Solkadhi Recipe in Marathi सोलकढी रेसिपी मराठी आज आपण सर्वांना हवी हवीशी वाटणारी आणि विशेषता उन्हाळ्यामध्ये किंवा आपण जर चिकन किंवा मटन बनवल्यानंतर जेवणाचा आणखीन आनंद वाढवण्यासाठी केली जाणारी सोलकढी रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत. सोलकढी हि नारळाच्या दुधापासून बनवली जाते आणि त्यामध्ये कोकम आगळ घातले जाते आणि सोलकढी बनवली जाते आणि हा ताकाचा एक चांगला पर्याय म्हणून जेवणामध्ये वाढली जाते. सोलकढी हि एक चविष्ट आणि थंड पेय आहे जे आपण उन्हामध्ये पिऊ शकतो आणि त्यामुळे पोटाला थोडा विसावा मिळतो.
सोलकढी बनवण्यासाठी नारळाचे दुध आणि कोकम किंवा कोकम आगळा हे महत्वाचे घटक लागतात. सोलकढी हा पदार्थ एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो आपण तसाच जेवता जेवता पिण्यासाठी बनवतो किंवा मग भातासोबत खाण्यासाठी म्हणजेच सोलकढी- भात खाण्यासाठी देखील बनवू शकतो.
सोलकढी हि घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनते आणि ह्या पदार्थाची विशेषता म्हणजे हा पदार्थ आपल्याला शिजवावा लागत नाही. चला तर मग आपण सोलकढी कशी बनवताची ते पाहूयात.

सोलकढी रेसिपी मराठी – Solkadhi Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ ते ६ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १५ ते १६ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
प्रकार | पेय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
सोलकढी म्हणजे काय ?
सोलकढी हि एक थंड पेय आहे जे नारळाचे दुध, लसून, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर आणि कोकम आगळ / आमसूल वापरून बनवली जाते. आपण सोलकढी ताकाला एक उत्तम पर्याय म्हणून पिऊ शकतो. सोलकढी हे एक उन्हाळी पेय आहे जे उन्हाळ्यामध्ये पोटाला विसावा देण्यासाठी पिले जाते.
- नारळाचे दुध : सोलकढी बनवण्यासाठी लागणारे नारळाचे दुध हे या रेसिपी मधील मुख्य घटक आहे. सोलकढी पूर्णपणे नारळाच्या दुधाने बनवली जाते आणि त्यामध्ये हिरवी मिरची, आले लसून पेस्ट आणि मीठ घातले जाते.
- कोकम आगळ किंवा आमसूल : सोलकढी मध्ये जर आपण कोकम आगळ किंवा आमसूल घातले तर सोलकढीला आंबट चव येते तसेच कढीला गुलाबीसर रंग देखील येतो. त्यामुळे सोलकढी मध्ये कोकम वापरणे आवश्यक असते.
सोलकढी हा एक चविष्ट पदार्थ आहे जो विशेषता महाराष्ट्रातील कोकण भागामध्ये बनवला जातो आणि हा पदार्थ कोकण भागामध्ये मासे, मटण किंवा चिकन या पदार्थांच्या सोबत एक साईड डिश म्हणून सर्व्ह केला जातो तसेच उन्हाळ्यामध्ये आपण ताका ऐवजी सोलकढी बनवून पिऊ शकतो. सोलकढी हा एक झटपट आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनणारा एक सोपा पदार्थ आहे. चला तर मग आता आपण सोलकढी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ ते ६ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १५ ते १६ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
प्रकार | पेय |
बनवण्याची पध्दत | सोपी |
सोलकढी हि रेसिपी बनवण्यासाठी नारळाचे दुध आणि कोकम आगळ किंवा आमसूल हे महत्वाचे घटक आहेत. त्याचबरोबर सोलकढी बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते आणि त्यामधील काही साहित्य घरामध्ये उपलब्ध असते आणि काही साहित्य आपल्याला बाजारातून आणावे लागते. चला तर मग सोलकढी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ३ मोठी वाटी नारळाचे दुध.
- २ ते ३ चमचे कोकम आगळ.
- अर्धा चमचा आले तुकडे.
- ८ ते ९ लसून पाकळ्या.
- २ हिरव्या मिरच्या.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
आता आपण वरील साहित्य वापरून सोलकढी कशी बनवायची ते पाहूयात.
- सोलकढी बनवताना सर्वप्रथम नारळ फोडून तो खवून घ्या.
- आता खवलेला ओले खोबरे, लसून, आले आणि मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र घ्या आणि ते मोठ्या वेगावर चांगले बारीक करून घ्या.
- मग ते मिश्रण बारीक केल्यानंतर त्यामध्ये १ वाटी पाणी घाला आणि ते परत मिक्सरला फिरवून घ्या.
- आता हे मिश्रण गाळण्याच्या किंवा पांढऱ्या सुती कापडामध्ये ओतून ते एक भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्यामधील सर्व दुध चांगल्या प्रकारे गाळून घ्या.
- आणि ते दुध जास्त घट्ट असल्यमुळे त्यामध्ये अर्धी वाटी किंवा अर्ध्या वाटीपेक्षा जास्त पाणी घाला आणि ते चांगले मिक्स करा.
- त्यानंतर त्या दुधा मध्ये कोकम आगळ, चवीनुसार मीठ आणि चावी नुसार साखर घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि ते मिक्स करा.
- तुमची सोलकढी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली. जर तुम्हाला सोलकढी थंड सर्व्ह करायची असेल तर ती १ तास फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ती थंड होईल.
सोलकढी कश्यासोबत पिऊ शकतो – serving suggestion
सोलकढीचा आनंद आपण तसाच घेवू शकतो किंवा सोलकढी आणि पांढरा भात असे कॉम्बिनेशन देखील खावू शकतो. कोकणामध्ये सोलकढी मासे, मटण किंवा चिकन या पदार्थांच्या सोबत एक साईड डिश म्हणून सर्व्ह केला जातो तसेच उन्हाळ्यामध्ये आपण ताका ऐवजी सोलकढी बनवून पिऊ शकतो.
- एक नारळातून २ ते अडीच वाटी दुध बनू शकते.
- कोकम आगळ दुधामध्ये डायरेक्ट घालू नका ते थोड्या एक ते दोन चमचे पाण्यामध्ये मिक्स करून मग घाला त्यामुळे ते ते दुधामध्ये मिक्स होण्यास मदत होते.
- आपण सोलकढी मध्ये जर आमसुला वापरला तर तो १ ते २ भिजवून ठेवावा लागतो.
- जर तुम्ही वाटलेले खोबऱ्याचे मिश्रण जर सुती कापडाने गाळले तर त्यामधून चांगले दुध निघू शकते.
- सोलकढी मध्ये आमसूल किंवा कोकम आगळ वापरल्यामुळे कढीला आंबट चव येते तसेच गुलाबीसर रंग देखील येतो.
आम्ही दिलेल्या solkadhi recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर सोलकढी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sol kadhi recipe in marathi video या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि solkadhi konkani recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये solkadhi in marathi recipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट