दुधापासून तयार होणारे पदार्थ Milk Products Information in Marathi

milk products informatttion in marathi दुधापासून तयार होणारे पदार्थ, दुध हे एक प्रकारचे पेय आहे ज्यामधून आपल्याला अनेक पौष्टिक घटक मिळतात आणि हे अनेकांचे लहानांपासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडणारे एक पेय आहे ज्यापासून अनेक आरोग्य फायदे होण्यास माग्डत होते जसे कि आपली आपली शक्ती वाढण्यास मदत होते तसेच हे पित्तहरक, वीर्यवर्धक आणि बलकारक असते आणि अश्या या भारतामध्ये अमृतासम मानल्या जाणाऱ्या दुधापासून अनेक वेगवेगळे पदार्थ किंवा उपउत्पादने बनवली जातात.

आणि आज आपण या लेखामध्ये काही सतत लोकांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या दुध उत्पादांच्या विषयी माहिती पाहणार आहोत. दुध हे जरी अनेकदा तसेच सेवन केले गेले असले तरी या दुधापासुना अनेक पदार्थ किंवा उत्पादने बनवली जातात.

आणि ती कोणकोणती असतात ते आपल्याला वेगळे सांगायची काही गरज नाही कारण आपल्या सर्वांना माहित आहे कि दुधापासून कोणकोणते पदार्थ तयार होतात आणि त्या दुधापासून तयार झालेल्या पदार्थापासून आणि इतर कोणते पदार्थ आपण बनवू शकतो.

milk products information in marathi
milk products information in marathi

दुधापासून तयार होणारे पदार्थ – Milk Products Information in Marathi

दुधापासून बनवले जाणारे पदार्थ किंवा उत्पादने – milk and milk products information in marathi

दुधापासून अनेक वेगवेगळे उत्पादने तयार केली जातात ज्यामधील काही २ ते ३ दिवस टिकतात तर काही १ किंवा २ महिने टिकतात. दही, तूप, ताक, चीज, बटर, पनीर, मिल्कपावडर असे अनेक पदार्थ बनवले जातात आणि या पदार्थांच्याविषयी खाली आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत म्हणजे ते कसे बनवले जातात आणि त्याचा वापर कश्यासाठी होतो.

दुधापासून तयार केली जाणारी उत्पादने – milk products list in marathi

दही

दही हे एक दुधापासून तयार करण्यात येणारे उत्पादन आहे जे आपण घरगुती रित्या देखील बनवू शकतो आणि हे मोठ्या प्रमाणात हे डेरी प्रक्रियेमध्ये देखील तयार केले जाऊ शकते आणि हे मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेले दही वेगवेगळ्या वजनाच्या एका सुंदर पॅकेजिंग मध्ये पॅक करून ते बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवले जाते.

दह्याचा वापर हा भारतीय पाककृतीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो जसे कि दह्याचा वापर हा अनेक रायते बनवण्यासाठी, ताक, कढी बनवण्यासाठी केला जातो त्याचबरोबर गोड पदार्थामध्ये श्रीखंड, आम्रखंड आणि फ्रुटखंड या सारखे पदार्थ बनवले जातात.

घरगुती पध्दतीने दही कसे बनवले जाते

घरगुती पध्दतीने दही बनवत असताना आपण ते २ प्रकारे बनवू शकतो जसे कि काही वेळा आपल्यालाकडे ताजे दही लावण्यासाठी पाहिलाचे दही शिल्लक नसते त्यावेळी कोमट दुधामध्ये लिंबूचा रस एक अर्धा चमचा घालून ते चांगल्या प्रकारे मिक्स केले जाते आणि त्यावर झाकण ठेऊन ते तसेच ठेवले जाते.

आणि असे केल्यामुळे घट्ट दही लागण्यास मदत होते. त्याचबरोबर काही वेळा दही लावण्यासाठी शिल्लक असलेले दही वापरले जाते म्हणजेच कोमट दुधामध्ये एक किंवा अर्धा चमचा दही घालून ते मिक्स केले जाते आणि त्यावर झाकण ठेऊन ते तसेच ५ ते ६ तास ठेवले जाते.

तूप

तूप देखील एक दुधापासून तयार झालेला पदार्थ आहे जो अनेक आरोग्य फायद्यासाठी महत्वाचा आहे. पूर्वी लोक असे म्हणत होते कि तुपाच्या सेवनामुळे आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर तुपामुळे रूप येते असे देखील म्हटले जाते.

म्हणजेच तूप खाल्यामुळे आपली कांती सुधारते तसेच त्वचा मऊ आणि तजेलदार बनण्यास मदत होते. तुपाचे उत्पादन हे अजूनही खेडेगावामध्ये स्त्रिया पारंपारिकपणे घेतले जाते तसेच डेरी प्रक्रियेमध्ये देखील तुपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि हे बाजारामध्ये विकले जाते.

तूप हे अनेक पदार्थामध्ये वापरले जाते जसे कि डिंकाचे लाडू, शिरा, बर्फी, वेगवेगळ्या प्रकारचा हलवा आणि इतर असे अनेक पदार्थ आहेत.

घरगुती पध्दतीने तूप काढण्याची पध्दत  

घरगुती पध्दतीने तूप काढण्याची एक लांब पध्दत आहे कारण यासाठी आठ ते दहा दिवसाची साय साठवून ते ढवळून त्याचे लोणी काढले जाते आणि त्याचा एकत्र गोळा बनवून तो स्वच्छ पाण्याने धुतला जातो आणि मग त्यामधून संपूर्ण पाणी काढून ते मध्यम आचेवर ठेऊन कडवले जाते.

आणि त्यामधील घाण निघून जाऊन त्याचे तूप बनते मग ते थंड झाल्यानंतर गळण्याने सोधले जाते आणि एका बरणीमध्ये घालून ठेवले जाते. तूप आपण १ ते २ महिने साठवून ठेवू शकतो किंवा त्यापेक्षा हि जास्त दिवस ठेऊ शकतो.

पनीर

पनीर या दुग्ध पदार्थाविषयी कोणाला माहित नाही असे नाही कारण पनीरचा वापर अनेक वेगवेगळय प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो आणि त्यामुळे सध्या पनीरला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्यामुळे पनीरचे उत्पादन हे डेरी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात केले जाते आणि मग ते बाजारामध्ये चांगल्या भावाला विकले जाते.

पनीर आपण घरी देखील बनवू शकतो परंतु आपण घरगुती बनवलेल्या पनीरच्या वड्य विकतच्या पनीरसारख्या पडत नाहीत. पनीर म्हटलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी येत आणि डोळ्यासमोर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पनीरपासून बनवलेल्या भाज्या आणि रेसिपीज येतात जसे कि पनीर मसाला, पनीर कुर्मा, पनीर अंगारा, पनीर टिक्का, पनीर पसंदा, पनीर कोफ्ता, पनीर हंडी मसाला, मटार पनीर इत्यादी.

घरगुती पध्दतीने पनीर कसे बनवले जाते

घरामध्ये पनीर बनवत असताना प्रथम एक चमचा लिंबू रस घ्या, तसेच अर्धा लिटर दुध गॅसवर उकलण्यासाठी ठेवा आणि जेंव्हा दुध उकळण्यास सुरुवात होईल त्यावेळी त्यामध्ये लिंबूचा रस घाला आणि ते मिक करा त्यावेळी दुध एकत्र होईल आणि पाणी बाजूला निघेल.

आता गॅस बंद करा आणि मग त्यामधील पाणी गाळा आणि परत त्यामध्ये थंड पाणी घालून तो गोळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या त्यामुळे लिंबूची चव त्यातून निघून जाईल.

आता तो गोळा एका चौकोनी बॉक्समध्ये घालून त्याचा आकार चौकोनी करून तो सेट होण्यासाठी ५ ते ६ तास ठेवा आणि मग त्यानंतर त्याच्या वड्य पाडा आणि मग तुम्ही त्याची कोणत्याही प्रकारची भाजी किंवा इतर पदार्थ बनवू शकता.

चीज

चीज देखील एक डेरी उत्पादन आहे म्हणजेच हे दुधापासून बनवले जाते आणि याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये घेतले जाते आणि हे वेगवेगळ्या कारानंच्यासाठी वापरले जाऊ शकते जसे कि पिझ्झा बनवण्यासाठी, पास्ता बनवण्यासाठी, सॅडविच मध्ये अश्या वेगवेगळ्या कारणांच्यासाठी हे वापरले जाते.

शक्यतो चीज हे डेरी पदार्थ मोठ्या प्रमाणात डेरी प्रक्रियेमध्ये बनवला जातो कारण या डेरी पदार्थाला देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि हा घरगुती पद्धतीने बनवला जात नाही.

बटर (लोणी)

दुधावर येणारी साय आठ ते दहा दिवस साठवून ती ढवळून त्याचे लोणी काढले जाते आणि त्याचा एकत्र गोळा बनवून तो स्वच्छ पाण्याने धुतला जातो आणि मग त्यामधून संपूर्ण पाणी काढून टाकले जाते आणि यालाबटर असे म्हणतात.

परंतु आपल्याला बाजारामध्ये मिळणारे बटर हे वेगळे वाटते परंतु ते प्रक्रियेतून काढलेले असते त्यामुळे आपल्याला घरामध्ये बनवलेल्या बटर ( लोणी ) मध्ये आणि बाजारातील बटर ( लोणी ) मध्ये फरक दिसून येतो.

मिल्क पावडर

मिल्क पावडर देखील एक दुधापासून बनवलेला पदार्थ आहे ज्याचा वापर अनेक वेगवेगळ्या कारानंच्यासाठी होतो आणि दुध पावडर हे एक औद्योगिक उत्पादन मानले जाते कारण याचे उत्पादन देखील डेरी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणत केले जाते आणि ते बाजारामध्ये विकले जाते.

आम्ही दिलेल्या milk products information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर दुधापासून तयार होणारे पदार्थ माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या milk products name in marathi या milk and milk products information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about milk products in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये milk products list in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!