जागतिक विज्ञान दिवस Science Day Information in Marathi

Science Day Information in Marathi – Vidnyan Din Information in Marathi राष्ट्रीय विज्ञान दिन माहिती मित्रांनो, ‘विज्ञान दिवस’ का साजरा केला जातो? त्याच्यामागचं मुख्य कारण काय आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याआधी विज्ञान म्हणजे काय हे सर्वात आधी आपण समजून घेऊया. तर मित्रहो, विज्ञान म्हणजे नेमके काय? अथवा आपल्याला विज्ञानाची व्याख्या देता येईल का? तर उत्तर असेल हो! विज्ञान म्हणजे ‘सुसंघटित विशेष ज्ञान होय’ अथवा ‘नैसर्गिक वस्तू, जीव, घटना, इत्यादींविषयाची माहिती व ज्ञान.’ खरंतर, सायन्स (विज्ञान) हा इंग्रजी शब्द ज्ञान (ज्ञाननिर्मिती) या अर्थाच्या ‘सायन्शिया’ या लॅटिन शब्दावरून आला आहे.

मात्र, प्रचलित वापरानुसार या शब्दाचा अर्थ विशिष्ट प्रकारचे ज्ञान असा होतो. एकोणिसाव्या शतकापर्यंत विज्ञान या संकल्पनेला मुख्यतः नैसर्गिक तत्वज्ञान म्हणूनच ओळखले जात होते. अर्थात अँरिस्टॉटल, फ्रान्सिस बेकन, ऑग्युस्त काँत इत्यादींनी विज्ञान या संकल्पनेचे विविध विभाग पाडून, विज्ञानाचे वर्गीकरण करण्याचे प्रयत्न केले होते.

एकोणिसाव्या शतकानंतर विसाव्या शतकाअखेरीस मात्र विज्ञानाची सामान्यपणे पुढील चार मुख्य विभागांत विभागणी करण्यात आली :- (१) गणित व तर्कशास्त्र (२) भौतिकीय विज्ञाने (३) जीवविषयक विज्ञाने आणि (४) सामाजिक विज्ञाने इत्यादी.

science day information in marathi
science day information in marathi

राष्ट्रीय विज्ञान दिन माहिती – Science Day Information in Marathi

महत्व

आता, विज्ञान म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर, आपल्या लक्षात आलं असेल की आपल्या आयुष्यामध्ये विज्ञानाचं महत्व किती आहे! आणि विज्ञानाचं हेच महत्व सगळयांना समजावं यासाठी आपल्या भारत देशात २८ फेब्रवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

खरंतर, भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ज्यावेळी, आपल्या भारतातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर हे १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते.

त्यावेळी त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक अत्यंत महत्वपूर्ण योजना म्हणजे आपल्या भारत देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारी यादिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे ही होती.

इतिहास

मित्रहो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राष्ट्रीय विज्ञान दिवस हा २८ फेब्रुवारी याच दिवशी का साजरा केला जातो? तर याच उत्तर म्हणजे ज्यावेळी विज्ञान दिवस साजरा करण्याची संकल्पना वसंतराव गोवारीकरांच्या मनात आली, त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार फक्त डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, त्यामुळे विज्ञान दिवस साजरा करण्याचा दिवस हा त्यांच्याशी संबंधितच असावा.

मग तो त्यांचा जन्मदिन असो अथवा मृत्युदिन. पण, नंतर त्यांनी असा विचार केला की डॉ. सी. व्ही. रामन यांचा जन्मदिवस अथवा मृत्युदिवस हा विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यापेक्षा, डॉ. सी. व्ही. रामन यांनी ज्यादिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? म्हणूनच मित्रांनो, अखेर राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्याची तारीख ठरली २८ फेब्रुवारी!

सर्वसामान्यांपासून ते उच्च स्तरावर असलेल्या लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्या सायन्सचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन हा दरवर्षी आपल्या भारतात साजरा करतात.

मानव कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न आणि कार्ये प्रदर्शित करण्यासाठी, सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी, नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा केला जातो.

शिवाय, भारतातील वैज्ञानिक विचारांच्या सर्व नागरिकांना संधी देण्यासाठी, लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच, विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९२८ यादिवशी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी रमण परिणामाचा शोध लावला.

तेंव्हापासून, २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन अशा सर्व ठिकाणी तसेच, सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ आणि संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.

मित्रहो, काही महिन्यांपूर्वी तर भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारे उल्लेखनीय काम करून दाखवले आहे आणि हे उल्लेखनीय कार्य म्हणजे, आपल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे.

खरंतर, एकविसावे शतक हे आपण विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे शतक असं मानतो आणि ते खरोखरच आहे. कारण, आज आपण आपल्या आजूबाजूला थोडंसं जरी डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, विज्ञानामुळे आपली प्रगती खूप जलद गतीने होत चाललेली आहे.

विज्ञानामुळे झालेले बदल

नवनवीन संकल्पना, प्रयोग, यंत्रे आणि तंत्रज्ञान हे सर्व बदल विज्ञानामुळेच तर होत आहेत. आपल्या समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा, रुढी आणि कटु परंपरा अजूनपर्यंत नांदत होत्या, त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत. आता आपण सर्वजण विज्ञानावर इतके अवलंबून आहोत की, आपल्याला पहाटे जरी लवकर उठायचे झाले तरी आपण लवकर उठण्यासाठी गजरचा म्हणजेच घड्याळाचा वापर करतो, म्हणजे हे सुद्धा एक विज्ञानाच्या प्रगतीचे छान उदाहरणच आहे.

आपल्या आयुष्यात वेळेला किती महत्त्व आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण, ही वेळ पाहण्यासाठी आपल्याला घड्याळाची आवश्यकता असते. म्हणजे, आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा मशीनमुळे योग्य वेळेत पूर्ण करतो. इसवी सन १९९९ पासून भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबविल्या जात आहेत.

यामुळे नवनवीन विषय, विज्ञानामधील चांगले तसेच वाईट अनुभव किंवा पुढील काही वर्षाचे नियोजन आपण आतापासून करू शकतो. शिवाय, पुढील काळात संभवणारा एखादा धोका, संकट किंवा होणारे नुकसान आपण टाळण्याचा प्रयत्न देखील करू शकतो.

इसवी सन १९९९ मध्ये विश्व बदलणे ही संकल्पना, २००४ मध्ये समुदायातील उत्साहवर्धक वैज्ञानिक जागृती ही संकल्पना तर, इसवी सन २०१३ मध्ये मॉडिफाईड पिके व अन्नसुरक्षा सुधारणा या संकल्पनेवर विशेष असा भर देण्यात आला होता. आताच्या आपल्या चालू वर्षामध्ये ‘खास विकलांग लोकांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाला अनेक ठिकाणी चांगले संभाषण, विविध संशोधने, शास्त्रज्ञांची चर्चासत्रे अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.

आतापर्यंत विज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानव जातीला, पशू – पक्ष्यांना तसेच संपूर्ण सृष्टीला देखील त्याचा चांगला फायदा झाला आहे. विज्ञानामुळे नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळाली त्यामुळे, अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आणि जीवन जगण्याचे, उदरनिर्वाह करण्याचे एक प्रगतीशिल साधन गरजू लोकांना प्राप्त झाले.

एकूणच काय तर विज्ञानामुळे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि व्यावहारिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये चांगला फायदा होत आहे. शिवाय, आपल्याला आताच्या काळात ज्या सुखसोई उपभोगायला मिळतात, त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळेच. आपण भविष्यात काय घडवू शकतो किंवा काय बदल करू शकतो, हे सुद्धा विज्ञानच ठरवू शकते.

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात जवळजवळ पंधरा ते वीस दिवस विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आणि इतर काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

शिवाय, विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असतात. त्यामुळे, सर्व विद्यार्थी या स्पर्धांमध्ये किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागाने यावर्षीपासून शिक्षण, कौशल्ये आणि कृती यांवर आधारित विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवप्रवर्तनाच्या अनुषंगाने साधावयाचा परिणाम ही संकल्पना जाहिर केली आहे.

कोविड-१९ च्या महामारीमुळे मराठी विज्ञान परिषदेने प्रथमच ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ निमित्ताने ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर आणि फेसबुकवर केले जाईल. इथं विज्ञानापुरता जरी विचार करायचा झाला तरी, सी. वी. रामण यांचं सारं आयुष्य, त्यांनी आपल्या देशासाठी मिळवलेला नोबेल सन्मान आणि त्यानंतरचं त्यांचं आयुष्य हे सारं अजब म्हणावं असंच आहे.

देश पारतंत्र्यात असताना, कोणत्याही प्रकारच्या साधन-सुविधा आणि दळणवळणाची साधने हाताशी नसताना केवळ बुद्धी, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर असिस्टंट अकौंटंट जनरल म्हणून नोकरी करत-करत भारतात राहूनच त्यांनी आपलं संशोधन पूर्ण केलं. इतकंच नाही तर नोबेल सन्मान मिळल्यानंतरही त्यांनी आपलं सारं आयुष्य भारतात राहूनच विज्ञान प्रसारासाठी व्यतीत केलं.

त्यामुळे, त्यांना न पटणाऱ्या अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या. शिवाय, संस्थात्मक कार्यातही अनेकांशी त्यांचे तीव्र मतभेद झाले. पण, त्यासाठी त्यांनी कधी असहिष्णुतेचा मुद्दा बनवला नाही आणि नाही आपल्याला मिळालेला पुरस्कार अहंकाराने त्यांनी परत केला.

उलट विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अभावामुळं आणि तशी संपर्क साधने नसल्यामुळे आपल्या देशातलं विज्ञान संशोधन पाश्चात्त्य जगाला कळलं पाहिजे यासाठी त्यांनी नियतकालिक सुरू केलं.

पण, आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे, ज्ञानाच्या मूलभूत संशोधनासाठी आणि त्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण तयार करण्यासाठी देशभरातून प्रयत्न करण्याची. त्यासाठी, आधी आपल्याला आपल्या शिक्षण व्यवस्थेत अभूतपूर्व बदल करावे लागतील. कारण, ‘काळ’ हे विज्ञानाचे एक परिमाण आहे! त्या बदलत्या काळाचे हेच खरे सांगणे आहे!

– तेजल तानाजी पाटील

बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या science day information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जागतिक विज्ञान दिवस बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या 28 february science day information in marathi  या article मध्ये update करू, मित्रांनो हि vidnyan din information in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information about national science day in marathi Share करायला विसरू  नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!