माझा आवडता पाळीव प्राणी निबंध – My Favourite Pet Animal Essay in Marathi
My Favourite Pet Animal Dog Essay in Marathi
मला कुत्रा हा प्राणी आवडण्याचे कारण म्हणजे कुत्रा हा एक प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखले जाते आणि त्याच्यापेक्षा प्रामाणिक या जगामध्ये कोणीच नाही असे मानले तसेच कुत्रा हा प्राणी मनुष्याला अनेक क्षेत्रामध्ये मदत करतो तसेच घराची राखण करतो आणि आपल्या घरी कुत्रा असला कि आपल्याला तो आपल्या कुटुंबाचा एक भागच वाटू लागतो. कुत्र्याला चार पाय, दोन डोळे, दोन मोठे व तीक्ष्ण कान, एक तोंड व एक तीक्ष्ण नाक असते. तीक्ष्ण नाक आणि कान असल्यामुळेच कुत्र्याची वास घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता अतिशय उत्तम असते.
त्याचबरोबर कुत्र्याला धार धार दात असतात आणि ते विषारी हि असतात तसेच कुत्र्यांना पुढील पायाला पाच तर मागील पायाला चार नखे असतात. पण काही कुत्र्यांना त्यापेक्षा जास्ती नखे असू शकतात आणि कुत्र्याची शरीर रचना असते. कुत्र्याला वास घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण असल्यामुळे कुत्र्याचा वापरा अनेक क्षेत्रामध्ये करतात जसे कि कुत्रा हा पाळीव प्राणी असून देखील त्याचा उपयोग गुन्ह्याचा तपास करण्यासाठी केला जातो म्हणजेच कुत्रा हा प्राणी पोलीस स्टेशन, विमान तळ किंवा देश्याच्या सीमेवर गुन्ह्याचा तपास घेण्यासाठी वापरले जातात.
तसेच कुत्रा हा प्राणी आपल्या वास घेण्याच्या जोरावर ड्रग्स, स्पोटके, काही विशिष्ट पदार्थ, पैसे किवा माणूस अगदी सहज पणे शोधून काढतात. काही कुत्र्यांचा वापर अभिनय करण्यासाठी हि करून घेतला जातो त्याचबरोबर कुत्र्याचा वापर मार्गदर्शन करण्यासाठी, बचाव कार्य करण्यासाठी, युध्द क्षेत्रामध्ये अश्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुत्र्याचा वापर केला जातो आणि कुत्रा हा असा प्राणी आहे जो कोणत्याही क्षेत्रामध्ये असो तो प्रामाणिक पणे आपले काम करतो आणि म्हणूनच मला कुत्रा हा प्राणी खूप आवडतो.
कुत्रा ह्या प्राण्याच्या वैशिष्ठ्या बद्दल सांगायचे म्हटले तर कुत्रा हा प्राणी एक तासाला १९ मैल अंतर पूर्ण करू शकतो त्यामुळे कुत्र्याला वेगवान प्राणी म्हणून देखील ओळखले जाते तसेच कुत्र्याला वास घेण्याची क्षमता उत्तम असते आणि कुत्रा हा प्राणी २४ मीटर अंतरावरील आवाज स्पष्टपणे ऐकू शकतो म्हणजेच त्याची ऐकण्याची क्षमता देखील चांगली असते.
कुत्रा ह्या प्राण्यापासून माणसाला शक्यतो धोका नसतो आणि कुत्रा प्राणी मानवाला कोणत्याही प्रकारची इजा करू शकत नाही आणि जर त्याने इजा केलीच तर ती आपला जीव वाचवण्यासाठी किंवा कोणत्यातरी माणसाने त्यांची कळ काढली तर किंवा त्यांना विनाकारण त्रास दिला तरच करतात.
कुत्रा ह्या प्राण्याच्या आहाराबद्दल सांगायचे म्हटले तर कुत्रा हा प्राणी सर्व प्रकारचे अन्न खातो जसे कि मांस, मासे, दुध व इतर कोणतेही पदार्थ जे सर्वसामान्य लोक खातात. काही कुत्रे पूर्णपणे मांसाहारी अन्न ग्रहण करणारे असतात व ते जास्त आक्रमक पण असतात आणि काही कुत्रे शाकाहारी अन्न हि ग्रहण करतात. सध्या घरगुती पाळीव कुत्र्यांना बाजारातून विकत आणलेले प्रोटीन युक्त आहार (उदाहरणार्थ : पेडिग्री) आपल्या कुत्र्यांना खाऊ घालतात.
प्रत्येक कुत्र्याच्या हालचालीचे काही गुणधर्म किंवा असतात म्हणजे जर कुत्रा जर कुत्रा भुंकत असेल तर तो आक्रमक असतो आणि जर तो शेपूट हलवत असेल तर तो मैत्रीपूर्ण असतो. तसेच कुत्रा जीभ बाहेर काढून ओठांवर फिरवत असेल तर तो एक तर दुखी असतो किवा आनंदी असतो आणि काही कुत्र्यांची शेपूट एकदम सरळ आणि कान पाठीमागे असतील आणि ते भुंकत असतील तर त्यांना दुसरी कुत्री किवा अनोळखी व्यक्ती त्यांच्या area मध्ये आलेली आवडत नाही.
अश्या प्रकारे कुत्रा हा आपल्या भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतो तसेच कुत्रा माणसांच्या भावना देखील समजावून घेण्यचा प्रयत्न करतात ते eye contact करून लोकांच्या भावना समजून घेवू शकतात. जगभरात ४०० हून अधिक जाती आहेत कुत्र्यांच्या आणि त्यामधील काही लोकप्रिय आहेत तर काही जाती नामशेष होत चालल्या आहेत. डॉबरमॅन, लॅब्रेडोर, जर्मन शेपर्ड, बुलडॉग, गोल्डन रिट्रीव्हर, पोमेरेनियन ह्या काही प्रसिध्द कुत्र्यांच्या जाती आहेत.
कुत्रा हा एक प्रामाणिक, एकनिष्ठ आणि प्रेमळ प्राणी आहे हे आपण छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या वाघ्या या कुत्र्यावरून देखील समजू शकतो कारण वाघ्या ह्या कुत्र्याने शिवाजी महाराजांचे निधन झाले तेव्हा वाघ्या ने शिवाजी महाराज्यांच्या चिते मध्ये उडी घेवून आपले हि आयुष्य शिवाजी महाराज्यान सोबत संपवले म्हणून या वाघ्याला स्वामिनिष्ठ कुत्रा म्हणून ओळखले जाते आणि म्हणून मला कुत्रा हा प्राणी खूप आवडतो आणि म्हणूनच आमच्या घरी देखील आम्हीहि एक कुत्रा बाळगला आहे तो आमच्या कुटुंबाचा भाग आहे आणि तो आमच्या घरातील सर्वांचा लाडका आणि आवडता आहे.
आम्ही दिलेल्या my favourite pet animal essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता पाळीव प्राणी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite pet animal dog essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट