majhi aaji nibandh in marathi मी लहानाची मोठी आजीच्या कुशीत झाली. माझ्या आजीचे नाव यशोदाबाई. घरामध्ये तिला सर्वजण आईच म्हणून हाक मारायचे. घरात सर्व लहान मुलांची ती आईच होती. आजी स्वभावाने प्रेमळ,समजूतदार आणि हुशार होती. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे घरात कोणी ना कोणी बायका येऊन बसायच्या तिच्याशी बोलायच्या. त्यांचे सुखदुःख आजीला सांगत. आजी चुटकीसरशी त्यांना गोड बोलून खूष करायची. mazi aaji essay in marathi आजीचा तो प्रेमळ स्वभाव मला खूप आवडायचा.
माझी आजी निबंध majhi aaji nibandh in marathi
दारात आलेल्या माणसाला उपाशी कधीच पाठवून देत नाही. घरी आलेल्या पाहुण्याला पण कधी उपाशी पाठवलं नाही. सतत घरामध्ये दोन माणसांचे जेवण जास्तच बनवत असे. आजीच्या हाताला छान चव होती. जेवणामध्ये कोणत्याही प्रकारचा बाहेरचा मसाला न वापरता जेवण बनवायची. तरी जेवण खूप छान बनवायचे कारण तेवढ्याच उत्साहाने आणि प्रेमाने जेवण बनवायची.
- नक्की वाचा: माझी शाळा निबंध
घरामध्ये जेवण बनवायला लागली की त्याची वास अंगणामध्ये यायची. आजीने बनवलेली पुरणपोळी मला खूप आवडायची. पुरण स्वतः पाट्यावर वाटायची आणि पोळ्या बनवायची. जी चव तिच्या हाताला आहे ती दुसऱ्या कोणाच्याही हाताला नाही. माझ्या आजीला तीन मुले होती. माझे बाबा आणि दोन काका.स्वतः अशिक्षीत असूनही त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले. आजीने शेती करून मुलांना शिकवले. आजी शेतात खूप कष्ट करायची. शेतात ऊस,नाचना, भात, मिरची पिकवायची.
आम्ही घरात नऊ भावंडे होतो. ती प्रत्येकाला समान प्रेम करायची. ती कधीच मला ओरडून बोलत नाही. मला असे नाही तर घरात कोणालाही आजी ओरडून बोलत नसे. आई-बाबा कोणी मला काही बोलले तर ती मला पदरात घ्यायची. प्रत्येक गोष्ट प्रेमाने समजून सांगायची. आम्ही नऊ भावंडे जेवढे आमच्या आई-बाबांच्या कडे राहत नव्हतो तेवढे आजीकडे होतो. मला काही सांगायचं असेल,बोलायचं असेल तर सर्वप्रथम आजी कडे धाव घ्यायची. ती एक प्रकारे आमची मैत्रीण झाली होती.
- नक्की वाचा: आवडता ऋतू पावसाळा निबंध
माझ्या आजीला तीन सुना होत्या. तरी आजी स्वतः काम करायची. तिचा दिनक्रम ठरलेला असे. ती सकाळी लवकर उठायची. देव पूजा करायची. आई बाबा कामाला गेल्यानंतर उरलेली कामे करायची, आमची काळजी घ्यायची, आम्हाला खायला घालायची, लहान भाऊ बहिणीला आंघोळी घालायची, त्यांना तयार करायची. संध्याकाळच्या वेळी भजन कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरांमध्ये जायची.
आमच्या घराच्या अंगणामध्ये आंब्याचे मोठे झाड होते. त्यामुळे अंगणात मस्त हवा यायची. आजी रोज संध्याकाळी अंगणामध्ये नातवंडांना घेऊन बसायची. आजीच्या मांडीवर डोके ठेवून झोपण्यासाठी आम्हा सर्व भावंडांमध्ये भांडणं व्हायची. आमच्या डोक्यावरून हात फिरवत.आम्हाला गोष्टी सांगायची. रामायण-महाभारतातील गोष्टी, राजा राणीच्या गोष्टी सांगायची.
- नक्की वाचा: आवडता सण दिवाळी निबंध
या गोष्टी एवढ्या चांगल्या प्रकारे सांगायची की गोष्ट सांगताना त्यातील पात्रे डोळ्यासमोर उभे राहायचे. असं वाटायचं की ती सर्व आमच्या डोळ्यासमोर घडत आहे. आजी दिवसभर काम करायची तरीही संध्याकाळच्या वेळी गोष्टी सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर थोडाही थकवा जाणवत नसे. सतत चेहऱ्यावर हास्य असायचे. आजीला उखाणे घ्यायला खूप आवडायचे. लग्न समारंभ असतील तर शेजारी लोक आजीला उखाणे घेण्यासाठी बोलवायचे. आताचे लोक दळण दळण्यासाठी गिरणी वर जातात, मिक्सर वापरतात पण पूर्वी असे नव्हते त्यावेळी जात्याचा वापर करत.
माझी आजी पण जात्यावर दळण डाळ दळायची. दळण दळताना गाणी म्हणायची. त्या गाण्यांमध्ये नातवंडांचे नाव घालून गॉड सुरात गाणी म्हणायची. आजी दिसायला खूप छान होती. तिच्या कपाळावर मोठे कोरीव कुंकू असायचे, नाकात नथ, नऊवारी साडी, रेशमी चोळी आणि दोन्ही हात बांगड्यांनी भरलेले असायचे. असा आजीचा थाट होता .पण हे सगळे आजोबा असेपर्यंत. आजोबा गेल्यानंतर आजीचा हा सगळा थाट उतरला. पण आजी खुश असते ते फक्त आपल्या मुलांसाठी, नातवंडांसाठी.
माझी आजी कविता
आमच्या घराला घरपण आहे
कारण आजीचं प्रेम
आमच्या नशिबी आहे
प्रार्थना करते देवाला
सुख समृद्धी लाभो माझ्या आजीला
मला वाटते, आम्ही खूप भाग्यवान आहे कारण की आम्हाला आजी-आजोबांचे प्रेम, त्यांचा सहवास लाभला. नाहीतर आज काल आई बाबा नोकरीसाठी बाहेरगावी जातात त्यामुळे मुलांना आजी-आजोबा पासून दूर राहावे लागते. आजी आजोबा मात्र गावीच राहतात. मुलांची आजी-आजोबांची एकमेकांना भेटण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे नाही भेटू शकत.
- नक्की वाचा: माझी शाळा निबंध
मला आजही आठवतं, मी लहान शाळेत असताना गाण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचो, नाटक करत होतो, भाषण करत होतो तेव्हा सर्वात अगोदर आजी येऊन बसायची. कौतुकाने पहायची. हे सगळं पाहत असताना तिच्या डोळ्यात नकळत पाणी यायचे. शेजारी बसलेल्या बायकांना कौतुकाने सांगायची भाषण करते ती माझी नात आहे. घरी आल्यानंतर दृष्ट काढायची मीठ मिरच्या ओवाळून टाकायची.
यामध्ये तिचा भोळेपणा आणि त्यात दडलेले प्रेम होते. जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवून या गालावर बोटे मोडायची.माझे बाळ आज खूप गोड दिसते असं बोलायची तिच्या नजरेतून प्रेम दिसायचे. परीक्षेच्या वेळी मी रात्रीला जागरण करून अभ्यास करायचो. त्यावेळी आजी मला चहा करून द्यायची. जागरण केल्यामुळे डोकं खूप दुखायचं. त्यावेळी आजी डोक्याला तेल लावून मालिश करायची मग डोक शांत राहायचं. माझी आजी शिकलेली नव्हती तरी तिला शिक्षणाचे महत्त्व समजायचं.
आम्ही शिकावं मोठं व्हावं काहीतरी बनावं असं ती सतत म्हणायची. शिकलेली नसूनही तिला व्यवहारज्ञान भरपूर होते. गावी आठवड्यातून एकदा दर बुधवारी बाजार भरायचा. आजी बाजार आणायला जायची आणि तिच्यासोबत मीही जायचे. भाजी खरेदी करताना भाजीवालीला किती पैसे द्यायचे किती घ्यायचे हा हिशोब करताना आम्ही हातावर बोटे मोजायचो पण आजी चुटकीसरशी करायची.
- नक्की वाचा: प्रजासत्ताक दिन निबंध
आजीला जनावरे आवडायची. आमच्या घरामध्ये कुत्रा,मांजर दोन म्हशी आणि दोन बैल होते. या जनावरांबरोबर अशी वागायची जसे काही घरातील इतर व्यक्ती बरोबर बोलते. जसे घरांमध्ये इतर सर्वांसाठी भाकरी बनवायची तसेच कुत्र्यासाठी ही बनवायची. कुत्र्याचे नाव टॉमी. आजीने हाक मारताच तो कुठे असेल तिथून पळत यायचा. आजीच्या भोवती गोल फिरायचा.
कुत्रा मांजर या बरोबरच आजी कोंबड्या पण पाळायची. संध्याकाळच्या वेळी आजी कोंबडी आणि तिच्या पिलांना घेऊन घराच्या पाठीमागे जायची. कोंबडीच्या पिल्लांना घार उचलून घेऊन जाऊ नये म्हणून तिचे बारीक लक्ष असायचे. जसे आपण माणसांबरोबर बोलतो तसे आजी कुत्रा मांजर कोंबडी यांच्या बरोबर बोलायची. ते तिचे मित्रच बनले होते.
आजीचे वेळेनुसार आता वय पण झाले होते. तिचे वय 86. वयानुसार आता चेहरा सुकला होता सुरतुक्या आल्या होत्या तिचे हात थरथरत होते . डोळ्याने व्यवस्थित दिसत नव्हते . त्यामुळे ती चष्मा वापरायची. डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नसले तरी माणसाच्या आवाजावरून कोण आले आहे हे ओळखायची. एवढे वय झाले असूनही तब्येतीने ठणठणीत होती.
तिने एवढ्या मोठ्या परिवाराला एकत्र बांधून ठेवले होते. आजी आहे म्हणून घराला घरपण आहे. फ मु शिंदे यांनी असे म्हटले आहे की आई एक गजबजलेलं गाव आहे पण मी म्हणेल की आजी एक गजबजलेलं गाव आहे. साऱ्या घराला एक ठेवणारी मायेची उब देणारी व्यक्ती म्हणजे आजी.
- नक्की वाचा: शेतकरी निबंध
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “माझी आजी निबंध मराठी” majhi aaji nibandh विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या majhi aaji nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि majhi aaji essay in marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण mazi aaji essay in marathi या लेखाचा वापर majhi aaji short nibandh in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट