माधुरी दीक्षित बद्दल माहिती Madhuri Dixit Biography in Marathi

Madhuri Dixit Biography in Marathi – Madhuri Dixit Information in Marathi माधुरी दीक्षित बद्दल माहिती सौंदर्याची खान व आपल्या मनमोहक रूपाने भारताच्या तमाम जनतेला घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित होय. सुंदर रूप आणि सुंदर अभिनय म्हणजे माधुरी दीक्षित. ती एक भारतीय अभिनेत्री असून हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षित नावाजली जाते. त्यांचे सौंदर्य, नृत्य कौशल्य आणि उत्कृष्ट अभिनयामुळे त्या चित्रपटसृष्टीतील प्रमुख व लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक आहेत. आजच्या ब्लॉग मध्ये आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या विषयी जाणून घेणार आहोत.

madhuri dixit biography in marathi
madhuri dixit biography in marathi

माधुरी दीक्षित बद्दल माहिती – Madhuri Dixit Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)माधुरी दीक्षित
जन्म (Birthday)१५ मे १९६७
जन्म गाव (Birth Place)महाराष्ट्रातील मुंबई
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)भारतीय अभिनेत्री

Madhuri Dixit Information in Marathi

जन्म

१५ मे १९६७ रोजी माधुरी दीक्षित यांचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला. मराठी कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबात माधुरी यांचा जन्म झाला. अंधेरी येथील डिव्हाईन चाईल्ड हायस्कूलमधून माधुरी दीक्षित यांनी शिक्षण घेतले. विलेपार्ले येथील साठे कॉलेजमध्ये माधुरी दीक्षित यांनी बीएससी मध्ये सुषमजीवशास्त्राचा अभ्यास केला आहे. माधुरी तीन वर्षाच्या असताना त्यांना नृत्याची आवड निर्माण झाली आणि पुढे त्यांनी आठ वर्ष कथ्थकचे प्रशिक्षण घेतले आज त्या व्यवसायिकरित्या प्रशिक्षित कथ्थक नर्तक आहेत.

वैयक्तिक आयुष्य

१७ ऑक्टोंबर १९९९ रोजी माधुरी दीक्षित यांचा विवाह श्रीराम माधव नेने यांच्याशी झाला. माधव नेने हे लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया येथील हृदय रक्तवाहिन्या संबंधी सर्जन आहेत. यांचा विवाह देखील दक्षिण कॅलिफोर्नियातील माधुरी दीक्षित यांचा मोठा भाऊ यांच्या निवासस्थानी पारंपारिक रीतीने पार पडला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विवाहाच्या वेळी माधुरी दीक्षित हि एक भारतीय अभिनेत्री आहे याची माधव नेने यांना काहीच कल्पना नव्हती.

अभिनय कारकीर्द

१९८४ मध्ये माधुरी दीक्षित यांच अबोध या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं. हा चित्रपट अयशस्वी ठरला. पुढील काही वर्षांमध्ये माधुरी दीक्षित यांचे स्वाती, हिफाजत, उत्तर-दक्षिण व खतरो के खिलाडी हे चित्रपट प्रदर्शित झाले परंतु ते अयशस्वी ठरले. पुढे माधुरी दीक्षित यांनी काही चित्रपटांमध्ये काम केले परंतु व्यवसायिक दृष्या ती उत्कृष्ट ठरली नाहीत. पुढे माधुरी दीक्षित यांचा तेजाब चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाद्वारे माधुरी दीक्षित यांना लोकप्रियता मिळण्यास सुरुवात झाली.

१९८८ मध्ये माधुरी दीक्षित यांनी मोहिनी या चित्रपटामध्ये काम केलं या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसून आल्या या चित्रपटात त्यांचे सहकलाकार अनिल कपूर होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला यातील प्रसिद्ध झालेल गाणं म्हणजे “एक, दोन, तीन,..” हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे माधुरी दीक्षित यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटाच्या यशामुळे माधुरी दीक्षित यांना हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थान मिळवून दिले. व हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला.

पुढे माधुरी दीक्षित यांनी वर्दी व राम लखन या चित्रपटांमध्ये काम केलं वर्दी हा चित्रपट बऱ्यापैकी गाजला परंतु राम लखन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला हा चित्रपट त्या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. पुढे माधुरी दीक्षित यांनी त्रिदेव या चित्रपटामध्ये काम केलं हा चित्रपट त्यावेळीचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला ज्याने वर्षातील सर्वाधिक कमाई करून दिली. १९९० मध्ये माधुरी दीक्षित यांचा दिल हा सिनेमा प्रदर्शित झाला. १९९० मध्ये माधुरी दीक्षित यांचा बेटा हा सिनेमा प्रदर्शित झाला.

पुढे हम आपके हे कोण या चित्रपटाद्वारे माधुरी दीक्षित यांनी भरपूर प्रसिद्धी मिळवली आणि स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून घोषित केले. पुढे माधुरी दीक्षित यांचा दिल तो पागल है.. हा चित्रपट प्रदर्शित झाला. जो सुपरहिट ठरला. माधुरी दीक्षित यांना त्यांच्या अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चे पुरस्कार मिळाले आहे. राम लखन, त्रिदेव, ठाणेदार, किशन कन्हैया, साजन, खलनायक, राजा,‌ हे चित्रपट माधुरी दीक्षित यांचे त्यावेळेचे गाजलेले चित्रपट होते ज्यामुळे माधुरी दीक्षित प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

पुढे परिंदा, प्रेम प्रतिज्ञा, देवदास या चित्रपटांच्या माध्यमातून माधुरी दीक्षित यांनी हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये मान सन्मान मिळवला. सन २००० मध्ये माधुरी दीक्षित देवदास चित्रपटामध्ये दिसून आल्या हा चित्रपट त्या काळातील सर्वात महागडा चित्रपट होता. हा चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या प्रचंड यशस्वी ठरला. २००३ मधील ऑस्कर साठी सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट म्हणून या चित्रपटाचा समावेश केला गेला.

या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली या चित्रपटाने पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अकरा फिल्मफेअर पुरस्कार सोबत इतर अनेक पुरस्कार जिंकले. पुढील काही काळ माधुरी दीक्षित यांनी पडद्यावरून विश्रांती घेतली आणि कालांतराने त्यांनी आजा नचले या रियालिटी शोमध्ये काम केलं. पुढील काळामध्ये मध्ये माधुरी दीक्षित अधून मधून काम करत. २०१४ मध्ये त्यांचा बकेट लिस्ट मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. २०१९ मध्ये माधुरी दीक्षित यांचा हिंदी चित्रपट तोटल धमाल प्रदर्शित झाला ज्याने सर्वाधिक कमाई केली.

१९९० च्या दशकामध्ये माधुरी दीक्षित या भारतातील सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्रींपैकी एक होत्या. २०१२ मध्ये फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १०० या यादीमध्ये माधुरी दीक्षित यांचा समावेश होता. माधुरी दीक्षित या भारतीय चित्रपट सृष्टीतील एक कुशल आणि प्रभावशाली अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात १९९० च्या दशकात आणि २००० च्या सुरुवातीच्या काळत माधुरी दीक्षित भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.

इतकच नव्हे तर सन २००० मध्ये माधुरी दीक्षित यांचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून नोंदवलं गेलं होतं. सन २०१२ मध्ये एनडी टीव्ही ने माधुरी दीक्षित यांना सर्व काळातील सर्वात लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री या यादीमध्ये पहिल्या स्थानावर ठेवलं होतं. न्यूयॉर्क टाइम्स च्यामते माधुरी दीक्षित या भारताची सर्वात मोठी महिला स्टार आहेत. एक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्माला आलेली माधुरी दीक्षित आज चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

मुकबल हुसेन हे थोर चित्रकार यांनीदेखील माधुरी दीक्षित यांना जगातील सर्वात सुंदर महिला असं संबोधलं होतं व त्यांनी तिचे चित्र देखील रेखाटले होते. माधुरी दीक्षित या हिंदी चित्रपट सृष्टीतील एकमेव अशा अभिनेत्री आहेत ज्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पारितोषिकासाठी १५ वेळा नामांकन मिळालं होतं. ज्यापैकी त्यांनी आठ जिंकले आहेत. माधुरी दीक्षित यांना भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

समाज कार्य

एक उत्तम अभिनेत्री व्यतिरिक्त माधुरी दीक्षित समाज कार्यकर्त्या देखील आहेत. त्यांनी मुलांचे शिक्षण व महिलांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला आहे. सन २००० मध्ये महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी साठी एड्स प्रतिबंधक एक मिनिट टेलिस्पाॅट्सच्या मालिकेमध्ये माधुरी दीक्षित यांनी काम केले होते.

२००१ मध्ये कोण बनेगा करोडपती? चे पहिलंच सीझन सुरू झालं त्यामध्ये माधुरी दीक्षित यांनी ५०००,००० रुपये जिंकले होते जे त्यांनी गुजरात येथे झालेल्या भूकंपातील पीडितांच्या कल्याणासाठी आणि पुण्यातील एका अनाथ आश्रम मध्ये दान केले. २०११ मध्ये माधुरी दीक्षित यांनी त्र्यंबकेश्वर येथील एका आश्रमाला भेट दिली जिथे त्यांनी ७५ शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांसोबत संपूर्ण दिवस साजरा केला. पुढील काळामध्ये माधुरी दीक्षित यांनी उत्तराखंड येथील पुरग्रस्तांना मदत केली.

२०१४ पासून माधुरी दीक्षित युनिसेफ सोबत काम करत आहे. त्या मुलांच्या हक्कांचे संवर्धन करण्यासाठी आणि बालमजुरी आणि बाल तस्करी रोखण्यासाठी युनिसेफ सोबत काम करत आहेत‌. २०१५ मध्ये भारत सरकारने माधुरी दीक्षित यांना बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेसाठी ब्रॅड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त केलं होतं. सन २०१३ मध्ये माधुरी दीक्षित यांनी जागतिक मधुमेह दिन निमित्ताने सनोफी इंडिया ची मोहीम सुरू केली. जी लोकांना मधुमेह प्रभावीपणे रोखण्यासाठी व्यवस्थापित करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यास प्रोत्साहित करते.

आम्ही दिलेल्या madhuri dixit biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माधुरी दीक्षित बद्दल माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Madhuri Dixit information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of madhuri dixit in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!