मायावती यांची माहिती Mayawati Information in Marathi

Mayawati information in marathi मायावती यांची माहिती, भारतातील एक राजकारणी म्हणून ज्यांची ओळख आहे अश्या कुमारी मायावती ह्या बहुजन पक्ष्याच्या प्रमुख आहेत आणि ह्या उत्तर प्रदेशमधील राजकारणी आहेत आणि आज आपण या लेखामध्ये त्यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. कुमारी मायावती ह्या उत्तर प्रदेशमधील एक राजकाराणी आहेत आणि त्या उत्तर प्रदेशच्या ४ वेळा मुख्यमंत्री बनल्या होत्या आणि त्या १९८४ मध्ये स्थापन झालेल्या बहुजन समाज पक्ष्याच्या प्रथम सदस्य होत्या आणि त्यानंतर त्या या पक्ष्याच्या महत्वाच्या व्यक्ती ठरल्या.

बहुजन समाज पक्ष हा मागासवर्गीय आणि दलितांचे कल्याण, विकास आणि सुधारणा करण्याच्या हेतूने सुरु केलेला पक्ष आहे आणि मायावती ह्या भारतीय राज्याच्या मुख्यमंत्री झालेल्या पहिल्या महिला दलित सदस्य आहेत आणि यांना उत्तर प्रदेशमधील लोक त्यांना दलितांच्या बहिण किंवा बहुजनी म्हणून ओळखले जाते.

जरी त्या ४ वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या असल्यातरी त्यांना २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हार मानवी लागली होती आणि त्यांनी त्याच वर्षी पक्ष्याच्या नेत्या या पदाचा देखील राजीनामा दिला होता.

Mayawati information in marathi
Mayawati information in marathi

मायावती यांची माहिती – Mayawati Information in Marathi

नावमायावती
जन्म१५ जानेवारी १९५६
जन्मठिकाणदिल्ली
पालकवडील प्रभू दास आणि आई राम रती
शिक्षणबी.ए ( B.A ), बी. एड ( B. Ed ) आणि एलएलबी ( LL.B )
ओळखसामाजिक कार्यकर्त्या आणि राजकारणी

मायावती यांचे सुरुवातीचे आयुष्य – early life

मायावाती यांचा जन्म दिल्लीमधील सुचेता रूग्णालयामध्ये १५ जानेवारी १९५६ मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव प्रभू दास असे होते तर त्यांच्या आईचे नाव राम रती होते आणि मायावती ह्या मध्य वर्गीय कुटुंबातील होत्या म्हणजेच त्यांचे वडील हे गौतम बुध्द नगरमधील बदलपूर या ठिकाणावरील टपाल कर्मचारी होते.

त्यांनी त्यांचे बी.ए (B.A) चे शिक्षण १९७५ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कालिंदी महाविद्यालयातून पूर्ण केले आणि तसेच त्यांनी बी. एड ( B. Ed ) चे शिक्षण त्यांनी व्हीएमएलजी कॉलेज जे गाझियाबादमध्ये आहे त्या ठिकाणहून केले आणि त्यांनी १९८३ मध्ये एलएलबी ( LL.B ) देखील दिल्ली विद्यापीठातून पूर्ण केली.

त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वकील म्हणून काम केले तसेच त्यांनी त्यांच्या २ ते ३ वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सामाजिक कार्य देखील केल. १९८४ मध्ये त्यांनी बहुजन समाज पक्ष्याची स्थापना झाली आणि मायावती ह्या स्थापनेपासून पक्ष्याच्या सदस्य होते आणि पुढे त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या चार वेळा मुख्यमंत्री बनल्या.

मायावती यांची राजकीय कारकीर्द – political career

  • त्यांनी त्यांचे एलएलबी ( LL.B ) चे शिक्षण १९८३ मध्ये केले आणि त्या १९८४ मध्ये स्थापन झालेल्या बहुजन समाज पक्षामध्ये सदस्य म्हणून सामील झाल्या.
  • १९८९ मध्ये झालेल्या निवडणुकांच्यामध्ये त्या बिजनौरमधून निवडून आल्या आणि खासदार बनल्या आणि पुढे १९९४ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेमध्ये निवडून आल्या.
  • १९९५ हे वर्ष त्यांच्यासाठी खास ठरले कारण त्या १९९५ मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या.
  • १९९६ मध्ये त्या पुन्हा लोकसभेवर निवडून आल्या आणि १९९७ मध्ये त्या पुन्हा उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री बनल्या आणि २००३ मध्ये त्यांना पुन्हा उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली.
  • २००७ मध्ये त्या चौथ्यादा मुख्यमंत्री बनल्या आणि त्यांनी २०१२ पर्यंत मुख्यमंत्री म्हणून आपली कामगिरी बजावली परंतु २०१२ च्या निवडणुकांच्यामध्ये त्यांना हार पत्करावी लागली.

 मायावती यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • २००८ या साली फोर्ब्सने जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये मायावती ह्या ५९ व्या स्थानावर आहेत.
  • मायावती यांनी त्यांचे बी. एड ( B. Ed ) शिक्षण गाझियाबाद मधून पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९७७ ते १९८४ पर्यंत शिक्षिका म्हणून काम केले होते.
  • मायावती यांनी महागठबंधन या संस्थेची स्थापना केली आहे.
  • मायावती यांना राजकारणामधील योगदानासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
  • त्या राजकारणामध्ये येण्याअगोदर शिक्षिका म्हणून काम केले होतेच आणि शिक्षिका म्हणून काम करत असताना त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा ( IAS ) ह्या परीक्षेची तयार करण्यासाठी देखील सुरुवात केली होती कारण त्यांचे भारतीय प्रशासकीय सेवा ( IAS ) बनण्याचे स्वप्न होते.
  • मायावती ह्या डॉ. बी. आर आंबेडकर यांच्या विचारांच्यावर खूप प्रभावित होती त्यामुळे त्या त्यांच्या विचारांच्या नुसार वागत होत्या म्हणजेच डॉ. बी. आर आंबेडकर हे त्यांचे प्रेरणास्थान होते.
  • मायावती ह्या दलित समाज्याच्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या राजकीय काळामध्ये सामाज्यासाठी अनेक कामे केली आहेत त्यामुळे त्यांना दलित समाजाचा मोठा पाठींबा आहे.
  • त्या उत्तर प्रदेशाच्या पहिल्या दलित मुख्यमंत्री आहेत.
  • भ्रष्टाचाराच्या आरोपांच्यादरम्यान मायावतींना त्यांच्या वैयक्तिक संपतीमध्ये अचानकपणे वाढ झाल्यामुळे अनेक टीकेला सामोरे जावे लागले त्याचबरोबर तसेच २००४ या साली यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा देखील दाखल झाला होता.
  • बहुजन समाज पक्ष या पक्षाची स्थापना हि काशीराम यांनी केली होती आणि त्यांच्यानंतर या पक्ष्याच्या प्रमुख म्हणून मायावती यांनी कामगिरी बजावली.
  • त्या १९९५ मध्ये उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री बनल्या परंतु मुख्यमंत्री पदाचा त्याचा कार्यकाळ हा फक्त चार महिन्याचा होता.
  • मायावती हे नाव भारतातील अनेक महिलांना प्रेरणा देणारे नाव.

आम्ही दिलेल्या Mayawati information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मायावती यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Mayawati biography in marathi या Mayawati information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about Mayawati in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Mayawati information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!