म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी Mutual Fund Information in Marathi

Mutual Fund Information in Marathi – Mutual Funds Meaning in Marathi म्युच्युअल फंड मराठी माहिती म्युच्युअल फंड म्हणजे काय ? सध्याच्या काळामध्ये लोक आपले पैसे कोणत्यातरी मार्गे गुंतवून ठेवण्यामध्ये भर देतात आणि सध्या चर्चेत असलेला एक गुंतवणुकीचा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड (mutual fund). सध्या म्युच्युअल फंड हा सतत कानावर पडत असलेला प्रश्न आहे कारण या बद्दल आपल्याला टी व्ही वर, रेडीओ किंवा वृत्तपत्रामध्ये सतत जाहिरात ऐकायला किंवा पाहायला मिळते आणि म्युच्युअल फंड हा आजकाल सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे.

जरी हा शब्द आपल्या ओळखीचा असला तरी कित्येक लोकांना म्युच्युअल फंड (mutual fund) या बद्दल संपूर्ण माहिती नाही म्हणून आज या लेखामध्ये म्युच्युअल फंड या विषयावर माहिती घेणार आहोत.

mutual fund information in marathi
mutual fund information in marathi

म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी – Mutual Funds Information in Marathi

म्युच्युअल फंड म्हणजे काय – What is Mutual Fund in Marathi

 • अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हंटले तर म्युच्युअल फंड म्हणजे अनेक लोक एकत्र आपले पैसे एका चांगल्या आणि सर्वाधिक परतावा देणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवतात आणि हि कंपनी त्यांचा पैसा अश्या ठिकाणी गुंतवते ज्यामुळे त्यांना चांगला फायदा मिळू शकेल.
 • म्युच्युअल फंड हा एक प्रकारचा आर्थिक मार्ग आहे ज्यामध्ये अनेक गुंतवणूक दारांकडून स्टॉक, बॉण्ड्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स आणि इतर मालमत्तां यामधून गुंतवणुकीसाठी पैसे जमा केलेले असतात जे व्यावसायिक मनी मॅनेजरद्वारे चालवले जातात आणि फंडाच्या गुंतवणूकदारांसाठी भांडवली नफा किंवा उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात.

मुख्य उद्देश – Mutual Funds Scheme in Marathi

म्युच्युअल फंडचा मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणूक दारांच्या कडून पैसे जमा करणे आणि तोच गुंतवणूक दारांच्या कडून मिळालेला फंडचा वापर इतर शेअर्स, सेक्युरीटीज किंवा बॉन्ड्स खरेदी करण्यासाठी करतात.

म्युच्युअल फंडचे प्रकार 

म्युच्युअल फंडचे तीन भागामध्ये वाटप केलेले आहे. ते म्हणजे इक्विटी फंड, डेब्ट फंड आणि बॅलन्स्ड म्युच्युअल फंड. त्यामुळे म्युच्युअल फंड योजनेद्वारे गृहीत धरलेली जोखीम आणि परतावा हा त्याच्या प्रकारावर अवलंबून असतो. म्युच्युअल फंडचे (mutual fund) तीन प्रकार खाली सविस्तर दिले आहेत.

इक्विटी फंड – Equity Fund Meaning in Marathi

इक्विटी फंड मध्ये गुंतवणूक करणारे लोक हे दीर्घ काळासाठी गुंतवणूक करतात कारण त्यांना या दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला नफा किंवा रिटर्न्स मिळण्यास मदत होते. या स्कीममध्ये आपले पैसे सरळ शेअर मार्केट मध्ये गुंतवले जातात. इक्विटी फंडांद्वारे मिळालेले रिटर्न्स बाजाराच्या हालचालींवर अवलंबून असतो, ज्यावर अनेक भौगोलिक आणि आर्थिक घटकांचा प्रभाव असतो.

डेब्ट फंड – Debt Fund Meaning in Marathi

डेब्ट फंड हा देखील एक गुंतवणूक करण्यासाठी चांगला मार्ग आहे कारण या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये कमी प्रमाणात धोका असतो आणि या फंडामुळे गुंतवणूकदाराला निश्चित उत्पन्न मिळवून देण्यास मदत करतो. या फंडामध्ये गुंतवणूकदार सरकारी कंपन्या, सरकारी बॉन्ड, ट्रेझरी बिले, मनी मार्केट, डीबेंचर किवा इतर निश्चित केलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. डेब्ट फंड हे जोखीम स्वीकारू शकत नसलेल्या गुंतवणूकदारांसाठी आदर्श आहेत कारण डेब्ट फंडांच्या हालचालीवर बाजारातील चढउतारांचा फारसा प्रभाव पडत नाही.

बॅलन्स्ड म्युच्युअल फंड 

बॅलन्स्ड म्युच्युअल फंड याला हायब्रीड म्युच्युअल फंड या नावाने देखील ओळखले जाते. बॅलन्स्ड म्युच्युअल फंड हे इक्विटी फंड आणि डेब्ट फंडचे मिश्रण असते म्हणजे गुंतवणूक दार इक्विटी फंड आणि डेब्ट फंड या दोन्ही मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करतात.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करावी – Mutual Funds Investment Information in Marathi

 • म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळू शकतो तसेच गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.
 • लोकांनी गुंतवलेला निधी हा निधी हुशार व्यवस्थापकाद्वारे हाताळला जातो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या गुंतवणुकी विषयी कोणतीही काळजी घ्यावी लागत नाही तसेच ते सर्वोत्तम कामगिरी करणारे स्टॉक्स आणि मालमत्ता निवडतात ज्यात दीर्घकाळासाठी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा देण्याची क्षमता असते.
 • म्युच्युअल फंडात गुंतवणुक करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही नियमितपणे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन द्वारे थोड्या प्रमाणात गुंतवणूक करू शकता आणि हि गुंतवणूक मासिक, मासिक किंवा द्वि-वार्षिक असू शकते.
 • विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून व्यक्ती त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवू शकतात ज्यामुळे त्यांचे पैसे देखी सुरक्षित राहतील आणि त्यांना त्यांच्या पैश्याचा चांगला परतावा देखील मिळेल.
 • म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूक दारांना बाजारातील अस्थिरतेबद्दल काळजी करण्याची गरज नसते कारण त्यांची गुंतवणूक वेगेवगळ्या ठिकाणी केलेली असते.
 • म्युच्युअल फंडमध्ये लहान स्वरुपात गुंतवणूक करता येते त्यामुळे ते लहान गुंतवणूकदारांसाठी योग्य ठरू शकते.
 • म्युच्युअल फंड अनेक कंपन्यांच्या मालमत्ता वर्ग आणि समभागांमध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे तुम्हाला विविधीकरणाचा लाभ मिळण्यास मदत होते आणि एका ठिकाणी गुंतवणूक करून होणारा धोका कमी करते.
 • म्युच्युअल फंड लॉक-इन कालावधीशिवाय गुंतवलेले असल्यामुळे गुंतवणूकदारांना आर्थिक संकटाच्या वेळी त्यांच्या म्युच्युअल फंड गुंतवणूक कमी येवू शकते.
 • म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे ही तुलनेने सोपी प्रक्रिया आहे.
 • जर गुंतवणूक दारांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर कर बचतीसाठी मदत होते.

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे मार्ग – Mutual Fund Details in Marathi

थेट गुंतवणूक

जर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये थेट गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या म्युच्युअल फंड कंपनीच्या शाखेत जाऊन रीतसर भरलेला फॉर्म जमा करू शकता किंवा ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि यालाच म्युच्युअल फंड मधील थेट गुंतवणूक म्हणतात तसेच बँकेकडे चेक सुपूर्द करण्यापूर्वी दस्तऐवज काळजीपूर्वक वाचले पाहिजेत.

डीमॅट खाते वापरून 

paytm money information in marathi
paytm money information in marathi

जर तुम्हाला म्युच्युअलफडामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमचे डीमॅट खाते असेल तर ते खाते वापरून किंवा बँक खाते म्युच्युअल फंडात गुंतवणूक आणि व्यवहार करण्यासाठी वापरले जावू शकते तसेच गुंतवणुकीसाठी, तुम्हाला तुमच्या डीमॅट खात्यात लॉग-इन करावे लागेल आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय शोधावा लागेल.

मग त्यानंतर तुम्हाला कोणत्या फंडामध्ये गुंतवणूक करायची आहे ते निवडणे आवश्यक आहे मग त्यानंतर मग रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करून गुंतवणूक पूर्ण करावी लागेल. हि संपूर्ण प्रक्रिय ऑनलाइनकरावी लागते.

म्युच्युअल फंड एजंट 

म्युच्युअल फंड एजंटद्वारे देखील म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली जावू शकते. पण हि पध्दतीचा अवलंब करताना यामध्ये खूप वेळ जातो आणि हि पध्दत खूप खर्चिक देखील असते. एजंट तुम्हाला आवश्यक फॉर्म निवडण्यात आणि भरण्यात मदत करण्यासाठी तुम्ही एजंटला कॉल करू शकता.

आजच्या इंटरनेटच्या जगामध्ये एजंट डिजिटल उपकरणांसह येतात जे तुम्हाला डिजिटल पद्धतीने फॉर्म भरण्यात आणि तुमचे खाते त्वरित सक्रिय करण्यात मदत करतात.

ऑनलाइन म्युच्युअल फंड गुंतवणूक प्लॅटफॉर्म 

ऑनलाइन गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल फोन आणि इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे आणि ऑनलाइन म्युच्युअल फंड निवडण्यात तुम्हाला मदत करणारे अनेक प्लॅटफॉर्म आहेत.

म्युच्युअल फंड साठी ऑनलाईन गुंतवणूक करण्याचे मार्ग

आता गुंतवणूक करणे झाले अगदी सोपे खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपले खाते उघडा आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा. 

paytm money information in marathi
paytm money information in marathi

आत्ताच्या मॉडर्ण काळामध्ये सर्वकाही ऑनलाईन करतो तसेच आपण म्युच्युअल फंडची (mutual fund) गुंतवणूक आपण ऑनलाईन करू शकतो आणि हि गुंतवणूक अॅपद्वारे किंवा वेबसाईट द्वारे करू शकतो. म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणारे अॅप आणि मार्ग इटी मनी (ET money), पेटीयम मनी (paytm money), ग्रो (groww) यासारखे अनेक मार्ग उपलाब आहेत.

आम्ही दिलेल्या mutual funds information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mutual funds india information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि what is mutual fund in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mutual funds meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी Mutual Fund Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!