माझा वाढदिवस निबंध मराठी My Birthday Essay in Marathi

My Birthday Essay in Marathi माझा वाढदिवस निबंध मराठी वर्षातून एकदा प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस हा त्याच्या जन्म तारखे दिवशी साजरा केला जातो. वाढदिवस म्हणजे आपण जन्मलेला दिवस आणि हा दिवस आपण सर्वच जन चांगला आणि आनंदात घालवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सध्या तरी वाढदिवसाचा इतका ट्रेंड आला आहे, कि आपला वाढदिवस आहे हे समजताच आपल्याला दिवसभर फोन करून, मॅसेज करून किंवा प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या जातात आणि हा शुभेच्छांचा वर्षाव हा सकाळपासून रात्रीपर्यंत चालूच असतो तसेच आपले कुटुंबातील किंवा आपले जवळचे मित्र मैत्रिणी आपल्यालासाठी बर्थडे सरप्राईज ठेवतात.

आपल्यासाठी केक आणतात आणि काही गिफ्ट देखील देतात तसेच त्यादिवशी सर्वजन ज्याचा वाढदिवस आहे त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात तसेच काही जन त्यांचा वाढदिवस असला कि प्रथम देवाचे दर्शन घेवून देवाकडे त्यांच्या पुढील चांगल्या आयुष्यासाठी आशीर्वाद मागतात आणि अश्या वेगवेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा करतात. आता आपण माझा वाढदिवस या विषयावर निबंध लिहणार आहोत.

my birthday essay in marathi
my birthday essay in marathi

माझा वाढदिवस निबंध मराठी – My Birthday Essay in Marathi

Maza Vadhdivas Essay in Marathi

पूर्वी भारतामध्ये मोठ मोठ्या र्ज्यांचा तसेच राज्यांच्या मुलांचा किंवा मुलींचा जन्मदिवस मोठ्या थाटामाटामध्ये साजरे केले जायचे त्यादिवशी सर्व प्रजेला मिठाई वाटली जायची तसेच अन्नदान करून प्रजेचे आशीर्वाद घेतले जायचे. परंतु आजच्या जगामध्ये सगळ्यांचे वाढदिवस साजरे केले जातात आणि ज्याचा वाढदिवस आहे त्याला त्या दिवशी त्याच्या कुटुंबा कडून आणि मित्र – मैत्रिणींच्या काढून स्पेशियल ट्रीटमेंट असते म्हणजेच त्या व्यक्तीला त्या दिवशी जेवढे होईल तेवढे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

तसेच माझा वाढदिवस देखील २६ जानेवारीला माझा वाढदिवस असतो आणि माझ्या वाढदिवसा दिवशी मला दिवसभर फोन करून, मॅसेज करून किंवा प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या जातात आणि हा शुभेच्छांचा वर्षाव हा सकाळपासून रात्रीपर्यंत चालूच असतो तसेच माझ्या कुटुंबातील किंवा माझे जवळचे मित्र मैत्रिणी आपल्यालासाठी बर्थडे सरप्राईज ठेवतात.

आपल्यासाठी केक आणतात आणि काही गिफ्ट देखील देतात. मी माझ्या वाढदिवसादिवशी खूप आनंदी राहणायचा प्रयत्न करते वाढ दिवसाच्यादिवशी सकाळी उठून अंघोळ करून नवीन कपडे घालून देवाची पूजा करते तसेच देवाकडे माझ्या चांगल्या आयुष्याची प्रार्थना करते मग त्यानंतर ज्यांनी मला मॅसेज करून शुभेच्छा दिल्या आहे, त्यांचे धन्यवाद मानत.

ज्यावेळी मी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये होते त्यावेळी आम्हाला शाळेचा युनीफॉर्म होता पण आमचे इथे शाळेमध्ये माझे मित्र – मैत्रिणी वाढदिवस असला कि शाळेचा युनीफॉर्म घालत नव्हते ते नवीन कलरफुल ड्रेस घालत होते आणि मी देखील माझ्या वाढदिवसा दिवशी नवीन कपडे घालून जात होते आणि युनीफॉर्म घालण्या ऐवजी जर आम्ही नवीन कपडे घातले असले तर सर्वांना समजत होते कि आज माझा वाढदिवस आहे.

तसेच मी शाळेमध्ये जाताना माझ्या वर्गातील मित्र – मैत्रिणींच्यासाठी आणि शिक्षकांच्यासाठी मिठाई आणि गोळ्या चॉकलेट घेवून जाणार आणि वर्गामध्ये सर्व मित्र – मैत्रीणीना वाटणार आणि मग सर्वजण मला शुभेच्छा देणार. तसेच मिठाई सर्व शिक्षकांना देखील देणार आणि त्यांचे देखील आशीर्वाद वाढदिवसादिवशी घेणार आणि हा दिवस शाळेमध्ये खूप मजेमध्ये घालवून मग मी घरी येणार.

घरी येताच बघतो तर काय माझ्या आईने आणि माझ्या बाबांनी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी तयारी सुरु केलेली असायची बाबांनी मला नवीन कपडे आणलेली असायची आणि माझ्या आईला घरी केक बनवता येत असल्यामुळे तिने घरी केक बनवून ठेवलेला असायचा तसेच फुगे लावून वाढदिवसाठी सजावट केलेली असायची.

मग मी स्वच्छ हातपाय धुवून नवीन कपडे परिधान करून आवरून माझ्या घराजवळील माझ्या सर्व मित्र मैत्रीणीना वाढदिवसासाठी बोलवून आणत होते त्यावेळेमध्ये माझ्या आईने टेबलवर केक ठेवून टेबल भोवती रांगोळी काढून सजावट करून ठेवलेली असायची. घराजवळील सगळे मित्र मैत्रिणी जमले कि मी केक कट करून तो केक आणि काही तरी खायला माझ्या सर्व मित्र मैत्रीणीना वाटले जायचे. तसेच घराजवळी माझे काही जवळचे मित्र – मैत्रीण माझ्यासाठी काही गिफ्ट देखील आणत होते.

पण आता माझा वाढदिवस थोड्या वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. मी माझ्या वाढदिवसादिवशी सकाळी उठून अंघोळ करू नवीन कपडे घालून देवाची पूजा करून प्रथम देवाचे आशीर्वाद घेतो मग नंतर आई – वडिलांचे आशीर्वाद घेतो आणि त्याचवेळी ते मला विष करतात आणि माझ्या चांगल्या आयुष्यासाठी चांगले आशीर्वाद देतात.

तसेच मी माझ्या वाढदिवसादिवशी आमच्या गावामध्ये असणाऱ्या मंदिरामध्ये देखील जावून येते. तसेच वाढदिवसादिवशी शुभेच्छांचा वर्षाव तर सकाळ पासूनच चालू होतो. माझे काही जवळचे नातेवाईक आणि जवळचे मित्र मैत्रिणी मला फोन करून शुभेच्छा देतात. तसेच काहीजन मला मॅसेज करून किंवा प्रत्यक्ष भेटून देखील शुभेच्छा देतात.

माझा २६ जानेवारीला झालेला वाढदिवस हा माझ्या मनासारखा झाला कारण मला माझ्या कुटुंबाने आणि माझ्या काही जवळच्या मित्र – मैत्रिणीनी माझा वाढदिवस हा हॉटेल मध्ये साजरा करण्याचे प्लॅन केला तेथे वाढदिवसाची सजावट केली तसेच माझ्या कुटुंबाने काही लोकांचे जेवण देखील हॉटेलमध्ये ठेवले आणि मला आवडणारा चॉकलेट केक आणला मी तो कट केला.

तसेच मला माझ्या कुटुंबाने आणि माझ्या जवळच्या मित्र – मैत्रिणींना मला गिफ्ट दिले तसेच आम्ही तेथे वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळलो आणि तो क्षण मी माझ्या कुटुंबा सोबत आणि माझ्या मित्र मैत्रिणींच्या सोबत खूप आनंदामध्ये घालवला. अश्या प्रकारे दर वर्षी काही ना काही वेगळ्या पध्दतीने माझा वाढदिवस साजरा केला जातो आणि एका वाढदिवसाला माझ्या आईने मला विश केले नव्हते त्यावेळी मला खूप वाईट वाटत होते.

पण तिच्या लक्षात येताच तिने केक बनवण्याऐवजी तिने माझ्या आवडत्या काही रेसिपी बनवलुया आणि मला पंच्पाक्वनाचे ताट बनवून एक पाठ ठेवला पाठासमोर ताट ठेवले आणि त्या भोवती रांगोळी काढून तिथे बाजूला एक समयी ठेवली आणि माझे औक्षण केले आणि मला पंचपक्वान करून माझे मन अगदी आनंदी केले.

तसेच माझ्या २ ते ३ वाढदिवसांना माझ्या मित्र – मैत्रिणींनी माझ्या घरी केक घेवून येवून मला सरप्राईज दिले होते त्याचबरोबर माझ्यासाठी काही गिफ्ट आणली होती आणि त्यावेळी माझा आनंद गगनात मावत नव्हता कारण असे मित्र – मैत्रिणी लाभायला खूप नशीब लागते. मी माझ्या वाढदिवसाचा दिवस हा सर्वांना धन्यवाद म्हण्यात घालवतो.

कारण त्या दिवशी माझे जवळचे नातेवाईक, कुटुंबातील सर्वजन, जवळचे मित्र –मैत्रिणी, ओळखीचे सर्वजन आठवणीने आणि अगदी कौतुकाने मला फोन करून किंवा मॅसेज करून शुभेच्छा देतात आणि पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी आशीर्वाद देतात आणि काही लोकांचे मॅसेज तर इतके सुंदर असतात कि ते वाचून मन अगदी भारावून जाते आणि स्पेशियल फील येतो.

अश्या प्रकारे दरवर्षी माझा वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो आणि त्या दिवशी कुटुंबांकडून किंवा जवळच्या मित्रांच्याकडून मला आनंदी ठेवण्याचा प्रयात सुरु असतो.

सध्या वाढदिवसा दिवशी स्टेटसला ज्याचा वाढदिवस आहे त्याचा फोटो ठेवणे किंवा मग इंस्टाग्राम स्टोरीला आणि किंवा फेसबुक स्टोरीला ज्याचा वाढदिवस आहे त्याचा फोटो लाऊन त्याला टॅग केले जाते आणि त्याला स्पेशीयल फिल दिला जातो.

आम्ही दिलेल्या My Birthday Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा वाढदिवस निबंध मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my birthday in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on how i celebrate my birthday in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on my birthday in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!