मणिपूर राज्याची माहिती Manipur Information in Marathi

manipur information in marathi मणिपूर राज्याची माहिती, आपला भारत देश हा २९ वेगवेगळ्या राज्यांनी बनलेला आहे आणि त्यामधील मणिपूर हे भारताच्या ईशान्य बाजूकडे असणारे राज्य आहे आणि आज आपण या लेखामध्ये या मणिपूर राज्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मणिपूर हे एक भारताचे राज्य आहे आणि हे राज्य भारताच्या ईशान्य बाजूकडे वसलेले असून या राज्याचे क्षेत्रफळ २२३२७ चौरस किमी इतके आहे म्हणून या राज्याला एक छोटेसे सुंदर राज्य म्हणून ओळखले जाते.

या राज्याच्या सीमेला लागून नागालँड, मिझोरम, आसाम हि राज्ये आहेत आणि या राज्याची राजधानी इंफाळा हे शहर आहे. मणिपूर या राज्याला अनेक पर्वत रांगांनी वेढलेले असल्यामुळे या शहराच्या चहूबाजूंनी हे राज्य हिरव्यागार झाडांनी सजलेले आहे आणि त्याचबरोबर मणिपूर राज्यामध्ये बराक नाडी वाहते आणि हि नदी राज्यातील सर्वात मोठी नदी आहे.

पोलो या खेळाबद्दल अनेकांना माहिती असे आणि या खेळाचा उगम हा या राज्यामध्येच झाला त्याचबरोबर हे राज्य त्यांच्या पारंपारिक नृत्य प्रकारासाठी देखील खूप प्रसिध्द आहे आणि येथील लोक हे पारंपारिक कला प्रकार आणि नृत्य प्रकार करण्यासाठी खूपच उत्साही असतात.

आणि या ठिकाणी पारंपारिक पणे साजरा केला जाणारा नृत्य प्रकार म्हणजे रास लीला आणि हा प्रकार येथील लोक अगदी श्रध्देने आणि भक्तीने साजरे केले जाते. चला तर आता आपण मणिपूर राज्याविषयी खाली आपण सविस्तर माहिती पाहूया.

manipur information in marathi
manipur information in marathi

मणिपूर राज्याची माहिती – Manipur Information in Marathi

राज्याचे नावमणिपूर (भारत
क्षेत्रफळ२२३२७ चौरस किमी
राजधानीइंफाळा

मणिपूर राज्याचा इतिहास – manipur history in marathi

मणिपूर राज्याच्या निर्मितीविषयी असे म्हटले जाते कि निंगथौजा कुळांतर्गत दहा कुळांचे एकत्रीकरण करून या राज्याची निर्मिती केली आहे. या राज्याला एक ऐतिहासिक महत्व लाभले आहे म्हणजेच या राज्यामध्ये भारत ते म्यानमार असा व्यापारी मार्ग होता.

आणि त्याचबरोबर दुसऱ्या महायुध्दामध्ये हे जपान आणि मित्र राष्ट्रामध्ये झालेल्या युध्दाची भूमी म्हणून या राज्याने आपली भूमिका बजावली होती. १९४७ मध्ये मणिपूर या राज्यामध्ये सरकार स्थापन झाले आणि १९४९ मध्ये हे एक स्वतंत्र्य भारताचा भाग बनले.

त्याचबरोबर मणिपूर राज्य हे १९५६ मध्ये भारताचा एक केंद्रशाशित प्रदेश बनला जसे गोवा शहर सध्या आहे आणि ते १९७२ पर्यंत केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यरत होते आणि १९७२ नंतर या प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळाला.

मणिपूर राज्यातील मुख्य व्यवसाय किंवा उद्योग ?

मणिपूर या राज्यामध्ये राहणारे लोक हे आपला उदरनिर्वाह अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय करून चालवतात आणि या ठिकाणी लोकांनाचे मुख्य जगण्याचे साधन किंवा उदरनिर्वाह चालवण्याचे साधन हे शेती आहे.

आणि या ठिकाणी राहणारे बहुतेक लोक हे शेती करतात त्याचबरोबर या ठिकाणी काही भागामध्ये लोक हातमाग देखील चालवतात तसेच या ठिकाणी काही प्रमाणात कुटीर उद्योग देखील चालवले जातात.

मणिपूर राज्यामधील जाती आणि जमाती

मणिपूर राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जातो जमाती राहतात आणि त्या म्हणजे चिरू जमाती, अनल जमाती, गंगटे जमाती, मरम जमाती, हमार जमाती, आयमोल जमाती, मेईथेई, लुआंग, हमार जमाती या सारख्या वेगवगळ्या जमाती मणिपूर राज्यामध्ये आहेत.

त्याचबरोबर या राज्यामध्ये या जमातींच्या सोबत एकूण लोक्संखेमध्ये दोन तृतीअंश लोक हे हिंदू धर्माचे आहेत आणि हे मणिपूरमध्ये राहणारे हिंदू धर्मीय लोक हे विष्णूभक्त आहेत.

या राज्यामध्ये नागा आणि कुकी या जमाती मुख्य जमाती आहेत आणि कुकू जमातीचे लोक हे मोठ्या प्रमाणात दक्षिण भागामध्ये राहतात आणि नागा या जातीचे लोक या राज्याच्या उत्तर भागामध्ये राहतात.

मणिपूर राज्यामध्ये बोलली जाणारिऊ भाषा – langauge

मणिपूर राज्यामध्ये राज्याच्या बहुतेक भागामध्ये मणिपुरी भाषा बोलली जाते आणि हि भाषा राज्यामध्ये १५ लाख लोक बोलण्यासाठी वापरतात आणि मणिपुरी भाषा हि भारताच्या २२ अधिकृत भाषांच्यापैकी एक आहे.

मणिपूर राज्यातील वेगवेगळे सण आणि उत्सव – festivals and celebrations

भारत हा देश संस्कृती प्रधान देश आहे आणि आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सन आणि उत्सव अगदी आनंदाने साजरे केले जातात त्याचबरोबर प्रत्येक राज्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे सन साजरे केले जातात आणि त्या सणांना किंवा उत्सवांना एक वेगळे महत्व असते.

तसेच मणिपूर राज्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे सण आणि उत्सव साजरे केले जातात ज्या सणांना काही वेगळीच ओळख असते. या राज्यामध्ये काही भारतातील पारंपारिक सन साजरे केल जातात जसे कि दिवाळी, गणपती, होळी तसेच राष्ट्रीय सन इत्यादी.

त्याचबरोबर या ठिकाणी रथजत्रा, दुर्गापूजा या सारखे विशेष सन देखील साजरे केले जातात. या ठिकाणी होळी हा सन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि या सणानिमित्त थावल चोम्बा हे नृत्य साजरे केले जाते आणि असा कार्यक्रम १० ते १५ दिवस चालतो.

मणिपूर राज्यामधील काही नृत्य प्रकार – manipur dance information in marathi

या ठिकाणी नृत्याला देखील खूप महत्व आहे आणि हे राज्य त्यांच्या काही पारंपारिक नृत्य प्रकारासाठी खूप लोकप्रिय आहे आणि या ठिकाणी अनेक त्यांचे पारंपारिक नृत्य पराक्र साजरे केले जातात आणि त्यामधील एक लोकप्रिय नृत्य प्रकार म्हणजे रास लीला जी राधा आणि कृष्ण यांच्याशी संबधित आहेत.

या नृत्य प्रकाराबरोबर या ठिकाणी खंबा थांबी खंबा नृत्य, पुंग चोळाम नृत्य, थावल चोम्बा नृत्य या प्रकारची अनेक नृत्य प्रकार देखील साजरे केले जातात.

मणिपूर राज्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • मणिपूर राज्याची स्थापना २१ जून १९७२ मध्ये झाली कारण मणिपूर राज्य १९७२ च्या अगोदर एक केंद्रशासित प्रदेश होता.
  • मणिपूर राज्य हे १५ ऑक्टोबर १९४९ मध्ये भारतामध्ये विलीन झाले होते.
  • मणिपूर या राज्यामध्ये मणिपूरचे राज्यफुल हे शिरूई लिली हे आहे, राज्य प्राणी सांगाई हा आहे आणि राज्य पक्षी नोंग्यीन हा आहे.
  • मेईथेई या जमातीचे लोक राज्यामध्ये जास्त प्रमाणात आहेत आणि मेईथेई या भाषेमध्ये मणिपूरला मितेइलेपाक आणि कंगली पाक असे म्हणतात.
  • इसवी सन ३३ च्या दशकामध्ये मानिपुराची स्थापना नोंगडा लैरेन पखांगबा यांनी केली आणि याला मानिपुराचा पहिला शासक म्हणून ओळखले जाते.
  • अनेक दंतकथा सांगतात कि मणिपूर मधील लोक हे मुळचे गंधर्व आहेत म्हणजेच स्वर्गीय गायक आणि नर्तक कारण या ठिकाणी चांगल्या प्रकारे नृत्य आणि गायन साजरे केले जाते.
  • भारतामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या १२६ बाम्बुंच्या प्रकारापैकी ५० ते ५४ प्रकारचे बांबू हे मणिपूर या राज्यामध्ये आढळतात.
  • शिरूई लिली हे मणिपूरचे राज्यफुल असले तरी या फुलाची प्रजाती हि धोक्यात आली आहे म्हणजेच या प्रकारची फुले खूप कमी प्रमाणात आढळतात.
  • मणिपूर राज्यामध्ये ७६ टक्के लोक हे साक्षर आहेत.
  • मणिपूर राज्यामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि या ठिकाणी उस आणि तांदूळ हि मुख्य पिके घेतली जातात.

आम्ही दिलेल्या manipur information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मणिपूर राज्याची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sajjangad story in Marathi या manipur capital information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information of manipur in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Manipur information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!