मटर पनीर रेसिपी मराठी Matar Paneer Recipe in Marathi

Matar Paneer Recipe in Marathi मटर पनीर रेसिपी पनीर म्हटलं कि सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते कारण पनीर पासून बनवलेला पदार्थ खूप लोक आवडीने खातात. पनीर पासून आपण पनीर मसाला, पनीर टिक्का, पनीर कोफ्ता, पालक पनीर आणि पनीर बुर्जी यासारखे अनेक पदार्थ आपण बनवून खातो आणि यामधील एक चमचमीत आणि टेस्टी लागणारा पदार्थ म्हणजे मटर पनीर. आज आपण या लेखामध्ये मटर पनीर कसे बनवायचे ते पाहणार आहोत. मटर पनीर हि एक भारतीय डिश आहे जी भारतामध्ये सर्व ठिकाणी खूप आवडीने बनवली जाते आणि खाल्ली देखील जाते.

मटर पनीर हि रेसिपी लहान मुलांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडते. जर काही लोकांना हि रेसिपी इतकी आवडते कि ते हॉटेल मध्ये जेवायला गेले कि त्यांची मटर पनीरची ऑर्डर हि ठरलेली असते. परंतु मटर पनीर हि रेसिपी घरी बनवण्यासाठी देखील खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे हि रेसिपी २५ ते ३० मिनिटामध्ये बनू शकते. चला तर आता आपण चमचमीत आणि मसालेदार मटर पनीर रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

matar paneer recipe in marathi
matar paneer recipe in marathi

मटर पनीर रेसिपी मराठी – Matar Paneer Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

मटर पनीर रेसिपी कशी बनवतात ?

मटर पनीर बनवताना आपल्यला सर्वप्रथम ग्रेव्हीसाठी कांदा, टोमॅटो आणि काजू याची पेस्ट करून घेवून ती फोडणी टाकावी लागेल मग त्यामध्ये तेलामध्ये भाजलेले मटार आणि पनीर घालून ग्रेव्ही शिजवली जाते.

मटर पनीर रेसिपी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य ( key ingredients ) ( Mutter paneer recipe in marathi )

  • पनीर : पनीर हे मटर पनीर बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे. मटर पनीर बनवताना पनीर तेलामध्ये पनीर थोडे लालसर रंग येईपर्यंत भाजले जाते आणि मग ते ग्रेव्हीमध्ये घातले जाते.
  • मटार : मटर पनीर बनवताना मटार देखील महत्वाचे साहित्य आहे. यामध्ये आपण शक्यतो ताजे वाटाणे वापरण्याचा प्रयत्न करा. वटाणे देखील तेलामध्ये भाजून घेवून ग्रेविमध्ये घातले जातात.
  • कांदा, टोमॅटो आणि काजू : कांदा, टोमॅटो आणि काजू हे घटक वापरून पेस्ट बनवली जाते ज्याची ग्रेव्ही बनवली जाते.

मटर पनीर रेसिपी – mutter paneer recipe in marathi language

मटर पनीर रेसिपी हि एक भारतीय डिश आहे जी भारतामध्ये सर्व ठिकाणी बनवली जाते. हि रेसिपी बनवताना पनीर आणि वटाणे तेलामध्ये चांगले भाजून घेतले जातात आणि मग कांदा, टोमॅटो आणि काजू याची पेस्ट बनवून त्याची ग्रेव्ही बनवून त्यामध्ये भाजलेले मटार आणि पनीर घातले जाते. मटर पनीर हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि २५ ते ३० मिनिटामध्ये अगदी उत्तम रेसिपी बनते. चला तर आता आपण मटर पनीर रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

मटर पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make mutter paneer 

मटर पनीर बनवण्यासाठी लागणारे सर्वच साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते असे नाही आणि जे साहित्य लागते त्यामधी काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि काही साहित्य नसते ते आपल्याला बाजारातून आणावे लागते. चला तर आता आपण मटर पनीर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २५० ग्रॅम पनीर.
  • १ वाटी वाटाणे ( हिरवे आणि ताजे ).
  • १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला ).
  • टोमॅटो ( बारीक चिरलेले ).
  • अर्धी वाटी काजू.
  • १ तुकडा दालचिन.
  • १ बदम फुल.
  • १ वेलदोडा.
  • १ चमचा आले लसून पेस्ट.
  • १ गरम मसाला पावडर.
  • १/२ चमचा जिरे पावडर.
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • १/३ चमचा हळद.
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • कोथिंबीर

मटर पनीर बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make mutter paneer recipe 

मटर पनीर हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि अनेक लोकांची आवडती डिश आहे. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून मटर पनीर रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात

  • मटर पनीर बनवताना सर्व प्रथम टोमॅटो, कांदा चिरून घ्या आणि तो बाजूला ठेवा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवा आणि त्यामध्ये २ चमचे तेल घाला आणि मग प्रथम पनीर तेलामध्ये चांगले लालसर रंग येई पर्यंत भाजून घ्या. पनीर चांगले भाजले कि ते बाजूला काढून ठेवा.
  • आता पॅन मध्ये परत १ चमचा तेल घाला आणि त्यामध्ये मटार घालून ते देखील चांगले भाजू घ्या आणि मग ते भाजले कि बाजूला काढा.
  • काजू देखील लालसर रंग येई पर्यंत भाजून घ्या.
  • आता त्यामध्ये परत १ चमचा तेला घाला आणि मग त्यामध्ये चिरलेला कांदा घाला आणि तो लासर रंग येईपर्यंत भाजून घ्या मग त्यामध्ये वेलदोडा, बदाम फुल आणि दालचिन घाला आणि ते मसाले कांद्याबरोबर काही वेळ भाजा मग त्यामध्ये टोमॅटो घाला आणि टोमॅटो देखी ५ ते ६ मिनिटे भाजून घ्या.
  • आता यामध्ये भाजलेले काजू घाला आणि ते थोडा वेळ भाजा आणि मग गॅस बंद करा आणि ते मिश्रण थोडे गार होऊ द्या.
  • ते गार झाले कि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची बारीक पेस्ट बनवा.
  • आता परत गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये ३ चमचे तेल घाला तेल गरम झाले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट घाला आणि ती सेकंदासाठी तेलामध्ये परता मग त्यामध्ये आपण बनवून ठेवलेला मसाला घाला आणि तो तेलामध्ये चांगला भाजा आणि त्यामध्ये लगेच गरम मसाला पावडर, लाल मिरची पावडर, जिरे पावडर, हळद घाला आणि मिक्स करा आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घाला.
  • मग त्यामध्ये भाजलेले वटाणे आणि पनीर त्याचबरोबर चवीनुसार मीठ घाला आणि ते सर्व मिक्स करा. आणि त्यावर झाकण लावून ते ५ ते ६ मिनिटे शिजवा.
  • आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि गॅस बंद करा.
  • मटर पनीर सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.

मटर पनीर कश्यासोबत खातात – serving suggestions 

  • मटर पनीर हि रेसिपी आपण रोटी, चपाती, नान, पुलके, जीरा राईस किंवा पांढऱ्या साध्या भातासोबत देखील खावू शकतो.

टिप्स (Tips) 

  • मटर पनीर मध्ये आपण गरम मसाला ऐवजी खडे मसाले भाजून त्याची पावडर बनवून घातली तरी चालते.
  • यामध्ये चवीसाठी साखर देखील घातली तरी चालते.

आम्ही दिलेल्या matar paneer recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मटर पनीर रेसिपी मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या paneer mutter masala recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mutter paneer recipe in marathi by madhura माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये matar paneer recipe in marathi madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!