Mattha Recipe in Marathi मठ्ठा रेसिपी मराठी मठ्ठा रेसिपी हि एक महाराष्ट्रीयन डिश आहे जी दह्यापासून बनवली जाते आणि रेसिपी घरामध्ये बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि आपण झटपट बनवू शकतो. आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची थंडगार पेय बनवून पिती जसे कि लस्सी, ताक, सोलकढी, आंब्याचे पन्हे, लिंबू सरबत यासारखे अनेक पोटाला गार करणारे पदार्थ उन्हाळ्यामध्ये बनवून पितो आणि त्यामधील एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे मठ्ठा कारण मठ्ठा हा पदार्थ बहुतेक लोकांना खूप आवडतो आणि हा पदार्थ भारतामध्ये बहुतेक भागामध्ये बनवला जातो.
मठ्ठा बनवताना दही सर्वप्रथम एका भांड्यामध्ये रवीने फेटले जाते आणि त्यामध्ये आले लसून पेस्ट, जिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर आणि मीठ घातले जाते आणि त्यामध्ये पाणी घालून ते पातळ बनवले जाते. मठ्ठा बनवणे खूप सोपी आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच १५ ते २० मिनिटामध्ये बनते आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण मठ्ठा रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
मठ्ठा रेसिपी मराठी – Mattha Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
मठ्ठा बनवताना दही सर्वप्रथम एका भांड्यामध्ये रवीने फेटले जाते आणि त्यामध्ये आले लसून पेस्ट, जिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर आणि मीठ घातले जाते आणि त्यामध्ये पाणी घालून ते पातळ बनवले जाते.
- दही : मठ्ठा बनवण्यासाठी दही महत्वाचे साहित्य लागते. दही फेटले जाते आणि त्यामध्ये इतर साहित्य घातले जाते आणि मग त्यामध्ये पाणी घालून ते पातळ बनवून त्याचा मठ्ठा बनवला जातो.
- लसून : लसून घातल्यामुळे मठ्ठ्याला चांगला फ्लेवर येतो आणि मठ्ठा टेस्टी लागतो.
- साखर : मठ्ठ्यामध्ये साखर घातल्यामुळे मठ्ठ्याला गोड चव येते.
मठ्ठा हा पदार्थ शक्यतो उन्हाळ्यामध्ये बनवला जातो आणि हे एक थंडगार पेय आहे जे दह्यापासून बनवले जाते आणि हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि या रेसिपीचा आनंद आपण जेवणानंतर किंवा जेवता जेवता घेऊ शकतो. मठ्ठा हा पदार्थ बहुतेक लोकांना खूप आवडतो आणि हा पदार्थ भारतामध्ये बहुतेक भागामध्ये बनवला जातो.
मठ्ठा बनवणे खूप सोपी आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच १५ ते २० मिनिटामध्ये बनते आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण मठ्ठा रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. चला तर आता आपण मठ्ठा रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
मठ्ठा बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये बहुतेक वेळा उपलब्ध असते आणि आणि जर आपल्या घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो. चला तर आता आपण मठ्ठा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- १ वाटी दही.
- एक ग्लास पाणी.
- १ चमचा आले लसून पेस्ट.
- १ चमचा साखर.
- १/२ चमचा जिरे पावडर.
- मीठ ( चवीनुसार ).
मठ्ठा रेसिपी एक हि खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून मठ्ठा रेसिपी कशी बनवायची.
- माथा रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम खोलगट भांडे घ्या आणि त्यामध्ये दही घाला.
- आता आल्याचे तुकडे आणि लसून घ्या आणि त्याची बारीक पेस्ट बनवा किंवा ठेचलेले आले आणि लसून देखील घालू शकतो.
- आता खोलगट भांड्यामध्ये घातलेले दही रवीने चांगले फेटून घ्या. दह्यामधील गाठी फुटल्या कि त्यामध्ये १ चमचा आले लसून पेस्ट, १/२ चमचा जिरे पावडर, १ चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घाला आणि ते रवीने दह्यामध्ये चांगले मिक्स करून घ्या.
- मग त्यामध्ये एक ग्लासा पाणी घाला आणि ते परत रवीने मिक्स करून घ्या ( मठ्ठ्यामध्ये पाणी तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला मठ्ठा जास्त घट्ट आवडत असेल तर कमी पाणी घाला आणि जर मठ्ठा पातळ आवडत असेल तर थोडे पाणी जास्ती घाला ).
- आता या मठ्ठ्यामध्ये शेवटी कोथिंबीर घाला आणि ग्लास मध्ये घालून सर्व्ह करा.
मठ्ठा कसा सर्व्ह करावा – serving suggestions
- या रेसिपीचा आनंद आपण जेवणानंतर किंवा जेवता जेवता घेऊ शकतो आणि हि रेसिपी आपण सकाळच्या जेवणाबरोबर पिऊ शकतो.
टिप्स (Tips)
- मठ्ठा आपण फ्रीजमध्ये थोडावेळ गार करून मग पिऊ शकतो.
- जर तुम्हाला आल्ल्याची पेस्ट आवडत नसेल तर आपण मठ्ठ्यामध्ये आले घातले नाही तरी चालेल.
- मठ्ठा जर तुम्हाला थोडा तिखट हवा असेल तर त्यामध्ये थोडीसी काळी मिरी पावडर टाकली तरी चालते.
- मठ्ठ्यामध्ये धने पावडर घातल्यामुळे मठ्ठ्याला खमंग वास येतो.
आम्ही दिलेल्या mattha recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मठ्ठा रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mattha masala recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि recipe of mattha in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये jalebi mattha recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट