मिताली राज मराठी माहिती Mithali Raj Biography in Marathi

Mithali Raj Biography in Marathi – Mithali Raj Information in Marathi Language मिताली राज मराठी माहिती मित्रांनो कुठे तो काळ जिथे स्त्रियांना घरातून बाहेर पडणे देखील अवघड होतं आणि आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करत आहेत. मग ते स्वयंपाक घर असो किंवा क्रिकेटचे मैदान प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आपले कलागुण दाखवत आहे. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका भारतीय स्त्रीरत्ना विषयी माहिती जाणून घेणार आहोत. मिताली राज ही एक भारतीय महिला क्रिकेटर आहे जि‌ने क्रिकेट विश्वामध्ये उत्कृष्ट खेळाने सर्वांचे मन जिंकून घेतल आहे.

क्रिकेट खेळामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, एक दिवसीय कसोटी सामने, ट्वेंटी-ट्वेंटी फटक्यांच्या सामन्यांमध्ये मिताली राज यांचा सहभाग असतो. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार, उत्कृष्ट खेळाडू म्हणून मिताली राज प्रसिद्ध आहे.

mithali raj biography in marathi
mithali raj biography in marathi

मिताली राज मराठी माहिती – Mithali Raj Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)मिताली दोराई राज
जन्म (Birthday)३ डिसेंबर १९८२
जन्म गाव (Birth Place)राजस्थान येथील जोधपुर
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

जन्म व वैयक्तिक आयुष्य

संपूर्ण नाव मिताली दोराई राज. भारताच्या राजस्थान येथील जोधपुर शहरात मिताली राज यांचा ३ डिसेंबर १९८२ रोजी जन्म झाला. मितालीचा जन्म जरी जोधपूर येथे झाला असला तरी तिचं मूळ गाव सिकंदराबाद आहे. मितालीचे वडील एक भारतीय हवाई अधिकारी आहेत तर तिची आई गृहिणी आहे. मितालीला एक मोठा भाऊ देखील आहे. मितालीने तिचे शालेय शिक्षण किज हायस्कूल फॉर गर्ल्स, सिकंदराबाद येथून पूर्ण केले आहे.

सिकंदराबाद मधील पश्चिम मरेडपल्ली इथल्या कस्तुरबा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातून मिताली राज हिने आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं मितालीने इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षण घेतल आहे लहानपणापासून मितालीला डान्सची खूप आवड होती. अगदी वयाच्या दहाव्या वर्षापासून ती भरतनाट्यम शिकली. भरत नाट्यम शिकत असतानाच मिताली क्रिकेट देखील खेळत होती.

परंतु करियर ऑप्शन म्हणून जेव्हा दोघांपैकी एक गोष्ट निवडण्याची वेळ आली तेव्हा भरत नाट्यम नर्तिका होण्याचं स्वप्न बाळगणारी मिताली राज हिने क्रिकेटला पहिली मान्यता दिली. मितालीला भरतनाट्यम इतक आवडायचं की तिने बऱ्याच मुलाखतीतून सांगितल आहे की, जर मी क्रिकेटर नसते तर नक्कीच भरतनाट्यम नर्तिका झाले असते.

क्रिकेट क्षेत्रात पदार्पण

मिताली राज ही भारतीय क्रिकेट संघातील एक उत्कृष्ट खेळाडू मानली जाते त्या सोबतच ती भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार देखील आहे. सुरुवातीला मितालीला भरतनाट्यमची फार आवड होती तिने काही वर्ष भरतनाट्यम देखील शिकलं परंतु वयाच्या दहाव्या वर्षापासून तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि तिला क्रिकेटमध्ये अधिक आवड निर्माण झाली आणि करिअर ऑप्शन म्हणून तिने क्रिकेट क्षेत्र निवडलं.

मितालीने हे क्षेत्र निवडताना तिच्या आई-वडिलांचा सल्ला घेतला आणि तिच्या आई वडिलांनी देखील तिला भरपूर प्रोत्साहित केलं. हैदराबाद येथे राहत असताना मिताली तिच्या मोठ्या भावासोबत त्याच्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षण घ्यायची. आपल्या भावासोबत ती क्रिकेटचा सराव करायची. किज गर्ल्स हायस्कूलमध्ये असताना मितालीने शाळेच्या मैदानातील नेटवर बराच वेळा क्रिकेटचा सराव केला आहे.

वयाच्या दहाव्या वर्षी मितालीने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि बघता बघता तिला भारतीय क्रिकेट संघात समाविष्ट करून घेण्यात आलं. मिताली १४ वर्षाची असताना म्हणजेच इसवी सन १९९७ मध्ये मिताली महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाली परंतु अंतिम संघांमध्ये तिला स्थान मिळू शकले नाही.

१९९९ मध्ये मिल्टन केन्स मध्ये झालेल्या आयर्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यांमध्ये मिताली राज हिने ११४ धावांची नाबाद खेळी खेळली होती या सामन्याच्या माध्यमातून मिताली राज हिने २६ जून १९९९ रोजी वनडे सामन्यांमध्ये पदार्पण केलं. मितालीने तिच्या आयुष्यातील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना २००१ ते २००२ च्या हंगामात खेळला ज्यामध्ये तिने १७ ऑगस्ट २००२ रोजी तिसऱ्या कसोटी सामन्यात कॅरेन रोल टन यांचा जगातील सर्वात सर्वोच्च कसोटी स्कोर २०९ चा विक्रम मोडला.

त्यावेळी मिताली फक्त एकोणीस वर्षाची होती. इंग्लंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या अंतिम कसोटी सामन्यांमध्ये मितालीने सर्वोच्च धावा करून २१४ धावांचा नवीन विक्रम तयार केला. मिताली राज हिने २००६ मध्ये भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटी आणि मालिकेत विजय मिळवून दिला अतिशय परिश्रम मेहनत करून मितालीने बारा महिन्यातून दुसऱ्यांदा आशिया कप जिंकला.

मिताली चे क्रिकेट क्षेत्रात असणारे कौशल्य हे उत्कृष्ट आहेत जे तिला एक उत्तम खेळाडू बनवतात. मितालीची खेळण्याची शैली सर्वांनाच आवडीची आहे म्हणून ती भारत महिला क्रिकेट संघाची कर्णधार देखील आहे. २०१३ साली मिताली राज महिला विश्वचषकात महिलांमध्ये वन डे चार्ट मध्ये क्रमांक एक वर असणारी क्रमांक एक क्रिकेटर होती.

फेब्रुवारी २०१७ मध्ये WODI मध्ये ५५०० धावा करणारी मिताली राज दुसरी खेळाडू ठरली आहे. २०१८ च्या आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धांमध्ये मितालीने स्थान मिळवलं. सप्टेंबर २०१९ मध्ये मिताली राज हिने t-२० सामन्या मधून निवृत्ती स्वीकारली. २००६ पासून मिताली राज t-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

त्यामुळे २०२१ च्या येणाऱ्या वन डे वर्ल्ड कप साठी ती स्वतःला तयार करत आहे असं सांगून तिने t-२० मधून निवृत्ती स्वीकारली. मिताली राज हिने आतापर्यंत दहा जागतिक चाचणी सामने खेळले आहेत ज्यामध्ये तिने ६६३ धावसंख्या सोबत एक शतक आणि चार अर्धशतके केली आहेत. या सामन्यांमध्ये तिने २१४ अशा सर्वोच्च धावा केल्या आहेत.

जागतिक चाचण्यांमध्ये खेळताना तिची फलंदाजीची सरासरी ५१.०० इतकी असते. मितालीने १८४ वनडे सामने खेळले आहेत. वनडे सामन्यांमध्ये मितालीची एकूण धावसंख्या ६१३७ इतकी आहे वनडे सामन्यांमध्ये मितालीची फलंदाजीची सरासरी ५२.०० इतकी आहे. वनडे सामन्यांमध्ये सहा शतके आणि ४९ अर्धशतक अशी उत्कृष्ट खेळी मितालीने खेळली आहे. वन डे सामन्यांमध्ये आतापर्यंत ११४ सर्वधिक धावा केल्या आहेत. ६३ टी-२० सामने मितालीने खेळले आहेत.

टी-२० सामन्यांमध्ये मितालीची एकूण धावसंख्या १७०८ इतकी आहे. टी ट्वेंटी सामन्यांमध्ये मितालीची फलंदाजीची सरासरी ३७.९५ इतकी आहे. t-२० सामन्यांमध्ये १० अर्धशतक ७३ सर्वोच्च स्कोर केला आहे. मिताली ही भारतातील सर्वाधिक कमाई करणारी महिला क्रिकेटर आहे. मिताली राज यांची ओळख भारतातील एक सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून केली जाते.

मिताली राज हिची निवड मे २०२१ मध्ये महिला इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध त्यांच्या एकहाती सामन्यांसाठी भारताच्या कसोटी संघाची कर्णधार म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. मिताली राज हिने सलग सात वेळा अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. मिताली एक महत्वकांशी, उत्तम, चिकट सराव करणारी, अतिशय कठोर परिश्रम घेणारी खेळाडू आहे.

तिने तिच्या अथक परिश्रमानंतर इतकं यश प्राप्त केल‌ आहे मितालीचे अनेक चाहते आहेत. मिताली राज हिने क्रिकेट विश्वामध्ये वेगवेगळे विक्रम केले आहेत ज्यामुळे तिला महिला सचिन तेंडुलकर असे देखील संबोधले जात. क्रिकेट विश्वामध्ये मितालीच नाव सातत्याने वर येत आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे तिची खेळण्याची शैली.

मिताली खेळताना संयम व स्थिर असते. मितालीने जे यश मिळवलं आहे. त्याचं संपूर्ण श्रेय ती आपल्या वडिलांना देते तिच्या वडिलांना असं नेहमी वाटायचं की मितालीने भारतीय संघामध्ये खेळावं. मितालीने बऱ्याच कठीण प्रसंगांवर मात करत इथपर्यंतचा प्रवास केला आहे तिने ज्यावेळी क्रिकेटर म्हणून करिअर ऑप्शन निवडला त्यावेळी बऱ्याच लोकांना माहित देखील नव्हते की महिला क्रिकेट सामने देखील होतात.

अशा वेळीही तिने न हार मानता सातत्याने सराव केला. या प्रवासात तिच्या आईवडिलांनी तिला फार प्रोत्साहित केलं. मिताली एक उत्कृष्ट कर्णधार देखील आहे आपल्या संघाला योग्य ते उपदेश देऊन त्यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरी करून घेण्याचं काम मिताली आजवर करत आली आहे.

पुरस्कार

मिताली राज‌ हि‌ भारतातील एक सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेट खेळाडू मानली जाते. तिच्या खेळाची दखल भारत सरकारने देखील घेतली आणि मिताली राज हिला भारत सरकार तर्फे वेगवेगळे उत्कृष्ट पुरस्कार देखील जाहीर झाले. भारतातील सर्वोच्च पुरस्कार पैकी एक मानला जाणारा “पद्मश्री पुरस्कार” मिताली राज हिला २०१५ मध्ये प्रदान करण्यात आला.

२००३ मध्ये मिताली राज “अर्जुन पुरस्काराची” मानकरी ठरली. २०१७ मध्ये युथ स्पोर्ट्स आयकॉन ऑफ एक्सलन्स अवार्ड मितालीने पटकावला. मिताली राज हिने २०१७ मध्ये वोग स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळवला. २०१७ मध्ये मितालीला बीबीसी १०० महिला पुरस्कार मिळाला.

विस्डेन जगातील आघाडीची महिला क्रिकेटपटू म्हणून मिताली राजच‌ २०१७ मध्ये पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आलं. २०२१ मध्ये मितालीला “खेलरत्न पुरस्कार” जाहीर करण्यात आला. मिताली राज ही महिला क्रिकेट क्षेत्रात इच्छीत असणाऱ्या तरुणींसाठी एक नवीन आदर्श आहे.

आम्ही दिलेल्या mithali raj biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मिताली राज मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Mithali Raj Information in Marathi Language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Mithali Raj in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information about mithali raj in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!