्या वेळी दमडाजी याने गावामध्ये तसेच त्यांच्या घरामध्ये असे सांगितले कि त्यांच्या पोटातील मुल आपले आहे आणि त्यामुळे तिच्या चारित्र्यावर तिच्या नवऱ्याने संशय घेतला आणि तिला मारून घराबाहेर काढले. त्यानंतर त्या त्यांच्या माहेरी केल्या पण तेथे देखील त्यांना कोणी समजून घेतले नाही.

त्यानंतर त्या नांदेड- मनमाड रेल्वे स्थानकावर भिक मागू लागल्या आणि आपला उदार निर्वाह केला. एकेकाळी त्यांनी आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता पण त्यांच्या पोटामध्ये असणाऱ्या छोट्या जीवाचे प्राण कश्यासाठी घ्यायचे म्हणून त्या मागे हटल्या होत्या ( त्यांनी त्यांच्या चौथ्या अर्भकाला एक तबेल्यामध्ये जन्म दिला होता ).

त्यांना रेल्वेस्थानकावर मिळालेल्या भिकेमध्ये त्यांचे पोट भरत नव्हते किंवा त्यांना त्याठिकाणी एक दोन दिवस खायला काहीच मिळत नव्हते त्यावेळी त्या स्मशान भूमीकडे देखील अन्नाच्या शोधासाठी जात होत्या. अश्या प्रकारे त्यांनी लग्नानंतर संघर्ष केला आहे.

सिंधूताई सपकाळ यांच्या कामाबद्दलची माहिती – social work 

सिंधुताई सपकाळ यांनी अनेक अनाथ मुलांचे पालन पोषण केले आणि त्यांना चांगले वाढवले त्यामुळे त्यांना माई म्हणून ओळखले जाते तसेच त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य अनाथांच्यासाठी घालवले म्हणून त्यांना अनाथांची आई या नावाने देखील संबोधले जाते. सिंधूताई म्हणजेच माई यांनी हजारहून अधिक मुले दत्तक घेतली होती आणि त्यांचे चांगल्या प्रकारे पालन पोषण करून त्या मुलांना त्यांच्या पायावर उभे केले आहे.

त्यामधील काही मुले उच्च शिक्षित आहेत तसेच त्यांना आता २०० हून अधिक जावई आणि ३५ ते ३६ सुना आहेत. त्यांची स्वताची मुलगी हि वकील झालेली आहे तर त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलांपैकी काहीजन इंजिनीयर आहेत, काहीजण, डॉक्टर आहेत काहीजण तसेच काहीजण वकील अश्याप्रकारे त्यांनी दत्तक घेतलेली मुले मोठी होऊन आता वेगवेगळ्या हुद्द्यावर आता काम करत आहेत.

सिंधुताई यांनी अश्याच अनाथ मुलांचे पालन पोषण करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या आणि आपण समाजसेविकेचे काम सुरूच ठेवले आणि त्या दिवसेंदिवस एक चांगली समाजसेविका म्हणून नावारूपाला आल्या. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला तसेच त्यांना २७० हून अधिक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले तसेच त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे.

थोडक्यात 

  • त्यांना २७० हून अधिक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते तसेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.
  • त्यांनी हजारहून अधिक मुले दत्तक घेवून त्यांचे पालन पोषण केले तसेच त्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. यामधील काही मुले उच्च शिक्षित आहेत तसेच त्यामधील काही मुलांनी आपले स्वताचे अनाथ आश्रम देखील सुरु केले आहेत.
  • तसेच त्यांना आता २०० हून अधिक जावई आणि ३५ ते ३६ सुना आहेत. त्यांची स्वताची मुलगी हि वकील झालेली आहे तर त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलांपैकी काहीजन इंजिनीयर आहेत, काहीजण, डॉक्टर आहेत काहीजण तसेच काहीजण वकील
  • सिंधुताई सपकाळ यांच्याकडे उत्तम संवाद कौश्यल्य आहे त्यामुळे त्या विविध टिकाणी बोलतात तसेच व्याख्याने देखील देतात.
  • त्यांच्या जीवनावर आधारित मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट देखील बनवण्यात आला.

सिंधुताई सपकाळ यांच्यावर काढलेला चित्रपट – movie on sindhutai sapkal 

सिंधुताई सपकाळ यांनी अनेक अनाथ मुलांचे पालन पोषण केले आणि समाजाची कर्तव्ये पार पडली आणि अश्या प्रकारे त्या समाजसेवा करत गेल्या आणि नवारुपाला आणि त्यांनी लोकांच्या मनामध्ये घर निर्माण केले. मग २०१० मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट बनवण्यात आला ज्याचे नाव मी सिंधुताई सपकाळ असे आहे.

आणि या चित्रपटामध्ये त्यांचे जीवनातील काही महत्वाचे संघर्ष दाखवले आहेत आणि या चित्रपटाबद्दलची यशस्वी बातमी म्हणजे या चित्रपटाला ५४ व्या लंडन फिल्म फेस्टीव्हलसाठी निवड झाली. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळाला.

सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या संस्था 

अ.क्रसंस्था
१.        ममता बाल सदन, कुंभारवळण ( रुचकर )
२.        सन्मती बाल निकेतल ( भेल्हेकर वस्ती, हडपसर, पुणे. )
३.        अभिमान बाल भवन ( वर्धा )
४.        माझा आश्रम चिखलदरा ( अमरावती )
५.        सावित्रीबाई फुले मुलींचे वसती गृह ( चिखलदरा )
६.        सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन आणि शैक्षणिक संस्था पुणे
७.        गंगाधर बाबा शयनगृह पोकळी
८.        गोपिका गाईरक्षण केंद्र ( गोपालन ) ( वर्धा )

सिंधुताई सपकाळ यांनी आपले आयुष्याच अनाथांच्यासाठी घालवले आणि त्यांनी अनेक अनाथ मुलांच्यासाठी आणि मुलींच्या साठी वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केल्या. त्यांनी सर्वप्रथम १९९४ मध्ये ममता बाल सदन या संस्थेची स्थापना कुंभारवळण या गावामध्ये ममता बाल सदन संस्था सुरु केली.

आणि अनेक अनाथ मुलांना आसरा दिला तसेच अन्न आणि कपडे पुरवठा केला तसेच त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. कारण त्यांना असे वाटले कि आश्रमातील मुलांना उच्च शिक्षण दिल्यामुळे मुले मोठी बनल्यानंतर आर्थिक दृष्ट्या स्वालंबी बनतील. अश्या प्रकारे अनाथ मुलांचे पालन पोषण करून त्यांच्या जीवनाला आसरा दिला. ममता बाल सदन संस्थेनंतर त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली.

सिंधुताई सपकाळ यांना मिळालेले पुरस्कार – awards 

त्यांना २७० हून अधिक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते तसेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. त्यामधी काही महत्वाचे पुरस्कार खाली दिलेले आहेत.

अ.     क्रपुरस्कारवर्ष
आग्रगण्य सामाजिक योगदानकर्ता पुरस्कार१९९२
दत्तक आई पुरस्कार१९९६
सह्याद्री हिरकणी पुरस्कारमाहित नाही
वूमन ऑफ द इयर पुरस्कार ( लोकसत्ता मार्फत )२००८
शिवलीला महिला गौरव पुरस्कारमाहित नाही
महाराष्ट्र सरकार कडून अहिल्याबाई होळकर पुरस्कार२०१०
रियल हिरो पुरस्कार ( रिलायन्स फाऊंडेशन )२०१२ 
कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग पुरस्कार ( पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेज कडून मिळाला )२०१२
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार२०१२
१०राजाई पुरस्कारमाहित नाही
११मूर्तिमंत आईसाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार२०१३

 

१२बसव भूषण पुरस्कार ( बसव सेवा, पुणे )२०१४
१३अहमदिया मुस्लिम शांतता पुरस्कार२०१५
१४प्राचार्य शिवाजीराजे भोसले स्मृती पुरस्कार २०१५
१५पद्मश्री पुरस्कार२०२१
१६जीवन गौरव पुरस्कार (पुणे विद्यापीठ)माहित नाही

सिंधूताई सपकाळ यांच्याविषयी काही महत्वाची माहिती – important information about sindhutai sapkal 

  • सिंधुताई सपकाळ यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे १४ नोव्हेंबर १९४८ मध्ये झाला.
  • सिंधूताई ह्या त्यांच्या आई वडिलांना नकोशी वाटणारे एक अर्भक होते म्हणून त्यांनी त्यांचे नवा चिंधी असे ठेवले होते.
  • वयाच्या नवव्या वर्षी तिचे लग्न एका २३ वर्ष मोठा असणाऱ्या श्रीहरी सपकाळ याच्याशी झाला.
  • तिच्या घरची परिस्थिती जेमतेम होती तसेच त्यांच्या घरी शिक्षणाला इतके महत्व नसल्यामुळे त्यांनी फक्त चौथी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून घेतले.
  • ज्यावेळी ती १८ वर्षाची होती त्यावेळी तिची तीन बाळंतपणे झाली होती आणि चौथ्या बाळंतपणी तिला अनेक खडतर समस्यांना सामोरे जावे लागते कारण त्यावेळी त्यांना त्यांच्या नवऱ्याने मारहाण करून घराबाहेर काढले मग ती तिच्या सासरी केली तेथेहि तिला कोणीही आसरा दिला नाही म्हणून त्या रेल्वे स्थानकावर भिक मागून उदार निर्वाह करत होत्या.
  • त्यांनी त्याच्या मुलीला एक तबेल्यामध्ये जन्म दिला होता.
  • श्रीहरी सपकाळ म्हणजेच त्यांचा नवरा ८० वर्षाचा झाल्यानंतर त्याने सिंधुताई सपकाळ यांची माफी मागितली त्यावेळी त्यांनी त्यांच्या नवऱ्याला माफ करून नवऱ्याला देखील मोठा मुलगा म्हणून स्वीकारले कारण त्या आता सर्वांच्या आई होत्या.
  • यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट देखील बनवण्यात आला आहे.
  • त्यांना अनेक पुरस्कार मिळाले तसेच काही पुरस्कार रक्कमेच्या स्वरुपात मिळाले ती रक्कम त्यांनी अनाथ मुलांच्यासाठी घरे बनवण्यासाठी वापरली.
  • सिंधुताई सपकाळ यांना रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार मिळाला होता.
  • त्यांना २७० हून अधिक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते तसेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.
  • त्यांनी हजारहून अधिक मुलांचे पालन पोषण केले आणि त्यामधील काही मुले आता उच्च शिक्षित आहेत तसेच त्यांना आता २०० हून अधिक जावई आणि ३५ ते ३६ सुना आहेत.

सिंधूताई सपकाळ यांन निधी कसा गोळा केला ?

सिंधूताई यांनी आपल्या संस्थांना वेगवेगळ्या माध्यमातून किंवा लोकांच्या कडून काही निधी मिळावा म्हणून देशभरामध्ये प्रवास केला आणि निधी उभा केला. तसेच त्यांनी परदेशातून निधी मिळवण्यासाठी ग्लोबल फाऊंडेशन संस्था स्थापन करून परदेशातूनहि निधी मिळवण्यास यशस्वी झाल्या.

सिंधूताई यांना अनेक पुरस्कार मिळू लागले आणि यामधील काही पुरस्कार हे रक्कमेच्या स्वरुपात होते ती रक्कम देखील सिंधुताई संस्थाच्यासाठी वापरत होत्या.

सिंधुताई सपकाळ यांचा मृत्यू -death 

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन मंगळवार, दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी पुण्यामधील गॅलॅक्सी या खासगी रुग्णालयामध्ये रात्री ८ वाजून १० मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताई सपकाळ यांचे वय ७५ वर्ष होते.

त्यांनी अनेक खडतर समस्यांना तोंड देत अनाथांचे संगोपन केले व त्यांना आसरा दिला होता अश्या या मातृतुल्य आणि एक चांगल्या समाजसेविकेला महाराष्ट्राने ४ जानेवारी २०२२ रोजी गमावले.

आम्ही दिलेल्या sindhutai sapkal information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सिंधुताई सपकाळ यांची माहिती Sindhutai Sapkal Biography बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sindhutai sapkal information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of sindhutai sapkal in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information about sindhutai sapkal in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “सिंधुताई सपकाळ यांची माहिती Sindhutai Sapkal Information in Marathi”

  1. बालपणीचे नाव सिंधू असेच होते. फक्त त्यांचे वडील तिरस्काराने चिंधी म्हणत होते.

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!