Michael Faraday Biography in Marathi – Michael Faraday Information in Marathi मायकेल फॅरेडे मराठी माहिती विज्ञान व तंत्रज्ञान यामुळे मानवाची प्रगती झाली आहे परंतु ही प्रगती घडवून आणणारे महान शास्त्रज्ञ ज्यांनी असे लाखो शोध लावण्यासाठी अनेक कठोर परिस्थितीचा सामना केला त्यातीलच एक म्हणजे महान शास्त्रज्ञ मायकेल फॅराडे. ते एक इंग्रजी शास्त्रज्ञ होते ज्यांनी रसायनशास्त्र आणि भौतिकीविज्ञ या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, डायमॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रॉलिसिस या संकल्पना त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या शोधां पैकी होत्या. ते इतिहासातील प्रमुख शास्त्रज्ञानपैकी एक होते. आजच्या लेखामध्ये आपण मायकल फॅराडे यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
मायकेल फॅरेडे मराठी माहिती – Michael Faraday Biography in Marathi
पूर्ण नाव (Name) | मायकल फॅराडे |
जन्म (Birthday) | २२ सप्टेंबर १७८९ |
जन्म गाव (Birth Place) | न्यूइंग्टन बट्स या सरे उपनगरात |
ओळख (Identity) | महान शास्त्रज्ञ |
Michael Faraday Information in Marathi
जन्म व वैयक्तिक आयुष्य
मायकेल फॅरडे यांचा जन्म २२ सप्टेंबर १७८९ रोजी न्यूइंग्टन बट्स या सरे उपनगरात झाला. मायकल हे ख्रिश्चन पंथाचे होते त्यांचं कुटुंब अतिशय गरीब होतं घरामध्ये सदैव अठराविश्व दारिद्र्य होतं शिवाय घरामध्ये खाणारी तोंड देखील जास्त होती. मायकल हे त्यांचे चार भावांपैकी तिसरे होते घराची परिस्थिती अतिशय बेताची होती म्हणून मायकल यांचे शिक्षण पूर्ण झालं नाही. मायकल यांना प्राथमिक शिक्षण मिळालं होतं आणि त्यानंतरच त्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतः करायला सुरुवात केली.
जेव्हा मायकल १४ वर्षाचे होते तेव्हा ते ब्रॅडफोर्ड स्ट्रीट वरील स्थानिक बुक बाईंडर आणि पुस्तक विक्रेते जॉर्ज यांच्याकडे शिकाऊ म्हणून काम करण्यास सुरुवात केली त्या दरम्यान मायकल यांनी बऱ्याच पुस्तकांचं वाचन केलं. ज्यामध्ये आयझॅक व्हाट्स यांच्या इम्प्रोवमेंट ऑफ माईंड या पुस्तकाचा समावेश होता यादरम्यान मायकल यांना विज्ञानाची आणि विशेषतः वीजेची आवड निर्माण झाली.
१८१२ मध्ये मायकल यांनी रॉयल सीट ऑफ रॉयल सोसायटीचे प्रख्यात इंग्रजी रसायनशास्त्रज्ञ हंफ्री डेव्ही आणि सिटी फिलोसोफिकल सोसायटीचे सदस्य जॉन टॅटम यांची व्याख्याने ऐकली. त्यांची व्याख्याने ऐकून मायकल यांनी टिपणे तयार करून जवळपास तीनशे पानांचे पुस्तक हंफ्री डेव्ही यांच्याकडे पाठवलं. इसवीसन १८१३ मध्ये मायकल फॅराडे हंफ्री डेव्ही यांच्या प्रयोगशाळेमध्ये सहाय्यक म्हणून रुजू झाले.
कारकीर्दस सुरुवात
हंफ्री डेव्ही यांच्यासोबत मायकल यांनी काम करण्यास सुरुवात केली आणि या दरम्यान त्यांनी युरोपमधील प्रमुख प्रयोगशाळांचे अवलोकन केलं यादरम्यान त्यांना ए.एम, अॕपियर, एफ. एच ए हंबोल्ट, जे एल गे ल्युसॅक, काउंट रम्फर्ड या प्रख्यात शास्त्रज्ञांना भेटण्याची संधी त्यांना मिळाली. हंफ्री डेव्ही यांच्यासोबत काम करत असताना माइकल यांनी क्लोरीनचे द्रवीकरण करण्यात यश प्राप्त केलं ्यानंतर हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन सल्फाइड, कार्बन डाय-ऑक्साइड द्रवीकरण केले.
१८२० मध्ये त्यांनी कार्बन व क्लोरिन यांची दोन संयुगे प्रथमच तयार केली. १८२४ मध्ये मायकल फॅराडे यांची रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड केली. १८२५ मध्ये मायकल यांनी बेंझाॅल या महत्त्वपूर्ण रसायनाचा शोध लावला. १८३१ मध्ये मायकल फॅराडे रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये रसायनशास्त्रज्ञ चे पहिले फुलेरियन प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले. १८३२ मध्ये मायकल फॅराडे यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाचे मानद डॉक्टर ऑफ सिविल लाॅ ही पदवी प्रदान केली.
मायकेल फॅरडे यांनी लावलेले शोध
मायकल फॅरेडे यांनी प्रत्यक्ष विद्युत्प्रवाह धारण करणाऱ्या कंडक्टर वरती चुंबकीय क्षेत्रावरील प्रयोगाद्वारे भौतिकशास्त्रातील विद्युत् चुंबकीय क्षेत्राच्या कल्पनेचा पाया प्रदान केला. मायकेल फॅराडे यांनी चुंबकत्व प्रकाश किरणा वर प्रभाव टाकू शकते आणि दोन घटनांचा अंतर्निहित संबंध आहे हे शोधून काढले. त्यांनी तयार केलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रोटरी सिस्टमच्या डिझाइन्स ने इलेक्ट्रिक मोटर तंत्रज्ञानाचा पाया घातला आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच वीज तंत्रज्ञानात उपयुक्त ठरली. त्यांनी आपल्या कल्पना अतिशय सोप्या भाषेत सांगितल्या.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि इलेक्ट्रॉलसिस च्या नियमांच्या शोधासाठी मायकल फॅराडे ओळखले जातात. त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वपूर्ण शोध लावले त्यातीलच पहिला शोध म्हणजे इलेक्ट्रिक मोटार. जरी विद्युत प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे सत्य शोधण्याचे श्रेय ओरस्टेड आणि ॲपियर यांना दिलं गेलं असलं तरी सन १८२२ मध्ये पहिली इलेक्ट्रिक मोटर शोधून काढणारे मायकल फॅराडे होती. मायकल फॅरेडे यांनी बेंझिनचा शोध लावला आहे.
मायकल फॅरेडे यांचे सुरुवातीचे शोध रसायनशास्त्राची संबंधित होते सन १८२० मध्ये त्यांनी कार्बन आणि क्लोरीनचे पहिले ज्ञात कृत्रिम संयुगे यार केले. हेक्साक्लोरोइथेन C2CI6 आणि टेट्राक्लोराइथेन C2CI4 आणि १८२५ मध्ये त्यांनी बेंझिन C6H6 बनवले. आजच्या रसायनशास्त्रातील जो एक महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. ज्यामुळे बऱ्याच सेंद्रिय रसायन शास्त्राचा आधार बनवला जातो. त्यानंतर मायकल फॅराडे यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चा शोध लावला.
१८३१ मध्ये त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चा शोध प्रकाशित केला त्यांनी एक प्रसिद्ध प्रयोगात मूलभूत ट्रान्सफॉर्मर तयार केले त्यांनी लोखंडी रिंगच्या विरुद्ध बाजूंना दोन वेगवेगळ्या लांबीच्या तारा गुंडाळून दोन कॉईल बनवल्या त्यातली एक कॉईल गॅलव्हानोमीटरला आणि दुसरी कॉईल बॅटरीला जोडली. जेव्हा त्यांनी बॅटरी जोडून आणि डिस्कनेक्ट करून बघितली तेव्हा त्यांना गॅलव्हानोमीटरला एक किक दिसली. त्यांनी केलेलं हे संशोधन आज एक म्युचल इंडक्शन म्हणून ओळखलं जातं.
लहानपणापासून मायकल फॅरेडे यांनी विद्युत शास्त्रावर आधारित वेगवेगळ्या पुस्तकांचा वाचन केलं होतं त्यांनी जे शिकलं त्यातूनच त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि मोटर्स बद्दल त्यांच्याकडे जे काही ज्ञान उपलब्ध होतं त्यातून त्यांनी जनरेटर चा शोध लावला. त्यांनी बलाच्या चुंबकीय रेषा पाहिल्या आणि असे अनुमान काढले की चुंबकाच्या हालचालीने निर्माण होणाऱ्या विद्युत् प्रवाहाचे तीव्रता ही गतीच्या आणि कट केलेल्या बलाचा रेषांच्या संख्येच्या प्रमाणात असते. त्यांनी फॅरडे डिस्क म्हणून ओळखला जाणारा विजेचा पहिला जनरेटरचा शोध लावला ज्याला त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक जनरेटर असे नाव दिले.
हा एक असा जनरेटर होता जो यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करायचा. मायकल फॅरेडे यांचे रसायन शास्त्रज्ञ व विद्युत् विज्ञानातील कौशल्य अद्भूत होते. त्याच्याच आधारावर त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यामधून त्यांनी इलेक्ट्रॉलिसिस चे दोन नियम तयार केले. फॅराडे यांचा एलेक्ट्रोलिसिस चा पहिला नियम असे सांगतो की इलेक्ट्रॉलिसिस दरम्यान इलेक्ट्रोलाईटिक सेलच्या इलेक्ट्रोड वर जमा केलेल्या पदार्थांचे प्रमाण हे त्याच्या सेल मधून जाणाऱ्या विजेच्या प्रमाणाशी थेट प्रमाणात असते व त्यांचा दुसरा नियम असे सांगतो की दिलेल्या विजेच्या प्रमाणात जमा केलेल्या विविध घटकांचे प्रमाण त्यांच्या रासायनिक समतुल्य वजनाच्या प्रमाणात असते.
फॅराडे यांनी कोणतेही शिक्षण न घेता वेगवेगळे महत्त्वपूर्ण शोध लावले ज्याचा आज मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग केला जातो. यासाठी त्यांना वेगवेगळे अनेक वैज्ञानिक व शैक्षणिक सन्माननीय पदके व पदव्या जाहीर करण्यात आल्या. त्यांनी केलेल्या कार्यासाठी रॉयल सोसायटीने त्यांना काॅप्ली, रॉयल व रम्फर्ड या पदांचा बहुमान दिला गेला. ते एक उत्तम प्रयोगकर्ता होते अतिशय सोप्या शब्दांमध्ये आपले मुद्दे मांडायचे शिवाय विविध प्रयोगांच्या विषयांवरील सुबोध व्याख्याने देण्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी ५४ वर्ष रॉयल इन्स्टिट्यूशन मध्ये कारकीर्द रचली आहे आणि या दरम्यान त्यांनी १५८ संशोधनांवर निबंध प्रसिद्ध केले त्यांचे निबंध आजही शास्त्रीय लेखनाचे आदर्श मानले जातात.
मृत्यू
मायकल फॅरेडे यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांनी हे सगळं कधीच प्रसिद्धीसाठी किंवा मोठे स्थान मिळवण्यासाठी केलं नाही त्यांनी फक्त त्यांची आवड जपली आणि अतिशय महत्त्वपूर्ण शोध लावले मायकेल फॅराडे यांनी लावलेल्या शोधांमुळे आपल्या संपूर्ण जगाचा कायापालट झाला. आज आपण अनेक वेगवेगळे तंत्रज्ञान वापरतो परंतु ते तंत्रज्ञान बनवण्यासाठी मायकल फॅराडे यांनी तयार केलेल्या नियमांचा वापर केला जातो त्यांनी इलेक्ट्रिक सायन्स मध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे आणि रसायन शास्त्रातही त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबी जगासमोर मांडले आहे. मायकल फॅराडे यांचा मृत्यू हॅम्पटन कोर्ट , मिडलसेक्स येथे झाला.
आम्ही दिलेल्या michael faraday biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मायकेल फॅरेडे मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या michael faraday information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of michael faraday in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट