मकबूल फिदा हुसेन माहिती MF Hussain Biography in Marathi

MF Hussain Biography in Marathi – MF Hussain Information in Marathi मकबूल फिदा हुसेन जीवन परिचय. हुसेन म्हणून प्रसिद्ध असणारे भारतीय चित्रकार मकबूल हुसेन जे ठळक आणि दोलायमान रंगीत चित्रे बनवण्यासाठी सुप्रसिद्ध होते. आपल्या चित्र काढण्याच्या विशिष्ट शैलीमुळे त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली. विसाव्या शतकामध्ये सुप्रसिद्ध भारतीय कलाकारांमध्ये हुसेन यांची गणना केली जायची. या लेखामध्ये आपण मकबूल हुसेन यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत तसेच त्यांनी काढलेली चित्रे व चित्रपटांमुळे ते कोणकोणत्या वादात सापडले होते हे देखील पाहणार आहोत.

mf hussain biography in marathi
mf hussain biography in marathi

मकबूल फिदा हुसेन माहिती – MF Hussain Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)मकबूल फिदा हुसेन
जन्म (Birthday)१७ सप्टेंबर १९१५
जन्म गाव (Birth Place)महाराष्ट्रातील पंढरपूर
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)भारतीय चित्रकार
मृत्यू९ जून २०११

MF Hussain Information in Marathi

जन्म व वैयक्तिक आयुष्य

१७ सप्टेंबर १९१५ रोजी हुसेन यांचा जन्म महाराष्ट्रातील पंढरपूर येथे झाला त्यांचे संपूर्ण नाव मुकबल फिदा हुसेन आहे. सुलेमानी बोहरा कुटुंबात जन्माला आलेले हुसेन यांची आई ते दिड वर्षाचे असतानाच वारली. कालांतराने हुसेन यांच्या कुटुंबीयांनी पंढरपूर वरून इंदूर येथे स्थलांतर केलं इंदूर येथे हुसेन यांच शालेय शिक्षण पूर्ण झालं. हुसेन यांनी त्यांच्या आयुष्यातील काही काळ बडोद्यात देखील घालवला आहे.

बडोद्यात असतानाच हुसेन यांना कॅलिग्राफी मध्ये आवड निर्माण झाली आणि कालांतराने त्यांना कलेबद्दल आकर्षण वाटू लागले आणि शेवटी त्यांनी कलाकार होण्याचा निर्णय घेतला. १९३५ मध्ये हुसेन मुंबईमध्ये आले आणि त्यांनी प्रसिद्ध सर जे.जे स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखला नोंदवला. मुकबल हुसेन यांचा विवाह फजिला बीबी यांच्याशी झाला या दांपत्याला दोन मुली आणि चार मुलं आहेत.

कारकीर्दीची सुरुवात

मुकबल हुसेन यांची चित्रकलेची कारकीर्द सिनेमाचे होर्डींग्स रंगवणे पासून सुरू झाली. तर झालं असं १९३० च्या दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांना वाव मिळू लागला त्यावेळी तब्बल वर्षाला दोनशे चित्रपट प्रदर्शित केले जायचे आता इतक्या सगळ्या चित्रपटांची जाहिरात करण्यासाठी बाजारपेठेला उच्च दर्जाच्या चित्रकारांची अत्यंत गरज पडू लागली आणि मुकाबला हुसेन यांनी या संधीचं सोनं केलं. हुसेन यांना आपल्या उपजीविकेसाठी खेळण्याच्या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली तिथे काम करत असताना त्यांनी वेगवेगळी नाविन्यपूर्ण खेळणी बनवली.

हुसेन यांना आपल्या भारतीय कलेला संस्कृतीला जागतिक व्यासपीठावर गेलेलं पहायचं होतं आणि त्यासाठी कलाकारांमध्ये आधुनिकता असणे गरजेचे होतं कलाकारांना ही आधुनिकता आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं लागेल हे त्यांना ठाऊक होतं. आणि म्हणूनच हुसेन यांनी १९४७ च्या फाळणीला चळवळ सुरू करण्याची संधी म्हणून पाहिले.

कारण भारत आणि पाकिस्तानच्या फाळणी दरम्यान अनेक निष्पाप जीव मारले गेलेत आणि याच फाळणीतून नव्या भारताचा जन्म झाल्याचा दावा करून हुसेन व त्यांच्या स्कूल मधील मित्रमंडळींनी त्यांचे सहकारी कलाकारांना प्रोत्साहन मिळाव म्हणुन १९४७ मध्ये प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप स्थापन केल. पुढे भारतीय कलेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण वळण म्हणून हा ग्रुप उदयास आला. हुसेन यांच्या चित्रकार कारकिर्दीतील त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन १९५२ मध्ये झुरिच येथे केलं.

१९५३ मध्ये हुसेन ‌पहिल्यांदा युरोपला गेले जिथे त्यांनी पाब्लो पिकासो, पॉल क्ली यांची कामे पाहिली. नंतर १९६४ मध्ये यूएस मध्ये पहिल्यांदा त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवलं. हुसेन यांना त्यांच्या चित्रकार कारकिर्दीत भरपूर प्रसिद्धी आणि सन्मान मिळाला परंतु पुढील काळामध्ये त्यांच्या चित्रांवरून वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. अनेकदा हिंदू राष्ट्रवादी गटांनी हुसेन यांना धार्मिक भावना दुखावल्या बद्दल त्यांच्यावर आरोप केले. हुसेन यांनी त्यांच्या चित्रांमधून बऱ्याच वेळा नग्न हिंदू देवींचे चित्र रेखाटले होते.

यावरून अनेक हिंदू आणि हिंदू संघटनांचा रोष वाढला आणि हुसेन यांच्याविरुद्ध आठ गुन्हेगारी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. इतकेच नव्हे तर त्यांच्या चित्रांची तोडफोड करण्यात आली होती व त्यांच्या घरावर देखील हल्ला करण्यात आला होता. २००६ मध्ये हुसेन यांनी रेखाटलेले भारत मातेचे नग्न चित्र लोकांसमोर आले आणि बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या या कारणास्तव पुन्हा लोकांनी त्यांच्यावर आरोप लादले.

हे पेंटिंग लीलावा मधून मागे घेण्यास भाग पाडले गेले परंतु हे पेंटिंग एका लिलावात ऐंशी लाख रुपयांना विकले गेले परिणामी हुसेन यांना वेगवेगळ्या संघटनांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आणि अखेरीस हुसेन यांना भारत सोडून दुसऱ्या देशात जावे लागेल. क्रिस्टिज येथे हुसेन यांचे २००८ मध्ये एक चित्र तब्बल डॉलर १.६ दशलक्षांना विकले गेले. हुसेन यांच्या एका कॅनवास ला क्रिस्टिज येथे झालेल्या लिलावात दोन दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त किंमत मिळाली होती.

या घटने नंतर हुसेन भारतातील सर्वोत्तम पेड चित्रकार बनले. २००८ मध्ये हुसेन यांना भारताचा इतिहास दर्शविणारी ३२ चित्र रंगविण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. हुसेन हे ठळक व दोलायमान रंगीत चित्रे काढण्यासाठी सुप्रसिद्ध होते. त्यांनी प्रामुख्याने घोडे, शहरी लांडस्कॅपे, बॉलीवूड स्टार माधुरी दीक्षित आणि नग्न हिंदू देवींच्या चित्र काढले आहेत. हुसेन यांच्यावर हिंदू संस्कृतीची बदनामी केल्याबद्दल भारत सरकारने त्यांच्यावर वेगवेगळे खटले दाखल केले आणि त्यामुळे हुसेन यांना २००६ मध्ये भारत देश सोडावा लागला पुढील काळामध्ये हुसेन यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य युनायटेड किंगडम येथे घालवलं.

१९६७ मध्ये हुसेन यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं‌ through the eyes of painter हा त्यांचा पहिला सिनेमा बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये दाखवला गेला. या सिनेमाला नंतर गोल्डन बियर शॉर्टफिल्म अवॉर्ड जाहीर झालं. हुसेन हे बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे मोठे चाहते होते. त्यांनी माधुरी दीक्षित यांचे चित्रदेखील काढलेल आहे. सन २००० मधील हुसेन यांनी गजगामिनी नावाचा चित्रपट बनवला.

२००४ मध्ये हुसेन यांनी मीनाक्षी एक टेल ऑफ थ्री सिटीज चित्रपटाची निर्मिती केली. आज हुसेन यांनी काढलेले चित्र एंजलिस काउंटी म्युझियम ऑफ आर्ट, मुंबई येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, दोहा येथील नॅशनल म्युझियम ऑफ इस्लामिक आर्ट प्रदर्शनात ठेवली आहेत. त्यांच्या कला क्षेत्रातील कारकिर्दी मुळे त्यांना राज्यसभेत सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.

जॉर्डन चा रॉयल इस्लामिक स्ट्रॅटेजिक स्टडीज जगातील पाचशे प्रभावशाली मुस्लिमांच्या यादीमध्ये हुसेन यांचे नाव लिहिले होते. हुसेन यांनी काढलेली अनेक चित्रे युरोप आणि यूएस मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध ठरली आज हुसेन यांच्या कलाकृती जगभरातील अनेक संग्रहालयामध्ये प्रदर्शित केल्या जातात.

पुरस्कार

हुसेन हे भारतातील नावाजलेले चित्रकार होते ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपली ख्याती पसरवली. त्यांनी रेखाटलेली अनेक चित्र वादात अडकली होती परंतु तरीही त्यांनी एक चित्रकार म्हणून यशस्वी कारकीर्द तयार केली आहे. आणि त्यासाठी चित्रकलेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सन १९६६ मध्ये हुसेन यांना भारत सरकारचा देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

१९७३ मध्ये त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला. १९९१ मध्ये हुसेन यांना भारतीय कलेतिल त्यांच्या योगदानाबद्दल पद्मविभूषण हा देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान केला. २००७ मध्ये केरळ सरकार तर्फे त्यांना कला क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच राजा रविवर्मा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

मृत्यू 

हुसेन यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ कतार आणि लंडन येथे घालवला कारण त्यांच्या या वादग्रस्त चित्रांमुळे त्यांना भारत सोडावं लागलं होतं. त्यांना भारतात येण्याची इच्छा तर होती परंतु त्यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जायच्या. त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळात ते बरेच महिने आजाराने ग्रासलेले होते. अखेरीस ९ जून २०११ रोजी लंडन येथील रॉयल ब्रॉम्प्टन हॉस्पिटल मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने हुसेन यांचे निधन झाले.

वयाच्या ९५ व्या वर्षी हुसेन यांनी अखेरचा श्वास घेतला. युके येथील सर्वात मोठी स्मशान भूमी असलेल्या ब्रूकवुड स्मशानभूमीत हुसेन यांच पार्थिव दफन करण्यात आलं. हुसेन यांनी देशातील कलेचे आधुनिकीकरण करून भारतीय कलेला जागतिक स्तरा पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हुसेन यांनी कलाकार क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहित करण्याचं काम केलं आहे.

आम्ही दिलेल्या MF Hussain Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मकबूल फिदा हुसेन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या MF Hussain information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of MF Hussain in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!