मेथीचे लाडू रेसिपी Methi Ladoo Recipe in Marathi

Methi Ladoo Recipe in Marathi मेथीचे लाडू रेसिपी मेथीचे लाडू हे नाव ऐकताना थोडे वेगळे वाटत असले तरी हे कित्येक भारतीय स्वयंपाक घरामध्ये मेथीचे लाडू बनवले जातात. कारण हे पौष्टिक असतात आणि अनेक आयुर्वेदिक उपचारांच्यासाठी हे खाल्ले जातात. मेथीचे लाडू हा एक पारंपारिक म्हणजेच खूप पूर्वीच्या काळापासून बनवला जाणारा एक पौष्टिक पदार्थ असून हा पदार्थ हिवाळ्यामध्ये औषधी उपचारांच्यासाठी उपयोगाला येतो. तसेच हे लाडू सांधेदुखीच्या त्रासावर देखील खूप गुणकारी आहेत तसेच हा पदार्थ नवीन मातांच्यासाठी देखील एक पौष्टिक पदार्थ आहे.

तसेच हे लाडू फक्त औषधी गुणांच्यासाठी ओळखले जात नाहीत तर हे लाडू चवीला देखील उत्तम लागतात आणि त्यामध्ये चांगल्या चवीसाठी ड्राय फ्रुट्स वापरू शकतो.

मेथीचे लाडू हे भारतामध्ये अनेक ठिकाणी लोक एक औषधी पदार्थ म्हणून खातात आणि हे बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनतात. चला तर आता आपण या लेखामध्ये मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात.

methi ladoo recipe in marathi
methi ladoo recipe in marathi

मेथीचे लाडू रेसिपी – Methi Ladoo Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४५ मिनिटे
पाककलाभारतीय

मेथी लाडू रेसिपी – methiche ladu in marathi

मेथी लाडू रेसिपी हि एक पौष्टिक रेसिपी असून हि रेसिपी खूप पूर्वीच्या काळापासून एक औषधी आणि गुणकारी रेसिपी म्हणून बनवली जाते. हि रेसिपी मेथी पासून बनवलेली असते आणि ह्या रेसिपीचे नाव जरी ऐकले तरी कित्येक लोकांना असे वाटते कि हे कडवट असतील पण नाही हे त्याच्या औषधी गुणांच्यासोबत टेस्टी देखील लागतात.

मेथी लाडू बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनतात. चला तर मग आता आपण पौष्टिक आणि टेस्टी मेथी कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४५ मिनिटे
पाककलाभारतीय

मेथी लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य – process to make methi ladoo recipe 

मेथी लाडू हे पौष्टिक असल्यामुळे हे बनवून ठेवून रोज एक एक आपल्याला घरातील सर्वांना खायला दिले तर ते आरोग्य फायद्यासाठी चांगलेच आहे. तसेच हे लहानाच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत खाण्यासाठी सर्वांना योग्य आहेत आणि हे बनवण्यासाठी जे साहित्य लागते त्यामधील बहुतेक साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि यामधील कोणते साहित्य घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो. चला तर आता आपण मेथी लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

 • अर्धी वाटी मेथी दाणे.
 • २ वाटी गव्हाचे पीठ.
 • अर्धी वाटी पेक्षा जास्त दुध.
 • अर्धी वाटी तूप.
 • २ ते ३ वाटी पिठी साखर.
 • अर्धी वाटी खिसलेले खोबरे.
 • काजू, बेदाणे आणि बदाम तुकडे ( प्रत्येकी १ चमचा )
 • १ चमचा वेलची पावडर.

मेथी लाडू बनवण्यासाठी केली जाणारी कृती – how to make methi ladoo in marathi

आता आपण वर दिलेल्या साहित्यापासून औषधी, पौष्टिक आणि स्वादिष्ट लाडू कसे बनवायचे ते पाहूयात.

 • सर्वप्रथम मेथी अर्धी वाटी मेथी दाणे घ्या आणि ते चांगले निवडून पॅन मध्ये मध्यम आचेवर कोरडे भाजून घ्या आणि मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची एकदम बारीक पावडर करून घ्या आणि ती पावडर दुधामध्ये ९ ते १० तास भिजत ठेवावी.
 • ९ ते १० तासांनी मेथी पावडर चांगली भिजल्यानंतर आता गॅसवर पॅन मध्यम आचेवर ठेवा आणि तो गरम झाला कि त्यामध्ये खिसलेले खोबरे थोडे लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले भाजून घ्या आणि ते बाजूला काढून घ्या.
 • आता त्याच पॅन मध्ये अर्धी वाटी तूप घाला आणि ते मध्यम आचेवर गरम करा आणि त्यामध्ये काजू, बदाम आणि बेदाणे घाला आणि आणि ते तळून घ्या आणि ते तळून बाहेर काढा आणि बाजूला ठेवा.
 • आता या तुपामध्ये गव्हाचे पीठ घाला आणि ते पीठ चांगले लालसर होईपर्यंत भाजा मग त्यामध्ये वेलची पावडर, खिसलेले खोबरे, तळलेले ड्राय फ्रुट्स आणि भिजवलेली मेथी पावडर घाला आणि ते मिक्स करून थोडा वेळ गॅसवर वाफवून घ्या.
 • आणि आता गॅस बंद करा आणि करा आणि पीठ थोडे गार झाले कि त्यामध्ये साखर घाला मिक्स करा ( जसे आपण बेसन लाडूच्या पिठामध्ये जसे पिठी साखर घालून मग ते मिक्स करून बांधतो ) तसेच या हे लाडू देखील बांधा.
 • तुमचे पौष्टिक आणि स्वादिष्ठ मेथी लाडू तयार झाले.

मेथी लाडू खाल्ल्यामुळे होणारे फायदे ( benefits of methi ladoo )

 • मेथी लाडू खाल्ल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.
 • आपण जर रोज एक मेथी लाडू खाल्ला तर आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत होते.
 • मेथी लाडू हा एक पौष्टिक पदार्थ असून हा पदार्थ हिवाळ्यामध्ये औषधी उपचारांच्यासाठी उपयोगाला येतो.
 • हे लाडू सांधेदुखीच्या त्रासावर देखील खूप गुणकारी आहेत तसेच हा पदार्थ नवीन मातांच्यासाठी देखील एक पौष्टिक पदार्थ आहे.

टिप्स (Tips)

 • मेथी लाडू आपण हवा बंद डब्यामध्ये घालून ३ ते ४ आठवडे ठेवू शकतो.
 • मेथी लाडू मध्ये तुम्ही डिंक सुध्दा तळून घालू शकता.

आम्ही दिलेल्या methi ladoo recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मेथीचे लाडू रेसिपी माहिती methi che ladu बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या methi ke ladoo recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि how to make methi ladoo in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये methi ladoo recipe for pregnancy in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!