nagpur city information in marathi नागपूर शहराचा इतिहास आज आपण या लेखामध्ये २२७.४ किमी चौरस इतके क्षेत्रफळ आणि २५ ते २६ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणारे नागपूर शहर या विषयी माहिती घेणार आहोत तसेच या शहराचा इतिहास काय आहे ते देखील पाहणार आहोत. नागपूर हे शहर नाग नदीच्या काठावर वसलेले आहे आणि म्हणूनच या शहराला नागपूर असे नाव पडले असावे आणि ज्यावेळी भारतामध्ये ब्रिटीशांचे राज्य होते म्हणजेच ब्रिटीश राजवटी मध्ये हे शहर भारताचे केंद्र म्हणून ओळखले जाते होते.हे शहर तसे पर्यटनासाठी देखील खूप चांगले स्थळ आहे.
कारण या शहरामध्ये एकूण ११ तलाव, ३ व्याघ्र प्रकल्प, लता मंगेशकर म्युझिकल गार्डन, जपानी रोझ गार्डन तसेच अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे नागपूर शहरामध्ये भेट देण्यासारखी आहेत. नागपूर हे शहर महाराष्ट्रातील एक महत्वाचे शहर आहे म्हणजेच हे शहर महाराष्ट्रातील तिसरे मोठे शहर आहे आणि हे शहर महाराष्ट्राची हिवाळी राजधानी देखील आहे.
आपण वर सांगितल्याप्रमाणे नागपूर हे शहर नाग नदीच्या काठावर वसलेले आहे आणि या शहराच्या ईशान्यबाजूला सातपुडा पर्वतरांगा पसलेल्या आहेत ज्या २७१ ते ६५३ मीटर पर्यंत लांब आहेत. या शहरातील हवामान हे उष्ण आणि कोरडे आहे आणि उन्हाळ्यामध्ये ४८ अंश सेल्सियस इतके असते. नागपूर हे शहर संत्री या फळासाठी खूप प्रसिध्द आहे आणि म्हणून या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. चला तर आता आपण नागपूर च्या इतिहासाबद्दल आणखीन माहिती घेवूया.
नागपूर शहर माहिती – Nagpur City Information in Marathi
शहराचे नाव | नागपूर |
क्षेत्रफळ | या शहराचे क्षेत्रफळ हे २२७.४ इतके आहे |
लोकसंख्या | २५ ते २६ लाखापेक्षा अधिक |
ओळख | महाराष्ट्रातील तिसरे मोठे शहर आणि राज्याची हिवाळी राजधानी |
आकर्षणे | ११ तलाव, ३ व्याघ्र प्रकल्प, लता मंगेशकर म्युझिकल गार्डन, जपानी रोझ गार्डन तसेच अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे |
नागपूर शहराचा इतिहास – history of nagpur city in marathi
नागपूर हे १७ व्या शतकातील शहर आहे जे नाग नदीच्या काठी वसलेले आहे आणि देवगड राज्याचा गोंड राजपुत्र भक्त बुलंद याने १७ व्या शतकामध्ये सुरवातीच्या काळामध्ये छिंदवाडा जिल्ह्यामध्ये नागपूर या शहराची स्थापना केली किंवा नागपूर हे शहर वसवले जे नाग नदीच्या काठी वसलेले आणि म्हणूनच या शहराला नागपूर असे नाव देखील पडले असावे. गोंड राजपुत्र भक्त बुलंद हा दिल्लीच्या सुसंस्कृत जीवनावर खूप प्रभावी होता.
त्यामुळे त्यांने नागपूर शहर देखील तसे बनवण्याचा प्रयत्न केला तसेच पुढे गोंड राजपुत्र भक्त बुलंद या याचा उत्तराधिकारी चांद सुलतान देखील नागपूर शहराची विकास करण्यासाठी प्रयत्न चालूच ठेवले. चांद सुलतान याचे निधन झाल्यानंतर आणि मग त्यानंतर नागपूरचा उत्तर अधिकारी बनवण्यासाठी अनेकांच्यामध्ये लढत चाली झाली.
त्यावेळी म्हणजेच १७३९ मध्ये बेरार मध्ये असणारा मराठा गव्हर्नर रघुजी भोसले याने आपल्या मोठ्या मुलाला गदिवर बसण्यासाठी प्रयत्न केला आणि हळू हळू मराठ्यांना नागपूर हे शहर आपल्या हातामध्ये घेण्यास यश मिळाले आणि मग मराठ्यांच्याकडे राज्य आल्या नंतर नागपूर हे शहर मराठ्यांची राजधानी बनली.
१८ व्या शतकामध्ये ज्या वेळी ब्रिटीश भारतामध्ये आले त्यावेळी त्यांनी भारतातील अनेक शहरे इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतली आणि यामध्ये नागपूर शहर देखील त्यांनी १८१७ आपल्या ताब्यात घेतले आणि मग तेथील कारभार हा ब्रिटीशांच्या अधिपत्त्याखाली सुरु झाला. १८६१ मध्ये नागपूर हे शहर भारताच्या मध्य प्रांताची राजधानी म्हणून ओळखली जावू लागली आणि १८६७ मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ( GIP ) च्या आगमनाने या शहराचा एक व्यापार केंद्र म्हणून विकास करण्यात आला.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मध्य भारत राज्याची नागपूर हि राजधानी बनली. १९६० मध्ये मराठी बहुसंख्य विदर्भ प्रदेश महाराष्ट्राच्या नवीन राज्यामध्ये विलीन करण्यात आला आणि नागपूरला महाराष्ट्र राज्याची दुसरी राजधानी म्हणून नियुक्त करण्यात आले. अशा प्रकरे नागपूर या शहराचा विकास होते गेला आणि सध्या नागपूर हे शहर महारष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकावरील मोठे शहर म्हणून ओळखले जाते आणि आणि सध्या हे नागपूर या शहराला अनेक पर्यटक देखील भेट देतात.
नागपूर पाहाण्यासारखी ठिकाणे – tourist places
हे शहर तसे पर्यटनासाठी देखील खूप चांगले स्थळ आहे कारण या शहरामध्ये एकूण ११ तलाव, ३ व्याघ्र प्रकल्प, लता मंगेशकर म्युझिकल गार्डन, जपानी रोझ गार्डन तसेच अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे नागपूर शहरामध्ये भेट देण्यासारखी आहेत. खाली आपण काही नागपूर मधील प्रेक्षणीय स्थळे पाहूया.
व्याघ्र अभयारण्य
नागपूर हे शहर व्याघ्र अभयारण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि असे म्हटले जाते कि नागपूर मध्ये तीन व्याघ्र अभयारण्ये आहेत आणि म्हणून याला महाराष्ट्राची व्याघ्र राजधानी म्हणून देखील ओळखले जाते. २०० किलो मीटरचे क्षेत्रफळ असलेल्या अभयारण्यामध्ये वन्यजीव अभयारण्य, उमरेड कऱ्हांडला अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि कान्हा व्याघ्र प्रकल्प आहे तसेच शहरापासून १०० अंतरावर ताडोबा राष्ट्रीय उद्यान देखील आहे.
बाग, तलाव आणि प्राणिसंग्रहालय
नागपूर या शहरामधील बाग, तलाव आणि प्राणिसंग्रहालय हि प्रमुख आकर्षणे आहेत आणि नागपूरमध्ये गोरेवाडा तलाव, अंबाझरी तलाव आणि खिंडसी तलाव हि नैसर्गिक तलाव आहेत अशी सर्व मिळून नागपूर मध्ये ११ तलव आहेत. लता मंगेशकर म्युझिकल गार्डन, जपानी रोझ गार्डन आणि सातपुडा गार्डन हि देखील महत्वाची आणि प्रसिध्द गार्डन्स आहेत.
धार्मिक स्थळे
नागपूर हे शहर धार्मिक स्थालान्च्यासाठी देखील खूप प्रसिध्द आहे. या शहराजवळ रामटेक येथे श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर, गुरुद्वारा गुरुनानक दरबार, कोरडी येथी कोरडी मंदिर, श्री पोद्दारेश्वर राम मंदिर, तेलनखेडी राम मंदिर तसेच बालाजी मंदिर आणि इतर मंदिरे देखील नागपूर शहरामध्ये आहेत.
नागपूर या शहराविषयी काही महत्वाची तथ्ये – facts about nagpur city
- नागपूर हे शहर संत्री या फळासाठी खूप प्रसिध्द आहे आणि या शहरातून संत्री या फळाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते.
- नागपूर या शहराचे क्षेत्रफळ हे २२७.४ किमी चौरस इतके आहे आणि हा शहराची लोकसंख्या हि २५ ते २६ लाख पेक्षा अधिक आहे.
- नागपूर या शहरामध्ये आशियामधील दुसरी सर्वात मोठी हवाई देखभाल कार्यशाळा आहे.
- भारतामधील नववे सर्वात जुने विद्यापीठ हे नागपूर विद्यापीठ आहे आणि हे महाराष्ट्रा राज्यात्तील दुसरे सर्वात जुने विद्यापीठ आहे.
- दख्खनच्या पठारावर वसलेले आणि नागपूर समुद्रसपाटी पासून ३१०.५ मीटर उंची आहे.
- तसेच नागपूर शहर हे मिठाई आणि स्नॅक्ससाठी सर्वात मोठे उत्पादन केंद्र आहे.
- या शहराचे नाव हे नाग नदीवरून पडले आहे.
- या शहरातील हवामान हे उष्ण आणि कोरडे आहे आणि उन्हाळ्यामध्ये ४८ अंश सेल्सियस इतके असते.
- नागपूर हे शहर नाग नदीच्या काठावर वसलेले आहे आणि या शहराच्या ईशान्यबाजूला सातपुडा पर्वतरांगा पसलेल्या आहेत ज्या २७१ ते ६५३ मीटर पर्यंत लांब आहेत.
आम्ही दिलेल्या history of nagpur city in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर नागपूर शहर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nagpur city information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि ucn news nagpur live in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट