राष्ट्रीय पोषण सप्ताह 2023 National Nutrition Week Information in Marathi

National Nutrition Week Information in Marathi राष्ट्रीय पोषण सप्ताह 2022 1 सप्टेंबर ते ७ सप्टेंबर मानवी जीवनात पोषक तत्त्वांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. हे आरोग्य चांगले राखण्यासाठी उत्तम सकस आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि अशा आहारा मधूनच निरनिराळे पोषण आपल्याला मिळत असते. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये पोषणतत्वांची बद्दल आणि आरोग्य बद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी हा पोषण सप्ताह सुरू करण्यात आला. याला इंग्लिश मध्ये न्यूट्रिशनल वीक असेही म्हणतात.

national nutrition week information in marathi
national nutrition week information in marathi

राष्ट्रीय पोषण सप्ताह – National Nutrition Week Information in Marathi

पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो?

सन 1982 मध्ये सर्वप्रथम हा पोषण सप्ताह सुरू करण्यात आला होता. सप्टेंबर 1 ते 7 सप्टेंबर हा पहिला आठवडा पोषण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा पोषण सप्ताह याच्याही आधी अमेरिकेमध्ये सुरू करण्यात आला होता. तिथे या उपक्रमात आरोग्यासंबंधी बरीच जनजागृती करण्यात आली. जीवनसत्वे, प्रथिने, इत्यादी पोषण तत्वांचा निरोगी आरोग्यासाठी किती चांगला वापर होतो हे दाखवून देण्यात आले. त्यामुळे पोषण सप्ताहाला अमेरिकेमध्ये खूप प्रतिसाद मिळाला.

पोषण सप्ताह का साजरा करतात ?

संयुक्त राष्ट्रांनी 2020 मध्ये केलेल्या सर्वेनुसार असे आढळून आले की भारतामध्ये 189 दशलक्ष लोक ही कुपोषित आहेत. म्हणजेच संपूर्ण लोकसंख्येच्या 14 टक्के लोकसंख्या ही कुपोषित आहे. त्यातील 20 टक्के बालकेही कमी वजनाची आहेत. म्हणजेच त्यांचे वजन शरीर यष्टी च्या मानाने अगदी कमी आहे.

तसेच 34 टक्के बालके जी 5 वयोमर्यादे पेक्षा लहान आहे त्यांची उंची खुंटलेली आहे. यावरून असे ध्यानात येते की भारतातील लोकांच्या आहारातील पोषण स्तर खूप मोठ्या प्रमाणात घटला आहे. तर त्यासाठी हा स्तर सावरण्या साठी आणि लोकांमध्ये पोषणा बद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी हा पोषण सप्ताह सुरू करण्यात आला.

पोषण सप्ताहाची ठळक मुद्दे!

भारत सरकारच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयात तर्फे अन्न आणि पोषण समिती कडून हा पोषण सप्ताह सुरू करण्यात आला आहे. हा पोषण सप्ताह योग्य पोषण तत्वे आणि त्याचे कार्य यावर प्रकाश टाकते. त्याबरोबरच मानवी जीवनात आपल्या आरोग्यासाठी संतुलित आहार या पोषण तत्वा बरोबर किती महत्त्वाचा आहे.

हे ही या पोषण सप्ताहाचा मूळ मुद्दा आहे. सध्या भारतामध्ये कितीतरी कुपोषित बालके आहेत आणि त्यांना आपली तब्येत सुधारण्याची नितांत गरज आहे. तर अशा मुलासाठी किंवा बालकांसाठी पोषण आहाराचे महत्व समजावून सांगणे खूप गरजेचे आहे.

पोषण सप्ताह कसा साजरा करतात?

या संपूर्ण सप्ताहात पोषण आहाराचे मूल्य जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे वर्क शॉप, क्षेत्रीय कार्यकर्त्यांचा अभिमुखता प्रशिक्षण कार्यक्रम, जनजागृती शिबिरे आणि समुदाय बैठका. इत्यादी उपक्रम राबविले जातात. आपल्या देशातील ४ विविध प्रदेशांमध्ये अन्न आणि पोषण समिती ने आखलेल्या कम्युनिटी फूड अँड एक्स्टेन्शन युनिट नुसार हा उपक्रम राबवण्यात येतो.

या पोषण सप्ताहात रोगप्रतिकार क्षमता आणि त्याचे महत्त्व, स्तनपान, स्वच्छता आणि स्वच्छतेचे तत्व, अन्न बनवताना पोषण तत्वांचे केले जाणारे संवर्धन , यांसारखे अनेक बाबी वर प्रकाश टाकून सर्वसमावेशक माहिती दिली जाते.

राष्ट्रीय पोषण सप्ताह

 • राष्ट्रीय पोषण सप्ताह जेव्हा मागील वर्षी २०२० मध्ये सप्टेंबर महिन्यात पार पडला तेव्हा “योग्य खा आणि चावून चावून खा” असे ध्येय ठेवण्यात आले होते.
 • त्यापूर्वी २०१८ साली “पदर्थांसोबत पुढे चला” असे उद्दिष्ट ठेवून पोषण सप्ताह राबवण्यात आला होता.
 • आणि २०१७ साली ‘चांगल्या बाल आरोग्यासाठी इष्टतम अर्भक आणि लहान मूल आहार पद्धती’  या तत्वावर पोषण सप्ताह साजरा केला गेला.

मानवी जीवनात पोषणाचे महत्त्व!

मानवी शरीरासाठी जगण्यासाठी अन्न हे पूर्णब्रह्म असते. अन्नातून बरेच जीवनसत्व, प्रथिने, लोह, मिनरल इत्यादी घटक जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि उत्तम संगोपनासाठी आवश्यक आहेत ते मिळत असतात. त्यामुळे आपण जर अन्नातून किंवा आपण जो काही आहार घेत असतो त्यामधून मिळणाऱ्या पोषण तत्वांकडे दुर्लक्ष केले तर आहारासंबंधीचे बरेच रोग उद्भवू शकतात.

त्यामुळे आहार आणि त्यातून मिळणाऱ्या पोषणाचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे असते. पोषनाचे फायदे पुढील प्रमाणे आहेत.

 • आपल्या शरीरात शक्ती निर्माण होते.
 • निरनिराळ्या साथीच्या रोगापासून आपला बचाव होतो.
 • आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते किंवा वाढते.
 • वाढत्या वयाबरोबर येणारे आजार हे लांबणीवर पडतात.
 • सकस आहार ग्रहण केल्याने आपले मन सुद्धा प्रसन्न आणि सकारात्मक राहते.
 • योग्य पोषणामुळे आपले आरोग्य चांगले राहून वयोमर्यादा वाढते.
 • तसेच योग्य संतुलित आहारातून मिळणाऱ्या घटकामुळे आपले आयुष्य ही संतुलित होऊन एकग्रता वाढते.

आहारातील पोषण मूल्यांच्या अभावामुळे कुपोषण होते. त्यामुळे शरीर यष्टीवर बाहेरून आणि आत मधून खोलवर वाईट परिणाम होतात. त्यामुळे कुपोषण के आहे हे ही आपण थोडक्यात पाहूया!

कुपोषण

आहारातील पोषण मूल्यांच्या कमतरतेमुळे शरीराची शारीरिक वाढ न होण्याच्या अवस्थेला कुपोषण म्हणतात. आर्थिक मिळकत कमी असणे, कामाचा त्रास, जेवणासाठी पुरेसा वेळ न मिळणे इत्यादी सारख्या कारणामुळे पोषण तत्वे कमी प्रमाणात मिळतात.

 1. कुपोषणामुळे वाढ मंदावणे, कमी वजन यासारखे लक्षणे दिसू लागतात. त्याच बरोबर खालील प्रमाणे काही लक्षणे आढळतात.
 2. भूक मंदावणे किंवा खाण्यातील रस निघून जाणे.
 3. थकवा जाणवणे.
 4. एकाग्रता करण्यासाठी अडचण होणे.
 5. नेहमी थंडी वाजने.
 6. अंगातील मेद, स्नायू, उती यांची संख्या कमी होणे.
 7. आजारी पडण्याची शक्यता वाढणे आणि बरे होण्याची शक्यता कमी होणे.
 8. जखमा बऱ्या होण्यास वेळ लागणे.
 9. शस्त्र क्रिया केल्यास ती बिघडण्याची शक्यता वाढणे.

तर यांसारख्या बऱ्याच कारणा पासून बचाव करण्यासाठी आपण आपले शरीर निरोगी राखले पाहिजे. त्यासाठी लागणारी माहिती ही पसरवण्यासाठी पोषण सप्ताह यासारखे उपक्रम राबविले जातात.

आम्ही दिलेल्या national nutrition week information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “राष्ट्रीय पोषण सप्ताह 2022″ बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about national nutrition week in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि world nutrition week information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये national nutrition week in marathi Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर nutrition week in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!