सुवर्ण मंदिर मराठी माहिती Golden Temple Information in Marathi

Golden Temple Information in Marathi सुवर्ण मंदिर अमृतसर मराठी माहिती द्रविड स्थापत्यशैलीच अतिशय उत्तम उदाहरण असलेलं सुवर्णमंदिर. आजच्या ब्लॉगमध्ये आपण याचं मंदिरा विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. “हरिमंदिर साहिब” हे “सुवर्णमंदिर” म्हणून देखील ओळखलं जातं. हे मंदिर शीख धर्मीयांच सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आणि प्रमुख गुरुद्वार म्हणून ओळखलं जातं. भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर शहरामध्ये स्थित आहे. हे पंजाबमधील अमृतसर या शहराच मुख्य आकर्षण आहे. सुवर्ण मंदिरात दररोज जवळपास हजारो पेक्षा अधिक भक्त आणि पर्यटक येतात. अमृतसर या शहराचे नाव एका सरोवरावर आधारित आहे. ज्या सरोवराच निर्माण स्वतः गुरु रामदास यांनी आपल्या हाताने केला आहे.

golden temple information in marathi
golden temple information in marathi

सुवर्ण मंदिर मराठी माहिती – Golden Temple Information in Marathi

सुवर्ण मंदिरमाहिती
मंदिराचे नावहरिमंदिर साहिब
उत्सव, यात्राबैसाखी, लोहरी, गुरुनानक पर्व, शहिद  दिवस, संक्रांत
मंदिर कोठे आहेपंजाब राज्यातील अमृतसर शहरामध्ये
मंदिर कोणी बांधलेशिखांचे चौथे गुरु रामदासजी
मंदिराचे दुसरे नाव
पाहाण्यासारखी ठिकाणेबाबा अटल गुरुद्वारा, माता कौलॉं गुरूद्वारा, गुरू का महाल

मंदिराचा इतिहास :

सुवर्ण मंदिर हे कित्येक वेळा नष्ट करण्यात आले होते परंतु भक्तांच्या भक्तिसाठी शिखांनी या मंदिराची पुन्हा स्थापना केली. या मंदिराची दुसरी स्थापना सतराव्या शतकात महाराज सरदार जस्सा सिंह अहलुवालिया यांच्या द्वारा केली गेली होती. जितक्या वेळा हे गुरुद्वार नष्ट करण्यात आले आहे, आणि जितक्या वेळा या गुरुद्वाराची स्थापना करण्यात आली आहे त्या प्रत्येक घटनेची नोंद करण्यात आली आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये अफगाण हल्लेखोरांनी हे गुरुद्वारा पूर्णपणे नष्ट केले होते परंतु महाराजा रणजीत सिंह यांनी हे गुरुद्वार पुन्हा उभारून त्याला सोन्याचा मुलामा दिला होता.‌

१९८४ मध्ये हिंदुस्तान फाडून टाकायचा आणि शेकडो निष्पाप हिंदू शिखांची हत्या करण्याची आशा असलेल्या दहशतवाद्यांनी शिखांचे विश्वासाचे केंद्र असलेल्या हरीमंदिर साहिब वर कब्जा केला आणि त्या जागेचा आपली जागा म्हणून उपयोग केला. सुरुवातीला विश्वासाचा सन्मान करताना सुरक्षा यंत्रणांनी प्रवेश करणे टाळले परंतु दहा दिवस चाललेल्या या संघर्षात सैन्याने अखिर आत घुसून दहशतवाद्यांचा खातमा केला. दहशतवादी भिंद्रनवाले आणि त्यांच्या सदारांकडून शेकडो पाकिस्तान निर्मिती भारी शस्त्रे जप्त करण्यात आली.

मंदिराची वैषिष्ट:

सुवर्णमंदिराला एकूण चार प्रवेशद्वारे आहेत. त्यातील एक द्वार गुरु रामदास यांचा सराय आहे. या सरायामध्ये “गुरू का लंगर” आहे. तिथे अनेक विश्राम स्थळ आहेत. हे लंगर २४ तास चालू असत. त्यामध्ये कोणताही प्रसाद ग्रहण करू शकतो. श्री हरिमंदिर साहिब मध्ये अनेक तीर्थस्थान आहेत. त्यांच्यामध्ये वृक्ष हेदेखील एक तीर्थस्थान मानलं जातं. त्या तीर्थस्थानाची ओळख बैल बाबा बुद्धा अशी आहे. असं म्हटलं जातं जेव्हा सुवर्णमंदिर बनवल जात होत तेव्हा बाबा बुद्धा याच वृक्षाखाली बसून सुवर्ण मंदिराच्या बांधकामावर लक्ष ठेवून होते.

लंगर हे हरिद्वार मधील प्रमुख स्थान आहे‌. त्याचं कारण असं की गुरुद्वार मध्ये येणाऱ्या प्रत्येक श्रद्धाळूची खाण्यापिण्याची व्यवस्था या लंगरमध्ये केली जाते. खाण्यापिण्याची व्यवस्था गुरुद्वार मध्ये येणाऱ्या भक्तांनी अर्पण केलेल्या गोष्टींमधून होते. लंगरमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि त्यांचे नियुक्त सेवादार करतात.

दररोज हजार लोक या लंगर मध्ये प्रसाद ग्रहण करतात. फक्त भोजनच नाहीतर गुरुद्वार मध्ये येणाऱ्या लोकांच्या आश्रयाची सोय देखील इथे केली जाते. या सरायाचा निर्माण १७८४ मध्ये केला गेला होता. ह्या मध्ये २२८ खोल्या आणि अठरा मोठे हॉल आहेत. इथे रात्री आश्रयासाठी चादर व गादी मिळून जाते. एक व्यक्ती तीन दिवसांपर्यंत व्यवस्थित या लंगर मध्ये राहू शकतो.

सुवर्ण मंदिर कोणी बांधले:

“हरिमंदिर साहिब” हे “सुवर्णमंदिर” म्हणून देखील ओळखलं जातं. हे मंदिर शीख धर्मीयांच सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आणि प्रमुख गुरुद्वार म्हणून ओळखलं जातं. भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर शहरामध्ये स्थित आहे. हे पंजाबमधील अमृतसर या शहराच मुख्य आकर्षण आहे. सुवर्ण मंदिरात दररोज जवळपास हजारो पेक्षा अधिक भक्त आणि पर्यटक येतात.

अमृतसर या शहराचे नाव एका सरोवरावर आधारित आहे. ज्या सरोवराच निर्माण स्वतः गुरु रामदास यांनी आपल्या हाताने केला आहे. हे गुरुद्वार सरोवराच्या मध्यभागी स्थित आहे. गुरूद्वार चा बाहेरील हिस्सा सोन्याने बनवला आहे. म्हणूनच या मंदिराला सुवर्णमंदिर असं नाव दिलं गेलं आहे. या गुरुद्वाराची स्थापना शिखांचे चौथे गुरु रामदासजी यांनी केली, तर काही स्तोत्रांमधे असे म्हटले जाते की गुरुजींनी डिसेंबर १५८८ मध्ये लाहोरच्या सुफी संत मिया मीर यांच्या हस्ते या गुरुद्वारा चा पाया घातला.

लुधियाना:

लुधियाना हे भारताचे पंजाब राज्यातील लुधियाना जिल्ह्यात वसलेले एक शहर आहे. हे ऐतिहासिक शहर सतलज नदीच्या काठी १४८० मध्ये वसवले गेले. या नगराचे नाव लोधी राजवटीवर वर आधारित आहे.

गुरुनानकांनी कोणत्या धर्माची स्थापना केली:

शीख धर्माची सुरुवात शीख धर्माचे पहिले गुरू गुरूनानक देव जी द्वारा दक्षिण आशियाच्या पंजाब मध्ये केली होती. तेव्हा पंजाब मध्ये हिंदू आणि इस्लाम असे दोनच धर्म होते. म्हणून गुरू नानक देव यांनी लोकांना शीख धर्माची माहिती देण्यास सुरुवात केली. हा धर्म इस्लाम आणि हिंदू धर्मापासून अतिशय वेगळा आहे. गुरू नानक देव यांच्या नंतर नऊ इतर गुरूदेखील होऊन गेले ज्यांनी पुढे धर्मात बदल घडवून आणला. गुरूनानक देवजी यांनी शीख धर्माची स्थापना केली होती.

शिखांचा एक पंथ:

शीख पंथ भक्ती आणि क्षात्रतेज यांचे सुयोग मिळवून पंजाबातील एक पंथ आहे. शीख म्हणजे शिष्य. शिखांच्या गुरुंचे शिष्यत्व पत्करतो तो शिख. या पंथाचे आद्य गुरु गुरु नानक मूळ हिंदूधर्मीय आहेत.गुरु नानक यांनी त्या काळात इस्लाम लोकांच्या आक्रमणांपासून पंजाबी हिंदूंची राखण करण्याच्या उद्देशाने त्यांनी शीख धर्म सुरू केला.

शीख धर्म :

शीख धर्माची सुरुवात पंधराव्या शतकात गुरुनानक देव यांनी केली होती. शिखांचा धार्मिक ग्रंथ श्री आदीग्रंथ आणि गुरु ग्रंथ साहिब म्हणून ओळखला जातो. शीख धर्मामध्ये त्यांच्या धार्मिक स्थळाला गुरुद्वार असे म्हणतात. शिखांचे एकूण दहा गुरू होऊन गेले परंतु शिखांच्या धार्मिक ग्रंथांमध्ये ६ गुरु आणि ३० भक्तांची बानी आहे. जी शिखांना शीख मार्गावर चालण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते.

मंदिर वास्तुकला:

सुमारे चारशे वर्ष जुनं असणाऱ्या या गुरुद्वारा चा नक्शा खुद्द गुरु अर्जुनदेव यांनी तयार केला होता. गुरुद्वार शिल्पसौंदर्याचे एक उत्तम उदाहरण आहे. गुरुद्वारावर असलेली नक्षी आणि बाह्य सुंदरता बघूनच कोणाच्याही मनाला भुरळ पडेल. गुरुद्वाराला चार दरवाजे आहेत जे चार दिशांन मध्ये खुलतात.( पूर्व,पश्चिम,उत्तर, दक्षिण) त्या काळामध्ये समाज ४ जातीमध्ये विभाजित केला गेला होता.

त्यामुळे विभिन्न जाती यांना अनेक मंदिरांमध्ये जाण्याची अनुमती नव्हती. म्हणूनच या गुरुद्वाराचे चार दरवाजे या चार जातीय लोकांना आमंत्रित करतात. हे गुरुद्वार प्रत्येक धर्माच्या अनुयायींनच स्वागत करते. सुवर्ण मंदिर च्या परिसरात दोन मोठे आणि तिन छोटे छोटे तीर्थस्थळ आहेत. हे सारे तीर्थस्थळ जलाशयाच्या चारी बाजूने पसरले आहेत. या जलाशयास अमृतसर किंवा अमृत सरोवर अशा नावाने ओळखले जाते. संपूर्ण सुवर्णमंदिर संगमरवरी दगडांनी बनवला गेला असून संपूर्ण मंदिरावर सोन्याच्या पानाची नक्षी कोरली आहेत.

सुवर्ण मंदिरामध्ये दिवसभर गुरबाणी चे स्वर गुंजत असतात. शीख गुरूना ईश्वर समान मानतात. सुवर्ण मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी ते मंदिरासमोर नतमस्तक होतात त्या नंतर पाय धवून मुख्य मंदिराच्या पायऱ्या चढतात. सुवर्ण मंदिर एक अतिशय सुंदर इमारत आहे त्यामध्ये प्रकाशयोजना ची सुंदर व्यवस्था केली आहे. मंदिर कॉम्प्लेक्समध्ये एक दगड स्मारक देखील आहे जे सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्थापित केले गेले आहे.

मंदिराचे रहस्य:

या मंदिराची स्थापना अकाल तख्तवर झाली आहे. हे मंदिर बांधले गेले होते तेव्हा त्यावर सोन्याच कोटिंग नव्हतं पंजाब चा राजा महाराजा रणजीत सिंग यांनी एकोणिसाव्या शतकात पंजाबला बाह्य हल्ल्यापासून वाचवले आणि मंदिराचे नूतनीकरण केले ज्यामध्ये गुरुद्वार चा वरचा भाग सोन्याने मढवला‌ गेला. आणि त्याचे सौंदर्य वाढवण्यात आले. सुवर्णमंदिर बांधण्यापूर्वी शिखांचे पहिले गुरू नानक यांनी या ठिकाणी ध्यान केले होते. या गुरुद्वाराला चार मुख्य दरवाजे आहेत जे चारही दिशेने उघडतात या चार दिशांच्या दरवाजांच्या अर्थ असा आहे की कोणत्याही धर्मातील कोणतीही व्यक्ती या मंदिरात येऊ शकते.

जवळजवळ ३५ टक्के पर्यटक शिख सोडून इतर धर्म येथे येतात. दररोज एक लाखाहून अधिक लोक भक्ती आणि पूजेच्या उद्देशाने सुवर्ण मंदिरात येतात. या मंदिराची सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे येथे जगातील सर्वात मोठे स्वयंपाक घर आहे‌. दररोज एक लाखाहून अधिक लोकांना विनामूल्य भोजन दिले जाते. या अण्णाला लंगार म्हणतात हे ‌प्रसाद म्हणून घेतले जाते. या मंदिराची सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे हे मंदिर पांढऱ्या संगमरवरी पासून बनविले गेले आहे जे सोन्याने मढवले आहे आणि म्हणूनच मंदिराला सुवर्णमंदिर असे म्हणतात.‌ यामध्ये शीख धर्माच्या प्राचीन ऐतिहासिक वस्तू ही प्रदर्शित केल्या गेल्या आहेत. त्यांना प्रदेशातील कोट्यावधी लोक बघण्यासाठी येतात.

उत्सव, यात्रा:

सकाळी ११ वाजता दीपोत्सव सुरू होतो. तेव्हा गुरू ग्रंथ साहिब यांना त्यांच्या खोलीतून गुरुद्वारा मध्ये आणले जाते. संगीताचा समूह भजन कीर्तन करत गुरु ग्रंथ साहिब यांची सजावट करून त्यांना पालखी मध्ये बसवले जाते. रात्री गुरु ग्रंथ साहिब यांना त्यांच्या कक्षात परत आणले जाते. प्रसाद(हलवा) व्यवस्थादेखील २४ तास चालू असते. गुरुद्वारामध्ये रोज श्रद्धाळूंच्या रांगा लागलेल्याच असतात. परंतु मे महिन्यात म्हणजेच गरमीच्या दिवसांमध्ये जास्त गर्दी असते. बैसाखी, लोहरी, गुरुनानक पर्व, शहिद दिवस, संक्रांत दिवशी गुरुद्वार मध्ये पाय ठेवायला देखील जागा नसते. ह्याच्या शिवाय सुखासन आणि प्रकाशोत्सव यांचा नजारा देखील मनाला भुरळ पाडणारा असतो. असं म्हणतात साफ मनाने प्रार्थना केल्यावर सगळ्या इच्छा पूर्ण होतात.

सुवर्ण मंदिर फोटो

golden temple information in marathi
golden temple information in marathi

मंदिर कोठे आहे? कसे जायचे? :

सुवर्ण मंदिर हे भारतातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. हे मंदिर पंजाब प्रांतात अमृतसर या शहरात स्थित आहे. मंदिराला भेट देण्यासाठी अमृतसरमध्ये आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा आहे. तिथून टॅक्सी करून गुरुद्वार पर्यंत पोचू शकतो. रेल्वे आणि रोड मार्गे जाण्यासाठी अमृतसर पासून दिल्ली पाचशे किलोमीटर दूर राष्ट्रीय राजमार्ग एक वरती स्थित आहे. आसपासच्या सर्व प्रमुख राज्यांच्या मधून अमृत्सर ला जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहेत.

राष्ट्रीय राज्यमार्ग एक वरती कोणत्याही स्थानकावरून २४ तास बस सेवा उपलब्ध असते. तसेच अमृतसर रेल्वे मार्ग सुद्धा भारताच्या सगळ्या प्रमुख नगरांशी जोडला गेला आहे. जुनी दिल्ली आणि नवी दिल्ली वरून अमृतसरला जाण्यासाठी शान-ए-पंजाब अशी शताब्दी ट्रेन सुटते. यातून आपण पाच ते सात तासांमध्ये अमृतसरला पोहचून अमृत्सर स्टेशन वरून पुढे रिक्षा करून गुरुद्वार ला भेट देऊ शकतो.

पाहाण्यासारखी ठिकाणे:

सुवर्ण मंदिराजवळ “बाबा अटल गुरुद्वारा” आणि “माता कौलॉं गुरूद्वारा” आहे. या दोन्ही गुरुद्वारामध्ये आपण पायी चालत जाऊ शकतो. त्याच जवळपासच “गुरू का महाल” या नावाच एक स्थान आहे. हे हेच स्थळ आहे जिथे सुवर्ण मंदिराच्या निर्माण काळात गुरु येथे राहत होते‌. बाबा अटल गुरुद्वार ही नऊ मजली इमारत आहे. अमृतसर शहरातील ही सर्वात उंच इमारत आहे. हि इमारत गुरु हरगोबिंद सिंह यांच्या मुलाच्या स्मरणात बनवण्यात आली होती. ज्याच वयाच्या अवघ्या नव्या वर्षी निधन झाल.

गुरुद्वाराच्या भिंतींवर असलेले चित्र गुरूनानक देवजी यांची जीवन शैली आणि शीख संस्कृती प्रदर्शित करते. याच्या बाजूला माता कौलॉं यांच गुरुद्वारा आहे. हे गुरुद्वारा बाबा अटल या गुरुद्वारा पेक्षा छोट आहे. हे गुरुद्वार मंदिराच्या अगदी जवळपासच बांधलं आहे. हे गुरुद्वारा दुखी स्त्रीला समर्पित आहे जिला गुरु हरगोबिंद सिहं यांनी येथे राहण्याची परवानगी दिली होती. मंदिराच्या आजूबाजूस अनेक अशी महत्त्वपूर्ण स्थान आहेत. जसं सारागढी़ साहिब गुरुद्वार. हे केसर बागेत स्थित आहे‌.

हे गुरुद्वार १९०२ मध्ये ब्रिटिश सरकारने शिख सैनिकांना श्रद्धांजली देण्यासाठी बांधलं होतं. जे ऐग्लो अफगान या युद्धात शहीद झाले होते. सुवर्ण मंदिराच्या जवळच येतीहासिक जालियनवाला बाग देखील आहे. जिथे जनरल डायरच्या क्रूर तेचे निशाण अस्तित्वात आहेत. तिथे गेल्यानंतर शुर वीरांनी देशासाठी दिलेल्या कुर्बानीच्या आठवणी ताज्या होतात. थोडं अंतरावर भारत-पाकिस्तान सीमेवर स्थित असलेली वाघ सीमा ही एक जागा आहे. इथे भारत आणि पाकिस्तान देशाचे सैनिक आपल्या देशाचा झेंडा  सकाळी आणि संध्याकाळी फडकवण्याचे आयोजन करतात येते. इथे परेड पण होते.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा सुवर्ण मंदिर अमृतसर मराठी माहिती golden temple information in marathi language हे मंदिर कुठे आहे? ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास,  मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा याची थोडक्यात माहिती  दिली आहे. golden temple amritsar information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about golden temple in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही सुवर्ण मंदिर अमृतसर मराठी माहिती विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या golden temple with information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!