दौलताबाद किल्ला माहिती Daulatabad Fort Information in Marathi

Daulatabad Fort Information in Marathi दौलताबाद किल्ल्याची माहिती देवगिरी किल्ला महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक किल्ले आणि त्यांचा इतिहास ऐकायला मिळतो त्याचबरोबर अनेक प्रसिध्द किल्ले आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला असो, तानाजी मालुसारेंनी मालुसरे यांनी आपल्या प्राणाची आहुती देवून जिंकून दिलेला सिंहगड, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला तो रायगड किवा विदेश व्यापाऱ्यांचा भारतीय बाजारपेठे वर वाढता प्रभाव रोखण्यासाठी बांधलेला सिंधुदुर्ग असो असे अनेक किल्ले आहेत आणि त्यामधील एक म्हणजे दौलताबाद ज्याचा इतिहास आपल्या सर्वांना माहीतच आहे.

daulatabad fort information in marathi
daulatabad fort information in marathi

दौलताबाद किल्ला माहिती – Daulatabad Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावदौलताबाद
जिल्हाऔरंगाबाद
स्थापनाइ. स ११८७
संस्थापकयादव राजा भिल्लमा
प्रकारगिरिदुर्ग
क्षेत्रफळ९४ एकर
किल्ल्याची उंची२९७५ फुट
किल्ल्यावरील मुख्य वंशयादव, खिलजी आणि तुघलक
किल्ल्य्वरील मुख्य ठिकाणेचांद मिनार, बारादरी, चीनी महल , कागदाचा पुरा आणि भद्रा मूर्ती मंदिर

दौलताबाद हा किल्ला महाराष्ट्र राज्यामधील औरंगाबाद जिल्ह्यातील दौलत या गावामध्ये आहे या किल्ल्याचे पूर्वीचे नाव ‘देवगिरी’ हे होते ते नंतर बदलून दौलताबाद असे ठेवण्यात आले. हे नाव बहुतेक दौलत या नावावरून ठेवले असावे. दौलताबाद या किल्ला यादव वंशाच्या काळामध्ये बांधला आहे आणि हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. दौलताबाद हा किल्ला दौलत या गावामध्ये एका शंकूच्या आकाराच्या डोंगरावर वसलेला आहे आणि या किल्ल्याचे एक विशेष वैशिष्ठ्ये म्हणजे या किल्ल्यावर अनेक राजांनी राज्य केले परंतु हा किल्ला युध्द करून आणि सैनिक बळावर कुणालाच जिंकता आला नाही तर हा किल्ला शेवट पर्यंत अजिंक्य राहिला. दौलताबाद हा किल्ला हि एक अशी प्राची वस्तू आहे जी महाराष्ट्रामधील सात चमत्कारापैकी एक आहे.

दौलताबाद किल्ला इतिहास मराठी – History of Daulatabad Fort in Marathi

देवगिरी किल्ला इतिहास मराठी – devgiri fort history in marathi

दौलताबाद या किल्ल्याच्या बांधकामाचे श्रेय यादव वंशामधील पाचवा भिल्लमा राजा याला दिले जाते याने हा किल्ला ११८७ मध्ये बांधला आणि तो किल्ला १२९६ मध्ये आपली राजधानी बनवली त्यावेळी हा किल्ला आणि तेथील भाग देवगिरी म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर या किल्ल्यावर अनेक घराण्यांनी राज्य केले त्यामध्ये इ. स. १३०८ मध्ये दिल्ली सल्तनतच्या कालावधीमध्ये या किल्ल्यावर अल्लावउद्दिन खिलजी (म्हणजेच खिलजी राजवंशाने) राज्य केले. त्यानंतर इ. स. १३२७ मध्ये हा किल्ला मुहम्मद बिन तुघलक (ज्याला इतिहासामध्ये वेढा मुहम्मद देखील म्हटले जाते ) याच्या नियंत्रणाखाली गेला.

त्याने त्यावेळी किल्ल्याचे देवगिरी हे नाव बदलून दौलताबाद असे ठेवले तसेच त्याने आपली राजधानी देखील दिल्लीहून हलवली आणि आपली प्रजा देखील त्याने या शहरामध्ये आणली पण या शहरामध्ये पाण्याच्या अभावामुळे त्याने इ. स. १३३४ मध्ये आपली राजधानी परत दिल्ली मध्ये नेली. त्यानंतर लगेचच दौलताबाद हा किल्ला बहामानिंच्या ताब्यात गेला आणि बहामानिंच्या काळात चांद मिनार बांधण्यात आले. इ. स. १४९९ मध्ये हा किल्ला अहमद नगरच्या निजाम शाहीच्या ताब्यात गेला आणि त्यांनी या किल्ल्याला आणखी मजबूत बनवले त्यानंतर १७ व्या शतकामध्ये हा किल्ला मुघलांच्या वर्चस्वाखाली गेला. त्यानंतर हा किल्ला पुढील २ शतकामध्ये मराठा, पेशवे आणि हैद्राबादच्या निजामाच्याकडे देखील गेला.

दौलताबाद किल्ल्याची निर्मिती कोणी केली ? 

दौलताबाद (देवगिरी – प्राचीन नाव) हा किल्ला एक ऐतिहासिक यादवकालीन किल्ला आहे जो यादव राजा भिल्लमा याने इ. स ११८७ मध्ये बांधला गेला आहे. तसेच तुघलक राजवटीच्या काळामध्ये या किल्ल्याला अधिक मजबूत आणि बळकट बनवले.

दौलताबाद किल्ल्याविषयी माहिती 

दौलताबाद हा किल्ला महाराष्ट्र राज्यामधील औरंगाबाद जिल्ह्यातील दौलत या गावाजवळ आहे आणि हा किल्ला औरंगाबाद या मुख्य शहरापासून १६ किलो मीटर अंतरावर आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची २९७५ फुट असून हा किल्ला २०० मीटर उंच असणाऱ्या एका डोंगरावर बांधण्यात आला आहे त्याचबरोबर या किल्ल्याचे संपूर्ण क्षेत्रफळ बहुतेक ९४ एकर असावे. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी एक तटबंदी बांधली होती आणि ती तटबंदीची भिंत ५ किलो मीटर लांबीची आहे. या किल्ल्यावर आपल्याला चांद मिनार, तीन पदरी सुरक्षात्मक घेरा (कालाकोट, महाकोट आणि अंबरकोट), तोफा, चीनी महाल, किल्ल्याचे बुरुज, कागदाचा पुरा, भद्रा मूर्ती मंदिर, पायरी विहीर, गुहा, विविध वाड्या, बरदरी जलाशय या सारख्या अनेक वस्तू आपल्याला या किल्ल्यावर पाहायला मिळतात.

किल्ल्याच्या आतील रचना :

दौलताबाद हा किल्ला ९४ एकर क्षेत्रफळा मध्ये विस्तारलेला आहे. ह्या किल्ल्याचे बांधकाम हे म्हणजे अलौकिक बुध्दीमत्तेचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. या किल्ल्यामध्ये विशिष्ठ हेतूसाठी बांधलेली लहान किल्लेदार क्षेत्रे आहेत आणि टी म्हणजे अंबरकोट जे सामान्य लोकांचे क्षेत्र या किल्ल्यामध्ये आहे, महाकोट हे उच्च सामाजिक लोकांच्यासाठी एक रहिवासी क्षेत्र आहे, कलाकोट हे शाही रहिवासी क्षेत्र आहे आणि बालाकोट जे गडाचे शिखर आहे तेथे ध्वज फडकवला जातो. तसेच या किल्ल्यावर सभागृहे, वाड्या, प्राचीन इमारती, चरण विहिरी, मंदिरे, जलाशय, मशिदी, मिनार यासारख्या अनेक वास्तू पाहायला मिळतात ज्या वेगवेगळय वंशांनी बांधले आहेत. त्याबरोबर तेथे आपल्यला एक अरुंद पूल पाहायला मिळतो ज्यावरून एका वेळी २ माणसे चालू शकतात आणि हि किल्ल्यावर जाण्याची एकमेव वाट होती.

दौलताबाद किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे 

 • चांद मिनार :

आपल्याला दौलताबाद ह्या किल्ल्यावर गेल्यानंतर एक मिनार पाहायला मिळतो जो बहामानिंच्या काळामध्ये बांधला आहे. चांद मिनारला मून टॉवर देखील म्हटले जाते. हा मिनार ६४ मीटर उंच आणि २१ मीटर रुंद आहे आणि त्यामध्ये गोलाकार बाल्कनी देखील आहे. या मिनाराच्या पायथ्याशी आपल्याला एक मशीद देखील पाहायला मिळते.

 • चीनी महल :

चीनी महाल या इमारतीचा उपयोग मुघलांच्या काळामध्ये औरंगजेबाने कैदखाना म्हणून किला होता त्याने अबुल हसन ताना शहा जो गोलकांडाचा राजा होता त्याला १२ वर्ष कैदेत ठेवले होते आणि चीनी महल हि एक या किल्ल्यावरील महत्वाची इमारत आहे जी आपल्याला आज देखील पाहायला मिळते.

 • बारादरी :

बारादरी हि एक १३ मोठ मोठ्या खोल्या असणारी एक भव्य इमारत आहे आणि हि इमारत त्यावेळी शाही महल होती. बारादरी इमारत हि १७ व्या शतकामध्ये शहजानच्या भेटीच्या वेळी बांधली होती.

 • तीन पदरी सुरक्षात्मक घेरा :

दौलताबाद या किल्ल्यावर आपल्याला तीन पदरी सुरक्षात्मक घेरा देखील पाहायला मिळतो. या मध्ये कालाकोट, महाकोट आणि अंबरकोट असे तीन मुख्य भाग आहेत.

 • खोटी दारे :

शत्रूला गोंधळा मध्ये टाकण्यासाठी या किल्ल्यावर खोटी दारे देखील बनवण्यात आली होती. हि दारे देखील आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळतात.

 • हाथी हौद :

हाथी हौद हि एक मोठी पाण्याची टाकी आहे आणि या पाण्याच्या टाकीची क्षमता १०००० घन मीटर आहे.

 • सरस्वती बावडी :

सरस्वती बावडी हि आपल्यला मुख्य प्रवेशदारा जवळ पाहायला मिळते.

 • इतर ठिकाणे :

कागदाचा पुरा, भद्रा मूर्ती मंदिर, पायरी विहीर, गुहा, बरदरी जलाशय, तोड, रंग महल, कला पहाड, लेणी, दुर्गा टोपे या सारखी अनेक ठिकाणे आपल्याला या किल्ल्यावर पाहायला मिळतात.

देवगिरी किल्ला फोटो:

daulatabad fort information in marathi
daulatabad fort information in marathi

किल्ल्यावर कसे जावे ?

आपण ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी या किल्ल्याजवळील आणि मुख्य शहर म्हणजे औरंगाबाद होय. औरंगाबाद हे शहर किल्ल्यापासून १६ किलो मीटर अंतरावर आहे. आपण औरंगाबाद शहरापर्यंत रेल्वेमार्गे, विमानने किवा रस्ता मार्गे जावू शकतो.

 • जर आपल्यला औरंगाबादला रेल्वे ने यायचे असल्यास औरंगाबादचे रेल्वे स्थानक किल्ल्यापासून खूपच जवळ आहे आणि तेथून आपण रिक्षा किवा टॅक्सीने जावू शकतो.
 • जर विमानाने यायचे असेल तर आपल्याला औरंगाबाद विमान तळावर यावे लागते आणि तेथून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी टॅक्सी पकडावी लागते. विमानतळा पासून किल्ल्यापर्यंतचे अंतर २२ किलो मीटर आहे.
 • रस्तामार्गे आपण औरंगाबादला बस ने येवू शकतो किवा आपल्या स्वताच्या खाजगी कारणे देखील आपण येवू शकतो.

टीप :

 • दौलताबाद हा किल्ला सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत पाहण्यासाठी चालू असतो.
 • हा किल्ला पाहण्यासाठी १ ते २ तास लागतात
 • या किल्ल्यावर किल्ला पाहण्यासाठी भारतातील पर्यटकांच्या १० रुपये शुल्क आकाराला जातो आणि परदेशी पर्यटकांच्या कडून १०० रुपये आकाराला जातो.
 • या किल्ल्यावर जर तुम्हाला विडीओ शुटींग करायचे असल्यास २५ रुपये आकारले जातात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, दौलताबाद किल्ला daulatabad fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. daulatabad fort aurangabad information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information of daulatabad fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही दौलताबाद किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!