माझे आजोबा निबंध My Grandfather Essay in Marathi

My Grandfather Essay in Marathi – Maze Ajoba Essay in Marathi माझे आजोबा निबंध मराठी मित्रांनो, आजोबा हे किती छान आहे. ह्या नावातच किती समाधान आहे. जेव्हा मी शाळा सुटल्यावर घरी येतो तेव्हा मी शाळेचं दफ्तर खांद्यावरून खाली टाकतो आणि लगेच माझ्या आजोबाकडे धावत येजातो. आजोबा अशी हाक मारत मी माझ्या आजोबांना मिठी मारतो. आजोबा मला माझ्या आवडीचे शेंगदाण्याची चिक्की देतात आणि ती खाल्ल्यावर माझ्या मनातला दिवसभराचा थकवा निघून जातो. संध्याकाळी  तेमला फेरफटका मारायला घेऊन जातात आणि माझ्याशी गप्पा मारतात.

my grandfather essay in marathi
my grandfather essay in marathi

माझे आजोबा निबंध – My Grandfather Essay in Marathi

Maze Ajoba Essay in Marathi

मी दिवसभरात काय काय केलं ते विचारून घेतात. शाळेत कोण कोणत्या विषयाचे नवीन शिकायला मिळाले. कोणी काय सरांना प्रश्न विचारले का ? शिकलेल्या भागात काय जास्त आवडले. काय कठीण वाटते?. अशा माझ्या दिवसभरातील सर्व काही गमती जमती विचारून घेतात. पण आता माझ्या लक्षात येते की त्यांच्या या सवयीमुळे त्या त्या दिवशी शिकवलेला अभ्यासाची उजळणी होऊन गेली आहे.

रात्रीचे जेवण झाल्यावर आजोबा मला थोडा फार चालायला घेऊन जातात. कधी कधी मजेत छान आशी गाणी सुद्धा म्हणतात. आजोबांच वय खूप आहे पण आवाज मात्र अजून पण सुरेख आहे. रात्री झोपताना मला छान गोष्टी सांगतात. आणि गोष्टी ऐकल्यावर खूप छान झोप लागते.

आजोबा माझ्यावर खूप प्रेम करतात आजोबा मला खूप आवडतात. मी किती ही मस्ती केली तरी आजोबा माझ्यावर कधीच रागवत नाही. ते माझे नेहमीच कौतुक करतात मला चांगल्या गोष्टी सांगतात. माझ्या अभ्यासात ते मला नेहमी मदत करतात. म्हणूनच मला शाळेत चांगले गुण मिळतात.

माझे आजोबा माझ्या बरोबर खेळतात धिंगाणा मस्ती घालतात. मला बागेमध्ये फिरायला घेऊन जातात. घरामध्ये आई आणि पप्पा माला कधी कधी माझ्या आवडीचे पदार्थ म्हणजे पाणी पुरी, वडापाव, भेल, समोसा खाऊ देत नसले तरी आजोबा माला गपचुप बाहेर नेऊन खाऊ घालतात आणि ते पण खातात. घरातील सर्व व्यक्ती आजोबांचा आदर करतात .

पण जेव्हा ते आमच्याशी थट्टामस्करी करतात तेव्हा ते स्वतः ही हसतात आणि आम्हाला पण हसवतात. आमच्या आजोबां मुळे आमचे सारे घर सदैवी आनंदी असते. म्हणूनच मला माझे आजोबा खूप खूप खूप आवडतात. माझे आजोबा म्हणजे सदैव प्रसन्न आणि नेहमी आनंदी असतात. कधीच घरामध्ये कोणावर चिडले नाही किंवा ओरडले नाही घरामध्ये कधी कुरकुर नाही.

मी तरी त्यांना अजून पर्यंत कधी चिडचिड करताना पाहिले नाही. ते सतत कधीही आणि काहीही विनोद करीत वावरतात . त्यामुळे सर्वांना त्यांचा सहवास आवडतो . त्यांच्याकडे लोकांचा मोठा गोतावळा असतो .

आमच्या सर्व नातेवाईकांना आणिशेजारील सर्व लोकांना आजोबा खूप आवडतात. आजोबा सर्वांची नेहमी गोड बोलतात आणि सर्वांची चौकशी करतात. सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे आमच्याकडे पाहुण्यांची व मित्रमंडळी याची सतत ये जा चालू असते घर माणसांने भरलेलं असते. आजोबा दिसले की सगळ्यांना आनंद होतो. माझ्या आजोबांना टापटीपपणा व स्वच्छतेची भारी आवड आहे. हा गुण तर त्यांच्याकडून घ्यावा असा आहे.

त्यांच्या दिवसाची सुरुवात नेहमी टापटीपपणाने होते. सर्वात आधी ते घरातील सर्व वस्तू जसे टीव्ही, टेबल, खिडक्या इत्यदी सर्व वस्तू व त्यांच्यावरील धूळ ते पुसून काढतात. सुमारे एक तास त्यांची ही साफसफाई चालते. मग ते घरामध्ये लावलेल्या सर्व झाडांना पाणी घालायला जतात त्यांची काळजी घेतात. आधी ते ओलसर कपड्याने रोपट्यांची पाणी हळुवारपणे पुसून घेतात .

ओल्या फडक्याने पुसून घेतली की मग रोपट्यांना पाणी घालतात. आजोबांच्या प्रेमाने जणु रोपटी टवटवीत बनतात. सकाळची सर्व कामे झाली की ते अंघोळ करतात. आणि सकाळचा फेरफटका मारायला बाहेर पडतात. बाहेरून फिरुन परत आले की पुन्हा एकदा चहा घेतात आणि मग त्यांच्या दिनक्रमाला सुरुवात करतात.

तो म्हणजे वाचन. ते रोज तासभर तरी वर्तमानपत्र वाचतात. त्यांना वर्तमानपत्रे वाचायला खूप आवडतात. आजोबा असे बोलतात की रोज वर्तमानपत्र वाचायचे म्हणून आम्ही वर्तमानपत्र मागवतो. ते वाचत असताना आजूबाजूला कोणी असलेल्या व्यक्तींना ते वर्तमानपत्रातील महत्वाची बातमी ऐकवतात.

वर्तमानपत्र वाचताना ते न चुकता शब्दकोश घेऊन बसतात. एखादा शब्द अडला तर कंटाळा न करता शब्दकोशात शब्द शोधतात. मी बाजूला असतो तर त्यांना मदत हवी असल्यास मला शब्द शोधायला लावतात. त्यांच्या या सवयीचा मला इतका फायदा झाला आहे की वर्गात माझा निबंध सगळ्यांपेक्षा चांगला असतो.

मी अभ्यासाला बसतो की त्यांचे माझ्याकडे बारीक लक्ष असते. मी कसा बसतो. पेन कसा धरतो. पुस्तके कसे वाचतो. वही कशी ठेवतो अभ्यास करतोकानाही या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतात. मला पाठांतर करताना मला खूप मदत करतात.

ते दररोजच दहावीच्या वर्षी पाठ्यपुस्तकाचे थोडातरी मजकूर मला मोठ्याने वाचायला सांगतात. मात्र हे सर्व काही कधीच न रागवता. सगळ्या बाबतीत पद्धतशीर व व्यवस्थितपणा असला पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. त्याचीही सवय हळूहळू माझ्या अंगी बाणल्या आहेत .

मी माझ्या वह्यातील सर्व लेखन मन लावून वाचतो आणी ते आणखी चांगले करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या बाई माझ्या लेखनाची नेहमी स्तुती करतात. आणि याचे सर्व श्रेय मी माझ्या आजोबांना देतो.

मनात चांगले विचार ठेवावे त्यानुसार चांगले वागावे आणि हे सर्व नियमितपणे करावे असे त्यांचे सर्वांना सांगणे असते. माझे आजोबा स्वतः तसे वागतात तसे करतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे . त्यांची पावले वंदावी तसेच माझे आजोबा आहेत.

आजोबा घरात सर्वात ज्येष्ठ आहेत आणि आदर्श आहेत आणि घरात प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांचा अनुभव सर्वात जास्त आहे. घरातील प्रत्येकजण त्यांचे ऐकतो आणि त्यांच्याकडून सल्ला घेतो. तो रोज सकाळी लवकर उठतो आणि बागेमध्ये फिरायला जातो. तिथून आल्यानंतर तो आंघोळ करतो आणि आरती करतो.

त्याला चहा पिताना वृत्तपत्र वाचण्याची सवय आहे.तो आमच्याबरोबर खेळतो आमच्याशी गप्पा मारतो आणि आमच्या कामात आम्हाला मदत करतो. आजोबा मला त्याच्या जीवनाशी संबंधित किस्सेही सांगतात. त्यांच्या लहानपणीचे किस्से ऐकायला माला खुप आवडते.

तो मला फिरायला घेऊन जातो. ते माझ्यासाठी टॉफी, चॉकलेट आणि भेटवस्तू आणि माझ्या आवडीचे खेळणी सुद्धा घेऊन येतात. आजोबा त्याच्या गावावर आणि तिथल्या लोकांवर खूप प्रेम करतात.

माझे आजोबा आमच्या कुटुंबाचा खूप महत्वाचा भाग आहेत. अस समझा की आजोबांशिवाय माझ्या कुटुंबाला काही अर्थच नाही. माझ्या आजोबांचे कुंडलिक पुष्पे आहे. या वयातही त्याला चांगले शारीरिक आणि सुदृढ आरोग्य लाभले. त्याची दृष्टी खूप चांगली आहे नाहीतर मी माला खुप कमी वयातच चस्मा लागला आहे आणि त्याची श्रवणशक्ती आजूनही खुप उत्तम आहे. ते सतत आनंदी आणि हसमुख स्वभावाचे मजेदार व्यक्ती आहे.

आजोबा खुप शांत स्वभावाचा माणूस आहे. त्यांना एवढा अनुभव आहे की ते त्यांचे मुद्दे इतरांना बरोबर पटवून देतात. ते एकदम साध्या आणि सरळ सवयीचा माणूस आहे. तो रोज लवकर उठतो आणि लांब मॉर्निंग वॉकसाठी बाहेर जातो. तसे, शेजारचे काही लोक त्यांना बघून त्यांच्यासोबत वॉक ला जातात. तो सतत देवाचे नाम स्मरण करत असतो आणि देवतांना प्रार्थना करतो.

तो थोडा वेळ भगवतगीता सुद्धा वाचतो. ते गीतेतील चांगलें चांगलें विचार सांगतात. माझे आजोबा आर्मी मध्ये होते. ते माला रोज सकाळी योगा आणि व्यायाम करायला सांगतात. ते वयाच्या साठव्या वर्षी आर्मी ऑफिसर म्हणून निवृत्त झाले. सेवेत असताना त्यांनी बरीच प्रतिष्ठा मिळवली होती. त्यांनी देशाची खुप सेवा केली होती.

मुळात ते आपल्या कामासाठी खुप प्रामाणिक होते. त्यांना लोकांची मदत करायला खुप आवडायचे. तो कर्तव्यात कधी ढिलाई करत नव्हता. त्यांनी त्यांच कर्तव्यं खुप हिमतीने आणि ईमानदारीने पारपाडले. त्यांनी त्यांच्या सेवेच्या कार्यकाळात कधीच कोणाला दुखवले नही सर्वांशी हसत खेळत मिळून मिसळून राहिले सर्वांना आनंदी ठेवले. आसे आहेत माझे आजोबा.

आम्ही दिलेल्या my grandfather essay in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझे आजोबा निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maze ajoba essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my grandfather in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maze ajoba short essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!