अहमदनगर किल्ला माहिती Ahmednagar Fort Information in Marathi

Ahmednagar Fort Information in Marathi अहमदनगर किल्ल्याची माहिती हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर आणि भिंगार गावाजवळ सीना नदीच्या काठी वसलेला आहे. अहमदनगर हा किल्ला भुईकोट प्रकारातील असून या किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून ६५७ मीटर इतकी आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. हा किल्ला १५ व्या किवा १६ व्या शतकामध्ये निजाम अहमद शहा बहिरी याने बांधला आहे. त्या काळी अहमदनगर हा किल्ला इंग्रजांच्या वर्चस्वा खाली होता, आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी हा किल्ला भारत सरकारच्या वर्चस्व खाली गेला.

ahmednagar fort information in marathi
ahmednagar fort information in marathi

अहमदनगर किल्ला माहिती – Ahmednagar Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावअहमदनगर किल्ला
ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील अहमदनगर आणि भिंगार गावाजवळ सीना नदीच्या काठी आहे
प्रकारभुईकोट
क्षेत्रफळ२.५ किलो मीटर
उंचीसमुद्र सपाटी पासूनची उंची ६५७ मीटर
आकारगोलाकार
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणेचांदबीबी महल, म्युझियम, गगन महल, बगदाद महल, मीना महल, विहिरी, खंदक, सोन महल. दिवान ए आम, दिवान ए खास, शाही दरबार आणि भारतीय नेत्यांन कैद करून ठेवलेली इमारत.

त्याकाळी निजाम शहा याने अहमदनगर किल्ल्याची स्थापना करण्यासाठी हा किल्ला सीना नदी काठी बांधला असे म्हणतात आणि तेथे शहराची स्थापना करून अहमदनगर हि आपली राजधानी बनवून घेतली. ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहुरू या किल्ल्यावर कैद होते त्यावेळी त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक या किल्ल्यावरच लिहिले. त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये येसू बाई , नाना फडणीस यांना देखील कैद करून ठेवले होते.

अहमदनगर किल्ल्याबद्दल माहिती 

अहमदनगर हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर आणि भिंगार गावाजवळ सीना नदीच्या काठी आहे. हा किल्ला भुईकोट प्रकारातील असून या किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून ६५७ मीटर. हा किल्ला सुमारे २.५ किलो मीटर अंतरावर पसरलेला आहे. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याच्या सर्व बाजूंनी एक खोल खंदक काढलेले आहे आणि खंदकाच्या बाहेरील बाजूस मातीच्या टेकड्या बनवल्या आहेत या खंदकामध्ये त्या पूर्वीच्या काळी सुसरी आणि मगरी सोडलेल्या होत्या. त्याचबरोबर या किल्ल्याला एकूण २२ भक्कम बुरुज आहेत.

येथील राजाने या बुरुजांना आपल्या सेनापतींची आणि प्रधानांची नावे देवून त्यांना गौरव केला आहे. हा किल्ला गोलाकार असून या किल्ल्याच्या भोवती एक संरक्षक गोलाकार तटबंदी देखील आहे जी १८ मीटर उंच आहे. या किल्ल्याला पूर्वीच्या काळी कोटबाग किल्ला म्हणून ओळखले जात होते. या किल्ल्यावर आपल्याला चांदबीबी महल, म्युझियम, गगन महल, बगदाद महल, मीना महल, विहिरी, खंदक, सोन महल या सारख्या इमारती आणि ठिकाणे पाहायला मिळतात. त्या काळामध्ये या किल्ल्याच्या बांधकामासाठी पोर्तुगीज कारागिरांचा वापर केला होता.

अहमदनगर किल्ल्याचा इतिहास – Ahmednagar Fort History in Marathi

हा किल्ला १५ व्या किवा १६ व्या शतकामध्ये निजाम अहमद शहा बहिरी याने सुरुवातीच्या काळामध्ये सीना नदीच्या काठी मातीच किल्ला बांधला होता त्यानंतर हुसेन निझाम शहा याने या किल्ल्याचे मजबूत आणि दगडी बांधकाम करून घेतले. इ. स १५६२ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम सुरु केले आणि हा किल्ला इ. स. १५९६ मध्ये बांधून पूर्ण झाला. या किल्ल्यावर इ. स. १५६२ ते इ. स. १६०० पर्यंत निजाम शाहिचे वर्चस्व होते पण दुसऱ्या युध्दानंतर हा किल्ला इ. स. १६०० मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला आणि त्यांनी इ. स. १६०० ते इ. स. १७५९ पर्यंत या किल्ल्यावर मुगलांनी राज्य केले.

इ. स. १७५९ मध्ये मोगलांचे आणि मराठा युध्द झाले आणि त्यामध्ये मराठ्यांनी मोगलांचा पराभव करून अहमदनगर किल्ला हा आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावर मराठ्यांनी इ. स. १८०३ पर्यंत राज्य केले. त्यानंतर हा किल्ला ब्रिटीशांच्या कडे म्हणजेच लॉर्ड वेलेस्लीने हा किल इ. स. १८०३ मध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. ज्यावेळी महात्मा गाधींनी भारत छोडो आंदोलन केले होते, त्यावेळी इंग्रज सरकारने सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. पी. सी. घोष आणि मौलाना आझाद या सारख्या आपल्यला भारतीय नेत्यांना याच किल्ल्यामध्ये कैद करून ठेवले होते.

ज्यावेळी आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी हा किल्ला भारत सरकारच्या वर्चस्व खाली गेला आणि तो आजतागायत भारत सरकारच्या अधिपत्या खाली आहे.

अहमदनगर पाहाण्यासारखी ठिकाणे

  • दिवान ए आम :

या किल्ल्यावर आपल्याला दिवान ए आम हि इमारत पाहायला मिळते जिथे सर्वसाधारण लोकांना भेटले जायचे त्यांचे प्रश्न सोडवले जायचे.

  • दिवान ए खास :

दिवान ए खास या इमारतीमध्ये खास पाहुण्यांना भेटले जायचे त्यांचा पाहुणचार याच ठिकाणी केला जायचा. हो इमारत देखील आपल्यला किल्ल्यावर पाहायला मिळते.

  • शाही दरबार :

या किल्ल्यावर आपल्याला निजामाचा शाही दरबार पाहायला मिळतो जेथे सर्व सभा होत होत्या आणि हि एक जुनी इमारत आहे.

  • विहिरी :

महमदनगर या किल्ल्यावर आपल्याला ३ ते ४ विहिरी आहेत आणि त्या म्हणजे यमुना, गंगा, शक्करबाई आणि मछलीबाई.

  • बुरुज :

या किल्ल्यावर आपल्यला २२ ते २३ बुरुज पाहायला मिळतात जे शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूवर हल्ला करण्यासाठी बांधले होते. या बुरुजांना त्याकाळच्या राजाने सेनापतींची आणि प्रधानांची नावे दिली आहेत.

  • महल :

या किल्ल्यावर सोनमहल, बगदाद महल, गगन महल आणि मीना महल पाहायला मिळतात.

  • भारतीय नेत्यांना कैद केलेली इमारत :

ज्यावेळी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला त्यानंतर काही काळातच महात्मा गाधींनी भारत छोडो आंदोलन केले होते आणि त्यावेळी ब्रिटीशांनी सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. पी. सी. घोष आणि मौलाना आझाद या सारख्या आपल्यला भारतीय नेत्यांना अहमदनगर किल्ल्यामध्ये कैद केले होते. त्यांना ज्या इमारतीमध्ये कैद करण्यात आले होते ती इमारत तेथे पहायला मिळते. या किल्ल्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये कैद करून ठेवले होते.

अहमदनगर किल्ला फोटो:

 

अहमदनगर किल्ल्यावर कसे जायचे ?

  • अहमदनगर हा किल्ला अहमदनगर शहरापासून २ किलो मीटर अंतरावर आहे आणि या किल्ल्यापासून अहमदनगराचे रेल्वे स्थानक देखील खूप जवळ आहे त्यामुळे कोणत्याही मुख्य शहरातून रेल्वे पकडून अहमदनगर रेल्वे स्थानकापर्यंत येवू शकता आणि तेथून स्थानिक बस किव टॅक्सी पकडून किल्ल्यापर्यंत जावू शकतो.
  • अहमदनगरला आपण पुण्याहून, मुंबई हून बसने देखील जावू शकतो. पुणे आणि अहमदनगरचे अंतर १२१ किलो मीटर इतके आहे.

टीप

  • अहमदनगर किल्ल्याला आपण सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये केव्हाही भेट देवू शकतो.
  • हा किल्ला पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क घेतला जात नाही.
  • अहमदनगर हा आठवड्याचे ७ दिवस उघडा असतो.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, अहमदनगर किल्ला ahmednagar fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. ahmednagar fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about ahmednagar fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही अहमदनगर किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या ahmednagar killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!