अर्नाळा किल्ला माहिती Arnala Fort Information in Marathi

Arnala Fort Information in Marathi अर्नाळा किल्ला माहिती मराठी कोकणामध्ये ज्या ठिकाणी समुद्राला नद्या मिळतात त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी बंदरे बांधलेलेई असायची आणि तेथे विदेशी व्यापार सुरु असायचा आणि याच व्यापाराच्या देवान घेवाणीसाठी बंदरांच्या जवळ किल्ले बांधले जायचे आणि त्यामधील एक किल्ला म्हणजे अर्नाळा किल्ला. अर्नाळा हा किल्ला एक सागरीदुर्ग म्हणजेच हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे आणि हा किल्ला पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा गावाजवळ आहे. वसई शहरापासून हा किल्ला १२ किलो मीटर अंतरावर आहे. हा किल्ला समुद्रामध्ये एका बेटावर आहे त्यामुळे तेथे किल्ल्याच्या चारही बाजूंनी समुद्र आहे. अर्नाळा या किल्ल्याला जंजीर अर्नाळा म्हणून देखील ओळखले जाते.

arnala fort information in marathi
arnala fort information in marathi

अर्नाळा किल्ला माहिती – Arnala Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावअर्नाळा किल्ला
स्थापना१५१६ मध्ये
संस्थापकसुलतान महमूद बेगडा
ठिकाणअर्नाळा हा किल्ला पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यामधील अर्नाळा गावाजवळ आहे
प्रकारजलदुर्ग
क्षेत्रफळ७०० चौ. मीटर
किल्ल्यावरील ठिकाणेअष्टकोनी तलाव, तीन दरवाजे, बुरुज कालिकामाता मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, अष्टकोनी तळे, अंबकेश्वर मंदिर, महादेव मंदिर आणि भवानी मातेचे मंदिर.

अर्नाळा हा किल्ला पहिल्यांदा बाजीराव शिवाजी याने बांधला त्यानंतर इ. स. १५१६ मध्ये या किल्ल्याची पुनर्बांधणी सुलतान महमूद बेगडा याने केली. हा किल्ला व्यापारासाठी महत्त्वाचा आहे हे लक्षात घेवून हा किल्ला मिळवण्यासाठी पोर्तुगीज, मराठा आणि मुगल यांनी लढाया केल्या. अर्नाळा हा किल्ला आकाराने चौरसाकृती असून या किल्ल्याचे क्षेत्रफळ ७०० चौ फुट आहे त्याचबरोबर या किल्ल्याला तटबंदीच्या मजबूत भिंती आहेत आणि या भिंतींची उंची ३० फुट आहे आणि तटबंदीच्या भिंतींना ९ बुरुज आहेत.

अर्नाळा हा किल्ला बेटावर आहे आणि हे बेट पूर्वी गुजरातमधील सुलतानांच्या ताब्यात होता त्यावेळी त्यांनी त्या बेटावर एक किल्ल्यासारखी गढी बांधलेली होती असे पोर्तुगीजांनी इतिहासामध्ये लिहून ठेवले होते. त्यानंतर पोर्तुगीजांनी या बेटावर इ. स. १५३० मध्ये हल्ला केला आणि हे बेट आपल्या ताब्यात घेतले आणि तेथील पूर्वीची गढी पाडून तेथे किल्ल्याची पुनर्बांधणी केली या किल्ल्यावर पोर्तुगीजांनी सुमारे २०० वर्ष राज्य केले त्यानंतर हा किल्ला इ. स. १७३४ मध्ये मराठा साम्राज्यामध्ये आला आणि पहिल्या बाजीराव पेशव्यांनी जुना किल्ला पाडून त्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली.

अर्नाळा किल्ल्याबद्दल माहिती 

अर्नाळा हा किल्ला पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यामधील अर्नाळा गावाजवळ हा किल्ला वसलेला आहे. हा किल्ला वसई शहरापासून १२ किलो मीटर अंतरावर आहे आणि हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याचा आकार आयताकृती आहे. अर्नाळा या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ७०० चौ. मीटर आहे. या किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी किल्ल्याच्या चारही बाजूंनी भक्कम अशी तटबंदी बांधलेली आहे. या तटबंदीच्या भिंतींची उंची जवळ जवळ २५ ते ३० फुट आहेत त्याचबरोबर या तटबंदीच्या भिंतींना एकूण ९ बुरुज आहेत त्यामधील तीन प्रमुख बुरुज म्हणजे भवानी, भैरव आणि बावा.

हा किल्ला वैतरणा नदी जेथे समुद्राला मिळते त्या खाडीच्या मुखाशी हा किल्ला बांधला आहे आणि या किल्ल्याचे चारही बाजूने समुद्र असल्यामुळे या किल्ल्यावर शत्रूला हल्ला करणे देखील अवघड होते. या किल्ल्यामध्ये एकूण तीन दरवाजे आहेत त्यामधी २ आकाराने मोठी आहेत आणि १ छोटा आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा उतरेकडे तोंड करून आहे आणि या दरवाज्याची रचना किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये केलेली आहे. मुख्य दरवाज्यावर हत्ती आणि सिंह या प्राण्यांचे सुंदर नक्षीकाम केलेले आपल्यला पाहायला मिळेल त्याचबरोबर या किल्ल्यावर आपल्यला शिलालेख देखील आहेत. या किल्ल्याच्या आतमध्ये कालिकामाता मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, अष्टकोनी तळे, अंबकेश्वर मंदिर, महादेव मंदिर तसेच भवानी मातेचे मंदिर आहे.

अर्नाळा किल्ल्यचा इतिहास – Arnala Fort history in Marathi

इ. स. १५१६ मध्ये या किल्ल्याची बांधणी सुलतान महमूद बेगडा याने केली. काही इतिहासकारांच्या मते असे म्हंटले जाते कि अर्नाळा हा किल्ला बेटावर आहे आणि हे बेट पूर्वी गुजरातमधील सुलतानांच्या ताब्यात होता त्यावेळी त्यांनी त्या बेटावर एक किल्ल्यासारखी गढी बांधलेली होती असे पोर्तुगीजांनी इतिहासामध्ये लिहून ठेवले होते. त्यानंतर पोर्तुगीजांनी या बेटावर इ. स. १५३० मध्ये हल्ला केला आणि हे बेट आपल्या ताब्यात घेतले आणि तेथील पूर्वीची गढी पाडून तेथे किल्ल्याची पुनर्बांधणी केली.

हा किल्ला व्यापारी मार्गावर असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात महसूल गोळा होत होता त्यामुळे पेशव्यांना देखील असे वाटले कि हा किल्ला आपल्या वर्चस्वा खाली यावा आणि हा किल्ला इ. स. १७३४ मध्ये मराठा साम्राज्यामध्ये आला आणि पहिल्या बाजीराव पेशव्यांनी जुना किल्ला पाडून त्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली त्यानंतर हा किल्ला पहिल्या मराठा-इंग्रज युध्दामध्ये हा किल्ला इ. स. १७८१ मध्ये एग्रजांच्या ताब्यात गेला.

किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे 

 • बुरुज :

बुरुज हा आपल्यला प्रत्येक किल्ल्याच्या रचनेमध्ये पाहायल मिळतो कारण बुरुजांवरून त्याकाळी शत्रूवर लक्ष ठेवले जायचे तसेच बुरुजांवरून तोफांचा मारा लांब पर्यंत केला जायचा. अर्नाळा किल्ल्यावर देखील आपल्याला बुरूज पाहायला मिळतात. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीला एकूण ९ बुरुज आहेत त्यामधील ३ प्रसिध्द बुरुज म्हणजे भवानी, भैरव आणि बावा.

 • तीन दरवाजे :

या किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला तीन दरवाजे पाहायला मिळतात त्यामधील २ मोठे आणि १ छोटा दरवाजा आहे. किल्याचा मुख्य दरवाजा उतरेकडे तोंड करून आहे आणि या दरवाज्याच्या कमानीवर सिंह आणि हत्ती या प्राण्यांचे सुंदर असे नक्षी काम केलेले पाहायला मिळते. किल्ल्याचे दुरसे दार पश्चिम तटबंदीतील बुरुजामध्ये आहे आणि ते देखील उतरेकडे तोंड करून आहे हे डर पाहिल्यानंतर आपल्यला महाद्वार पहिल्याचा भास होईल. जे छोटे दार आहे ते किल्ल्याच्या पश्चिम तटबंदीच्या भिंतीमध्ये आहे.

 • अष्टकोनी तलाव :

किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर पाहायला मिळते त्या मंदिराच्या समोर आपल्यला स्वच्छ पाण्याने भरलेला तलाव पाहायला मिळतो तोच अष्टकोनी तलाव. पूर्वीच्या काळी या तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जायचे.

 • मंदिरे :

अर्नाळा किल्ल्यामध्ये अंबकेश्वर मंदिर, महादेव मंदिर, भवानी मातेचे मंदिर, कालिकामाता मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर पाहायला मिळतात.

 • कबर :

किल्ल्यामध्ये आपल्यला शाहली आणि हज्जाली कबरी पाहायला मिळतात.

अर्नाळ किल्ल्याविषयी काही अनोखी तथ्ये – interesting facts about arnala fort 

 • या किल्ल्यावर नित्यानंद महाराजांच्या पादुका किल्ल्याच्या पूर्वेकडील भागात आहेत.
 • या किल्ल्याच्या प्रवेशदारापाशी आपल्यला वेगवेगळे नक्षीकाम आणि शिलालेख पाहायला मिळतात.
 • किल्ल्याच्या दक्षिण दिशेपासून सुमारे ५५० मीटर मार्टेलो टॉवर पाहायला मिळतो जो इंग्रजांनी १७ व्या शतकात बांधला आहे.
 • या किल्ल्यावर जाण्यासाठी बोटींचा उपयोग केला जातो.
 • या किल्ल्यावर गुजरातचे सुलतान, पोर्तुगीज, मराठा साम्राज्य आणि इंग्रजांनी राज्य केले.

अर्नाळा किल्ला:

arnala killa
arnala killa

अर्नाळा किल्ल्यावर कसे जायचे ? 

 • रेल्वे मार्गे : अर्नाळा हे किल्ल्याजवळचे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे जे फक्त १० किलो मीटर अंतरावर आहे त्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी येणारे लोक अर्नाळा रेल्वे स्थानकावर उतरू शकतात.
 • रस्तामार्गे : या किल्ल्याचे सर्वात जावाचे मुख्य शहर म्हणजे वसई आहे त्यामुळे आपण वसई बस पकडून वसई मध्ये येवू शकतो आणि तेथून अर्नाळा या गावाला जाणारी स्थानिक बस पकडून किल्ला पाहण्यासाठी जावू शकतो.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, अर्नाळा किल्ला arnala fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. arnala fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about arnala fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही अर्नाळा किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या arnala killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही arnala fort virar त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!