26 जानेवारी विषयी माहिती 26 January Information in Marathi

26 January Information in Marathi 2022 – Republic Day Information in Marathi 26 जानेवारी विषयी माहिती खरंतर, प्रजासत्ताक दिनाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यलढा समजून घेऊयात. तर मित्रहो, भारतीय  स्वातंत्र्यलढा म्हणजे आपल्या भारतावर स्वतःची सत्ता उभारण्यासाठी आलेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यानंतर आलेले युनायटेड किंग्डम या दोहोंचे आपल्या देशातील आधिपत्य घालवून एक स्वतंत्र आणि स्थानिक सरकार बनवण्यासाठीची चळवळ होती. सुरुवातीच्या काळात इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या नावाखाली आपल्या देशात वसाहतवाद सुरू केला होता.

त्यामुळे, भारतीय जनतेमध्ये ब्रिटिशांबद्दल नाराजी पसरली. साधारणतः इसवी सन १७५७ ते इसवी सन १८५७ असा आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा प्रदीर्घ काळ होता. ब्रिटिशांनी पहिल्यांदा आपल्या देशात व्यापारी अंमल प्रस्थापित केला आणि त्यानंतर स्वतःचे वर्चस्व भारतीय उपखंडात स्थापित केले.

 26 january information in marathi

26 january information in marathi

26 जानेवारी विषयी माहिती – 26 January Information in Marathi

इतिहास – Republic Day Information in Marathi

अशा प्रकारे, इसवी सन १८५७ च्या प्रखर लढ्यानंतर इसवी सन १९४७ च्या सालापर्यंत भारतीय नागरिकांनी स्वतःच्या देशातील ब्रिटिशांची जुलूमी सत्ता झुगारून देण्यासाठी इंग्रजांशी जवळजवळ ९० वर्षे सातत्याने संघर्ष केला. याखेरीज, संपूर्ण जगभरातील अनेक वसाहतवादी सत्तांच्या विरोधात देखील आपले भारतीय क्रांतिकारक लढले.

त्यामुळेच, अनेक क्रांतिकारकांच्या, भारतीय नेत्यांच्या आणि जनतेच्या संघर्षातून, त्यागातून आणि अमूल्य बलिदानातून अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपल्या देशात अनेक प्रकारचे लढे, स्वतःच्या हक्कासाठीच्या चळवळी आणि सुधारणा झाल्या.

शिवाय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिनांक २९ ऑगस्ट १९४७ रोजी महामानव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण मसूदा समितीची स्थापना करण्यात आली होती.

खरंतर, मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा अर्थपूर्ण मसुदा तयार केला आणि दिनांक ४ नोव्हेंबर १९४७ रोजी भर सभेसमोर सादर केला. तसेच, मसुदा समितीने सार्वजनिक चर्चेसाठी निवडलेल्या सभागृहात संविधानाचा प्रस्ताव साधारणतः १६६ दिवसांसाठी खुला केला आणि त्यानंतर २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधीनंतर या समितीने तयार केलेला मसुदा अंतिम केला.

मित्रहो, या कालावधीमध्ये मसुदा समितीच्या सदस्यांमध्ये बरेचसे विचारविमर्श झाले आणि त्यानुसार मसुद्यामध्ये सुधारणा देखील करण्यात आल्या. अखेर, दिनांक २४ जानेवारी १९५० रोजी मसुदा समितीच्या एकूण ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती या अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये एकत्रितरित्या स्वाक्षरांकित केल्या.

लगेचच दोन दिवसानंतर हा मसुदा, आपल्या भारत देशाचे संविधान म्हणून जाहीर करण्यात आला आणि संपूर्ण राष्ट्रासाठी लागूदेखील झाला. अशा प्रकारे, आपल्या देशाच्या संविधानाच्या निमित्ताने दिनांक २६ जानेवारी १९५० पासून संपूर्ण देशभरात हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.

भारतीय उत्सव

मित्रहो, आपणा सर्वांना माहीत आहे की ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ हा आपल्या लोकशाही असलेल्या भारत देशाच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी यादिवशी खूप उत्साहाने साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. खरंतर, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच दिवशी आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?

तर मित्रांनो, या पवित्र दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आपल्या मसुदा समितीने दिनांक २६ नोव्हेंबर, इसवी सन १९४९ रोजी स्वीकारले आणि त्यानुसार २६ जानेवारी इसवी सन १९५० सालापासून भारताचे स्वतंत्र संविधान अंमलात आणण्यात आले. त्यामुळे, २६ जानेवारी यादिवशी संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

याखेरीज, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिनांक ३१ डिसेंबर, इ.स.  १९२९ साली लाहोर येथील एका रावी नदीच्या काठी भारताचा तिरंगी झेंडा फडकवला आणि आपल्या  स्वराज्याची अर्थात भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

खरंतर, या अनोख्या प्रसंगाची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस खासकरून आपल्या भारताची राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. ज्याप्रकारे १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, अगदी त्याचप्रकारे २६ जानेवारी हा दिन देखील आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून भारतात सर्वत्र साजरा केला जातो.

शिवाय, यादिवशी भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन, तिरंग्याला सगळ्यांकडून मानवंदना दिली जाते आणि सलोख्याने आपल्या देशाचे राष्ट्रगीत म्हटले जाते. तसेच, आपल्या देशाबद्दलचा आदर, देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम यांसारख्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून, उदाहरणार्थ; समूहगीत, भाषण, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नृत्य इत्यादी माध्यमांतून व्यक्त केल्या जातात.

मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाला गणतंत्र दिन असेही म्हटले जाते. शिवाय, या दिवसाला आपल्या देशाचा ‘सुवर्ण दिन’ म्हणून सुद्धा  ओळखले जाते.

कारण, या दिवसाची प्राप्ती कित्येक हजारो देशभक्तांच्या त्यागातून आणि बलिदानातून झाली होती. त्यामुळे, भारतीय क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी दिलेल्या बलिदानासाठी प्रामुख्याने यादिवशी देशभरातील सगळ्या प्राथमिक शाळांपासून ते अगदी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये देशप्रेम या विषयावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.

मित्रहो, कित्येक देशभक्तांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. खरंतर त्यांच्या या त्यागातूनच आपल्या भारत देशाला ब्रिटिशांच्या अन्यायकारक आणि जुलुमी राजवटीतून दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. तसं पहायला गेलं तर आपल्या सर्वांच्याच लक्षात येईल की यामागे भारताचा तीव्र स्वातंत्र्यलढा आणि त्यामध्ये विशेषतः महात्मा गांधी यांच्या अहिंसा तत्व प्रणालीचा मोलाचा वाटा होता.

परंतू मित्रहो, असे असले तरी १५ ऑगस्ट १९४७ नंतर देखील स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान मात्र नव्हते आणि याचे मुख्य कारण म्हणजे त्याकाळी आपल्या देशाचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कलमावर पूर्णपणे आधारलेले होते.

त्यामुळे, दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे संविधान अंमलात आणण्यात आले आणि अशाप्रकारे तो दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून जाहीर करण्यात आला. यादिवशी भारताच्या राजधानीत अर्थात नवी दिल्ली याठिकाणी देशातील सर्वांत मोठे संचलन आयोजित केले जाते. खरंतर, हे संचलन रायसीना हिलपासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत भव्य राजपथ मार्गाद्वारे केले जाते.

याखेरीज, मुख्य  संचलनाला सुरुवात करण्याआधी देशासाठी शहीद झालेल्या अनेक सैनिकांसाठी बांधण्यात आलेले स्मारक आणि अमर जवान ज्योती येथे मुख्यतः आपल्या भारत देशाचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. त्याचबरोबर, उपस्थित सगळेजण डोळे मिटून शांततेमध्ये आपल्या भारतासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात.

अशा प्रकारे, सर्व शहीद सैनिकांना आदरांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर स्थानापन्न होतात आणि या शुभ दिवसा निमित्त उपस्थित असलेल्या पाहुण्यांची भेट घेतात.

खरंतर, याचवेळी आपल्या देशाच्या राष्ट्रपतींचे प्रमुख पाहुण्यांसोबत आगमन होते आणि आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार झाल्यानंतर लगेचच आपल्या देशाचे राष्ट्रगीत देखील सुरु होते. राष्ट्रगीत सुरू असतानाच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. यामध्ये विशेष म्हणजे तिरंगा ध्वज फडकवल्यानंतर आपल्या देशाचे राष्ट्रपती तिरंग्याला एकूण २१ तोफांची सलामी देतात.

राष्ट्रीय ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिल्यानंतर आपल्या देशासाठी शौर्य गाजवलेल्या कर्तृत्ववान सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार बहाल करण्यात येतात.

शिवाय, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली आपल्या देशातील वीर बालके विलक्षणीय पद्धतीने सजवलेल्या हत्तीवरून किंवा एखाद्या वाहनावरून या भव्य संचलनामध्ये सहभागी होतात. मित्रहो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दरवर्षी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित केले जात असेल?

तर मित्रांनो, यादिवशी प्रमुख पाहुणे म्हणून वेगवेगळ्या परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले जाते. आपल्याला माहीत आहे की भारतीय फौजांचे म्हणजेच नौदल, पायदल, वायुसेना या प्रत्येकाचे वेगवेगळे सेनाविभाग, पायदळ, घोडदळ, तोफखाना, अन्य अद्ययावत क्षेपणास्त्रे अथवा शस्त्रे जसे की पृथ्वी, अग्नी इत्यादी., रणगाडे या सगळ्यांच्या समवेत राजपथावर संचलन केले जाते.

यावेळी आपल्या देशाचे राष्ट्रपती तिन्ही फौजांकडून त्यांना दिली जाणारी मानवंदना स्वीकारतात. कौतुकाची बाब म्हणजे या भव्य संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी ही अतिशय काळजीपूर्वक आणि विशेष शिस्तीने केली जाते, त्यामुळे या संचलनात शंभर टक्के अचूकता दिसते. याशिवाय, राष्ट्रीय पातळीवर नवी दिल्ली येथे होणार्‍या संचलनाप्रमाणे भारतातील सगळ्या राज्यांमध्येही विशेष संचलन होते.

शिवाय, ज्या पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर देशाचे राष्ट्रपती फौजांची मानवंदना आदराकृतरीत्या स्वीकारतात, अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.

अशाप्रकारे, सगळ्यांचे डोळे टिपून टाकणाऱ्या प्रजासत्ताक सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता ही एका बीटिंग रिट्रीट ‎या कार्यक्रमाने पार पडली जाते. इसवी सन २०१९ मध्ये गुगलने २६ जानेवारी यादिवशी आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या वेबसाईटच्या भारतीय आवृत्तीवर डुडल दर्शवले होते. सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे २६ जानेवारी यादिवशी त्यांच्या शाळेला सुट्टी असते.

त्यामुळे, या मुलांना सुट्टीच्या हव्यासाने का होईना पण प्रजासत्ताक दिनाची खूप उत्सुकता असते. एकंदरीत, प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सगळयांनाच सार्वजनिक सुट्टी असते.

दिनांक २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी जेंव्हा आपल्या देशाला पुन्हा एकदा नव्याने स्वातंत्र्य मिळालेलं होत, तेंव्हा आपल्या देशाने स्वतःचे असे स्वतंत्र संविधान अंमलात आणून लोकशाहीच्या एका अनोख्या पर्वाची सुरुवात केली होती. मित्रहो, राष्ट्रीय प्रजासत्ताक दिवस हा भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे आणि उर्वरित दोन राष्ट्रीय सुट्ट्या या पुढीलप्रमाणे आहेत; स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर).

प्रजासत्ताक देश म्हणजे काय ?

मित्रहो, वरील माहितीमध्ये आपण प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? याबद्दल जाणून घेतले. आता आपण प्रजासत्ताक देश म्हणजे काय? याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. तर मित्रांनो, ज्या देशामध्ये त्या देशाचा प्रमुख हा वंशावळ वारसाहक्काने निवडला न जाता, लोकशाही अथवा लोकनिर्वाचित पद्धतीने प्रत्यक्षरीत्या/अप्रत्यक्षरीत्या निवडणुकांच्या सहाय्याने निवडून आणला जातो.

शिवाय तेथील सर्व क्षेत्रांतील शासकीय कार्यालये, सरकारी पदे ही त्या  देशातील सर्व सामान्य नागरिकांसाठी खुली असतात, त्या देशाला प्रजासत्ताक देश अथवा गणतंत्र देश असे म्हणतात.

थोडक्यात, प्रजासत्ताक देश म्हणजे “प्रजेची सत्ता” असणारा देश किंवा जिथे लोकांची सत्ता असते असा देश! आपल्या भारत देशाने देखील अशाच प्रकारे स्वतंत्र संविधानाचा स्वीकार करून, लोकशाही देशाची निर्मिती केली आणि देशामध्ये लोकशाहीचे एक पर्व रुजवले. मित्रहो, यांतील लोकशाही म्हणजे “लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेले राज्य होय!”

विशेष संचलन

आपल्या देशातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय संस्था, सरकारी कार्यालये, खाजगी संस्था, ग्रामपंचायती, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद इत्यादी. अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी तिरंगा ध्वज फडकवून स्वतंत्र भारतीय संविधानाप्रती मनापासून आदर व्यक्त केला जातो.

इसवी सन १९५० मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथे राजपथावर देशातील पहिले भव्य संचलन आयोजित करण्यात आले होते. मित्रहो, आपणा सर्वांना माहीत आहे की संपूर्ण जगामध्ये फक्त आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे.

त्यामुळे, भारताच्या विविधतेतून एकता हे वैशिष्ट्य स्पष्टपणे दिसून येतं. एकंदरीत, आपल्या देशात विविध धर्म, जाती, परंपरा, पोशाख पद्धती निरनिराळ्या प्रकारच्या असूनही भारतीय लोक एकत्रितरित्या नांदतात.

त्यामुळे, खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनी एकतेच्या या वैशिष्ट्याला मानवंदना दिली जाते. इसवी सन २०१६ साली साधारणतः ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारच्या शिष्ट समितीतर्फे “मरीन द्राइव्ह” याठिकाणी खूप मोठे संचलन आयोजित करण्यात आले होते. खरंतर, हे संचलन सर्वांना स्वतःकडे आकर्षित करणारे होते.

मित्रहो, इसवी सन १९५० पासून आपला भारत देश प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दरवर्षी विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो. अभिमानाची बाब म्हणजे आपल्या देशात परराष्ट्रीय पाहुण्यांचे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केले जाते. याखेरीज, प्रजासत्ताक दिनी केल्या जाणाऱ्या संचलनाबरोबरच आपल्या देशातील नानाविध संस्कृतींची झलक देखील  प्रस्तुत केली जाते.

विशेषतः यासाठी भारतातील सगळी राज्ये केंद्रीय संचलन आयोजकांकडे स्वतःच्या राज्यांचे चित्ररथ पाठवतात. मित्रहो, या विलोभनीय  सादरीकरणामध्ये आपल्या महाराष्ट्राचा देखील सुरेख चित्ररथ असतो.

खरंतर, या चित्र सादरीकरणाची पूर्वतयारी भारतातील विविध राज्यांचे कलाकार आधीपासूनच करत असतात. शिवाय, या चित्ररथ सादरीकरणाला केंद्रीय सरकारकडून विशेष पारितोषिकही बहाल केली जातात. त्यामुळे, आपल्या देशातील प्रत्येक राज्य परंपरेने चालत आलेल्या आपापल्या संस्कृतीचे दर्शन खूप चांगल्या पद्धतीने, चित्ररथ सादरीकरणात दिसून येईल यासाठी अधिक प्रयत्न करत असते.

मित्रहो, २६ जानेवारी रोजी आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली येथे देशातील सर्वात मोठया परेडचे आयोजन करण्यात येते. खरंतर, “रायसीना हिल ते राष्ट्रपती भवन” या भव्य  राजपथावरून राष्ट्रीय पथसंचलनाचे आयोजन केले जाते.

मित्रहो, प्रजासत्ताक दिनानिमित्त केले जाणारे हे पथसंचलन “याची देही, याची डोळा” या ओळीप्रमाणे अगदी आपल्या सर्वांच्या डोळयांचे पारणे फेडून जाईल असे असते. शिवाय, यादिवशी आपल्या दूरदर्शनवर संपूर्ण दिवस प्रजासत्ताक दिनाबद्दल सांगितले जाते आणि खासकरून हे पथसंचलन पूर्णपणे दर्शवले जाते.

पहिला प्रजासत्ताक दिन

आपण पाहिले की आपल्या भारत देशात पहिला प्रजासत्ताक दिन हा इसवी सन १९५० साली साजरा करण्यात आला होता. इसवी सन १९५० रोजी भारताला स्वतंत्र संविधान मिळालं होतं. याकाळी, डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते. खरंतर, २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशामध्ये पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला होता. 

शिवाय, या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासूनच भारतात वेगवेगळ्या राष्ट्रांतील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांना  प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची नवी परंपरा सुरू झाली होती. याखेरीज, इसवी सन १९५५ मध्ये भारतातील नवी दिल्ली येथे राजपथावरील परेडमध्ये पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले होते. याखेरीज, पहिल्या प्रजासत्ताक दिनाची परेड ही मेजर ध्यानचंद या स्टेडियममध्ये पार पाडण्यात आली होती.

मित्रहो, आपल्या भारताचे संविधान हे संपूर्ण जगातील सर्वात मोठे असे लिखित स्वरूपाचे संविधान मानले जाते. शिवाय, याची विशेषतः म्हणजे भारतीय संविधान हे एका दिवसात पुर्ण वाचून होऊ शकत नाही. भारतीय संविधानामध्ये एकूण ३९५ अनुच्छेद आणि साधारणतः ८ अनुसूची आहेत.

विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनी देशासाठी चांगले कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तींना “अशोक चक्र आणि किर्ती चक्र” यांसारखे दर्जेदार स्थानाचे सन्मान बहाल केले जातात. इसवी सन १९५० मध्ये अर्थात आपल्या देशाच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो हे मुख्य पाहुणे होते.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या भारत देशाचे जे ठळक वैशिष्टय आहे ते म्हणजे ’विविधतेतुन एकता’ निर्माण करणं होय. त्यामुळे, हेच वैशिष्ट्य प्रजासत्ताक दिनी पथसंचलनातुन दाखवले जाते आणि विशेष म्हणजे या वैशिष्ट्याला मानवंदना देखील देण्यात येते.

तसं पहायला गेलं तर आपल्या लक्षात येईल की आजदेखील संपूर्ण जगामध्ये आपल्या भारत देशाची गणना ही शक्तिशाली देशांमध्ये करण्यात येते, ते केवळ आपल्या एकात्मतेच्या वैशिष्ट्यामुळे!

त्यामुळे, मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या या औचित्याने आपण सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा द्यायला हव्यात आणि आपल्या देशाच्या विकासा करता त्याचबरोबर, समृद्धीकरता सर्वांनी एकत्रितरीत्या मिळून एकजूटीने प्रयत्न करण्यासाठी आपण सर्वांनी परमेश्वराजवळ प्रार्थना करायला हवी की एकदिवस आपण सर्वजण आपल्या भारत देशाला संपूर्ण जगातील सर्वश्रेष्ठ देश बनवण्यात यशस्वी होऊ!

                      तेजल तानाजी पाटील

                         बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या 26 january information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर 26 जानेवारी विषयी माहिती मराठी 26 january marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या 26 january republic day in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about 26 january in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Republic Day Information in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!