नितीन बानगुडे पाटील माहिती Nitin Bangude Patil Biography in Marathi

Nitin Bangude Patil Biography in Marathi – Nitin Bangude Patil Information in Marathi नितीन बानगुडे पाटील जीवन परिचय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य आणि यांचा इतिहास आजच्या पिढीतील कमी लोकांना माहित आहे याचीच खंत वाटते. आणि म्हणूनच इतिहास अभ्यासक नितीन बानगुडे पाटील हे आजच्या पिढीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी माहिती देण्याचे काम करत आहेत. संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करत आहेत. मराठी भाषेवर त्यांचा पगडा आहे व त्यांच्या तेजस्वी वाणीमुळे त्यांची अनेक भाषणे प्रसिद्ध आहेत ते एक प्रेरणादायी वक्ते देखील आहेत. आजच्या लेखामध्ये आपण नितीन बानगुडे यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

nitin bangude patil biography in marathi
nitin bangude patil biography in marathi

नितीन बानगुडे पाटील माहिती – Nitin Bangude Patil Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)नितीन बानगुडे पाटील
जन्म (Birthday)२५ मे १९७७
जन्म गाव (Birth Place)सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)इतिहास अभ्यासक

Nitin Bangude Patil Information in Marathi

जन्म

२५ मे १९७७ रोजी नितीन पाटील यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे झाला. सर्वसामान्य इतर मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे त्यांच कुटुंब होतं. त्यांचं संपूर्ण नाव नितीन संपतराव बानगुडे पाटील आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांचे मुळगाव रहिमतपूर येथून पूर्ण झालं. नितीन पाटील यांनी सातारा येथून बीएडच शिक्षण पूर्ण केलं. कराड येथून बी.जे च शिक्षण पूर्ण केलं. आणि पुढे त्यांनी पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एमएमसी ही पदवी संपादन केली. नितीन पाटील हे प्राध्यापक लेखक इतिहास अभ्यासक व प्रेरणादायी वक्ते आहेत.

नितीन पाटील चौथीमध्ये असताना पहिल्यांदा वकृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झाले तेव्हा ते पहिल्यांदा व्यासपीठावर उभे राहिले होते. पहिली वकृत्व स्पर्धा आणि पहिल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक. पुढे त्यांनी असंख्य वकृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि तब्बल एकशे सत्तावीस वकृत्व स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. आज ते सुप्रसिद्ध वक्ते आहेत. ज्यांची ख्याती सातासमुद्रापार पसरली आहे. त्यांचे वडील त्यांना गावामध्ये नेहमी कीर्तन ऐकण्यासाठी घेऊन जायचे आणि तिथूनच नितीन बानगुडे पाटील यांना आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आवड निर्माण झाली.

कारकीर्द

नितीन बानगुडे पाटील एक प्राध्यापक, इतिहास अभ्यासक, लेखक व प्रेरणादायी वक्ते आहेत. त्यांची व्याख्याने ऐकण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात. त्यांच्या भाषणाच मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची तेजस्वी वाणी. महाराष्ट्रातील तमाव बांधवांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगण्यासाठी ते महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपरा मध्ये भाषणे देतात. आपल्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल माहिती आहे.

परंतु जर छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख विचारली किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले यांची नावे विचारली तर सगळ्यांची दातखिळी बसते. अजुनही आपल्या समाजामध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल काहीच माहिती नाही आहे आणि आपल्या इतिहास किती महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव लोकांना व्हावी म्हणून ते जागोजागी भाषणे देतात. नितीन पाटील यांनी इतिहासाचा गाढा अभ्यास केला आहे.

आज आपल्या इतिहासाची माहिती देणारे अनेक कथा,‌ पुस्तक उपलब्ध आहेत परंतु त्यांच्यामध्ये कितपत योग्य माहिती दिली असेल याची आपल्याला कल्पना नाही. परंतु आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून नितीन पाटील यांची धडपड चालू आहे. लहानपणापासूनच नितीन पाटील यांनी असंख्य वकृत्वस्पर्धा मध्ये सहभाग घेतला होता. परिणामी त्यांचं एक उत्तम वक्ता मध्ये ‌रूपांतर झालं.

जेव्हा जेव्हा त्यांची व्याख्याने आयोजित केली जातात तेव्हा अनेक श्रोते अगदी आवडीने त्यांच्या व्याख्यानांना उपस्थिती लावतात. शंभुराजे, वंदे मातरम अशी महानाट्य नितीन पाटील यांच्या लेखणी मधून उतरली आहेत. या नाटकांचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर सादर करण्यात आले. जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. इतिहासाचा प्रचंड अभ्यास असणारे नितीन पाटील यांचे भाषण ऐकताना अंगावर अक्षरशः काटा येतो कारण ते इतिहासात घडलेल्या प्रत्येक क्षण अतिशय उत्तम रित्या त्यांच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवतात.

त्यांच्या भाषणातून त्यांच्या वाणी मधून त्यांना आपल्या स्वराज्याचा इतिहासाची किती माहिती आहे याची जाणीव होते. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ते नेहमीच तत्पर असतात. ते आपल्या श्रोत्यांना गड किल्ल्यांचे महत्त्व सांगून प्रबोधन घडवण्याचं काम करत आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्या दुर्ग साहित्य संमेलनाच आयोजन केलं आहे. गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थात्मक कार्यात त्यांचा सहभाग असतो.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व व जतन येणाऱ्या पिढीने करावे असं त्यांचं म्हणणं आहे यासाठी त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली आहे. प्रताप सृष्टी जेथे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा जन्म झाला, त्यानंतर स्वराज्याचे प्रवेशद्वार वर्धनगड किल्ला, पुढे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे जन्मगाव तळबीड इत्यादी ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या स्मृती जपणाऱ्या हुतात्मा स्मारकांचे जतन व संवर्धनासाठी भरीव कार्य केले आहे. वृक्ष लागवड आणि पर्यावरण रक्षण व्हावे म्हणून त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत.

येणारी पिढी ही आपल्या देशाचं भवितव्य निश्चित करेल म्हणूनच या पिढीला योग्य ते मार्गदर्शन मिळायला हवं आणि यासाठी नितीन पाटील यांनी जणू मशालच हाती घेतली आहे. तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचं काम ते करतात. त्यांनी युवकांसाठी स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन यांसारखे कार्यक्रम राबवले आहेत इतकेच नव्हे तर ग्रामीण भागातील युवकांसाठी स्वयंउद्योग कसा करावा याचे मार्गदर्शन ते देत आहे. नितीन पाटील यांना वाचनाची अतिशय आवड आहे.

इयत्ता सातवी मधे असताना नितीन पाटील यांनी रहिमतपूर येथील वाचनालयात प्रवेश घेतला होता आणि आणि त्यांची दहावी पूर्ण होईपर्यंत त्यांनी त्या वाचनालयातील संपूर्ण पुस्तके वाचून काढली होती. ही गोष्ट खरं तर अतिशय अशक्य वाटते आहे परंतु नितीन बानगुडे पाटील यांनी शक्य करून एक उत्तम उदाहरण जगासमोर मांडलं आहे. ते नेहमी त्यांच्या श्रोत्यांना व जेव्हा ते नवीन पिढीला करियर गायडन्स देत असतात तेव्हा ते त्यांना नेहमी अधिक वाचन करायला सांगतात.

तरुणांना मार्गदर्शन करताना ते नेहमी असं सांगतात की प्रत्येकाने नेहमी पुस्तके वाचली पाहिजेत पुस्तकाने मस्तक सुधरते आणि जे मस्तक सुधारलेल असतं ते मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. नितीन पाटील यांचे हे विचार ते उत्तम प्रेरणादायी वक्ते असल्याचे दाखले देतात. आज पर्यंत नितीन बानगुडे पाटील यांनी पाच हजारपेक्षा अधिक व्याख्याने पूर्ण केली आहेत. आणि या सगळ्याची सुरुवात झाली जेव्हा ते पंचवीस वर्षाचे होते त्यांना बऱ्याच लोकांनी व्याख्यानरुपी मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रण दिलं होतं.

आलेली संधी त्यांनी अशीच जाऊ दिली नाही आणि बघता बघता अगदी वर्षभरातच व्याख्याने देण्यासाठी ते साडेतीन लाख किलोमीटर दूर जाऊ लागले. त्यांच्या संघर्षाला कशाची तोड नाही आहे. आज अनेक तरुण मुलं त्यांचे मार्गदर्शन घेऊन आयुष्यामध्ये पुढे जावून सकारात्मक बदल घडवून आणत आहेत. याचं सगळं श्रेय नितीन बानगुडे पाटील यांना जातं महाराष्ट्रातील युवापिढी घडवण्यामध्ये त्यांनी मोलाची भर दिली आहे.

लाखो शेतकरी दरवर्षी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात अनेक विद्यार्थी अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या करतात या समस्या अतिशय गंभीर आहेत. आणि याच्या वरती कोणीतरी मार्ग काढायला हवा याची जाणीव नितीन पाटील यांना आहे म्हणूनच त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी वेगवेगळे प्रेरणादायी उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या व्याख्यानांना जमलेली गर्दी त्यांच्या कार्याची पोचपावती देते.

२०१४ मध्ये नितीन बानगुडे पाटील यांनी शिवसेना या राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला. प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची सातारा सांगली येथील संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. २०१६ मध्ये नितीन बानगुडे पाटील यांची शिवसेनेच्या उपनेते पदावर नियुक्ती करण्यात आली आणि २०१८ मध्ये महाराष्ट्र शासन कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. एक उत्कृष्ट वक्ता १०००० मधून एकदा जन्म घेतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे नितीन बानगुडे पाटील आहेत. त्यांच्या सारख्या महान वक्त्यांची गरज या महाराष्ट्राला आहे.

आम्ही दिलेल्या Nitin Bangude Patil Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नितीन बानगुडे पाटील माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Nitin Bangude Patil information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Nitin Bangude Patil in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!